मे २५
दिनांक
(२५ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
मे २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४५ वा किंवा लीप वर्षात १४६ वा दिवस असतो.
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादनपंधरावे शतक
संपादन- १४५८ - महमुद बेगडा, गुजरातच्या सुलतानपदी आला.
सतरावे शतक
संपादन- १६५९ - रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८१० - सेमाना दि मेयो - आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले.
- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.
- १८९५ - फोर्मोसाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९२६ - युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.
- १९३५ - जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले.
- १९३८ - स्पॅनिश गृहयुद्ध - अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.
- १९४० - दुसरे महायुद्ध - डंकर्कची लढाई सुरू.
- १९४६ - अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.
- १९५३ - अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली.
- १९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
- १९६१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने "दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस" पाठवण्याची घोषणा केली.
- १९६३ - इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना.
- १९७९ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार.
- १९८१ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.
- १९८२ - फॉकलंड युद्ध - आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.
- १९८५ - बांगलादेशमध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार.
- १९९५ - बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.
- १९९७ - सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला
- २००२ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
- २००२ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
- २००३ - नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २०२४ - गुजरातच्या राजकोट शहरातील गेमझोन या करमणूक केन्द्रात लागलेल्या आगीत होरपळून ३३ मृत्युमुखी.
जन्म
संपादन- १०४८ - शेन्झॉॅंग, चीनी सम्राट.
- १३३४ - सुको, जपानी सम्राट.
- १७१३ - जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८०३ - राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९०७ - उ नु, म्यानमारचा राजकारणी.
- १९३६ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७० - मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ९६७ - मुराकामी, जपानी सम्राट.
- १०८५ - पोप ग्रेगोरी सातवा.
- १२६१ - पोप अलेक्झांडर चौथा.
- १५५५ - हेन्री दुसरा, नव्हारेचा राजा.
- १९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.
- १९९९ - डॉ. बी. डी. टिळक, संचालक - पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा.
- २००१ - नीला घाणेकर, गायिका.
- २००५ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- मे क्रांती दिन- आर्जेन्टिना, लिब्या.
- राष्ट्र दिन - जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना.
- आफ्रिका मुक्ती दिन- चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे.
- मुक्ती दिन - लेबेनॉन.
- युवा दिन - युगोस्लाव्हिया.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)