विल्हेम राँटजेन

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(विल्हेम रॉंटजेन या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्हेम राँटजेन हे शास्त्रज्ञ आहेत.

प्रा.विल्हेम राँटजेन
विल्हेम राँटजेन
पूर्ण नावविल्हेम राँटजेन
जन्म मार्च २७ १८४५
मृत्यू फेब्रुवारी १० १९२३
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

संशोधन

संपादन

सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनाईड वापरले होते. अंधाऱ्या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या. या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी.चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स रे असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.

पुरस्कार

संपादन

क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

फेब्रुवारी १० १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक माऱ्यामुळे मृत्यु पावले.

बाह्यदुवे

संपादन