परतूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. परतूर हे शहरच या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ते दुधना नदीच्या काठी आहे. या शहरात शेती संशोधन केंद्र आहे. परतूर हे काचीगुडा-मनमाड लोहमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.

  ?परतूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४३९ मी
जवळचे शहर जालना
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
लोकसंख्या ३५,८८३जनगणना २०११ (2011)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ परभणी
तहसील परतूर
पंचायत समिती परतूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431501
• +०२४८४
• MH 21
संकेतस्थळ: [http://www.parturelection.org परतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक]


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.

परतूर गावाचे प्राचीन नाव प्रल्हादपूर आहे, साहजिकच येथे देशपांडे गल्लीत नृसिंह मंदिर आहे. मंदिराजवळ करक्षेत्र कुंड आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर याच कुंडात नृसिंहाने आपले हात धुतले अशी आख्यायिका आहे. १९३७ साली निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. त्या परिषदेचे पहिले अधिवेशन १ ते ३ ऑक्टोबर १९३७ या कालावधीत हैदराबाद येथे भरले होते. या अधिवेशनानंतर मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीस चालना मिळाली. जालना जिल्ह्यातील दोन पैकी एक उपविभागीय कार्यालय परतूर येथे आहे.

भूगोलसंपादन करा

परतूर येथे 19°21′N 76°07′E / 19.35°N 76.12°E / 19.35; 76.12 स्थित आहे.[१] . परतुरची समुद्रसपाटीपासूनची उंची ४३९ मीटर (१४४० फूट) आहे. लोअर दुधना धरण परतूरहून जवळच आहे. बागेश्वरी साखर कारखाना परतूर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. गावकऱ्यांच्या उत्‍पन्‍नाचा मुख्य स्रोत शेती आहे.. या क्षेत्रात सर्वाधिक लोक शेतकरी आहेत. प्रमुख पीक कापूस, तूर, ज्वारी, गहू, ऊस हे आहे.

लोकसंख्यासंपादन करा

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, परतूर नगराची लोकसंख्या ३५, ८८३ आहे[२]. त्यात पुरुषांची संख्या १८, ४०१ तर स्त्रियांची १७,४८२ आहे[२].

परतूर शहरात दर १०० माणसांमध्ये ७९.५२ माणसे साक्षर आहेत (संपूर्ण महाराष्ट्रात ८२.३४), पैकी पुरुष साक्षरता ८६.०३‍% तर स्त्री साक्षरता ७२.७२% आहे.[२].

परतूरच्या एकूण लोकसंख्येच्या १४.१३ टक्के संख्या ही ६ वर्षे वयाच्या आतील मुलांची आहे. दर १०० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहेत. (संपूर्ण महाराषट्रात हा अनुपात ९५० आहे)[२].

लोकसंख्येच्या १०.५७ टक्के अनुसूचित जातींचे, तर ३,७७ टक्के लोक अनुसूचित जमातींचे आहेत.[२].

वाहतूकसंपादन करा

रेल्वेसंपादन करा

येथून मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नागपूर, मनमाड, लातूर, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद आणि मनमाड या गावांना जाण्यासाठी थेट आगगाड्या आहेत.

महत्त्वाच्या गाड्यासंपादन करा

मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस, मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्सप्रेसया गाड्या दैनंदिन आहेत. साईनगर शिर्डी - तिरुपती एक्स्प्रेस, विजयवाड़ा - साइनगर शिर्डी एक्सप्रेस, निजामाबाद - लोकमान्य तिलक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेस, औरंगाबाद - रेणीगुंठा एक्सप्रेस, या साप्ताहिक गाड्या आहेत. नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि मदुरै-मनमाड एक्स्प्रेस या गाड्या परतूर स्टेशनवर थांबत नाहीत. मनमाड-सिकंदरबाद या दरम्यानच्या कोणत्याही स्टेशनापेक्षा परतूर रेल्वे स्थानकाचे महसूल संकलन अधिक आहे.

परतूर रेल्वे स्टेशनावर २ फलाट आहेत.

रोडसंपादन करा

परतूरपासून राज्य परिवहन मंडळाच्या बसने पुणे, औरंगाबाद, पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, सांगली, लोणार, शेगाव, खामगाव, अकोला, नांदेड, लातूर, हैदराबाद येथे थेट जाता येते. राज्य परिवहन महामंडळाचे परतूर बसस्थानक २०१० साली सर्वात फायदेशीर होते.

हवाईसंपादन करा

औरंगाबाद येथे चिखलठाण्याजवळ विमानतळ आहे.

शिक्षणसंपादन करा

जवाहर नवोदय विद्यालय ही भारत सरकारची निवासी शाळा आहे. येथे सेंट्रल बोर्डाचा (सीबीएसईचा) अभ्यासक्रम चालतो. ही शाळा परतूरपासून तीन किलोमीटरवर आंबा येथे आहे.

परतूरमधील शाळासंपादन करा

मराठी व सेमी इंग्लिश माध्यमसंपादन करा

 1. स्वामी विवेकानंद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा
 2. योगानंद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा
 3. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा
 4. लालबहादूर शास्त्री उच्च माध्यमिक शाळा
 5. ला बहादूर शास्त्री उच्च माध्यमिक कन्या शाळा
 6. विवेकानंद प्राथमिक शाळा

इंग्रजी माध्यमसंपादन करा

 1. विवेकानंद इंग्लिश स्कूल
 2. ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल
 3. महाराणा प्रताप इंग्लिश स्कूल

उर्दू माध्यमसंपादन करा

 1. अल-हद उर्दू शाळा
 2. मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू प्राथमिक शाळा

परतूरमध्ये अलीकडच्या काळात अनेक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक खाजगी इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत.

महाविद्यालये (कॉलेज)संपादन करा

 1. लालबहादूर शास्त्री कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ट(ज्युनियर) कॉलेज.
 2. लालबहादूर शास्त्री कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ (सीनिअर) कॉलेज.
 3. भानुदासराव चव्हाण कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ (सीनिअर) कॉलेज.
 4. शिवराज कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ (सीनिअर) कॉलेज.

उपयुक्त सेवासंपादन करा

परतूर मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे वीज वितरित केली जाते. बहुतेक लोकांकडे बीएसएनएलचे लॅन्डलाईन किंवा डब्लूएलएल यांपैकी एखादे कनेक्शन असते. एअरटेल, व्होडाफोन, बीएसएनएल, रिलायन्स, आयडिया आणि टाटा डोकोमो या मोबाईल सेवा परतूरमध्ये आहेत. शहरात GSM व CDMA या दोन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. गावात बीएसएनएल, सायबर नेक्स्ट या ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा आहेत. परतूरमध्ये बीएसएनएल आणि आयडिया या कंपन्यांच्या मोबाईलवर ३ जी सेवा मिळते.

बँकासंपादन करा

परतूर हे जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही शहरातील सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. इतर अनेक बँका शेतकऱ्यांना, उद्योजकांना आणि शहर रहावाशांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देत असतात.

==परतूरमधील बँका=='

 1. स्टेट बँक ऑफ इंडिया
 2. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
 3. बँक ऑफ महाराष्ट्र
 4. कॅनरा बँक
 5. महाराष्ट्र ग्रामीण बँक
 6. सांगली अर्बन को-ऑप बँक
 7. दीनदयाळ नागरी सहकारी बँक
 8. ॲक्सिस बँक
 9. आयसीआयसीआय बँक

शहरात ४-५ एटीएम आहेत.

मल्टिस्टेट सहकारी बँकासंपादन करा

 1. विजया अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव
 2. ज्ञानराधा को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. बीड
 3. शुभकल्याण को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. हावरगाव
 4. श्री पद्मावती माता को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. राहुरी
 5. राजर्षी शाहू महाराज को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव

संदर्भसंपादन करा

 1. ^ Falling Rain Genomics, Inc - Partur
 2. ^ a b c d e चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; जनगणना २०११ नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना | अंबड | भोकरदन | बदनापूर | घणसवंगी | परतूर | मंठा | जाफ्राबाद