तेर (उस्मानाबाद)

पुरातत्वीय स्थळ
(तेर या पानावरून पुनर्निर्देशित)

तेर हे धाराशिव जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे. हे ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला १८ किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. या नगराला प्राचीन काळी तगर या नावाने ओळखले जात होते.त्या पुर्वि सत्यपुरी हे नाव प्रचलित होते.

  ?तेर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर उस्मानाबाद
जिल्हा धाराशिव जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/
तेर (उस्मानाबाद) is located in महाराष्ट्र
तेर (उस्मानाबाद)
तेरचे महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
तेरच्या बसस्थानकासमोरील उत्खनन केलेली जागा (३० जुलै, २०१२ चेछायाचित्र)

तेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.

हवामान

संपादन

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.

प्राचीन उल्लेख

संपादन

'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी' या इ.स. ५० ते इ.स. १३० या काळात एका ग्रीक प्रवाशाने लिहिलेल्या ग्रंथाच्या ५१व्या प्रकरणामध्ये तेरचा तगर असा उल्लेख आलेला आहे. या प्राचीन महत्त्वपूर्ण ग्रंथात हा ग्रीक प्रवासी म्हणतो-

दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. यातील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच-भडोच) पासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येते. पैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढीत दगड आणला जातो. याउलट तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठविले जाते. त्याचप्रमाणे समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठविला जातो.[१]

पेरिप्लसव्यतिरिक्त तेरचा प्राचीन उल्लेख प्टॉलेमीने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो. या प्रवासवर्णनात त्याने तगर ही नगरी समुद्रकिनाऱ्यापासून आत असून अरियके प्रदेशात आहे असे सांगितले आहे. [२]

इ.स. ६१२ या काळातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखात ज्या ज्येष्ठशर्मन याला दान दिले तो तगरनिवासी होता असा उल्लेख आहे. अकोला जिल्ह्यात मिळालेल्या राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या इ.स. ६९३च्या सांगळूद ताम्रपटात उम्बरिकाग्राम आणि वटपूरग्राम या दोन खेड्यातील जमीन तगरनिवासी हरगण द्विवेदी याला दान दिल्याचा उल्लेख आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी (ट्रॅव्हल ॲन्ड ट्रेड इन द इंडियन ओसीयन बाय अ मर्चंट ऑफ द फस्ट सेंच्युरी)" (इंग्रजी भाषेत). 2012-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ जॉन वॅटसन मॅकरॅंडल. "एंशंट इंडिया ॲज डिस्क्राईब्ड बाय प्टॉलेमी" (इंग्रजी भाषेत). १३ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate