उदगीर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघ - २३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील जळकोट आणि उदगीर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. उदगीर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबुराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
२०१९ 237 उदगीर अ.जा. संजय बाबुराव बनसोडे पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 96366 अनिल सदाशिव कांबळे पुरुष भारतीय जनता पक्ष 75787
2014 237 उदगीर अ.जा. सुधाकर संग्राम भालेराव पुरुष भारतीय जनता पक्ष 66686 संजय बाबुराव बनसोडे पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 41792
2009 237 उदगीर अ.जा. सुधाकर संग्राम भालेराव पुरुष भारतीय जनता पक्ष 73840 कामंत मच्छिंद्र गुणवंतराव पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 56563
2004 204 उदगीर खुला भोसले चंद्रशेखर धोनीबा पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 57605 केंद्रे गोविंद ज्ञानोबा पुरुष भारतीय जनता पक्ष 54488
1999 204 उदगीर खुला गोविंद ज्ञानोबा केंद्रे पुरुष भारतीय जनता पक्ष 50394 जाधव बाळासाहेब किशनराव पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 37604
1995 204 उदगीर खुला मनोहर दिगंबरराव पटवारी पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 34333 केंद्रे गोविंद ज्ञानोबा पुरुष जनता दल 30996
1990 204 उदगीर खुला पाटील नारायणराव बाजीराव पुरुष जनता दल 39246 बसवराज मलशेट्टी पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 38844
1985 204 उदगीर खुला जाधव बाळासाहेब किशनराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 46231 पटवारी मनोहरराव दिगंबरराव पुरुष अपक्ष 39066
1980 204 उदगीर खुला जाधव बाळासाहेब किशनराव पुरुष INC(U) 33243 पटवारी मनोहरराव दिगंबरराव पुरुष JNP(JP) 16647
1978 204 उदगीर खुला जाधव बाळासाहेब किशनराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 24455 पटवारी मनोहर दिगंबरराव पुरुष शेतकरी कामगार पक्ष 19482
1972 191 उदगीर अ.जा. विठ्ठलराव खडीवाले पुरुष RPI 22058 घोगे भीमराव माणिकराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 21815
1967 191 उदगीर अ.जा. पी.एस. सरवदे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 15419 व्ही.बी. खडीवाले पुरुष अपक्ष 9920
1962 231 उदगीर अ.जा. विठ्ठलराव बापूराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 21494 किसन सखाराम पुरुष REP 7616

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

संपादन