महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस अकलूज येथे पडतो. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीकाठी वसलेले आहे. अकलूज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होती.अकलुज मध्ये सध्या नगरपरिषद अस्तित्वात आहे.

  ?अकलूज

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१७° ५३′ ००″ N, ७५° ०१′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सोलापूर
तालुका/के माळशिरस
लोकसंख्या त्रुटि: "39,972(2011)" अयोग्य अंक आहे (2011)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 413101
• +०२१८५
• MH- ४५

अकलूज पूर्वी कापसाच्या मोठ्या व्यापारासाठी ओळखला जात असे, सध्या तो जवळजवळ गायब झाला आहे. अकलूज हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे. शहर व परिसर शेतीप्रधान आहे. अकलूज हे काही काळ आशियातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठे ग्राम पंचायत होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे अकलूजचे सरपंच होते. ते सुंदर शहर आहे.

प्रेक्षणीय स्थळे- आनंदी गणेश मंदिर, शिवपार्वती मंदिर, संगीत कारंजे , सयाजीराजे पार्क, अकलाई मंदिर, शिवस्रुष्टी किल्ला, शिवाम्रुत बाग, श्री राम मंदिर, क्रीडा संकुल अकलुज.

इतिहास

संपादन

अकलूज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरून पडले आहे.मोगल काळामध्ये हे गाव अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये १३व्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. असे म्हटले जाते की १६७९ मध्ये दिलेरखान आणि संभाजी महराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास होते. अकलूज हे रत्नाई कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे.येथून यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर ७ कि.मी. दूर महाळूंग या गावी आहे. या ठिकाणी एकदिवसीय पर्यटनासाठी सयाजीराजे पार्क या नावाचे ठिकाण आहे. आता या अकलूज मध्ये घोड्यांचा बाजार हा सुरू करण्यात आला आहे तो पूर्वी पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता. या बाजारामध्ये जातिवंत घोडे पर राज्यातून विक्रीसाठी येतात. ग्रीन फिंगर इंग्लिश मेडियम स्कूल प्रशिद्ध आहे. कृषी प्रदर्शन या ठीखाणी भरते अकलूज पासून जवळच वेळापूर येथे खूप मोठा बाल आनंद मेळावा भरला होता . सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर या ठीखणी आहे .एस. एन.डी. टी.विधापीठाचे गृह विज्ञान कॉलेज येथे आहे. महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविधालय येथे आहे .शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे आहे. अकलूज हे आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात. अकलूज गावाजवळ व परिसरात २० कि.मी. अंतरामध्ये ०४ साखर कारखाने आहेत. त्यामुळे माळशिरस तालुका हा प्रगतीशील तालुका म्हणून ओळखला जातो. एस .एन .डी .टी विद्यापीठाचे महिला बी. एड. कॉलेज आहे .

स्थान

संपादन

अकलूज हे माळशिरस तहसीलमध्ये आहे आणि सोलापूर शहरापासून 120 किमी अंतरावर आहे. हे नीरा नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. अकलूजची उंची एमएसएलपासून 551 मीटर आहे.

अक्षांश 17.9000 रेखांश 75.0333 अक्षांश (फूट) 1581 लॅट (डीएमएस) उत्तर 17 ° 53 '60 एन लॉंग (डीएमएस) पूर्वेकडील 75 ° 1' 60E अक्षांश (मीटर) 481.

हवामान

संपादन

अकलूज हा डेक्कन पठाराचा एक भाग आहे म्हणून त्याचे क्षेत्र सपाट आहे. हे नीरा नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. अकलूजची उंची एमएसएलपासून 551 मीटर आ सर्वसाधारणपणे अकलूज हवामान हे शेतीसाठी योग्य आहे आणि उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळी असे तीन. तू आहेत. अकलूजच्या हवामानातील वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्याशिवाय कोरडे. अकलूजचे सरासरी वार्षिक तापमान. 36 अंश सेल्सियस आहे. मे महिना हा वर्षाचा सामान्यत: सर्वाधिक तपमान असतो (°२ अंश सेल्सियस पर्यंत). अकलूज येथे सरासरी वार्षिक पाऊस 450 मिमी आहे.

लोकसंख्या

संपादन

सध्याची लोकसंख्या अंदाजे 1,10,000 (2021) आहे. 1971 मध्ये लोकसंख्या 40,278 होती (जनगणना 1971 नुसार).