श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर

श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे धाराशिव (उस्मानाबाद) पासून १५ कि. मी. अंतरावरील एक छोटेशे पण टुमदार गाव. प. पु. सद्गुरू आप्पा बाबांचे रुईभर हे छोटेसे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रातील दत्त उपसकांचे आशेचे, श्रद्धेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमंदिर संस्थान या नावाने न्यास नोंदणीकृत असून आज पुज्यश्री या ठीकाणावर १९८३ पासून आहेत. या ठिकाणातून समाजातील अठरापगड जाती व सर्वधर्मातील लोकांना तरुण पिढीला धर्मकार्याची, राष्ट्रकार्याची व समाजसेवेची शिकवण महाराज देत आहेत.

आठवडाभर समाज प्रबोधनाच्या कार्यात पुज्यश्री भारतभर कोठेही असले तरीही प्रत्येक गुरुवारी श्री अप्पाबाबा श्री रुईभर येथील श्री दत्तमंदिर संस्थानात असतात. निरनिराळ्या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येनेरूईभर येथील मंदिर व परमपूज्य महाराजांचे दर्शनास येतात. दत्तमहाराजांना साकडे घालतात व् महाराजांकडून आशीर्वाद घेऊन समाधानाने स्वगृही परततात. अनेकांना लाभ झाल्याचे भक्तगण एकमेकास श्रद्धेने सांगतात. श्री दत्त महाराजांचे कृपेने व परंमपूज्य महाराजांचे प्रेरणेने श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमहाराजांचं एक अतिभव्य मंदिर साकारत आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम करण्यात येत आहे.

या मंदिरात मुख्यत्वेकरून खालील गोष्टींचा समावेश असेल. १) भव्य सभागृह १०५×७० चौरसफुट २) गाभारा (गर्भगृह) ५ ×५ मीटर्स ३) प्रदक्षिणा मार्ग ४५×५० चौरस फूट. ४) गर्भगृहावरील शिखर राजस्थानातील डोळपुरी लाल दगडात केलेले आहे. शिखरांची उंची ५१ फूट असून सर्व योजना एक देखण्या मंदिराकडे नेण्याचा प्रयत्न आहे. सदर सर्व बांधकाम व विकास कामे भक्तगणकडून स्वेच्छेने आलेल्या देणग्यातून होते. ज्याठिकाणी श्रीगुरूंची कृपाद्रीष्टी आहे तेथे कमी काय पडणार?

या मंदिर परिसरात भाविकांना जप, तप, साधना पारायण, ध्यानधारणा करण्यासाठी २७×९ चौरस फुटाचे ध्यानमंदिर आहे. याच मंदिर परिसरात १६०×५५ मोठ्या सभागृहाचे काम मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे. याच ठिकाणी ५५×६० असे भक्तनिवास ही आकार घेत आहे. या ठिकाणी येणाऱ्या व राहणाऱ्या भावकांच्या सर्व सोयी व सुविधांचा विचार केला जात आहे. हे भक्त निवास ५ माजली असून सर्व सुखसोयींनी युक्त असेल. दत्त भक्तांनी एकदा तरी या पवित्र स्थळी दर्शनास जावे श्रींचे आशीर्वाद घ्यावे. सद्गुरू अप्पा बाबाचे दर्शन घेऊन कृतकृत्य व्हावे !


श्री सद्गुरू अप्पामहाराज व‬ श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर

श्री सद्गुरू अप्पामहाराज उर्फ श्री दत्तमहाराज रुईकर, मु. पो. रुईभर, ता. धाराशिव, जि. उस्मानाबाद येथिल दत्तमंदिरात त्यांचे वास्तव्य असते. दत्त उपासना मार्गातील एक उपासना असुन व्यक्तीमत्व असुन त्यांची राहणी अतिशय साधी आहे. समाजातील सर्वसामान्य माणसाची काळजी वाहण्याचे व त्यांचे जीवन सुखी, सुसह्य व सार्थकी करण्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. अहोरात्र जनसामान्याच्या सुखासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यसाठी ते सतत प्रयत्नशिल असतात. अंधश्रद्धेवर त्यंचा विश्वास नाही. समाजात रूढ असलेल्या रूढी, परंपरा, मान्यता प्रथम विज्ञानाच्या नंतर धर्माच्या आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे समाजाच्या कसोटीवर सत्य उत्तरल्याशिवाय विश्वास ठेऊ नये अशी त्यांची शिकवणुक आहे.

आध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी कोणतीही उपासना, करण्यापेक्षा आपण करीत असलेले काम शंभर टक्के (१००%) प्रामाणिकपणे करणे हीच खरी देवपूजा व आराधना होय असे ते छातीठोकपणे सागतात, कोणताही देव काहीही मागत नाही. देव हा फक्त देणेच जाणतो. तो आपल्या भक्तांना सदैव देतच असतो त्याच्यावर प्रेम करित असतो. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. आपल्या घरात येणारे धन, विचार आपले आचार, सात्विक, समाधानी असण्यासाठी प्रत्येक गोष्ठ भगवंताला अर्पण करणे हा विचार मनात सतत ठेवणे इतकीच पुजा हे ते आपल्या भक्तांना सांगतात.

श्री. सद्गुरू अप्पामहाराज सांगतात जे काही पाहिजे असेल ते देण्यास श्री. दत्तमहाराज सदैव तत्पर असतात. परंतु त्यसाठी मनुष्याचे मन, शरीर व धन शुद्ध, पवित्र असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपलेकडे असणारे दोष व्यसन सर्व देवाला अर्पण करून आपले शरीर, मन शुद्ध केल्यास मनुष्य जन्म प्राप्तः होतो. यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणून आपल्य भक्तांना हीच शिकवण देतात त्यांच्या शिकवणुकीची जे पालन करतात त्या सर्वांचे जीवन सुखी झाले आहे अशी प्रचीती आली आहे. त्यमुळे त्यांचा भक्तगण उत्तोरोतर वाढतच चालला आहे. संपूर्ण भारतभर त्यांचे भक्तः वाढलेले आढळतात. परंतु आपली प्रासिद्धी व्हावी किवा करावी हे त्यांच्या तत्त्वात बसत नाही. त्यांना वाटत नाही . फक्त कार्यरत रहाणे येवढेच त्यांना माहित आहे. साखर गोड आहे हे कुणी सांगून समजत नाही. परंतु ती खाल्यावर गोड आहे आणि गोड म्हणजे काय हे ज्याचे त्याला फक्तसमजते यासाठी प्रमाण द्यावे लागत नाही. भक्तांना आप्पामहाराजाची प्रचीती आली आहे. त्यामुळे सर्वांचे जीवन सुखमय झाले आहे. कोणीतरी म्हणले आहे. हा "देहना माझा राहिला दत्त दिंगबर".

अशा या आमच्या सद्गुरूचा कृपाप्रसादाने व कृपाशीर्वादाने सर्व भक्त आपल्या जीवनात सुखी व समाधानी आहेत. सर्व दत्तभक्तांची मांदीयाळी आहे. सर्वांचा एक परिवार आहे. सर्व दत्तभक्त नियमीतपणे आपल्या सद्गुरूच्या दर्शनासाठी रुईभर येथे जात असतात व भक्तीची व आशीर्वादाची शिदोरी आणत असतात प्रलोभनाच्या महासागरात सर्व भक्तजनांच्याजीवनाचे कार्य भरकटू नये म्हणून सर्व भक्तगण नित्यनियमाने एकत्र येऊन भजन, कीर्तन, आरती सहोळा यासारखे उपक्रम राबुवून सर्वजण श्रेद्धेने सहभागी होत असतो.