एप्रिल १५
दिनांक
(१५ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०५ वा किंवा लीप वर्षात १०६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६७३ - मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
एकोणविसावे शतक
संपादन- १८९२ - जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
- १८९५ - रायगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हस्ते पहिल्या शिवजयंती उत्सवास सुरुवात.
विसावे शतक
संपादन- १९१२ - आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.१५१७ बळी.
- १९२३ - मधुमेह असणाऱ्ययांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
- १९४० - दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नार्विक शहरावर दोस्त राष्ट्रांचा हल्ला.
- १९५१ - आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे 'भूदान' चळवळ सुरू केली.
- १९९५ - जागतिक व्यापार संघटनेची स्थापना.
- १९९७ - मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १४५२ - लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार.
- १४६९ - गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.
- १५५२ - पियेत्रो कॅताल्दी, इटालियन गणितज्ञ.
- १६४२ - सुलेमान दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६४६ - क्रिस्चियन पाचवा, डेन्मार्कचा राजा.
- १६८४ - कॅथरिन पहिली, रशियाची सम्राज्ञी.
- १८०० - जेम्स क्लार्क रॉस, इंग्लिश शोधक.
- १८७४ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८३ - स्टॅन्ली ब्रुस, ऑस्ट्रेलियाचा आठवा पंतप्रधान.
- १८९३ नरहर रघुनाथ फाटक, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
- १८९६ - निकोलाय निकोलायेविच सेम्योनोव्ह, नोबेल पारितोषिकविजेता रशियन रसायनशास्त्रज्ञ.
- १९१२ - मल्हार सदाशिव पारखे, उद्योजक व वेदाभ्यासक
- १९१२ - किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - रिचर्ड फॉन वायझॅकर, जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२२ - हसरत जयपुरी, गीतकार.
- १९३० - विग्दिस फिनबोगादॉट्टिर, आइसलॅंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - सुरेश भट, कवी व मराठी गझलकार.
- १९४०-सारंगीवादक उस्ताद सुलतान खान
- १९४२ - केनेथ ले, एन्रॉनचा अमेरिकन मुख्याधिकारी.
- १९५५ - डोडी अल-फयेद, इंग्लिश धनाढ्य.
- १९६३ - मनोज प्रभाकर, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९८० - जेम्स फॉस्टर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १६५९ - सायमन डाख, जर्मन कवी.
- १७०४ - योहान व्हान वेवरेन हड, डच गणितज्ञ.
- १७५४ - जाकोपो रिकाटी, इटालियन गणितज्ञ.
- १७९४ - मोरेश्वर रामचंद्र पराडकर, पंडीतकवी
- १८६५ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
- १८८९ - फादर डेमियन, ख्रिश्चन धर्मप्रसारक.
- १९१२ - एडवर्ड स्मिथ, टायटॅनिकचा कॅप्टन.
- १९८० - ज्याँ-पॉल सार्त्र, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञ.
- १९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी
- १९९८ - पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.
- २०१३ - वि.रा. करंदीकर, संत साहित्याचे अभ्यासक
प्रतिवार्षिक पालन
संपादन- जागतिक कला दिन
- जागतिक सांस्कृतिक दिन
- जागतिक आवाज दिवस.
- हिमाचल राज्य स्थापना दिन.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - (एप्रिल महिना)