लातूर जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.


लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर विभागातील एक जिल्हा आहे. लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या २५.४७% लोकसंख्या शहरी आहे.

लातूर जिल्हा
लातूर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
लातूर जिल्हा चे स्थान
लातूर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग
मुख्यालय लातूर
तालुके अहमदपूर

उदगीरऔसाचाकूरजळकोटदेवणीनिलंगारेणापूरलातूर तालुकाशिरूर (अनंतपाळ)

क्षेत्रफळ
 - एकूण ७,१५७ चौरस किमी (२,७६३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २८,५६,३०० [] (२०२०)
-लोकसंख्या घनता ३४३ प्रति चौरस किमी (८९० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ६,२४०००
-साक्षरता दर ७९.०३%
-लिंग गुणोत्तर ९२४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ लातूर
-विधानसभा मतदारसंघ अहमदपूरउदगीरनिलंगालातूर ग्रामीणलातूर शहरऔसा
-खासदार डॉ . शिवाजी काळगे ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८०२.४ मिलीमीटर (३१.५९ इंच)
प्रमुख_शहरे उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा.
संकेतस्थळ


इतिहास

संपादन

अ)प्राचीन

आ)मध्य

लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले.. जिल्हा मुख्यालय लातूर हे "लट्टा" वा राष्ट्रकूट राजांचे मूळ निवासस्थान होते. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती "स्वामी" असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यानंतर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत. चालुक्य घराण्यातील "विक्रमादित्य" ६ व्या नन्तर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने "अभिलाषीतीर्थ" हा ग्रंथ लिहिला, त्यामुळे त्याला "सर्वज्ञ चक्रवर्ती" असे म्हणत. लातूर जिल्ह्यात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोंद असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशी देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. सदर कोरीव लेख शके १०४९ (इ.स.११२९) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानंतर हा भाग देवगिरीच्या यादवाच्ंया अधिपत्याखाली आला

.इ.स. १३३७ मध्ये यादवांचे राज्य दिल्लीच्या सुलतानांच्या ताब्यात आले व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अंमल सुरू झाला. इ. स. १३५१ मध्ये दिल्लीच्या सुलतानांच्या साम्राज्यातील हा भाग बहामनी साम्राज्यात आला. बहामनी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती.

इ)आधुनिक

लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. . १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतन्त्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालान्तराने उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.

या नवनिर्मित लातूर जिल्ह्यात पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा व [[ औसा] अशा पाच तालुक्यांचा तसेच १५ ऑगस्ट, १९९२ रोजी पूर्वीच्या तालुक्याची पुनर्रचना करण्यात येऊन रेणापूरचाकूर हे दोन तालुके अस्तित्वात आले. तसेच २३ जून, १९९९ रोजी पूर्वीच्या तालुक्यांची पुनर्रचना करण्यात येऊन देवणी, जळकोट व शिरूर (अनंतपाळ) तीन तालुके अस्तित्वात आले. सद्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.

तदनंतर बहामनी राज्याची शकले होऊन शेवटी निजामशाही ( अहमदनगरची)मध्ये हा भाग आला. निजामाचे हैदराबाद राज्य १७ सप्टेंबर १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात सामील झाल्यानंतर हा भाग महाराष्ट्र राज्यात आला.[]

भूगोल व हवामान

संपादन

महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर आणि कर्नाटकाच्या ईशान्य सीमेजवळ हा लातूर जिल्हा येतो. नांदेड, बीड, धाराशिव हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत. लातूर समुद्र सपाटीपासून ६३६ मीटर उंचीवर बालाघाट पठारावर आहे. लातूरला मांजरा नदीतून पिण्याचे पाणी मिळते. ही नदी २० व्या आणि २१ व्या शतकात पर्यावरणीय विघटनामुळे व धूप झाल्याने दूषित झाली. जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे लातूरला २०१० साली दुष्काळ उद्भवला.

अ) तापमान:

लातूरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते, पैकी प्रवासासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ उत्तम आहे.आत्तापर्यंत नोंदवलेले सर्वोच्च तापमान ४५.६°से होते. उत्तर भारताच्या पश्चिम व्यत्ययाच्या (Western Disturbanceच्या) पूर्व प्रवाहासोबत आलेल्या थंड लाटांमुळे काहीवेळेस हिवाळ्यात क्षेत्र प्रभावित होते, व न्यूनतम तापमान २° ते ४°से (३६ ते ३९°फॅ) पर्यंत कमी होते.

आ) वर्षा:

जून ते सप्टेंबरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस पडतो. पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस ७२५ म़िलि (२८.५ इंच) पडतो.

इ) नदी, तळे व धरणे

तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात येणारे पाणी मांजरा नदीतून येते. २०व्या व २१व्या शतकांत प्रदूषणाचा सामना केला. तावरजा, तिरू, घरणी, मनार, रेणा या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचनासठी व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बांधली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरू यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेंडीतिरू या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत.

लोकसंख्या

संपादन

लातूरचे बहुसंख्य रहिवासी मराठी बोलतात.

धार्मिक

धर्म टक्केवारी
हिन्दू ७०%
इस्लाम २४%
बौद्ध ४.६%
ख्रिश्चन ०.२%
जैन ०.८%
इतर ०.४%

इतरमध्ये ०.२% शीख व ०.१% निधर्मींचा समावेश होतो.

लोकसंख्या वाढ

जिल्ह्याचा लोकसंख्या क्रम: १८१/६४० ( भारतात )

जनगणना लोकसंख्या वाढ/घट
१९०१ ४,२३,६०९ -%
१९११ ५,०६,५४९ +१.८%
१९२१ ४,७९,७२३ -०.५४%
१९३१ ५,४०,०१९ +१.१९%
१९४१ ६,००,३७३ +१.०७%
१९५१ ६,६०,८२३ +०.९६%
१९६१ ८,१८,१६० +२.१६%
१९७१ १०,४८,६१८ +२.५१%
१९८१ १२,९२,८८२ +२.१२%
१९९१ १६,७६,६४१ +२.६३%
२००१ २०,८०,२८५ +२.१८%
२०११ २४,५४,१९६ +१.६७%

भाषा

भाषा टक्केवारी
मराठी ८१.७५
हिंदी १०.४३
उर्दू ६.३७
तेलुगू ०.७२
कन्नड ०.४४

प्रशासन व राजकारण

संपादन

कै. केशवराव सोनवणे हे नवनिर्वाचित महाराष्ट्रातील लातूरचे पहिले आमदार होते. केशवराव सोनवणे यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिल्यांदा सहकारमंत्रीपद मिळाले. केशवरावांच्या काळात लातूर तालुक्याला स्वतःची वेगळी ओळख होण्यास मदत झाली. सन १९५७ ते ६७ अशी सलग दहा वर्षे केशवराव लातूरचे आमदार होते. त्यानंतर १९७१ ते ८० असे दहा वर्षे औसाचे आमदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी १९६२ ते ६७ या काळात सहकारमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम केले. भूतपूर्व केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य झाले होते. त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.

अ) स्थानिक

जिल्हा परिषद लातूर

२०२१ सालचे अध्यक्ष : राहुल गोविंद केंद्रे

२०२१ सालचे जिल्हाधिकारी : बी. पृथ्वीराज

क्षेत्र: ७,१५७ चौरस किलोमीटर

सत्ताधारी पक्ष : भाजप

एकूण सदस्य : ५८

विभाग :लातूर

१)सामान्य प्रशासन

२)अर्थ

३)प्राथमिक शिक्षण

४)माध्यमिक शिक्षण

५)आरोग्य

६)महिला व बालकल्याण

७)पाटबंधारे व पाणी पुरवठा

८)पंचायत

९)बांधकाम

१०)ग्रामीण विकास यंत्रणा

११)पशुसंवर्धन

१२)समाजकल्याण

१३)कृषी

आ) राज्य व केंद्र प्रशासन

लातूर जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, औसा, निलंगा व अहमदपूर असे ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. लातूर जिल्ह्यातील मतदार औसासाठी उस्मानाबाद व उर्वरित पाचसाठी लातूर अशा दोन लोकसभा मतदार संघांत मतदान करतो.

राजकारण

इ) प्रसिद्ध राजकारणी

केशवराव सोनवणे हे लातूर क्षेत्रातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गेलेले पहिले मंत्री होते. ते आधी मुख्यमंत्री यशववंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले व नंतर ते वसंतराव नाईक मंत्रिमंडळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मंत्री होते. लातूर हे दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव(लातूर)ला झाला होता. त्यांनी दोनदा महाराष्ट्र राज्याचाे मुख्यमंत्री म्हणूम व नंतर व केंद्रीय मंत्री म्हणून काम केले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांशी संबंधित गुजरातमध्ये दंगल घटनेची त्यांनी तपासणी केली. की तपासणी करत असलेले केंद्रीय तपास आयोगाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेंबर २०१४ रोजी हत्या झाली.

ई)न्याय

जिल्हा न्यायाधीश :

लातुरात १ जिल्हा व सत्र न्यायालय आहे.

उ)संरक्षण

  • जिल्हा पोलीस अधीक्षक : सोमय मुंडे (२०२२ साल)
  • एकूण पोलीस स्थानके: २३
  • केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र चाकूरला व बाभळगाव(लातूर) येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

संपादन
  • केशवराव सोनवणे हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते. ते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते औसा मतदारसंघातून दोन वेळा व लातूर मतदारसंघातून दोन वेळा असे एकून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते
  • विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे दोनदा मुख्यमंत्री व एकदा केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञानज्ञान मंत्री होते.
  • शिवराज विश्वनाथ पाटील पंजाब राज्याचे व चंदीगड प्रदेशाचे २०१०पासून २०१५ पर्यंत राज्यपाल होते. त्यापूर्वी ते १९९१ पासून १९९६ पर्यंत १० व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. २००४ पासून २००८ पर्यंत ते मनमोहन सिंह मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री होते. १९८० च्या सुमारास शिवराज पाटील हे इंदिरा गांधी व राजीव गांधी मंत्रिमंडळांत संरक्षण मंत्रीसुद्धा होते.
  • अमित देशमुख
  • रितेश देशमुख हे भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता व गृहशिल्पी आहेत. ते त्यांच्या हिंदी व मराठी चित्रपटांतील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे पुत्र आहेत.
  • संभाजी पाटील निलंगेकर हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत व निलंग्याचे प्रतिनिधित्व करतात. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. २०१ून त्यांनी श्रमिक कौशल्य विकास व उद्योजकता हे खाते सांभाळले.होते.

अर्थव्यवस्था

संपादन

उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन झाल्यानन्तर १५ ऑगस्ट १९८४ रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. ह्या बँकेने कृषि क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहेत. सन १९८४ मध्ये या बँकेच्या ४५ शाखा होत्या तर त्यात सम २००७ मध्ये १०६ पर्यंत वाढ झाल्याचे दिसून येतेय म्हणजेच शाखेत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद संख्येत ८७२ वरून १७११ पर्यंत म्हणजे दुपटीने वाढ झाली. विशेषतः बँकेचे भागभांडवल सन १९८४ मध्ये १३१ लाख रुपये होते. ते सन २००७ मध्ये ३,८८६ लाखापर्यंत वाढले, ही वाढ जवळ-जवळ ३० पटीने झाल्याचे दिसून येते. बँकेच्या ठेवी सन १९८४ मध्ये १,१९१ लाख रुपयाच्या होत्या. सन २००७ मध्ये ५०,९२८ लाखापर्यंत वाढल्या आहेत. याचा अर्थ ठेवीमध्ये ४३ पटीने वाढ झाल्याचे आढळून येते. बँकेने कर्ज वाटपात सुलभता निर्माण केल्यामुळे बँकेच्या कर्ज देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बँकेने सन १९८४ मध्ये १८२१ लाख रुपयाची कर्जे वितरीत केली. तर सन २००७ मध्ये ७३,१२९ लाख रुपयाच्या कर्जाचे वाटप केले. सन १९८४ ते सन २००७ या काळात बँकेच्या कर्ज वाटपाचे प्रमाण ४० पटीने वाढले. बँकेने कर्ज देण्याचे सुलभ धोरण स्वीकारले असले तरी कर्जाची वसूली करणे कठीण असते. तरी परंतु बँकेचे सन १९८४ मध्ये कर्ज वसुलीचे प्रमाण ३५.५०% होते. ते सन २००७ पर्यंत ८५% पर्यंत वसुलीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुरुवातीच्या काळात जरी १८ लाख रुपयांचा तोटा झाला असला तरी नंतर मात्र बँकेने आपल्या नफ्यात ४६० लाख रुपयांची वाढ केल्याचे दिसून येते.[] वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, निश्चितच बँकेने जिल्ह्यातील कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सहकाराची तत्त्वे व नियमांचे काटेकोर पालन केल्याचे दिसून येते. याचबरोबर बँकेने सभासदासाठी त्यांच्या आर्थिक कल्याणात वाढ करण्यासाठी अतिशय अल्प व्याजदराच्या वेगवेगळ्या विकासात्मक व प्रोत्साहनात्मक योजना राबविल्या आहेत.

हैद्राबादच्या निजाम काळात लातूर प्रमुख व्यापार केंद्र बनले. ते कृषी आधारित अर्थव्यवस्था व औद्योगिक केंद्रसुद्धा आहे. लातूर संपूर्ण भारतात कडधान्ये व विशेषतः तूर डाळीसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा उडीद, मूग, हरबरा व तुरीसाठी प्रमुख व्यापार केंद्र आहे. इथे मांजरा व विकास हे साखर कारखाने आहेत. तसेच हे तेलबिया मुख्यतः सूर्यफुल, करडई, व सोयाबीन यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. लातूर जिल्हा हा कुलुपे, पतळी वस्तू, दुधाची पावडर, सूतगिरण्या यांचे प्रमुख उत्पादन केंद्र आहे. स्थानिक आंब्यासह लातूरमध्येशंब्याची केशर नावाची जात विकसित झालेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केशवराव सोनवणे यांनी डालडाचा कारखाना स्थापन केला. हा सहकारी तत्त्वावर स्थापलेला कारखाना आहे.

१९९० पर्यंत लातूर तालुका औद्योगिकदृष्ट्या मागास राहिले. १९६० मध्ये मराठवाडा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मागास क्षेत्रास पुढे नेत, मराठवाडा क्षेत्राची औद्योगिक प्रगती सुरू झाली. सहकार मंत्री केशवराव सोनवणे यांच्या कार्यकाळात लातूरला पहिले औद्योगिक क्षेत्र मिळाले. तेव्हाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमीन मिळवून औद्योगिक क्षेत्र स्थापन करून वाढवण्याची सुरुवात केली. शेती प्रक्रिया, खाद्य तेल, जैव तंत्रज्ञान, टिकाऊ वस्तु, प्लास्टिक व ॲल्युमिनिअम प्रक्रियेतील अनेक कंपन्यांचे निर्माण प्रकल्प लातुरात आहेत, पण बहुतांश हे लहान व मध्यम प्रमाणाचे आहेत.

भारताच्या सर्वात मोठे सोयाबीनचे व्यापार केंद्र लातूर आहे. या नगरास महाराष्ट्राचा साखर पट्टा म्हणले जाते. तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. ते भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक आहेत.. इथे तेलबिया, विक्रेय वस्तु व फळबाजारसुद्धा आहे.

लातूर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शीत साठवण सुविधांची सोय करतो. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात ३०० एकर पसरलेले लातूर अन्न उद्यान निर्माणाधीन आहे. दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातूर हे प्रमुख स्टेशन आहे.

लातूरचे औद्योगिक क्षेत्र

१) लातूर औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त भाग १

२) लातूर अतिरिक्त भाग २

३) लातूर सहकारी औद्योगिक क्षेत्र

४) मुरुड तालुका सहकारी औद्योगिक क्षेत्र

५) उदयगिरी सहकारी औद्योगिक क्षेत्र

लातुरातील विशेष औद्योगिक क्षेत्रे व निर्यात क्षेत्रे

१)लातूर अन्न उद्यान

२)लातूर माहिती तंत्रज्ञान उद्यान

३)लातूर एकात्मिक कापड उद्यान

४)मुंबई रेयॉन फॅशन लातूर

वाणिज्य व औद्योगिक संघटना

१)लातूर वाणिज्य संघटना

२)निर्माता संघटना लातूर

३)अभियंता व गृहशिल्पी संघटना लातूर

४)विकसक संघटना लातूर

५)संगणक व माध्यम संघटना लातूर

६)भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रीय परिषदेची शाखा

शिक्षण व संशोधन

संपादन

अ) लातूर आकृतिबंध

लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयचे माजी प्राचार्य जनार्धन वाघमारे व अनिरुद्ध जाधव यांनी लातूर आकृतिबंध निर्माण केला. हा लातूर आकृतिबंध हे विशेष प्रशिक्षण व सातत्यपूर्ण शिकवणीचे मिश्रण आहे. विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिका शृंखला सोडवतात व शिकवणी सत्रास उपस्थित राहतात. लातूर आकृतिबंध ही परीक्षेत अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी बनवलेली सातत्यपूर्ण अभ्यासाची यांत्रिक पद्धत आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी ती प्रमाण बनली. प्रमाणित सामाईक प्रवेश परीक्षेतील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्याच्या इतर भागांत हे शैक्षणिक तंत्र स्वीकारले जात आहे. भारताच्या अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या पद्धतीवर टिका केली आहे. ते या आकृतिबंधास तात्पुरता नफा मिळवण्याचे साधन मानतात; त्यांच्या मते हे तंत्र विद्यार्थ्यांना प्रगत शिकण्यासाठी तयार करत नाही.

लातूर माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी केंद्र म्हणून विकसित झाले आहे. लातूरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षेत चांगले प्रदर्शन असते.

आ) मूलभूत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण

इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित संलग्न १,२८४ प्राथमिक शाळा व ४८७ खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवण्याचे प्राथमिक माध्यम बहुतांशी मराठी आहे. तरी अनेक शाळांमध्ये इंग्रजी व अर्ध इंग्रजी माध्यमसुद्धा दिसतात. मयाने म.रा.मा.उ.मा.शि.म.च्या परिक्षेत अनेक वर्षांपासून गुणववंत दिले आहेत. जिल्हा परिषद व महानगर पालिकेद्वारे सार्वजनिक विद्यालय चालवले जातात व ते महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी (रा.मा.उ.मा.शि.म.शी) संलग्न आहेत.व्यक्तींद्वारे व शिक्षण संस्थांद्वारे खासगी शाळा संचालित होतात. त्या राज्य मंडळ किंवा राष्ट्रीय शिक्षण मंडळ (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद अशांशी संलग्न असतात.

इ) विद्यापीठातील शिक्षण

मागील काही वर्षांपासून(किती?) लातूर उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था इथे आहेत. बहुतांश प्रस्थापित व्या‌वसायिक पदवी महाविद्यालये लातूर नगरात आहेत, अलीकडे उपनगरीय क्षेत्रांतही बऱ्या संस्था निघाल्या आहेत. उज्ज्वल निकालाने मानांकित असल्याने, राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांना लातूर आकर्षित करते. बरेच विद्यार्थी शेजारील जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश महाविद्यालय स्वा.रा.ति.म. विद्यापिठ नान्देडशी संलग्न आहेत. १९८३ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. १९८८मध्ये समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी लातुरात'महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्थेची स्थापना केली. २००८मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली.

ई) व्यावसायिक शिक्षण

लातूर हे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रीय परिषदेचे माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रंथालयासहित परीक्षा केंद्र आहे.

एकूण महाविद्यालये=३३

शिक्षण संस्था

१) स्वा.रा.ति.म. विद्यापीठ उपकेंद्र, पेेठ, लातूर.

कृषि

१)कृषि महाविद्यालय, (स्नातक पदवीधर, पदव्युत्तर कृषि,पदव्युत्तर उद्यानविद्या), लातूर.

२)विलासराव देशमुख जैवतंत्रज्ञान कृषि महाविद्यालय लातूर.

३)गळीतधान्य संशोधन केंद्र,लातूर.

४) कृषि तंत्र पदविका शाळा.लातूर.

५) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूर


वैद्यकीय

१) विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर

२) मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय, लातूर

३) वसंतराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय, लातूर

४) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, लातूर

५) शासकीय रुग्णसेवक महाविद्यालय, बाभळगाव, लातूर

अभियांत्रिकी

१) एम.एस. बिडवे महाविद्यालय, वसवाडी, लातूर

तंत्रनिकेतन

१) पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर

२) वि.दे.फा. तंत्रनिकेतन, लातूर

३) सांदीपनी तंत्रनिकेतन, कोळपा, लातूर

४) विवेकानंद तंत्रनिकेतन, लातूर

५) मुक्तेश्वर तंत्रनिकेतन, बाभळगाव, लातूर

शाळा

अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या क्षेत्रातील शाळा

१) श्री व्यंकटेश विद्यालय, लातूर

२) गोदावरी कन्या विद्यालय, लातूर

३) सरस्वती विद्यालय, लातूर

४) देशी केंद्र विद्यालय, लातूर

५) केशवराज विद्यालय, लातूर

६) शिवाजी विद्यालय, लातूर

७) यशवंत विद्यालय, लातूर

८) राजस्थान विद्यालय, लातूर

९) बसवण्णप्पा वाले विद्यालय, लातूर

१०) श्रीमानयोगी विद्यालय, लातूर

११) लाल बहादुर शास्त्री विद्यालय, लातूर

ब) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या शाळा

१) संत तुकाराम, लातूर २)श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल , लातूर

३) पोदार, लातूर

संस्कृती

संपादन

अ)कला, स्थापत्य व साहित्य

आ)संगीत, नृत्य व चित्रपट

आ)समाज

इ)अन्न

ई) वेशभूूषा १)महिला : बहुतांशी साड्या २)पुरुष : बहुतांशी शर्ट-पँट

उ) उत्सव दर्शवेळ अमावस्या : या दिवशी. (सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः [[अमावास्या[[ असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या म्हणतात.)

ऊ) क्रीडा लातूरमध्ये क्रीडांगण तयार करण्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची योजना आहे. लातूर भागासाठी विभागीय क्रीडा संकुलाची योजना आहे. हे केंद्र लातूर, उस्मानाबाद व नांदेडच्या खेळाडुूंची गरज भागवेल. राष्ट्रस्तरीय कबड्डी व बेसबॅाल लातुरात झाल्या आहेत. लातूर अजूनही कीरिडा प्रबोधिनीची प्रतीक्षा करत आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालये

संपादन

२) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

३) महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा

४) संभाजी महाविद्यालय,मुरुड

५) शहीद भगतसिंग महाविद्यालय,किल्लारी,औसा

६) दयानंद महाविद्यालय, लातूर

७) दयानंद विधी महाविद्यालय,लातूर

८) महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर

९) जयक्रांती महाविद्यालय ,लातूर

९) व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, लातूर

१०) त्रिपुरा महाविद्यालय,लातूर

११) काॅक्झिट महाविद्यालय, लातूर

१२) सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर

१३) राजमाता जिजामाता महाविद्यालय, लातूर

१४) कमला नेहरू महाविद्यालय, बोरी, लातूर

१५) संजीवनी महाविद्यालय,चापोली,चाकूर,लातूर

१६) स्वामी विवेकानंद महाविद्यालय,शिरूर ताजबंद, अहमदपूर,लातूर

१७) शिवाजी महाविद्यालय,उदगीर,लातूर

१८) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,उदगीर,लातूर

१९) आझाद महाविद्यालय,औसा, लातूर

२०) शिवनेरी महाविद्यालय, शिरूर अनंतपाळ,लातूर

२१)महात्मा गांधी महाविद्यालय,अहमदपूर,लातूर

विभाग व तालुके

संपादन

तालुके १०

उपविभाग ५

विधानसभा मतदारसंघ ६

लोकसभा मतदारसंघ २

महानगर पालिका १

गावे ९४८

ग्रामपंचायती ७८६

पंचायत समित्या १०

तालुके १०

नगर पालिका ४

  • नगरपंचायत ५

टपाल कार्यालये ३२

शासकीय विश्रामगृहे २

पर्यटन स्थळे

संपादन
  • अष्टविनायक मंदिर, लातूर

हे शिवाजी नगरमध्ये आहे. १९८९ मध्ये निर्मित हे नवीन मंदिर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे देवालयाच्या दोन्ही बाजूंस उद्यान आहे, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत. उद्यानात ८ ते ९ फूट उंचीची शिवमूर्ती आहे.

१७६१ च्या मराठा व हैदराबादी निजामांमधील युद्धाचा साक्षी आहे. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वातील मराठा सेनेने निजामांचा पराभव केला व उदगीरचा सधी झाला.. उदगीरचा किल्ला ४० फूट खोल खंदकाने वेढलेला आहे, कारण किल्ला भूमी स्तरावर बांधला आहे. किल्ल्यात अरबी व फारशीत लिहिलेले काही दुर्मिळ कोरीव लेख आहेत.

हा किल्ला सर्व बाजूंनी उंच प्रांगणाने वेढलेला व खड्ड्यात आहे, ज्यामुळे व्यक्ती याच्या उंच स्थानावरून दूर अंततरावरून येणाऱ्या सेनेला पाहू शकतो. त्यावेळी जेव्हा किल्ल्याचा बहुतांश भाग लपलेला राहतो. जवळपास चौकोनी आकाराचा, किल्ला ३६.५८ मीटर रुंद खंदकाने किंवा चराने वेढलेला आहे. हा चर कोरडा आहे.
  • केशव बालाजी मंदिर, औसा : हे मंदिर औसाजवळ याकतपूर मार्गाजवळ आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर हे बांधले आहे. हे मंदिर व शेजारील क्षेत्र खासगी संपत्ती आहे पण भक्त दर्शनासाठी व पर्यटनासाठी तिथे जाऊ शकतो. किल्ल्यानंतर औसा नगरातील हे दुसरे आकर्षक स्थळ आहे. मंदिराजवळ निवासी सुविधा उपलब्ध आहे.

मंदिर उतारांनी वेढलेले आहे. गणेश, शिव, विठ्ठल, रुक्मिणी तसेच केशवानंद बापू यांना समर्पित चार वेगळी मंदिरे एकाच परिसरात आहेत. मंदिर सकाळी ६ला उघडून रात्री ९ला बंद होते. दिवसभरात विविध सेवा होतात. सकाळी १० व संध्याकाळी ७ वाजता अतिथींसाठी साधारण प्रसाद असतो. प्रत्येक शुक्रवारी महाप्रसाद सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान असतो. हे मंदिर 'धर्म व संस्कार नगरी' प्रकल्पाचा भाग आहे.

लातूरपासून ४५ किमी अंतरावर हे लेण्यांचे लहान गाव आहे. बुद्ध, नरसिंह, शिवपार्वती, कार्तिकेय व रावण यांचा लेण्यांतील शिल्पांत समावेश होतो. इतिहासकारांच्या अनुसार या लेणी ६ व्या शतकात गुप्त काळात बनल्या. लेण्यांजवळ रेणुका मंदिर व पिरपाशा दर्गा आहे.
  • गंज गोलाई, लातूर:

गोलाई तालुक्याच्या केंद्रात आहे. नगर रचनाकार फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली. १९१७ला निर्मित मोठी २ मजली रचना ही गोलाईची मुख्य वास्तु आहे. वर्तुळाकार रचनेच्या केंद्रात अंबादेवीचे मंदिर आहे. या गोलाईस जोडणारे १९ मार्ग आहेत व या मार्गांच्या बाजूंस सर्व प्रकारचेया पारंपरिक स्थानिक दागिने, पादत्राणे ‌व मिरची ते गुळापर्यंत अन्नपदार्थांचा बाजार आहे. अशाप्रकारे, गोलाई हे तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार केंद्र बनले आहे.

  • शेळगाव : पाच गावांच्या सीमेवरील हे गाव चाकूर तालुक्यातील मल्लप्पा शिव मंदिरासाठी विख्यात आहे. श्रावण महिन्यात शेळगावच्या मल्लप्पा मंदिरात व डोंग्रज येथे संत अंबादास मंदिरात तीर्थयात्रा होते. या यात्रेदरम्यान अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होते.
  • नागनाथ मंदिर, वडवळ, चाकूर
  • बुद्ध उद्यान : मंदिरात विशाल बुद्धमूर्ती आहे.
  • लोहारा: उदगीर तालुक्यातील गाव महादेव बेट (टेकडी) व गैबीसाहेब बेटासाठी प्रसिद्ध आहे. निजामशाही वंशाच्या काळापासून बेनिनाथ मठ अस्तित्वात आहे.
  • वनस्पती बेट, वडवळ : ही टेकडी दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी व वनस्पतींचे माहेरघर आहे. हे ठिकाण लातूरपासून ३९ किमी व चाकूरपासून १६.५ किमी दूर आहे. टेकडी जमिनीपासून ६५० फूट (२०० मीटर) उंच व वडवळ गावापासून तीन किलोमीटर दूर आहे.
  • विराट हनुमान(लातूर):

ही परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातूर येथे आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मंदिर आच्छादित आहे. मूर्ती २८ फूट उंच व शेदरी रंगाची आहे.

  • विलासराव देशमुख उद्यान, लातूर:

हे नाना नानी उद्यान होते. हे मध्यवर्ती ठिकाण महानगरपालिकेजवळ आहे व आरामदायक वातावरणामुळे जनतेत प्रसिद्ध आहे. नागरिक इथे सहपरिवार, अपत्यांसहित व मित्रांसह वेळ घालवतात. येथे एक मुक्त सभागृह आहे. उद्यानामध्ये सार्वजनिक बैठकांसाठी जागा आहे.

  • शिव मंदिर, निलंगा
  • साई धाम, तोंडार
  • साई नंदनवन, चाकूर: चाकूरजवळील आणखी एक पर्यटन स्थळ. ४०० एकर (१.६ चौ.किमी.) मध्ये पसरलेले आहे, इथे आंब्याचा मळा, जल उद्यान व मनोरंजन उद्यान आहे. उद्यानाच्या केंद्रात एक सत्यसाईबाबा मंदिर आहे.
  • सिद्धेश्वर मंदिर, लातूर : -

हे देऊळ मुख्य नगरापासून दोन किलोमीटरवर आहे. हे सम्राट 'ताम्रध्वजा'द्वारे निर्मित व सोलापूरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे. हे लातूरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते.

  • सुरत शहावली दर्गा

हा राम गल्ली, पटेल चौकात आहे. हा लातूरचा भाग आहे. हा दर्गा १९३९ला मुस्लिम संत सैफ उल्लाह शाह सरदारींच्या स्मरणार्थ बांधला गेला. त्यांना येथे पुरले. येथे जून-जुलैमध्ये ५ दिवसांची जत्रा दरवर्षी असते.

  • हकानी बाबा, लातूर मार्ग, चाकूर
  • हत्ती बेट देवर्जन: उदगीरजवळच्या या ठिकाणी एका लहान टेकडीवर संत गंगाराम यांची समाधी आहे. ह्या स्थानी काही कोरीव गुहा आहेत.. या स्थानाने ज्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात प्राणाहुती दिली अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जन्म दिला आहे.
  • येरोळ :- हे गाव लातूर व उदगीर रोडवर आहे.येथे कालिंकामातेचे भव्य दिव्य असे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे..हे येरोळ गावचे ग्रामदैवत आहे.येथे गुढिपाडवा झाल्यावर सातव्या दिवशी यात्रा भरते..

प्राथमिक सुविधा

संपादन

आरोग्य

एकूण रुग्णालये: २८

लातूर जिल्हा १२ शासकीय रुग्णालय, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १९ इस्पितळे व २३४ प्राथमिक आरोग्य सहाय्यता गटांद्वारे सज्ज आहे. लातुरात बनत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयामुळे शेजारील ११ जिल्ह्यांना लाभ मिळेल. शिवाय इथे अनेक खासगी रुग्णालये आहेत.लातुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेच, त्याशिवाय, व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयही आहे.

ऊर्जा

चित्रे

संपादन
 
उदगीरचा किल्ला
 
लातूरचा दर्गा
चित्र:Bhukamp-लातूर.jpg
लातूरात झालेला भूकंप
चित्र:Kharosa2,लातूर.jpg
खरोसा लेण्या, औसा
चित्र:Sidheshwar mandirलातूर.jpg
सिद्धेश्वर मंदिर, लातूर

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ ३१ जाानेवारी लोकमत वृत्तपत्र
  2. ^ देशमुख, रा. नी. "आपला लातूर जिल्हा".
  3. ^ [१]

बाह्य दुवे

संपादन
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर तालुका | उदगीर तालुका | अहमदपूर तालुका | देवणी तालुका | शिरूर अनंतपाळ तालुका | जळकोट तालुका | औसा तालुका | निलंगा तालुका | रेणापूर तालुका | चाकूर तालुका