निजामाबाद हे तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. निजामाबाद शहर तेलंगणाच्या वायव्य भागात तेलंगणा-महाराष्ट्र सीमेजवळ वसले असून ते हैदराबादच्या १७५ किमी उत्तरेस तर नांदेडच्या ११० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली निजामाबादची लोकसंख्या सुमारे २.२९ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (हैदराबादवारंगळ खालोखाल).

निजामाबाद
నిజామాబాద్
भारतामधील शहर

Montage of Nizamabad.jpg

निजामाबाद is located in तेलंगणा
निजामाबाद
निजामाबाद
निजामाबादचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°40′19″N 78°5′38″E / 18.67194°N 78.09389°E / 18.67194; 78.09389

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा निजामाबाद जिल्हा
क्षेत्रफळ ४० चौ. किमी (१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२९६ फूट (३९५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,११,१५२
  - महानगर २,५२,३०८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

निजामाबादची स्थापना १९०५ साली निजामाने केली. आजच्या घडीला निजामाबाद उत्तर तेलंगणामधील एक प्रमुख शहर आहे. निजामाबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असून ते मनमाड-सिकंदराबाद रेल्वेमार्गावर स्थित आहे.

बाह्य दुवेसंपादन करा