मेहकर
मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील नदी पैनगंगा वाहते.मेहकरचे जागतिक भूषण मेहकरच्या तीन गोष्टी जागतिक दर्जाची भूषणास्पद आहेत.(१) येथील त्रिविक्रम विष्णू शारंगधर बालाजी मूर्ती व मंदिर. (२) जगप्रसिद्ध अकरांपैकी सहावे नरसिंह स्थान व मंदिर येथे आहे. ही मूर्ती जवळपास १५०० वर्षे (उत्तर चालुक्य काळातील) जुनी असून इ. स. १५६९ मध्ये भूगर्भात सापडून मंदिरात पुनर्स्थापित करण्यात आली. (३) आदिशक्ती मुक्ताबाईच्या परंपरेतील संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे (ॐब्रह्मी श्वासानंद सरस्वती) यांचे गुरूपीठ श्रीक्षेत्र ज्ञानमंदीर, श्री नरसिंह संस्थान मेहकर येथे आहे. त्यांचा शिष्यवर्ग भारत व भारताबाहेर पसरलेला असून त्यांचे चरित्र दिव्य व बोधप्रद आहे.
मेहकर तालुक्यात चैत्र, श्रावण, भाद्रपद व मार्गशीर्ष या महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. तालुक्यात असलेल्या एका गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये येथे बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.
संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे
मेहकर,जिल्हा बुलडाणा येथे परमहंस परिव्राजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचे ज्ञानमंदीर हे हंस संप्रदायाचे गुरूपीठ तसेच प्राचीन कालीन एकादश नृसिंहातील ६वे प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह मंदिर असून येथे विद्यमान गुरुपीठाधिश ॲड.रंगनाथ महाराज पितळे (बाबासाहेब)यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धार्मिक,पारंपरिक, सामाजिक कार्यक्रम होतात.
संत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर मूळ नाव संत बाळाभाऊ महाराज पितळे जन्म इ.स.१८८८ मेहकर येथे झाला.त्यांची संजीवन समाधी श्री श्वासानंद आश्रम, जंगमवाडी,वाराणसी(उ.प्र.) येथे पौष कृ.१२,इ.स.१९३० रोजी झाली. 'कुलदैवत - भगवान प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह,मेहकर उपास्यदैवत - लक्ष्मीनृसिंह, दत्त,विठ्ठल संप्रदाय- वारकरी संप्रदाय+दत्त संप्रदाय+नाथ संप्रदाय=हंस संप्रदाय गुरू- आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, विश्रांती मठ,नाव्हा,जि.जालना उत्तराधिकारी'- द्वितीय गुरूपीठाधीश वै.दत्तात्रय महाराज पितळे(१९३०-१९४०), तृतीय गुरूपीठाधीश वै.दिगंबर महाराज पितळे(१९४०-१९९५),चतुर्थगुरूपीठाधीश ॲड.रंगनाथ महाराज पितळे(विद्यमान) दिंडी'-विदर्भातील पहिली मेहकर ते पंढरपूर, पैठण,मुक्ताईनगर, माहूर, घ्रुष्णेश्वर या दिंड्या प्रारंभ. कार्य- अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन,समरसता,दिंड्या,ब्राह्मणेतरांच्या मौंजी,धर्मशुद्धी,गायत्रीमंत्र सर्वांसाठी खुला करणे,वारकरी संप्रदायात अष्टगंध बुक्का लावण्याचे प्रचलन,नामसप्ताह,चातुर्मास, यज्ञ, प्रसिद्ध वचन- विश्वासोफलदायकः,ज्ञानमंदीराचा दगडही वाया जाणार नाही, यहा ज्ञानमंदीरमे नम्रताका सर ऊॅंचा है और सेवा यह महाव्रत है,तुम्ही तरूनी विश्व तारा, संबंधित तीर्थक्षेत्रे -श्री क्षेत्र ज्ञानमंदिर मेहकर,विश्रांती मठ नाव्हा,श्वासानंद आश्रम वाराणसी, पंढरपूर, गायत्रीसिद्धपीठ,मुर्डेश्वर,विश्वासानंद संस्थान कांबी, टाकरवन,माहेरखेड शिष्यसंख्या-अंदाजे १०लाख प्रकाशने- श्वासानंद माऊली,दत्तबादशहा, माऊली सार,संप्रदाय संहिता, पादपद्म परागाष्टक,सच्चित सुख घनदेव,श्रीगुरू कल्पतरू सागर संपर्क प्रा.डॉ. श्रीहरी रंगनाथराव पितळे, ज्ञानमंदीर, मु.पो.ता.मेहकर, जि.बुलढाणा. मो.८००७४६१६८६,९४२०१८२५६६,९४०४८६७३०४,९०११८५२९८८ वेबसाईट http://balabhaumaharajpitale.in/ Archived 2018-01-17 at the Wayback Machine.
जन्म व बालपण संत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर हे वारकरी संप्रदायाचे एक संत होते. पितळे घराण्याच्या नऊ पिढ्यांच्या भगवान लक्ष्मीनृसिंहाच्या उपासनेचे फळ म्हणून १८८८ मध्ये पैनगंगा नदीच्या तीरी भगवान नृसिंहाने बाळाभाऊ महाराजाच्या मेहकर रूपाने अवतार घेतला, अशी कल्पना आहे.
गुरुदीक्षा जालना जिल्ह्यातील नाव्हा गावात बाळाभाऊ पितळे यांना आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराजांची गुरुदीक्षा मिळाली,
हंस संप्रदायाची स्थापना गुरुदीक्षा मिळाल्यावर बाळाभाऊ महाराजांनी नाथसंप्रदाय दत्तसंप्रदाय मी वारकरी संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम असणारा हंस संप्रदाय रूढ केला. विदर्भातून पहिली पायी दिंडी पंढरपूरला नेली. ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो नामसप्ताह यज्ञ सोहळे आयोजित करून प्रत्येक चातुर्मासात पंडरपूरची पायी वारी करून सर्व जातिधर्माच्या लोकांना भक्तिमार्गात आणले. जातिभेद निर्मूलन धर्म शुद्धीकरण आणि समाज परिवर्तनासाठी महाराजांनी लक्षणीय कार्य केले. त्रैवर्णिक यांच्या मौंजीबंधनांचा समारंभ त्यांनी आयुष्यात दोनदा आयोजित केला.
चमत्कार मृतास जीवदान, पुत्रहीनास पुत्रप्राप्ती, गरीब भाजीवालीच्या थैलीतून हजार रुपयांचे दान करणे, नदीतील पाण्याचे तूप करून पंक्तीस वाढणे, पाण्याचे दिवे लावणे, जिवंत वाघाची पूजा, माहूरच्या रेणुका मातेच्या मूर्तीस प्रसाद खाऊ घालणे, स्वतः कालकूट विष पचवणे यासारखे अनेक चमत्कार बाळाभाऊ महाराजांनी केले अशा आख्यायिका आहेत. त्यांच्याकडील मूक प्राणीसुद्धा एकादशीच्या दिवशी काही खात नव्हते, असे सांगितले जाते.
संजीवन समाधी चारही आश्रमांचे पालन करून सन १९३०मध्ये काशी बनारस इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते. बाळाभाऊ मार्गांच्या कृपाप्रसादाची अनुभती भक्तांना त्यानंतरही येत असते, असे म्हणतात. वैकुंठवासी दत्तात्रय महाराज आणि वैकुंठवासी समर्थ सदगुरू दिगंबर महाराज यांनी त्यांचा वारसा अखंड चालविला होता. विद्यमान हंस संप्रदायाच्य गुरुपीठाच्या गादीवर (२०१७ साली) ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे ऊर्फ बाबा साहेब आहेत.
पुन्हा दर्शन चारही आश्रमांचे पालन करून १९३०मध्ये काशी इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते, असे सांगतात.
ज्ञान मंदिर परिसर मेहकर पितळे महाराजांची दिंडी विदर्भातील ही पहिली दिंडी असून यात जवळपास शंभर वारकऱ्यांचा समावेश असतो. ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहचते.
आषाढी वारी (पंढरपूर) आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारी वारकरी पदयात्रा
मेहकर शहर आणि तालुका
संपादनमेहकर हे अजिंठ्याच्या पर्वत रांगेत वसलेले शहर आहे. शहराजवळून पैनगंगा नदी वाहते. आधीच हा सुपीक भूभाग होता आणि त्यातच कोराडी, उतावळी, पेनटाकळी या सिंचन प्रकल्पांमुळे तालुक्यातील ओलीत क्षेत्रात वाढ झाली. १९०१ मध्ये मेहकर शहराची लोकसंख्या ५ हजार ३३० होती. १९८१ च्या जनगणनेनुसार ती २२ हजार ३८२ तर, आता ६० हजारावर पोहोचली आहे. जुन्या मेहकर तालुक्यात मेहकरसह लोणार व सिंदखेड राजा तालुक्यांचा समावेश होता. आजही तिन्ही तालुक्यांची विविध खात्यांची उपविभागीय कार्यालये मेहकर शहरातच आहेत.
इतिहास आणि धार्मिक स्थाने
संपादनमेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्य प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. महानुभाव पंथाचे भगवान चक्रधरस्वामींचा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वसिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत.
मंदिरे, मठ, मढी यांची मोठी देण मेहकरला आहे. गावकोट, कमानी, यज्ञकुंडे, शिलालेख यांची रेलचेल आहे. येथे पूर्वी सोन्याचे खांब असलेले वाडे होते. पेंढारी लोकांच्या स्वाऱ्यांनंतर येथील सुबत्ता कमी होत गेली. ऐतिहासिकदृष्टय़ा प्रसिद्ध शिवाजीराजाचे आजोळ व जिजाबाईचे माहेर सिंदखेडराजा, व खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमाकांचे सरोवर असलेले लोणार ही ठिकाणे, पूर्वीच्या मेहकर तालुक्यातीलच. मेहकरला तयार होणारी धोतरजोडी प्रसिद्ध होती. आज तिचा मागमूसही नाही. येथे तयार होणाऱ्या मूर्ती मात्र आजही विदर्भ, मराठवाडय़ात ठिकठिकाणी विक्रीसाठी जातात. श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकरात अहिल्यादेवी होळकरांनी अन्नछत्र बांधून दिले होते.
मेहकरला यज्ञभूमी मानले गेल्याचा उल्लेख मत्स्यपुराणात आहे. शुद्ध तूप यज्ञात अर्पण करणारी नदी म्हणून पैनगंगेचा उल्लेख आहे. म्हणून पैनगंगेच्या काठीच येथे मोठ्या संख्येने मंदिरे व यज्ञकुंडे आहेत. तिथल्या एका मढीच्या ६० दगडी स्तंभांपैकी, नदी काठावर असल्याने आता फक्त २५ स्तंभच उरले आहेत. मधल्या भागात २३ फुटांचे भव्य यज्ञकुंड असून दक्षिण बाजूच्या गावकोटाशेजारी विटांपासून बांधलेला मोठा दरवाजा आहे. १४८५ मध्ये त्यावरील कमानीवर शिलालेख कोरलेला आहे. पैनगंगा नदीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, ती उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी प्रथम मेहकरकडे वाहत येते व गावाच्या जवळ ती पश्चिम वाहिनी होते व पुन्हा दक्षिण वाहिनी होऊन मेहकराच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. नदी पश्चिम वाहिनी जेथे होते ते ठिकाण पवित्र मानले जाते. या ठिकाणी श्राद्ध, पितृतर्पण व यज्ञकर्मे केली जातात. यामुळेही मेहकरला पूर्वापार महत्त्व आहे. नदीच्या वळणांमुळे येथे ‘ओलांडा’ आहे. पूर्वी तेथे २ फूट खोल कुंड होते. या कुंडातले पाणी कधीच आटत नव्हते. मूल न होणाऱ्या स्त्रिया या ओलांड्याच्या वाऱ्या करीत. येथे शिवपिंडही आहे. आता ओलांडेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. मोठा पूर आला की, हे मंदिर पाण्यात बुडून जाते.
मेहकरातील बालाजीबरोबरच गोपालकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर, चंदनशेष मंदिर, हनुमान मंदिर, महानुभाव मठ, पंचपीर, राममंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. यात मारुतीची ८ तर, गणपतीची ३ मंदिरे आहेत. शहरात मशिदींची संख्याही मोठी आहे. अलबेरुनीच्या ग्रंथात,आईन-ए अकबरी या अकबरनामाच्या तिसऱ्या भागातही येतो. एका मुस्लिम कवीने लिहून ठेवले आहे की, मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे याकाळात अस्तित्वात असलेले जुने गाव आहे. महसुली जिल्ह्याचे जसे हे पूर्वी मुख्य गाव होते, तसाच मेहकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा, असे मानले जाते.
धार्मिकता हा येथील माणसांच्या जगण्यातील अंगभूत गुण तसेच, त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कार्यही वाखाणण्याजोगे आहे. अनेक क्षेत्रांना या गावाने नेतृत्व प्रदान केले. कै.अण्णासाहेब देशमुख हे त्यापैकीच एक. दुसरबीड येथे त्यांनी उभारलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून १९६२ ते १९७८ असे सलग १६ वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते. १९७२ च्या भीषण दुष्काळात साखर कारखाना उभारणीच्या काळात काम नसलेल्या शेकडो हातांना काम देण्याचे मौलिक कार्य अण्णासाहेबांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शुकदास महाराजांच्या पुढाकाराने साकारलेला स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम येथे आहे. विवेकानंद आश्रम हे मानव सेवेचे केंद्र आहे. आज तेथे शाळा, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, विविध वसतिगृहे, कर्णबधिर -अपंग निवासी विद्यालय विवेकानंद ज्ञानपीठ (इंग्रजी माध्यम) व आरोग्य विषयक सेवा, धमार्थ रुग्णचिकित्सा केंद्र, रोगनिदान शिबिरांचे आयोजन, कृषी प्रदर्शनांचे आयोजन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, विवेकानंद वाटिका, हरिहर तीर्थक्षेत्र, इत्यादींमुळे शहराला नंदनवनाचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्र शासनाने विवेकानंद आश्रमास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. विवेकानंद जन्मोत्सव दरवर्षी पौष वद्य पंचमी ते सप्तमी दरम्यान भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तिन्ही दिवस नामवंत कलाकार, संगीतकार, गायक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार आपली सेवा देतात. पौष वद्य सप्तमीला तीन लाख भाविक महाप्रसाद सेवन करतात.
राजकीय पार्श्वभूमी
संपादनजनपद सभेच्या काळात मेहकर व परिसरात दलितमित्र कै. आयाजी पाटील यांनी हुंडाबंदी, सामूहिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, हरितक्रांती, पर्यावरण या सर्वच क्षेत्रांत अजोड काम केले. त्यांच्या भारदस्त व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा युवकांवर मोठा प्रभाव होता. सहकार व शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांनी भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक नवीन नेतृत्वांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मेहकरात पहिल्यांदा मुख्यमंत्री आले. मेहकरच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले. माजी आमदार भाऊसाहेब लोढे हे त्यापैकीच एक. त्यांच्या कार्यकाळात मेहकरला पहिली पाणीपुरवठा योजना झाली. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मेहनत घेतली. मेहकर मतदारसंघात लोणार तालुकाही येतो. त्यामुळे त्या तालुक्यातही त्यांच्या कार्याची लोक आजही आठवण करतात. मतदारसंघ राखीव होता तेव्हा तुळशीराम कंकाळ, लक्ष्मण गवई, बळीराम वानखेडे हे आमदार येथे होऊन गेले. काँग्रेसचे आमदार म्हणून कै. किसनराव सांगळे यांची कारकीर्दही गाजली पण, खऱ्या अर्थाने गाजला तो सुबोध केशव सावजी यांचा कार्यकाळ. सलग १४ वर्षे ते आमदार होते. काही काळ ते महसूल, वस्त्रोद्योग आदी खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मेहकरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना (कोराडी प्रकल्पातून) मंजूर झाली. मेहकरातील बरीच विकासकामे त्यांच्या हातून झाली. या सर्व कालखंडात डॉ. पळसोकर, डॉ. देशमुख, माणिकचंद जैन, नलिनीताई खडसे, शोभाताई अग्रवाल या नगराध्यक्षांनी लक्षात राहण्याजोगे काम केले.
नंतरच्या काळात म्हणजे १९९५ पासून मेहकर मतदारसंघातर्फे काँग्रेसचे वर्चस्व संपले आणि १९९५ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्या रूपाने शिवसेनेचा आमदार या मतदारसंघाला मिळाला. युतीच्या काळात युवक कल्याण पाटबंधारे खात्याचे ते राज्यमंत्री झाले. सध्या ते बुलढाण्याचे खासदार आहेत. मेहकरसाठी त्यांनी रस्ते, नालीबांधणी, वीज, पाणी आदी बाबींकरिता पैसा खेचून आणला. नगराध्यक्ष म्हणून जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर यांची कारकीर्द नियोजनबद्ध विकास कामांच्या बाबतीत लक्षणीयच ठरली. एकात्मिक शहर विकास योजनेचा आराखडा त्यांच्या काळातच तयार होऊन शासनाकडे गेला. त्यातील एकेक काम नंतरच्या काळात होत आहे. रामराव म्हस्के, कासमभाई गवळी, संजय जाधव या नगराध्यक्षांनीही रस्ते विकासाच्या बाबतीत काम केले. सामाजिक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कार्य केलेले डॉ. संजय रायमूलकर सध्या शिवसेनेचे आमदार आहेत.
शहराच्या नवीन भागात वाढ झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले. तेथे रस्ते, पाणी, नाल्या या समस्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी आणखी जोरकस प्रयत्नांची नागरिकांची मागणी आहे. शहराला सध्या आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होतो. हा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. कारण, कोराडी, पेनटाकळीसारखे मोठे प्रकल्पजवळ आहेत. चिखली, बुलढाणा शहरांना येथून पाणी पुरवले जाते. ४० पेक्षा जास्त खेडेगावांना हे प्रकल्प शेतीबरोबरच पिण्याचे पाणी पुरवतात. मेहकरच्या पाणी पुरवठ्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. सुसूत्रता आणली तर दिवसाआडही पाणी पुरवणे शक्य असल्याचे यापूर्वी नलिनीताई खडसे व श्याम उमाळकर या नगराध्यक्षांनी दाखवून दिलेले आहे. शहरात एकही बगीचा नाही. जागा मात्र बऱ्याच ठिकाणी आरक्षित आहे. तेथे बागबगिचे होणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी शहरात टाऊन हॉलची गरज आहे.
इतर महत्त्वाचे
संपादनसंपूर्ण मराठी साहित्य जगतात प्रख्यात झालेले कविवर्य ना. घ. देशपांडे मेहकरचे. त्यांच्या शीळ, अभिसार, खूणगाठी या काव्यसंग्रहांतील कवितांनी रसिकांना वेड लावले होते. राज्य पुरस्कारांपासून साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मेहकरच्या उत्तरेला टेकडीवर असलेल्या पुरातन कंचनीच्या महालासंबंधीच्या आख्यायिकेवर ‘कंचनीचा महाल’ हे दीर्घकाव्य त्यांनी लिहिले. त्याचा स्वतंत्र संग्रह निघाला. सांस्कृतिक क्षेत्रात मात्र मेहकरात मोठी पोकळी निर्माण झाली होती. १९९५ पासून मात्र किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांनी ही पोकळी भरून काढत संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या साहित्यमुळे मेहकरची साहित्य चमक दाखवली. १९७६ मध्ये जन्मलेल्या ह्या साहित्यिक शिक्षकास राज्य पुरस्कारसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या तुटलेल्या बोटांचे संदर्भ, मृगजळाचे पाणी आणि विषात वितळलेले सत्य ह्या संग्रहाना विशेष मागणी असून हे संग्रह खुप गाजले.किरण डोंगरदिवे ह्याच्या समीक्षण क्षेत्रात काव्यप्रदेशातील स्त्री ह्या दीर्घ ग्रंथाला महाराष्ट्रभरातून प्रचंड लोकप्रियता लाभली. ना.घं. देशपांडे यांचे बंधू वि.घ. देशपांडे हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. ते खासदारही होते. १९३९ मध्ये त्यांचा सत्कार मेहकरच्या बालाजी मंदिरात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावकरांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी सावरकरांनी युवकांना मोठय़ा संख्येने सैन्यात भरती होण्याचे आवाहन भाषणातून केल्याची नोंद आहे.
ना.घं. देशपांडे यांनी मेहकरात मेहकर एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे महाविद्यालय, विद्यालय व कन्या विद्यालय आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला महाविद्यालय, विद्यालय व कॉन्व्हेंट सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकरात आणले. श्याम उमाळकर यांनी अध्यापक महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, फार्मसी विद्यालय, मॅनेजमेंट अभ्यासक्रम महाविद्यालय स्थापन केले. डॉ. सुभाष लोहिया यांनी महेश विद्या मंदिर, या इंग्रजी शाळेची भरीव प्रगती केली.डॉ. राम शिंदे यांनीही शैक्षणिक क्षेत्रात चांगली वाटचाल सुरू केली आहे,अध्यापक विद्यालय, पॉलिटेक्निक, CBSE पब्लिक स्कूल या संस्थाही त्यांनी सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली. संतांजी कॉन्व्हेंट, ज्ञानदीप कॉन्व्हेंट या इंग्रजी शाळा लक्षणीय कार्य शैक्षणिक क्षेत्रात करीत आहेत. कासमभाई गवळी यांनी उर्दू विद्यार्थ्यांसाठी उर्दू विद्यालय सुरू केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातली मेहकरची घोडदौड नजरेत भरण्यासारखी आहे.
बँकिंग क्षेत्रात शहर मागे नाही. जीवन गतिमान झाले व लोकांच्या अपेक्षा गरजा वाढल्या. राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांबरोबरच सहकारी बँकांनीही व्यवहार वाढवले. श्याम उमाळकरांची सत्यजित पतसंस्था, डॉ. सुभाष लोहिया, उदय सोनी, आदींच्या प्रयत्नातून विस्तारलेली महेश पतसंस्था, प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पतसंस्था, वसंतराव मगर, सर्पमित्र वनिता बोराडे, नलिनी खडसे यांच्या विविध पतसंस्था या अर्थविषयक संस्थांच्या जाळ्याने बचत व कर्जपुरवठा गरजा भागल्या व त्याबरोबरच शहराच्या व्यापार, रोजगारसंबंधीच्या भरभराटीला मोठा हातभार लागला. रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांच्या उसाला किंमत देण्याचे काम प्रतापराव जाधव, भगवान मानधने, बबनराव भोसले, प्रकाश मापारी, विलास काळे आदींच्या प्रयत्नातून साकारलेल्या शारंगधर साखर कारखान्यानेही केले आहे. मेहकर परिसरातला हा एकमेव मोठा उद्योग. एरव्ही अनेक वर्षांपासून मेहकरला अनेक एकरांच्या पडीत जमिनीवर फक्त एम.आय.डी.सी.चा बोर्डच तेवढा उभा आहे. औद्योगिक वसाहत उभीच झाली नाही. गावात मोठमोठी व्यापार प्रतिष्ठाने, व्यापारी संकुलात वाढ झाली पण, मोठ्या रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.
पूर्वी बालाजी संस्थानमध्ये धर्मार्थ दवाखाना वैद्यांच्या सहकार्याने चालवला जायचा. वार्षिक तीन रुपये भरून वर्षभर मोफत औषधोपचार केला जायचा. आता मेहकरात ग्रामीण रुग्णालय आहे. उच्चशिक्षित डॉक्टरांचे ४७ दवाखाने आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. १९१६ मध्ये मानमोडीच्या (एन्फ्लुएंझा) रोगाने येथील शेकडो लोक दगावले. १९२० मधील दुष्काळात उपासमार झाली. १९२६ मध्ये प्लेगने असंख्य बळी घेतले. २ जातीय दंगली झाल्या तरीही होरपळलेली माणसे पुन्हा उभी झाली व गावाला प्रगतीची गती देत राहिली. कालानुरूप सर्व परिवर्तनाचा स्वीकार करत मेहकर ताठ मानेने उभे आहे.
किरण डोंगरदिवे ह्यांच्या सोबत त्यांच्या पिढितील सुनील पवार संदीप गवई नागेश कांगाने यांनी साहित्य क्षेञात तसेच अमोल टेकाळे यांची साहित्य सागर साहित्य संघाने भरीव कार्य केले आहे.