कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान

(कांगर राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात जगदलपूर शहरापासून सुमारे २६ कि. मी. अंतारावर, २०० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले कांगेर राष्ट्रीय उद्यान आहे. १९८५ साली या जंगलास आशियातील पहिले बायोस्फियर रिझर्व घोषित करण्यात आले.