एप्रिल १
<< | एप्रिल २०२३ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९१ वा किंवा लीप वर्षात ९२ वा दिवस असतो.
एप्रिल महिन्यात भारतात (बहुधा) कडक उन्हाळा असतो. त्या काळात चैत्र-वैशाख हे हिंदू महिने असतात.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
सहावे शतकसंपादन करा
- ५२७ - बायझेन्टाईन सम्राट जस्टिन पहिला याने स्वतःचा भाचा जस्टीनियन पहिला यास आपला वारसदार घोषित केले.
सतरावे शतकसंपादन करा
१६६९ -उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.
एकोणिसावे शतकसंपादन करा
१८२६ : इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.
१८६९ : भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.
१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
विसावे शतकसंपादन करा
१९१२ : भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.
१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
१९२८ : पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला. यापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असे म्ह्टले जाते.
१९३३ : भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण
- १९३५ - भारतीय रिझर्व बँकेची स्थापना.
- १९३६ : ओरिसा राज्याची स्थापना झाली. १९५४ : भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या. १९५५ : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती. १९५७ : भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१ रुपया =१०० नवे पैसे). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी. १९५७ : बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली. १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरू झाले. १९७३ : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात झाली. १९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्न’ १९९७ : हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १२२० - गो-सागा, जपानी सम्राट.
- १६२१ - गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
- १८८९ - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- १९०७ - भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म. १९१२ : पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व ( - २६ सप्टेंबर १९८८) १९३६ : तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री १९३७ : मोहम्मद हमीद अन्सारी - भारताचे १३वे उपराष्ट्रपति
- १९४१ - भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.
मृत्यूसंपादन करा
- १०८५ - शेन्झॉॅंग, चीनी सम्राट.
- १२०४ - एक्विटेनची एलिनोर, इंग्लंडचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.
- १९८४: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
- १९८९:श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
- १९९९:श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक
- २०००:संजीवनी मराठे – कवयित्री
- २००३:प्रकाश घांग्रेकर – गायक व नट
- २००६:राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
- २०१२:एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- एप्रिल फूल्स दिन
- उत्कल दिवस, ओरिसा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - (एप्रिल महिना)