उमरगा विधानसभा मतदारसंघ
हा महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ - २४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, उमरगा मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उमरगा हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
शिवसेनेचे ज्ञानराज धोंडिराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | ज्ञानराज धोंडिराम चौगुले | शिवसेना | |
२०१४ | ज्ञानराज धोंडिराम चौगुले | शिवसेना | |
२००९ | ज्ञानराज धोंडिराम चौगुले | शिवसेना |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
उमरगा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
ज्ञानराज धोंडीराम चौगुले | शिवसेना | ७०,८०६ |
बाबूराव पांडुरंग गायकवाड | काँग्रेस | ६०,४७४ |
महंत्त्य कल्ल्या स्वामी | मनसे | १३,९५४ |
राम सैदा गायकवाड | भाबम | २,०६२ |
दत्तात्रय कृष्णाजी कांबळे | अपक्ष | १,८२३ |
उमेश संभाजी मुरुमकर | बसपा | १,७५९ |
पोपटराव खंडेराव सोनकांबळे | रिपाई (A) | १,७२० |
मोहन कांबळे गुलगांवकर | अपक्ष | १,५३६ |
भिम लक्ष्मण शिंदे | अपक्ष | १,२८३ |
राजेंद्र बळीराम उबाळे | अपक्ष | १,०४७ |
पांडुरंग शंकरराव पोळ | अपक्ष | ९९० |
सुभाष राजण्णा वाघमारे | प्ररिप | ६४३ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |