केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

(देवनहळ्ळी विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BLRआप्रविको: VOBG) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २३ मे २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बंगळूर शहरापासून ३० किमी अंतरावर देवनहळ्ळी ह्या गावामध्ये स्थित आहे.

केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: BLRआप्रविको: VOBL
BLR is located in कर्नाटक
BLR
BLR
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्नाटकातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक बंगलोर इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड (BIAL)
कोण्या शहरास सेवा बंगळूरू
स्थळ देवेनहळ्ळी
हब
समुद्रसपाटीपासून उंची ३,००२ फू / ९१५ मी
गुणक (भौगोलिक) 13°11′56″N 77°42′20″E / 13.19889°N 77.70556°E / 13.19889; 77.70556
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ १५,१२६ ४,२०० डांबरी

हा विमानतळ सुरू होण्यापूर्वी बंगळूरमधील हवाई वाहतूक एच.ए.एल बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ सांभाळत असे. परंतु बंगळूरमधील वाढती वाहतूक हाताळण्यास तो अपूरा पडू लागला. ह्या कारणास्तव देवनहल्ळी येथे २००५ साली नव्या विमानतळाचे बांधकाम सुरू झाले. मार्च २००८ मध्ये कार्यरत होण्याची अपेक्षा असताना काही विलंबांमुळे अखेर मे मध्ये येथून वाहतूक सुरू करण्यात आली. २०१२ साली १२.७ दशलक्ष प्रवासी वाहतूक सांभाळणारा बंगळूरू आंतरराष्ट्रीय हा एका सर्वेक्षणानुसार भारतामधील सर्वोत्तम विमानतळ होता.

एक मोठा टर्मिनल व ३६ गेट्स असलेल्या ह्या विमानतळामध्ये हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था आहे.

Indian National Flag at Kempegowda International Airport, Bengaluru

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर अरेबिया शारजा
एर फ्रान्स पॅरिस-चार्ल्स दि गॉल
एर इंडिया अहमदाबाद, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, दिल्ली, दुबई-आंतरराष्ट्रीय, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, कोळीकोड, लखनौ, माले, मंगळूर, मुंबई, पाटणा, पुणे, सुरत, तेल अवीव, तिरुवनंतपुरम
एर इंडिया एक्सप्रेस मंगळूर
एरएशिया क्वालालंपूर
एरएशिया इंडिया अहमदाबाद, बागडोगरा, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, रांची, विशाखापट्टणम
अकासा एर अहमदाबाद, चेन्नई, कोची, मुंबई
अलायन्स एर अगत्ती बेट, गोवा, गुलबर्गा, हैदराबाद, कोची, कोल्हापूर, म्हैसूर, विजयवाडा
अमेरिकन एरलाइन्स सिॲटल-टॅकोमा
बटिक एर मलेशिया क्वालालंपूर
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो
कॅथे पॅसिफिक हाँग काँग
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय
इथियोपियन एरलाइन्स अदिस अबाबा
एतिहाद एरवेझ अबु धाबी
गो फर्स्ट अहमदाबाद, दिल्ली, गोवा, हैदराबाद, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे, रांची, सुरत, वाराणसी३ मे, २०२३ रोजी दिवाळे काढले.
गल्फ एर बहरैन
इंडिगो आगरताळा, आग्रा, अहमदाबाद, अलाहाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बागडोगरा, बँकॉक-सुवर्णभूमी, बरेली, बेळगांव, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगढ, चेन्नई, कोइंबतूर, कोलंबो-बंदरनायके, देहरादून, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, दोहा, दुबई-आंतरराष्ट्रीय, दुर्गापूर, गया, गोवा, गोरखपूर, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, इंफाळ, इंदोर, जयपूर, जम्मू, जोधपूर, जोरहाट, कडप्पा, कण्णुर, कानपूर, कोची, कोलकाता, कोळीकोड, कर्नूल, लखनौ, मदुराई, माले, मंगळूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पाटणा, पोर्ट ब्लेर, पुणे, रायपूर, राजमहेंद्री, राजकोट, रांची, शिर्डी, सिलचर, सिंगापूर, श्रीनगर, सुरत, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, तिरुपती, तुतिकोरिन, उदयपूर, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम
जपान एरलाइन्स तोक्यो-नारिता
केएलएम अ‍ॅम्स्टरडॅम
कुवेत एरवेझ कुवेत
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट
मलेशिया एरलाइन्स क्वालालंपूर
नेपाल एरलाइन्स काठमांडू
ओमान एर मस्कत
क्वांटास सिडनी
कतार एरवेझ दोहा
सौदिया जेद्दाह
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर
स्पाईसजेट बागडोगरा, चेन्नई, कोइंबतूर, दरभंगा, दिल्ली, गोवा, ग्वाल्हेर, हैदराबाद, जबलपूर, झरसुगुडा, कोलकाता, मंगळूर, मुंबई, नाशिक, पाटणा, पाँडिचेरी, पुणे, शिर्डी, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, उदयपूर, विशाखापट्टणम
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो-बंदरनायके
स्टार एर बीदर, गुलबर्गा, हुबळी, हैदराबाद, जामनगर
थाई एरएशिया बँकॉक-डॉन म्वाँ
थाई एरवेझ इंटरनॅशनल बँकॉक-सुवर्णभूमी
युनायटेड एरलाइन्स सॅन फ्रान्सिस्को
वीएटजेट एर दा नांग, हनोई, हो चि मिन्ह सिटी
व्हिस्टारा चंदिगढ, कोइंबतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इंदोर, मुंबई, पुणे

बाह्य दुवे

संपादन