धाराशिव जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.
(उस्मानाबाद जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख धाराशिव जिल्ह्याविषयी आहे. धाराशिव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


धाराशिव जिल्हा (पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा) हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक जिल्हा आहे. हैद्राबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकरच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्या गेले. पुढील सुनावणी होईपर्यंत, म्हणजे १० जून २०२३ पर्यंत जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. मात्र शहराचे नाव धाराशिव कायम आहे.[] यांचे जिल्हा मुख्यालय धाराशिव शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ किमी भाग हा शहरी आहे.

धाराशिव जिल्हा
Dharashiv
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
धाराशिव जिल्हा चे स्थान
धाराशिव जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग
मुख्यालय धाराशिव
तालुके धाराशिवतुळजापूरउमरगालोहाराकळंबभूमवाशीपरांडा
क्षेत्रफळ
 - एकूण ७,५६९ चौरस किमी (२,९२२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,६०,३११ (२०११)
-लोकसंख्या घनता २२१ प्रति चौरस किमी (५७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७६.३३%
-लिंग गुणोत्तर १.०८ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे
-लोकसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघ
-विधानसभा मतदारसंघ उमरगा विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद विधानसभा मतदारसंघतुळजापूर विधानसभा मतदारसंघपरांडा विधानसभा मतदारसंघ
-खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर (२४ इंच)
संकेतस्थळ


नामांतर

संपादन

महाराष्ट्र राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी राजपत्र प्रकाशित करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जिल्हा असे अधिकृतपणे बदलले आहे. यासोबतच उस्मानाबाद उपविभाग, उस्मानाबाद तालुका आणि उस्मानाबाद गाव/शहर यांचे देखील नावे बदलण्यात आले.[][]

जिल्ह्याचे भौगोलिक स्थान

संपादन
  • अक्षांश : १७.३५ ते १८.४० उत्तर
  • रेखांश : ७५.१६ ते ७६.४० पूर्व.

धाराशिव जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्याच्या नैऋत्येला आहे. जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात. धाराशिवच्या नैऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा व दक्षिणेला कर्नाटकातील बिदरगुलबर्गा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान डोंगराने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, धाराशिव आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७,५६९ चौरस किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ किमी आहे. (एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).[]

जिल्ह्याचे हवामान

संपादन

धाराशिव जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.

लोकसंख्या

संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या ही १६,५७,५७६ एवढी आहे. धाराशिव १००० पुरुषांमागे ९२० स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते आणि साक्षरता दर ७६.३३% होता. मराठी ही येथील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.[]

जिल्ह्यातील तालुके

संपादन

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

संपादन
  • तुळजाभवानी मंदिर हे प्रसिद्ध भवानी देवीचे हिंदू मंदिर तुळजापूरात बाला घाटाच्या टेकडीवर आहे. हे मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी मंदिरात येत असत. हे भवानीमातेचे मंदिर धाराशिव पासून २५ कि.मी.वर, सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
  • कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
  • परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. परांडा शहरापासून जवळ डोमगाव येथे समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची समाधी आहे. तसेच सोंनारी येथे भैरवनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे महाराष्ट्रतील सर्वात मोठी यात्रा येथे भरते आणि ती सात दिवस चालते महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे.[]
  • श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर - धाराशिव पासून १५ कि.मी. श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमहाराजांचे एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे.
  • रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते धाराशिव पासून २० कि.मी.च्या अंतरावर सोलापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील येडशी या गावात आहे. येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात. तसेच भरपूर पाऊ पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षण ठरू शकतो. हा डोंगराळ प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे. त्यामुळे प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
  • इतर पर्यटनस्थळे - संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर, कन्हेरी दत्तमंदिर, तसेच नळदुर्ग येथील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे.
  • धाराशिव हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातच्या मध्यभागी आहे. दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक परराज्यांतूचन व विदेशातून उरसासाठी येतात.
  • तसेच तेर (ता.धाराशिव) येथील पुरातणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट

धाराशिव येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. धाराशिव जिल्हा उस्मानाबादी शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आई तुळजाभवानी ही कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात. जिल्ह्यातील नळदुर्ग येथील जलदुर्ग आणि परंडा येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहेत. नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्यानुसार बांधलेला असून, येथील जलमहाल हा वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नळदुर्ग जवळ अणदूर येथील खंडोबाचे मंदिर, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, डोमगाव येथील कल्याणस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहेत.

या जिल्ह्यामध्ये परंडा व नळदुर्ग या ठिकाणी किल्ले आहेत. तुळजापूर या ठिकाणी तुळजा भवानीचे भव्य मंदिर आहे. धाराशिव शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बालाघाट डोंगर रागामध्ये वसलेले गाव आहे. त्याजवळ तुळजाभवानी देवीचे मंदिर जवळ लाभले गेले आहे. त्या ठिकाणी प्रसिद्ध असे हतलादेवी मंदिर ही आहे. श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे धाराशिवपासून १५ कि.मी. अंतरावर दत्तमहाराजांचं एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था

संपादन

नगरपरिषद

संपादन

जिल्ह्यात एकूण ८ नगरपरिषद आहेत.

  • धाराशिव[]
  • कळंब
  • भूम
  • परांडा
  • तुळजापूर
  • नळदुर्ग
  • उमरगा
  • मुरुम

नगरपंचायत

संपादन

धाराशिव जिल्ह्यात एकूण २ नगरपंचायत आहेत.

  • वाशी
  • लोहारा बुद्रुक

जिल्हा परिषद

संपादन

धाराशिव जिल्ह्यात एकूण ५४ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ गट आहेत.

 • पारगाव  • पारा  • वाशी  • तेरखेडा

 • कानेगाव  • माकणी  • सास्तूर  • लोहारा  • जेवळी

 • ईटकूर  • डिकसळ  • नायगाव  • शिराढोण  • खामसवाडी  • मोहा  • येरमाळा

 • कवठा  • बलसूर  • दाळींब  • येणेगूर  • गुंजोटी  • आलूर  • कदेर

 • ढोकी  • पळसप  • कोंड  • तेर  • येडशी  • अंबेजवळगा  • उपळा  • सांजा  • पाडोळी  • केशेगाव  • बेंबळी  • वडगाव  • इर्ला  • दाऊतपूर  • भंडारवाडी  • डकवाडी  • सारोळा  • दारफळ • पवारवाडी  • कोळेवाडी  • शिंदेवाडी  • सकनेवाडी  • चिखली • समुद्र्वाणी  • केकस्थळवाडी  • धारूर  • बेंबळी  • पोहनेर  • वाघोली  • काजळा  • हिंगलाजवाडी  • वाणेवाडी  • रामवाडी {{*}टाकळी  • पानवाडी  • मोहतरवाडी  • बुकणवाडी  • कावळेवाडी  • गोरेवाडी  • गोवर्धनवाडी  • खेड  • बावी  • वरूडा  • बलपीरवाडी  • मेडसिंगा  • म्हालांगी  • बरमगाव  • आंबेगाव  • गौडगाव  • रुईभर  • अनसुर्ड  • उतमी कायापूर  • बोरी  • कामठा  • वरवांटी  • राघुचीवाडी  • अम्बेहोळ  • खानापूर  • घातंग्री  • शिंगोली  • अळणी  • किणी  • मुळेवाडी  • तुगाव  • भिकार सारोळा  • जागजी  • तावरजखेडा  • सुम्भा  • नितळी  • लासोना  • मेंढा  • एकंबीवाडी  • बोरखेडा  • पळसवाडी  • बेगडा.

 • ईट  • पाथरूड  • वालवड  • माणकेश्‍वर

 • लोणी  • डोंजा  • शेळगांव  • अनाळा  • जवळा

 • सिंदफळ  • काक्रंबा  • मंगरूळ  • काटी  • काटगाव  • अणदूर  • जळकोट  • नंदगाव  • शहापूर

वाहतूक

संपादन

राष्ट्रीय महामार्ग क्र. ९- हैद्राबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. २११- गदग-कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ हा धाराशिव शहरातून जातो

धाराशिव शहर मध्य रेल्वेवर, लातूर रोेड - मिरज या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. धाराशिव येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर, पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला, नागपूर, हैद्राबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

धाराशिव जिह्यात एस.टी.ची उत्तम वाहतूक आहे. धाराशिव मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस.टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. धाराशिव बसस्थानकावरून धावणारी तुळजापूर-धाराशिव-छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते. धाराशिव येथून राज्यातील जिल्हा मुख्यालये, प्रमुख शहरे, पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैद्राबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत

जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांकासह- []
१) राष्ट्रीय महामार्ग ५२- संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव-तुळजापूर-सोलापूर-विजापूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक)
(जिल्ह्यातील या महामार्गावरील गावे- पारगाव-कुंथलगिरी फाटा-तेरखेडा-येरमाळा-येडशी-धाराशिव-तुळजापूर-तामलवाडी)

२) राष्ट्रीय महामार्ग ६३- बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड-लातूर-उदगीर-निझामाबाद(तेलंगणा)-सिरोंचा(महाराष्ट्र)-जगदलपूर(छत्तीसगढ)-कोतापड (ओडिशा)-बोरीगुम्मा

३) राष्ट्रीय महामार्ग ६५- पुणे-इंदापूर-सोलापूर-उमरगा-हैद्राबाद-विजयवाडा-मच्छलीपट्टणम(आंध्र प्रदेश)
(जिल्ह्यातील या महामार्गावरील गावे- अणदूर-नळदुर्ग-जळकोट-येणेगूर-दाळिंब-उमरगा-तुरोरी)

४) राष्ट्रीय महामार्ग ३६१- तुळजापूर-लातूर-अहमदपूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-बुटीबोरी (नागपूर जवळ)

५) राष्ट्रीय महामार्ग ५४८बी- मंठा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी-अंबाजोगाई-लातूर-औसा-उमरगा-येणेगूर-मुरूम-आलूर-अक्कलकोट-नागणसूर-विजापूर-अथणी-चिक्कोडी-संकेश्वर-गोतूर(कर्नाटक)

६) राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी- सातारा-कोरेगाव-म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभूर्णी-बार्शी-येरमाळा-कळंब-केज-माजलगाव-परतूर-मंठा-लोणार-मेहकर-खामगाव-शेगाव-अकोट-अंजणगाव-बैतूल(मध्य प्रदेश)

७) राष्ट्रीय महामार्ग ६५२- तुळजापूर-अणदूर-नळदुर्ग-हन्नूर-अक्कलकोट

संदर्भ

संपादन
  1. ^ "उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय". daily hunt. 2023-04-20. 2023-03-19 रोजी पाहिले.
  2. ^ https://marathi.abplive.com/news/osmanabad/entire-aurangabad-district-is-now-named-chhatrapati-sambhajinagar-while-osmanabad-district-is-named-dharashiv-gazette-release-1210098
  3. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/aurangabad-district-renamed-as-chhatrapati-sambhajinagar-osmanabad-to-be-known-as-dharashiv-cabinet-meeting-cm-eknath-shinde-decision/articleshow/103707030.cms
  4. ^ http://osmanabad.nic.in/newsite/DistrictProfile/location_m.htm
  5. ^ ""District Census 2011 - Osmanabad"" (PDF).
  6. ^ "ऐतिहासिक चित्रावरून रेखाटले कल्याणस्वामी". लोकसत्ता. 2022-03-29 रोजी पाहिले.
  7. ^ "mieknathshinde Instagram post".
  8. ^ Details of National Highways (NHs) as on 31.03.2019

बाह्य दुवे

संपादन