एन.के.पी. साळवे
नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे उर्फ एन.के.पी. साळवे (१८ मार्च, १९२१ - १ एप्रिल , २०१२) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक अनुभवी भारतीय राजकारणी, संसदपटू आणि क्रिकेट प्रशासक होते. ते माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष होते. तसेच त्यांनी १९८७ मध्ये क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या काढून भारतीय उपखंडात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. साळवे हे विदर्भाच्या वेगळ्या राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते.[१][२]
वैयक्तिक आयुष्य
संपादनसाळवे यांचा जन्म मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे १८ मार्च १९२१ रोजी मराठी ख्रिश्चन पालक प्रसादराव केशवराव साळवे आणि कॉर्नेलिया करुणा जाधव यांच्या घरी झाला.[३] त्यांचे वडील उज्जैन येथील वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांची आई मराठी भाषिक, प्रसिद्ध विद्वान, स्वातंत्र्यसैनिक आणि गणित विषयात सन्मान पदवी प्राप्त करणारी भारतातील पहिली महिला होती. साळवे यांचे आजोबा केशवराव साळवे हे शालिवाहन घराण्याचे वंशज होते.[४]
साळवे यांनी बी.कॉम. आणि FCA पदवी प्राप्त केली होती. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी क्रिकेटची आवड जोपासली होती.[५][१]
साळवे यांचे १ एप्रिल २०१२ रोजी नवी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, नागपुरात नेण्यात आले, जिथे त्यांना स्थानिक ख्रिश्चन स्मशानभूमीत दफन करण्यात आले. त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.[६]
त्यांचा मुलगा, वकील हरीश साळवे यांनी १९९९ ते २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. त्यांना एक मुलगी अरुंधती आहे.[७] त्यांच्या पत्नीचे त्यांच्या आधी निधन झाले होते.[२]
संदर्भ
संपादन- ^ a b "NKP Salve: Statesman, raconteur & visionary". द टाइम्स ऑफ इंडिया. 2 April 2012.
- ^ a b "Salve made Asia a cricketing force". द हिंदू. 1 April 2012.
- ^ "NKP Salve, who brought '87 world cup to sub-continent, passes away in Delhi". इंडिया टुडे. 2 April 2012.
- ^ "PK SALVE".
- ^ "Rajya Sabha Members: Biographical Sketches 1952 – 2003: S" (PDF). Rajya Sabha website.
- ^ "Mortal remains of NKP Salve laid to rest in Nagpur". Zee News. 2 April 2012.
- ^ "Harish Salve declines second term". द हिंदू. 30 October 2002. रोजी मूळ पानापासून संग्रहित24 January 2005. 28 March 2008 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)