भरूच

भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर.


भरूच (गुजराती: ભરૂચ) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर व भरूच जिल्ह्याचे मुख्यालय आहे. भरूच शहर गुजरातच्या दक्षिण भागात नर्मदा नदीच्या उत्तर काठावर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून २१० किमी तर सुरतहून ७० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली भरूचची लोकसंख्या १.६९ लाख इतकी होती. अंकलेश्वर हे भरूच जिल्ह्यामधील दुसरे शहर नर्मदेच्या दक्षिण काठावर वसले असून ही दोन शहरे १८८१ साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन पुलाद्वारे जोडली गेली.

भरूच
ભરૂચ
भारतामधील शहर

भरूच येथील स्वामीनारायण मंदिर
भरूच is located in गुजरात
भरूच
भरूच
भरूचचे गुजरातमधील स्थान

गुणक: 21°42′43″N 72°59′36″E / 21.71194°N 72.99333°E / 21.71194; 72.99333

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा भरूच जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६९,००७
  - महानगर २,२३,६४७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

भरूच राष्ट्रीय महामार्ग ८ वर स्थित असून ते पश्चिम रेल्वेवरील एक स्थानक आहे. भरूच भागाचे मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झाले असून येथे सध्या अनेक मोठ्या कंपन्यांचे कारखाने व कार्यालये आहेत.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत