मार्च २७
दिनांक
(२७ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८६ वा किंवा लीप वर्षात ८७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसोळावे शतक
संपादन- १५१३ - स्पॅनिश कॉॅंकिस्तादोर हुआन पॉन्से दे लेओन फ्लोरिडाला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
सतरावे शतक
संपादन- १६२५ - चार्ल्स पहिला इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडच्या राजेपदी. राजेपदी येताच त्याने आपणच फ्रांसचेही राजे असल्याचे जाहीर केले.
अठरावे शतक
संपादन- १७८२ - चार्ल्स वॅट्सन-वेंटवर्थ युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १७९४ - अमेरिकन नौदलाची स्थापना.
- १७९४ - स्वीडन व डेन्मार्कमध्ये मित्रत्त्वाचा तह.
एकोणिसावे शतक
संपादन- १८१४ - १८१२ चेयुद्ध-हॉर्सशू बेंडची लढाई - जनरल अँड्र्यू जॅक्सनच्या अमेरिकन सैन्याने क्रीक जमातीचा पराभव केला.
- १८३६ - टेक्सासची क्रांती-गोलियाडची कत्तल - जनरल ॲंतोनियो लोपेझ दि सांता ऍनाने मेक्सिकन सैन्याला ४०० टेक्सासी व्यक्तींची कत्तल करण्यास फरमावले.
- १८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - फोर्ट टेक्सासचा वेढा सुरू.
- १८५४ - क्रिमियन युद्ध - युनायटेड किंग्डमने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८७१ - रग्बीचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये खेळला गेला.
- १८९० - अमेरिकेच्या लुईव्हिल, केंटकी शहरात टोर्नेडो. ७६ ठार, २०० जखमी.
- १८९३ - केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.
विसावे शतक
संपादन- १९४१ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियातील अक्षधार्जिण्या वायुदल अधिकाऱ्यांनी रक्तहीन क्रांती करून सरकार उलथवले.
- १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
- १९५८ - निकिता ख्रुश्चेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६४ - गुड फ्रायडे भूकंप - अमेरिकेच्या अलास्का राज्यात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.२ तीव्रतेचा भूकंप. १२५ ठार, ॲंकरेज शहर उद्ध्वस्त.
- १९७७ - तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर. ५८३ ठार. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे.
- १९८० - अलेक्झांडर कीलॅंड हा खनिज तेलाचे उत्खनन करणारा तराफा समुद्रात बुडाला. १२३ ठार.
- १९८८ - मौदुद अहमद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी.
- १९९३ - जियांग झेमिन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९३ - आल्बर्ट झफी मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९३ - महामने उस्माने नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००० - वेस्ट इंडीजचा खेळाडू कोर्टनी वॉल्श याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- २००० - चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
- २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
- २००४ - नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.
जन्म
संपादन- ९७२ - रॉबर्ट पहिला, फ्रांसचा राजा.
- १७८५ - लुई सतरावा, फ्रांसचा राजा.
- १८४५ - विल्हेम रॉंटजेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.
- १८५९ - जॉर्ज गिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८६३ - हेन्री रॉइस, इंग्लिश कार तंत्रज्ञ.
- १८८८ - जॉर्ज ए. हर्न, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९१ - व्हॅलेन्स जुप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०१ - ऐसाकु साटो, जपानी पंतप्रधान.
- १८१० - फ्रँक स्मेइल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१० - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
- १९१२ - जेम्स कॅलाहान, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९४१ - इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.
- १९७० - मरायाह केरी, अमेरिकन गायिका.
- १९७३ - रॉजर टेलिमाकस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - झेवियर मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ११९१ - पोप क्लेमेंट तिसरा.
- १३७८ - पोप ग्रेगोरी अकरावा.
- १६२५ - जेम्स पहिला, इंग्लंडचा राजा.
- १८९८ - सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
- १९४० - मायकेल जोसेफ सॅव्हेज, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- १९६८ - युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
- १९८१ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
- १९९२ - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.
- १९९७ - भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मार्च २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २५ - मार्च २६ - मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - (मार्च महिना)