जगदलपूर
जगदलपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर बस्तर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
येथील 'बस्तर राजवाडा' ही राजघराण्याची वास्तू आहे.यास जगदलपूर पॅलेसही म्हणतात.येथे गंगामुंडा व दलपत लेक नावाचे दोन तलाव आहेत.[१]
येथून जवळच सुमारे ४५ किमी अंतरावर चित्रकोट धबधबे आहेत. हे धबधबे इंद्रावती नदीवर आहेत.हे घोड्याच्या नालेच्या आकाराचे असून सुमारे १०० फूट उंचीवरून ते खाली कोसळतात.याजवळच नारायणपल नावाचे एक विष्णूंचे मंदिर आहे.तसेच या गावाच्या दक्षिणेला तीरथगड नावाचा अजून एक धबधबा आहे.येथे जाणारा महामार्ग हा कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानातून जातो.हा धबधबा सुमारे ३०० फूट खाली कोसळतो.या धबधब्यांशिवाय येथे मांडवना, चित्रधारा व थामाद घुमार आदी धबधबे आहेत.[१]
याजवळ असलेल्या कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानात कैकश अथवा कुतुमसर नावाची एक गुहा आहे.ही गुफा सुमारे २०-३० फूट खोल आहे. येथे चुनखडीपासून निसर्गतःच बनलेल्या आकृती आहेत.[१]
येथून सुमारे ५५ किमी दूर दंतेश्वरी देवीचे मंदिर असलेले दंतेवाडा हे ठिकाण आहे.शाकिनी व डाकिनी नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर येथील मुख्य आकर्षण आहे.[१]
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the Wayback Machine.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the Wayback Machine.