मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

संपादन
चांदणे शिंपित जा ...!
 
 
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

 

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


 
जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
 
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
 
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
 
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

  २०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

 

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
 
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

  वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

संपादन
२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
 
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

 
विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
 
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
     
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

  २०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
 
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


माझे Katyare नावाने केले जुने कार्य येथे आहे! बोला काय म्हणताय?

'Archives'
जुन्या दप्तरदाखल चर्चा खाली आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) १६/०७/२००९ २६/०५/२०१०


लेखनपद्धतीतले बारकावे

संपादन

नमस्कार कट्यारे,

विकिपीडियावरील लेखनपद्धत आपल्याला सर्वसाधारण मानाने माहीतच आहे. पण अजून काही बारकाव्यांबद्दल हा संदेशप्रपंच : मराठी विकिबुक्स लेखात मी नुकते केलेले संपादन पाहावे. त्याआधीच्या तुम्ही केलेल्या संपादनांत खालील काही गोष्टी सुधारायच्या होत्या, त्या या संपादनाने साधल्या आहेत :

  • 'विकिबुक्स' शब्दाला प्रत्येक परिच्छेदात बाह्य दुवा देणे : सहसा बाह्य दुवे सर्वांत शेवटी 'बाह्य दुवे' नोंदवले जातात. लेखातील अन्य विभागांमध्ये, मुख्य मजकुरात विकिपीडियांतर्गत दुवे (म्हणजे मराठी विकिपीडियांतर्गत) दुवे देणे अपेक्षित असते.
  • 'बाह्य दुवे' विभागात विकिपीडियाबाहेरील दुवे नोंदवावेत. यासाठी साचा:संकेतस्थळ हा साचा वापरू शकता.

लेखनपद्धतीतल्या या बारकाव्यांसाठी आपण अन्य जाणत्या सदस्यांनी केलेली संपादने निरखू शकता; त्यातून या गोष्टी उलगडत जातील. बाकी, आपण पुन्हा विकिपीडियावर आलात व जोमाने सहभाग घेत आहात, हे पाहून आनंद झाला. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:२९, ३ फेब्रुवारी २०११ (UTC)

क्षेपणास्त्रे

संपादन

नमस्कार,

दोनेक दिवस येथे फिरकता न आल्यामुळे तुमच्या क्षेपणास्त्रांबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. पण संकल्पने स्वतःला कृष्णा भास्कर कुलकर्णी करुन घेउन उत्तर आणि काम दोन्ही केलेले दिसत आहे. अधिक मदत किंवा माहिती लागली तर कळवालच.

अभय नातू १७:४९, १७ मार्च २०११ (UTC)

ता.क. संकल्प कृभाकु झाला तर मग मी अफजलखान होईन, नाही का? हमम् :-)

क्षेपणास्त्रांचे चपखल वर्गीकरण हवे

संपादन

नमस्कार! क्षेपणास्त्रांचे वर्गीकरण मी केलेल्या बदलांअगोदर वर्ग:शस्त्रे, वर्ग:युद्धवर्ग:क्षेपणास्त्रे या ढोबळ वर्गांमध्ये केले होते; याचे कारण तेव्हा एक-दोनच क्षेपणास्त्रविषयक लेख होते. मात्र नंतर तुम्ही भारताच्या क्षेपणास्त्रांविषयी लेख बनवायला घेतले म्हटल्यावर वर्ग:भारताची क्षेपणास्त्रे नेमका हा वर्ग बनवून त्यात सर्व संबंधित लेख वर्ग करून अन्य ढोबळ पातळीच्या वर्गांमधून काढून घेतले.

यामागचे कारण विकिपीडियावर चावडीच्या आर्काइव्हांत चर्चिले गेले आहे. ते इथे तुमच्या पृच्छेच्या निमित्ताने पुन्हा लिहितो : एक समांतर उदाहरण घेऊ. समजा मला संदीप खरे हे नवीन पान बनवल्यावर त्याचे वर्गीकरण करायचे असल्यास मी त्याचे वर्गीकरण वर्ग:सजीव, वर्ग:प्राणी, वर्ग:भूचर प्राणी, वर्ग:मानव, वर्ग:व्यक्ती, वर्ग:साहित्यिक, वर्ग:कवी अश्या सर्व वर्गांत तत्त्वतः करू शकतो. पण या सर्व वर्गांत त्याचे वर्गीकरण करणे फारच ढोबळ, किंबहुना बेशिस्त वर्गीकरण होते. त्यापेक्षा मी या लेखाचे वर्गीकरण वर्ग:मराठी कवी या चपखल आणि नेमक्या वर्गात केल्यास, ते सुयोग्य ठरते - कारण 'संदीप खरे' या माणसाबद्दल कोणी मला एका वाक्यात ओळख सांग, असे विचारल्यास "संदीप खरे हा मराठी भाषेतील एक कवी आहे" असे नेमके उत्तर आपसूक सुचते. याचाच अर्थ 'संदीप खरे' या पानाचे नेमके वर्गीकरण वर्ग:मराठी कवी याच वर्गात होते.

त्याच तर्काने अग्नी क्षेपणास्त्राबद्दाल कोणी एका वाक्यात परिचय मागितल्यास "अग्नी क्षेपणास्त्र हे भारताचे क्षेपणास्त्र आहे" अशी नेमकी आणि चपखल माहिती उत्तरादाखल देता येईल. याचाच अर्थ 'अग्नी क्षेपणास्त्र' लेखाचे वर्गीकरण वर्ग:शस्त्रे, वर्ग:युद्ध (अग्नी क्षेपणास्त्र युद्धांमध्ये वर्ग करायला लढाई/युद्ध नाही :) ) या वर्गांत होऊ शकणार नाही. किंबहुना वर्ग:क्षेपणास्त्रे या वर्गातही हे पान ठेवू नये - कारण कालौघात पाकिस्तान, चीन, अमेरिका, उत्तर कोरिया, इस्राएल, लेबानन, लिबिया, फ्रान्स, युनायटेड किंग्डम व अन्य अनेक देशांच्या क्षेपणास्त्रांचे लेख या वर्गांत वर्ग होत राहिले, तर ते माहितीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने बेशिस्त ठरेल. लेखांचे, साच्यांचे सुयोग्य, चपखल आणि नेमक्या गटांमध्ये शिस्तशीर संकलन करणे, हा वर्गीकरणामागील उद्देश आहे हे ध्यानात घेतल्यास मी केलेल्या बदलांमागील प्रयोजन आपणांस समजून येईल.

बाकी, तुमचे योगदान पाहून माझ्यासारख्या बर्‍याच लोकांना हुरूप येतो. तुमचे दर्जेदार काम असेच चालू राहू द्या. :)

धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:४६, १८ मार्च २०११ (UTC)

मला तुमचा प्रश्न निटसा कळाला नाही. तुम्हाला Template:Infobox_Weapon सारखा साचा बनवायचा आहे का ?

Template:Infobox_Weapon चा वापर पहाण्यासाठी इंग्लिश विकि वरील पुथ्वी मिसाईल लेख पहावा.

Maihudon ०५:०२, १८ मार्च २०११ (UTC)

नविन साचा

संपादन

तुम्ही केलेल्या साच्यात तुम्ही कोणतेही parameter read किंवा pass करत नव्हतात. तुम्ही बनवायचा प्रयत्न करत असलेल्या साच्यात तुम्हाला standard format मध्ये क्षेपणास्त्राची काही माहिती दाखवायची होती. त्यासाठी तुम्हाला क्षेपणास्त्र माहिती parameters तुमच्या साच्याला pass करण्याची गरज होती. साचा बनवणे शिकण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे इंग्लिश विकीवरील साचे मराठी विकि वर कॉपी करून त्यातील parameter चे behaviour पहाणे.

साच्यांची माहितीजरी थोडी अवघड वाटली असेल पण साचे बनवणे खूप सोपे काम आहे.

साच्यांच्या अभ्यासासाठी इंग्रजी विकिपिडियावरील काहि दुवे देत आहे, [१], [२]

Maihudon ०७:१९, १९ मार्च २०११ (UTC)

वेगवान संपादने

संपादन

नेमक्या अशा युक्त्या लगेच आठवत नाहीत पण माझ्या आवडीचा विषय असला की पटापटा संपादन होते हे लक्षात आले आहे.

तसेच लिहायला घेण्याआधी त्या विषयावर थोडेसे वाचन असले तर भराभरा शब्द सुचत जातात तसेच लेखनात सुटसुटीतपणाही येतो.

एखाद्या मोठ्या लेखाचे भाषांतर करताना शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा मी तो लेख (जसे इंग्लिश विकिपीडियावरील) आधी वाचतो, त्यावर इतर काही साधने मिळाली तर ती पाहतो आणि मग लिहायला घेतो. त्याचप्रमाणे लिहिताना दोन-तीन परिच्छेद वाचून त्याचा आशय कळून घेतो आणि मग भाषांतरापेक्षा मराठीत पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न करतो.

टंकनाचे म्हणाल तर मी पहिल्यापासून इन्स्क्रिप्ट कळपट वापरत आलेलो आहे आणि आता ४-५ वर्षांनी फोनेटिक पेक्षा इन्स्क्रिप्ट टंकनाचा माझा वेग अनेकपटीनी जास्त आहे.

अजून काही आठवले तर कळवतो.

अभय नातू ०१:४४, १८ मार्च २०११ (UTC)


वर अभयने म्हटल्या प्रमाणे संबधीत विषयाचा अभ्यास असेल आणि विषय आवडीचा असेल तर कॉन्संट्रेशन चांगले होते.छोट्या विकिपीडियावर सर्वात मोठा व्यत्यय स्वतःहून ओढवून घेतलेला अलिकडील बदल तपासत रहाण्याचा छंद लागण्याचा असतो.तसेच मध्येच लाईट गेलीतर लिहिलेले जाऊ नये म्हणून संपादन सतत सेव्ह करण्याची सवयीतही काहीसा कालापव्यय होतो तोही बर्‍याचदा टाळता येणारा असतो.
सपादन खिडकीच्या साधनपट्टीत प्रगत साधनात सर्वात उजव्या कोपर्‍यातील शोधा व बदला सुविधा वेळ वाचवण्याच्या दृष्टिने उपयूक्त आहे
मी मागे म्हटल्या प्रमाणे विकएडीट हे फायर फॉक्स एक्सटेंशन वेळ वाचवण्याकरिता बरेच उपयूक्त आहे माहितगार १५:५७, ८ एप्रिल २०११ (UTC)

सांगकाम्या

संपादन

निनाद,

मला वाटते तुम्ही हा (निनावी संदेश म्हणून आलेला) संदेश माझ्या चर्चापानावर ठेवला होतात --

  • एकदा एखाद्या पानाचा दुवा बनवला असता त्याचे इतर सर्व लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. यावर मराठीमध्ये शब्दांची रूपे बदलतात त्यानुसार सांगकाम्याकडून काम होणे अवघड आहे असा आक्षेप घेतला गेला आहे. परंतु तरीही याचा उपयोग आहेच. उदा. डीएनए असा शब्द किंवा सिग्मंड फ्रॉईड हे नाव सर्वत्र (बहुदा) असेच येईल. व बहुसंख्य ठिकाणी ते दुव्यात बदलले जाऊ शकेल. यामुले विकीकरणाचा वेग उत्तम रित्या वाढेल.

असे करता येईल पण त्यात दोन गोष्टींबद्दल काळजी घ्यावी लागेल --

  1. तुम्ही म्हणल्याप्रमाणे रुपांतरित शब्द बदलताना चुका होता कामा नयेत.
  2. एखाद्या पानावर एकाच शब्दाचे सगळ्या ठिकाणी दुवे नकोत. एकाहून जास्त असल्यास हरकत नाही पण मनोरुग्ण या लेखात सिग्मंड फ्रॉइडकडे अगदी जवळजवळ असलेले १०-१२ दुवेही नकोत.

यांसाठी जर का deterministic rules करता आले तर आहेत त्या सांगकाम्यांकरवीसुद्धा हे काम करुन घेता येईल.

  • २. वर्गिकरण करून देणारा सांगकाम्या हवा आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्रातील विद्यापीठे या लेखामध्ये अनेक विद्यापीठांची यादी आहे. त्या सर्वांना वर्गिकृत करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठे असा वर्ग देणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी त्यांना भारतातील विद्यापीठे या वर्गातही आणणे आवश्यक आहे.

हे काम सहज शक्य आहे. तुम्ही येथील विद्यापीठांप्रमाणे उदाहरणे दिलीत तर सांगकामे चालविणार्‍यांपैकी कोणीतरी हे काम करुन टाकेल.

अभय नातू १४:३७, ८ एप्रिल २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

निनाद आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

जर आपण चावडी ध्येय आणि धोरणे बाबत आपले सकारात्मक विचार चावडीवर मांडले तर लोकशाही पद्धतीने सदर चावडी निर्माण करण्याच्या कामात मौलिक मदत होईल. राहुल देशमुख १३:२३, ७ जुलै २०११ (UTC)

  चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण  
नमस्कार, निनाद


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.


नमस्कार

संपादन

मला एक बाब खटकते आहे.साचा :फल ज्योतिषातील ग्रह यात लग्न हे ग्रह कसेकाय. तो तर एक बिंदु आहे.कृपया खुलासा करावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०७:४२, २९ जुलै २०११ (UTC)

महाराष्ट्रातील सण व व्रते

संपादन

निनाद, महाराष्ट्रातील सण व व्रते - या लेखाचे रुपांतर महाराष्ट्रातील हिंदू सण आणि महाराष्ट्रातील हिंदू व्रते - आशा दोन वेगवेगळ्या वर्गात करावी असे वाटते. साधारणतः विपी वर याद्या नदेता वर्गा द्वारे त्या आपोआप तयार केल्या जातात. अश्या याद्या चे इतर फायदे म्हणजे याद्या आटो उप्डेट. डाय्ण्यामिक इंडेक्स होणे, इतर वर्गाशी इंटर्लींक जसे उपवर्ग वैगरे. राहुल देशमुख ०२:५३, २९ जुलै २०११ (UTC)

लेखाचे रुपांतर महाराष्ट्रातील हिंदू सण आणि महाराष्ट्रातील हिंदू व्रते हाच विचार मी ही केला होता पण तसे दोन लेख होत नाहीत कारण उदा. हरितालिका हा सणही आहे आणि व्रतही. तसेच अनेक इतर साजर्‍या होणार्‍या दिवसांचेही आहे. मात्र याशिवायही तुमच्ज्याकडे काही सुलभ पद्धत असेल तर तसे करायला माही काहीच हरकत नाही. दुसरा मुद्दा मला निटसा समजला नाही. निनाद ०५:१८, २९ जुलै २०११ (UTC)


  • निनाद,
  1. आपल्या कडे हिंदू धर्म नावाचा वर्ग आहे त्यात आता ३५ उपवर्ग आहेत.
  2. आपण तेथे दोन नवे उपवर्ग बनवावे अ) महाराष्ट्रातील हिंदू सण ब) महाराष्ट्रातील हिंदू व्रते
  3. आपणास आपल्या यादीस महाराष्ट्र पर्यंतच मर्यादित ठेवायचे आहे का ? (ते पण ठरून घ्या कारण हिंदू भारत भरत आहेत)
  4. आपणास हि यादी हिंदू धर्मा पर्यंतच मर्यादित ठेवायची आहेका ? ( कारण साद्य यादी हि महाराष्ट्रातील सण व व्रते ह्या नावानी आहेत आणि त्यात ईद, मोहरम, ख्रिसमस... आदि. हे पण येऊ शकतात )
  5. आपण जे सण आणि व्रत ह्या याद्यान मध्ये जोडू इच्छिता त्या लेखांना ह्या वर्गा कडे वर्गीकृत करा
  6. आपण अशा तर्हेने वर्ग निर्मिती केली कि आपणास आता असलेल्या पानाची गरज पडणार नाही, वर्ग पानावर यादी आपोआप मिळेल.
  7. मग महाराष्ट्रातील सण व व्रते - पानातील मजकूर वगळून त्यावर पान काढा साचा लावावा
  8. "हरितालिका हा सणही आहे आणि व्रतही" - अशा लेखांच्या तळाशी दोन्ही वर्ग समाविष्ट करावे जेणे करून ते लेख संबंधित दोन्हि याद्यान मध्ये वर्गीकृत होतील.

अधिक माहिती लागल्यास कळवावे राहुल देशमुख १३:२६, २९ जुलै २०११ (UTC)

उपसूचना

संपादन

नमस्कार कट्यारे ! तुम्ही हिंदू धर्मविषयक पानांवर सध्या काम करत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे कौतुक+अभिनंदन! :) त्याच्या अनुषंगाने चर्चा:सोरठी सोमनाथ येथे लिहिलेल्या माझ्या सूचनेकडे तुमचे लक्ष वेधावेसे वाटते. तुम्ही जे उद्दिष्ट साधू पाहताहात, त्यासाठी हिंदूधर्मविषयक विकिप्रकल्प चालवणे उपयुक्त ठरेल. या कामी काही मदत लागल्यास, जरूर कळवा; मी प्रकल्पपाने बनवण्यासाठी मदत करून देऊ शकेन. तूर्तास, मुख्य नामविश्वात असंबद्ध साचे जोडू नयेत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०४, ३० जुलै २०११ (UTC)

ओके. या आठवड्याच्या मध्यापर्यंत प्रकल्पपाने बनवून ठेवतो आणि तुम्हांला तसे कळवतो. प्रकल्प सुरू झाल्यावर त्यात वेगवेगळी कामे कार्यप्रस्तावांच्या स्वरूपात सुस्पष्ट मांडून काम करता येईल. कोणत्याही कार्यप्रस्तावात प्रस्तावित कामाचे स्वरूप/व्याप्ती यांचे वर्णन, काम करायच्या लेखांचे दुवे, एखाद्या लेखावर काम पूर्ण झाले असे म्हणण्याचे सुस्पष्ट निकष आणि प्रस्तावित मुदत यांचा उल्लेख अपेक्षित आहे. याशिवाय कार्यगटात सहभागी झालेल्या लोकांची व व्यवस्थापकांची सूची राखणे आणि लेखांच्या विद्यमान स्थितीनुसार एकंदरीत प्रकल्पाचा पाठपुरावा राखणे इत्यादी नैमित्तिक कामेही यात येतील.
तूर्तास विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/चालू कामे येथे डोकावलात, तर चरित्र विकिप्रकल्पावर चालू असलेल्या कार्यप्रस्तावाचा आराखडा दिसेल. त्यानुसार हिंदू धर्मविषयक प्रकल्पावर प्रस्तावित कामे घेता येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:५३, १ ऑगस्ट २०११ (UTC)
हिंदू धर्मविषयक विकिप्रकल्पाची किमान आवश्यक पाने व समासपट्टी साचा बनवून विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे मुख्य पान तयार केले आहे. तुम्हांला येथून पुढे सुरुवात करता येईल. खेरीज इंग्लिश विकिपीडियावरील विकिप्रकल्पावरही एक चक्कर मारून तेथील काही कल्पना इकडे आणण्याजोग्या आहेत किंवा कसे याबद्दल चिंतन करता येईल.
काही मदत लागल्यास जरूर कळवा. सध्या जॉबात जोरदार लोड आहे; तरीही येथील कामे शक्य तितक्या लवकर पुरी करण्याचा प्रयत्न चालू आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:११, १ ऑगस्ट २०११ (UTC)
नमस्कार निनाद,

तुम्हाला धर्म या विषयात रुचि आहे हे वाचुन आनंद झाला. मी हवी ती मदत करेन. धर्म हा तर माझाही चिन्तनाचा विषय आहे. मी तमिल्क्युबवर काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ते काम ऑनलाइन करावे लागते. ऑफ़लाईन कामासाठी बहारा सॉफ़्ट्वेअर फ़ारच चांगले पडते. कळवावे, ही विनंती.

खुलाश्याबद्दल खरच मनापासुन आभार.पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:२५, २९ जुलै २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

निनाद! माझी काही मदत/सेवा लागल्यास जरूर हाक द्यावी.तसे काही काम पडणार नाही असे मला वाटते. तुम्ही स्वयंपूर्ण आहातच. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:३२, ३० जुलै २०११ (UTC)

बहुआयामी आभास

संपादन

निनाद,

हिंदू धर्माच्या प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्य अभिनंदन आणि प्रकल्पाच्या सिद्धीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. मराठी तिथीन वर आपण नेमके काय काम करीत आहात ते जर मला कळले तर त्याच्या बहुआयामी आभासाची (व्हारच्युअलायझेषण) ची योजना मी आखतो आहे. त्या करिता मदत होईल आणि हिंदू धर्म प्रकल्पाला त्याचा थेट फायदा/वापर घेता येईल. केळ्वावे. राहुल देशमुख ०५:५७, २ ऑगस्ट २०११ (UTC)

वेगवान सम्पादने

संपादन

निनाद धन्यवाद,

दिनविशेष ह्या विषयास हिंदुधर्म प्रकापात सामाऊन घेण्यामुळे पाकाल्पाच्या काही पानाची दिखाऊ (हा आभासी प्रयोग असल्याने) लांबी तरी चुटकी सरशी वाढवण्यात मदत होईल. ह्या कामा बाबतचा प्रस्ताव सध्या प्रचाल्कांच्या हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत खितपत पडलेला आहे. एकदा पुढील काम सुरु झाले कि मी आपणास पूर्ण योजना समजून सांगतो.

मी सांगकाम्या वापरात नाही, कारण त्यासाठी सांगकाम्या खाते लागते जे API access साठी असते मला अजून पावेतो हि सुविधा देण्यात आलेली नाही/मी मागितलेली नाही. आपणास सांगकाम्या हवा असल्यास संकल्पला सांगा प्रकल्पाच्या कमी आपणास सांगकाम्याची चांगलीच मदत होईल. वेगवान सम्पादन करण्या साठी मी जादुई शब्दाचा वापर मात्र बरेचदा करतो अथवा कामापुरती स्क्रिप्ट साच्यात लिहून तिचा वापर करतो हे परिस्थिती नुसार असते. २४ जुलैला मी २० तासात १०११ पेक्षा जास्त वास्तविक संपादने करून वेगवान संपादनाचा एक यशस्वी प्रयोग करून पहिला आहे. अजूनही काही प्रयोग मी निकट भविष्यात करण्याचे विचाराधीन आहे (जसे एडीट टूल , व्हर्चुअल योजना आदी अनेक ) आणि मग वेगवान संपादनाबाबत काही सूत्रे साधारण सद्स्या साठी माडावे असे वाटते. जेणे करून नियमित काम करणाऱ्या सदस्यांनी येथे दिलेल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करता यावा. पण येथे प्रयोग शिलतेला खुला विरोध नसला तरी प्रोत्साहनही मुळीच नाही (माहितीगाराचा अपवाद वगळता ).तेव्हा जेकाही करायचे ते स्वतःच ओढून न्यावे लागते. तुम्हाला काहीही मदत लागल्यास कळवा माझ्या परीने मी सहकार्यास उपलब्ध असेलच. धान्यवाद ..! राहुल देशमुख ०४:२५, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

नमस्कार मालक, चावडी आजकाल लई गरम झालीय जनु!! :) निनाद ०७:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

आम्ही प्रचालक बापडे झालो, चांगले आहे प्रचालकांची संख्या तेवढीच लवकर वाढेल (चावडी गरम(चर्चा) करणारेच पुढे प्रचालक होतात त्या क्वालिटी बिगर आम्ही पन प्रचालक झालो का काय ? :)

स्टारसाठी थॅंक्यू

संपादन

स्वतःच्या सदस्यपानावर कुणी लावलेला तारा मोठा क्यूट दिसतो. थॅंक्यू व्हेरी मच.:) -मनोज ०९:५५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

निनाद, तुम्ही यात पुढाकार घेता आहात या बद्दल धन्यवाद.(बाय द वे मनोजरावांनी आणि आदरणीय जेंनी चावडीवर राष्ट्रीय नव्हे... असा काही दिनविशेषाच्या संदर्भाने विषय चर्चेस टाकला आहे सध्या विशेषत्वाने दिनविशेष या विषयावर आपण राहुल आणि नरसिकरजी काम करत आहात तेव्हा त्या चर्चेत लक्ष घातल्यास मनोजचा हा विषय प्रचालकांच्या आख्त्यारीतला आणि प्रचालक लक्ष देत घेत नाहीत हा गैरसमज कमी होण्यास मदत होईल.माहितगार १५:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)


धन्यवाद ! :) बाकी, आपण विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे समन्वयक म्हणून पुढाकार घेऊन तिथल्या प्रस्तावित कामांच्या पानावर प्राधान्यक्रम किंवा अन्य कुठल्याही सुयोग्य निकषानुसार काम करावयाच्या लेखांची सूची करायला घेऊ शकता. काही मदत लागल्यास, कळवत राहा.
ता.क.: विकिपीडियावर सध्या काही बार्नस्टार बनवले आहेत. इकडे पाहा : वर्ग:बार्नस्टार गौरव साचे

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:३४, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

कमळाबद्दल धन्यवाद ! :) विकिप्रकल्प हिंदू धर्म सुफळ होवो. :) --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)


तारे किंवा इतर प्रोत्साहनपर चिन्हे

संपादन
तारे किंवा इतर प्रोत्साहनपर चिन्हे संदेश नकारात्मक कारणा साठी वापरली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, बाकी केव्हा कुणाला आणि कुणी द्यावीत यावर इतर कोणतेही बंधन नाही. मराठी विकिपीडियावर याबाबत थोडसच काम झाल आहे आणि ते काहीस विखूरलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे.तयार गौरव साचेवर्ग:विकिपीडिया गौरव इथे वर्गीकृत आहेत. शिवाय या शोध पानावरही ते उपलब्ध होऊ शकतात.
विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/निशाण विकिपीडिया:बार्नस्टार विकिपीडिया:प्रमाणपत्र हि पाने उपलब्ध आहेत त्यात बरेचसे काम होणे बाकी आहे.अती गरम झालेल्या चर्चांना थंड शिडकावा करण्याकरता विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/चहा हे पान उपलब्ध आहे.
मागे हजार संपादने पूर्ण झाल्या नंतर अभय आणि संकल्प हजारी बार्नस्टार देत असत, (पण तो त्यांनीच द्यायचा असतो असे काही नाही) .मी सुरवातीस पाचशे सांपादने पूर्ण झाल्यानंतर {{subst:पाचशे संपादने}} हा साचा लावत असे.त्याचा उद्देश केवळ गौरवकरण्या पेक्षा गौरव+ टप्प्या टप्प्याने मार्गदर्शन असा होताम्हणून नंतर विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू येथे दहा,पन्नास,शंभर,पाचशे, हजार,पाच हजार, दहा हजार, अशा साचांवर काम करण्यास घेतले खरे पण अचानाक पोटापाण्याच्या घाईत ते पूर्ण होऊ शकले नाही आणि शिवाय स्वयंसेवकांचीही कमतरता एकूण कामास पडेल असे लक्षात येऊन ते मागे पडले.
सवडी नुसार इंग्रजी विकिप्डियातील नवीन लव्ह साईन ची सिस्टीमही तपासून घ्यावी
आपणास ज्या गोष्टी सोप्या वाटतील आणि आवडतील त्या आवश्यक ते बदल करून करून घ्याव्या .प्रदीर्घ उत्तरे देण्या मागे नेहमीच भविष्यातील सहाय्यपान बनवण्याचे काम हलके व्हावे असा असतो त्यामुळे उत्तराच्या लांबी बद्दल क्षमस्व. माहितगार १५:००, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

तारे ज़मीन पर

संपादन

निनाद तू दिलेल्या चटक चांदणी (बार्न स्टार) बद्दल धन्यवाद. भविष्यातील नव-नवीन कल्पना झपाट्याने प्रत्यक्षात आणण्याचा कमी आपला असाच भरीव सहयोग मिळत राहील हिच अपेक्षा. राहुल देशमुख १०:१०, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

  • स्वयमचालीत विकीकरण
निनाद आपली स्वयमचालीत विकीकरणाची कल्पना छान आहे.किमान प्रयोग करून पहायला तर मुळीच हरकत नाही. पण त्या साठी लागणारे सांगकामे खाते आपल्यास प्रचालकांनी उपलब्ध करून द्यावयास पाहिजे. एकदा सांगकाम्या हाती घेतला कि मग अनेक प्रयोग करता येतील. राहुल देशमुख १८:१४, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
  • बदल
माझेपण कुणाशीही वाद नाहीत (किमान आज पर्यंत तरी झालेले नाहीत ) मला सहयोग हि चांगला मिळतो म्हणूनच कदाचित मी जेकाही थोडे काम केले ते होऊ शकले. पण सारखा पाठपुरावा करावा लागतो. आता माझ्या बाबतीत मी तो करतो पण आम सदस्या कडून ती अपेक्षा करण्या पेक्षा आपण थोडे व्यापक प्रोत्साहन देणारे धोरण राबवले तर अधिक चागले असे वाटते. माझ्या पर्यत पोहचलेल्या लोकांना तर मी सर्वतोपरी मदत करतोच पण आपले पदाधिकारी साधे साधे निर्णय घेण्यास खूप वेळ घेतात, आणि तो पर्यंत ते कोणताच रीस्पओंस देत नाहीत ह्यामुळे कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण होऊशाकतो. किमान निरोपाची पोच, त्यावरील शंका, निर्णयास लागणारा अपेक्षित वेळ आदी. गेष्टी जर केल्या तर काम करणाऱ्या मंडळीचा हुरूप सांभाळता येउशाकेल असे वाटते. त्यासही वेळ नसेल तर काही स्थायी साचे बनवून देता येतील पण सिस्टीम रीस्पोन्सीव असावी. अप्लाय अप्लाय अप्लाय आणि नो रिप्लाय हे तितकेसे योग्य नाही. प्रश्न माझा आणि तुमचा नाही आपण मार्ग काढूनच घेऊ प्रश्न आम सदस्याचा आहे. राहुल देशमुख ०७:२१, ८ ऑगस्ट २०११ (UTC)

अभिनंदन

संपादन

निनाद! नविन सदस्यांना प्रोत्साहनात्मक संदेश देउन त्यांचेमधे लेखन-उर्मी निर्माण करण्याच्या आपल्या जोरकस प्रयत्नांसाठी आपले हार्दिक अभिनंदन. त्याचा कृपया स्विकार करावा ही विनंती. मकरंद (चर्चा • योगदान) ०६:३९, १० ऑगस्ट २०११ (UTC)

शुभेच्छा

संपादन

निनाद नमस्कार, आपले नवीन सदस्यांना लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहनपर निरोप पहिले. आज विपी ला खरोखरच संघटन मजबूत करण्याची आवशकता आहे. आपले बहुतेक निरोप हे अनामिकांना आहेत. मला असे वाटते कि अनामिकांव्रर मेहनत घेण्यपेक्षा नवगतांना केंद्र स्थानी मानून मेहनत घ्यावी. कारण आय पी हे डायन्यामिक असण्याची शक्यता अधिक असल्याने वापर कर्त्याला नेमके लक्ष करणे कठीण असते. पुढील कामासाठी शुभेच्छा. राहुल देशमुख १०:१३, १० ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi निनाद,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

सांगकाम्या

संपादन

निनाद,

हे काम करण्यासाठी आपण संदेश चावडीवर ठेवला. त्यास एखादे पण/परंतु वाले मत पण आले. पण हा विषय प्रचालाकांच्या अखत्यारीतला असल्या मुळे, जो पर्यंत त्यांची अशा तर्हेच्या कामास अनुमती मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. आता सवई प्रमाणे ते ह्या विषयावर निर्णय घेण्यास किती वेळ लावतात ते भगवंतालाच माहित. आपण काय वेट अन्ड वॉच. आपल्या लिखाणात माझ्या नावाचा उल्लेख असल्याने ह्या विषयावर मी लिहिण्याचे टाळले जेणे करून त्यांना मुक्त पणे निर्णय घेता येईल. मंदारने पण काही काम करण्याची इच्छा प्रगट केलेली आहे. आपण अजून काही काळ शांततेने वाट पहावी असे वाटते. राहुल देशमुख ०६:५५, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

धर्म या विषयावर लिहिण्याची माझी पात्रता आहे की नाही याबद्दल साशंक आहे. माझ्याकडे वेदवाङ्मयावर फारशी पुस्तके नाहीत, आणि आंतरजालावरून, त्या विषयातले काही समजत नसताना निव्वळ भाषांतर, पोपटपंची किंवा नकल-डकव पद्धतीने लिहिणे मला रुचत नाही. तरीसुद्धा भाषांतर करण्यासारखे काही सापडले तर जरूर प्रयत्न करीन.....J ०७:२९, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

सादर नमस्कार

संपादन

१. अहो! सदस्यत्व म्हणुन ठिक आहे.पण मी यासारख्या(हिंदु धर्म) गहन विषयात भर घालु शकेल किंवा कसे या बद्दल मला जरा शंका वाटते.कच्चे लिंबु म्हणुन येण्यास हरकत नाही.नाहीतर उगाच भुईला भार नको.जमेल तशी मदत करीत जाईन/भर घालेन.

२. दुसरे असे की माझ्या चर्चा पानावर देण्यात आलेले संदेश पुर्वी कोणीतरी दिलेल्या कळफलकाच्या संदेशात घुसत आहेत.प्रत्येक वेळा 'दाखवा' क्लिक केल्याशिवाय दिसत नाहीत.

३. ज्याने 'माझ्या चर्चे'त कळफलक टाकला त्याचे मनापासुन आभार मानतो.त्याने बरेच शिकता आले.

मकरंद (चर्चा • योगदान) १५:४८, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार

संपादन
  • आपले चर्चा पान बरेच मोठे झाल्यामुळे त्यात थोडी ढवळा-ढवळ केली.रुचत नसल्यास मी केलेले बदल कृपया काढावेत.
  • आपले निमंत्रण-हिंदू धर्म प्रकल्प- मिळाले.त्यास कार्यबाहुल्यामुळे कितपत न्याय देता येईल याची शंका वाटते.तरीही,जास्तीत जास्त प्रयत्न करील ही खात्री बाळगा.हातातले कामच पूर्ण कधी होईल तेपण जाणत नाही.पुढच्या कामाची कशी खात्री देणार? फुल ना फुलाची पाकळी ते काम करीलच.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:३५, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

संपादन

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा

संपादन
मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

भेट झाल असती तर आम्हा सर्वांना निश्चित आनंद झाला असता.भविष्यातील कृती आलेखाबद्दलच्या ब्रेनस्टॉर्मंग मध्ये तुमची मोलाची मदत होऊ शकली असती.अर्थात आपण ऑनलाईनही भेटत राहू शकतोच .माहितगार ०३:४७, १ डिसेंबर २०११ (UTC)

 

.  

  विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!  
नमस्कार, निनाद

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


स्वागत

संपादन
चित्र:ओम.GIF

निनाद नमस्कार,

बर्याच दिवसांनी इकडे येणे झाल्याचे दिसते. मध्यंतरी आपली अनुपस्थिती जाणवली. काही ठोस काम हाती घ्यावसे वाटते. आपल्या पीढील विकीकामासाठी शुभेच्छा. -- राहुल देशमुख ०३:५३, १७ जानेवारी २०१२ (UTC)

शब्दकोष

संपादन

शब्दकोषात माझी मदत लागल्यास कृपया कळवावे. मी तयारी आहे.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:११, २७ जानेवारी २०१२ (UTC)


इंग्रजी शब्दकोश बांधणीच्या निमित्याने

संपादन

निनाद नमस्कार,

विकीपात्रिका आपणास कुठेही वाटत येईल तिचा मूळ उद्देशच प्रचार आणि प्रसार आहे. विकीपत्रिकेची इंग्रजी लिंक अशी आहे http://mr.wikipedia.org/wiki/Vikipatrika. पुढील अंका पासून सोशल नेट्वर्किंग सुविधा पण देण्याचा विचार आहे.

अन्द्रोईड साठी काही तात्रिक मदत अथवा तंत्रज्ञाची स्वयंसेवक म्हणून गरज असल्यास सांगावे मी काही कार्यकर्ते जुळून देईन.

आपला शब्दकोश मराठी विकी स्त्रोत ह्या येऊ घातलेल्या बंधू प्रकल्पावर ठेवता येईल काय ते पण पाहावे तसेच आपले शब्द कोशातील कामाच्या अनुभवावर मराठी विषनरी ह्या बंधू प्रकापास भविष्यात हात देता येईल अशी आशा वाटते.

आपल्या शब्दकोशाच्या कामास अनेक शुभेच्छा .

धन्यवाद

राहुल देशमुख ०३:२८, २७ जानेवारी २०१२ (UTC)

सद्भावना प्रयत्नांकरिता शुभेच्छा

संपादन

निनाद आपण मराठी विकिपीडियावर समतोल आणि सद्भावनापुर्ण कार्य करत आहात .त्या बद्दल मनःपुर्वक शुभेच्छा !! रायबा ०३:५९, २७ जानेवारी २०१२ (UTC)

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी

संपादन

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:४६, ११ मार्च २०१२ (IST)Reply

नमस्कार, "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" या प्रकल्प अंतर्गत काही कामे भरली आहेत. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात अजून काही भर घालायची असेल तर अवश्य करावी. आपले काही मार्गदर्शन यासाठी झाले तर बरे होईल...मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:३०, १७ मार्च २०१२ (IST)Reply


नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५१, २७ मार्च २०१२ (IST)Reply


नमस्कार निनाद, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

संपादन

नमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. मराठी विकिपीडियावरील लोक आपणास आपल्या सुस्प्ष्ट भुमीकेवरून ओळखतात. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा

>>सदस्य आणि प्रचालक यात सुसंवाद स्थापन करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे. त्यासाठी प्रचालकांनी पुढाकार घेतला पाहिजे कारण त्यांच्याकडे जास्त अधिकार आहेत.

आपल्याशी पुर्णत: सहमत आहे. मीही आपल्या प्रमाणेच एक सामान्य सदस्य आहे. सदस्य आणि प्रचालकात सुसंवाद निर्माण करण्यात मी मला शक्य ते प्रयत्न करेन.मी ही चुकू शकतो चुकलोतर मोकळेपणाने लक्षात आणून द्दावे

आपला -रायबा

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

संपादन

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०१, ११ जून २०१२ (IST)Reply

संपादन गाळणी

संपादन

निनाद पुन्हा एकदा नमस्कार, मी ही चर्चा नंतर विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी येथे हलवेन.

>> ही चर्चा इतरत्र हलवल्यास हरकत नाही.

तांत्रिक चावडीवर तांत्रिकेतर चर्चा/वाद झाल्यास मुख्य तांत्रिक विषय/अडचणी बाजूस पडू शकतात हा उद्देश आपण समजावून घेऊ शकला आणि या संबधाने आपला गैरसमज झाला नाही हे लक्षात येऊन बरे वाटले.
अधिक संदर्भा करिता सदस्य मनोज यांच्याशी मी मागे साधलेल्या संवादाचे स्वरूप काहिसे खालील प्रमाणे होते
" तांत्रीक चावडीवर ...... पण येथे बाकीही चर्चा होत असतात .आपणच पुर्वी सांगीतलेत >>"पुढावे (अॅडव्हान्समेंट) केले जातात त्याची एकाच ठिकाणी नोंद पहायला मिळावी." ह्याच चर्चा विशेष बनवलेल्या चर्चा पानावर केल्या तर संपादन गाळणी विषयक सारी चर्चा एकाच ठिकाणी राहून ॲडव्हन्समेंट येण्या पुर्वी पासून आपण आणि इतर सदस्यही चर्चेत राहू शकतील, नव्या सूचनांची दखल घेणे, संदर्भ तपासणे सोपे होईल शिवाय आधीच झालेल्या शंका आणि शंका निरसनातील पुनरूक्तीही टाळता येतील"

>>हीच माहिती त्या पानावरच लावल्यास उत्तम राहील.

आपली सुधारणा सुचना लक्षात आली. यावर निश्चित अमलबजावणी करेन.फक्त न दिसणाऱ्या प्रत्येक गाळणी करिता वेगळी सूचना देता येईला का बघावे लागेल . शक्य झाले तर तेही करेन.दिसणाऱ्या गाळणी करिता प्रत्येक गाळणीवर वेगवेगळ्या दिल्या जातच आहेत.
कार्यवाही:अंशत: कार्यवाही झाली. पुढेही अद्ययावत करण्याचे प्रयत्न असतील.आपल्या रचनात्मक सुचनांबद्दल धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५९, २० फेब्रुवारी २०१३ (IST)Reply
मी मिडियाविकि संदेशात आपल्या या चर्चेवर आधारीत बदल केले आणि अंशत: झाल्याचे कळवले परंतु सदस्य खात्यातून बाहेर पडून तपासले तेव्हा तेही 'बग' मुळे अर्धेच झाले असे निदर्शनास आले. बगझीलावर या संदेशाबाबत बग क्रमांक 45195 बग नोंदवला. आपला या विषयातील रस लक्षात घेऊन आपण या बगच्या प्रगतीवर अधून मधून लक्ष ठेऊन सहाय्य केल्यास आपले स्वागतच असेल. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२५, २२ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

>>गाळणी कशी बनवावी / बनवली जाते; यावर येथे माहिती दिली जावी.

निनाद,संपादन गाळण्या दुरुपयोग नियंत्रणा शिवाय इतर सजगता इत्यादी कामाकरिता सुद्धा वापरता येऊ शकतात.हे एक्स्टेंशन डेव्हेलप करणाऱ्यांच्याही उशीरा लक्षात आले असावे. मराठी विकिपीडियावर संपादन गाळण्यांचा मुख्य उद्देश सदस्य सजगता हाच ठेवला आहे .मी आणि काही इतर भाषी विकिपीडियन्सनी सुद्धा हा विषय संबधीत ठिकाणी चर्चेस घेतला होता. याच कारणाने इंग्रजी विकिपीडियाने abuse हा शब्द आता वगळला आहे आणि आपणही abuse दुरूपयोग हे शब्द वगळण्याच्या प्रक्रीयेत आहोत.
गाळणी कशी बनवावी / बनवली जाते; आपले म्हणणे पटते,या संदर्भाने इंग्रजी विकिपीडिया आणि मेटावरील माहिती सुद्धा अपुरी आणि खास करून jargons युक्त आहे. त्यामुळे, मी माझ्या कडून सवडी प्रमाणे या बाबत भर टाकेनच (आणि या कारणामुळे माझ्या उत्तरांना पाल्हाळता येते या बद्दल, क्षमस्व).इतर सदस्यांच्या सहभागाचेही स्वागत आहे.

>>(बहुदा सध्याच्या गढूळ वातावरणामुळे साधे प्रश्नही टोकदार भासत असावेत :)

खरेतर उत्तरे उशीरा देण्या बद्दल माझ्यावर टिका होते. उत्तरांची भाषा सौजन्य पूर्ण रहावी म्हणून घाई न करता पुरेसा वेळ घेऊन लिहिण्याकडे माझा कटाक्ष असतो. पण आपण मांडलेल्या चर्चेमुळे तुमची आणि माझी इच्छा नसली तरी इतर सदस्य विषयांतरात उत्साहाने सहभागी होतील याची खात्री होती. हा त्यांचा विषयांतर उत्साह इतर चर्चा, प्रचालक मुल्यांकन किंवा अगदी थोडा फार विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी विषयांतरे झाली तरी माझी हरकत नव्हती.वर नमुद केलेल्या कारणांमुळे तांत्रिक चावडीवर विषयांतरे होऊ नयेत म्हणून कदाचीत मी अधिक संवेदनशील झालो आहे त्यातून उत्तर लिहिण्याची घाई झाली.मी जो शब्दसुद्धा वगळणार आहे त्या शब्दावर आपले विभाग शीर्षक आल्यामुळे आणि सोबतीला आपण वर्णन केलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तो शब्द विषयांतरास कारणीभूत ठरतो आहे हे पाहून उत्तर लगेच द्यावेसे वाटले. लिहिण्याच्या भाषेत कठोरता जाणवली असेल तर , क्षमस्व.

>>इतर मुद्द्यांवरून वाद घालत बसणे शक्य आहे पण तो माझा उद्देश नाही.)

'पण तो माझा उद्देश नाही' करिता, धन्यवाद. इतर मुद्द्यांवरून चर्चा, वादाचे आणि अगदी टिकेचेही मनमोकळे स्वागतच असेल .नव्हे ते करा असा आग्रह असेल , आणि तरीही मी योग्यवेळी इतरांप्रमाणे आपल्यालाही अधीक जबाबदाऱ्या घेण्याची विनंती करेन तेव्हा तरी लोकांना विश्वास वाटेल कि माहितगार निष्पक्षपणे काम करतात.
अर्थात इतरांशी संवाद साधण्यात मी आधीच उशीर करतो. सध्याचे माझे उर्वरीत लेखन झाल्या वर येत्या काही महिन्यात, माझ्या बद्दलचे समज गैरसमज कमी होतील आणि आपण म्हणता तसे वातावरणातील गढूळता आपसूकच खाली बसेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४७, ७ डिसेंबर २०१२ (IST)Reply

संवाद

संपादन
>>गैरसमज नसावा म्हणून संवाद साधायचा होता, पण उशीर होत आहे. तुम्ही आपली सुरक्षा पातळी पुर्ववतच ठेवावी हेच बरे... :(
ज्यांना मराठी भाषा किंवा विकिपीडियाशी काहीच देणे घेणे नसेल ते टिका करण्या करताही येत नाहीत ,शंका विचारणारे, टिका करणारे काहीतरी देणे घेणे आहे म्हणूनच येतात. त्यामुळे आपण निदर्शनास आणलेल्या गोष्टींकडे मी सकारात्मक पणेच पहाण्याचा प्रयत्न करतो. अगदी कठोर रचनात्मक टिकेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आग्रहीपणे जपण्याचाच प्रयत्न असतो.
चांगली टिका कशी करता येईल या संबंधाने Openmidedness,चौकस अभ्यास, criticalthinking ,constructive criticism, logic आणि logical fallacies च्या संबधाने इंग्रजीतील लेखन मराठीत आणण्यास येत्या (प्रदीर्घ:)काळात मी व्यक्तिगतरित्या प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.
Trainings मधला नियम आहे कि काही गोष्टी unlearn केल्या शिवाय काही नवीन learn करणे अवघड जाते, यात हेतुपुरस्सर टिका करणारी मंडळींसोबतचा वेळ जरा अवघड जातो (कारण त्यांना आहे ते अनलर्न करणे हेतुस मारक असते). काही वेळा कोण कोणत्यावेळी हेतुपरस्सर करते आहे आणि कोण नाही हे समजणे अवघड जाते या बद्दल काही कमीत कमी stick वापरून करता येतील,स्वत:त काय सुधारणा करता येतील अशी सोल्युशन्स सापडतात का याच्या शोधात असतो आणि आहे. मध्यंतरात काही वेळा अनपेक्षीत गैरसमजही घडतात आणि संवादानेच ते दूर होऊ शकतात हे खरे आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१५, २२ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

हॉटकॅट

संपादन

नमस्कार, तुमच्या सदस्य नावाची वर जी पट्टी आहे त्यातील "माझ्या पसंती" निवडा त्यामध्ये "उपकरण(गॅजेट)" हा टॅब सिलेक्ट करा तेथे खाली तुम्हाला <gadget-HotCat> च्या पूर्वी असलेला चौकोनात टिचकी देऊन बरोबर चिन्ह येईल त्यानंतर खाली जतन करा. झाले. त्याच्या वापराचे सहाय्य पान विकिपीडिया:हॉटकॅट मी वर्षभरापूर्वीच बनवून ठेवले आहे ते पाहा. - संतोष दहिवळ (चर्चा) ०३:२४, १० फेब्रुवारी २०१३ (IST)Reply


जरा इकडे लक्ष घालावे

संपादन

निनाद नमस्कार,

तुम्ही संतोष दहीवळ ह्या तुमच्या मित्रास समजावून सांगण्याची कृपा कराल का ? संतोष दहीवळ ह्यांना प्रशासकांनी अधिकृत सांगकाम्या खाते १९ मार्च २०१२ ला दिले असतांना ते आपल्या सदस्य खात्यातून रोज सांगकाम्या चालवून संपादने करतांना दिसतात आहेत. त्याने अलीकडील बदल मध्ये सारा प्रताप दिसतो. अवैध मार्गाने संपादन संख्या वाढवण्याच्या ह्या प्रकाराने मराठी विकिपीडिया नितीमत्तेची पायमल्ली होत आहे. संतोष ह्याची हि जुनीसवय आहे असे दिसते , मंदार कुलकर्णी ह्यांनी संतोष ह्यास ह्या पूर्वी ह्या बाबत समाज दिली असता त्यांनी येथे मोठा गोंधळ घातला असल्याचे स्मरते येथे पहा

आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - Hari.hari (चर्चा) १०:३८, ९ मार्च २०१३ (IST)Reply

धन्यवाद आपली प्रतिक्रिया कळवावी

संपादन

नमस्कार निनाद, धन्यवाद आपण ॲन्ड्रॉइड ऍप वरुन चढवलेली संचिका बघितली, ॲन्ड्रॉइड ऍप या वर काही आपला अभिप्राय कळवा, जेणे करून ॲन्ड्रॉइड ऍप काही बदल करून मराठी सभासदांसाठी वापरणे हे सोयीचे जाईल धन्यवाद !! संतोष शिनगारे २२:०६, २२ मार्च २०१३ (IST)Reply

मूर्तिशास्त्र

संपादन

कृपया मी नुकतेच दिलेले मूर्तिशास्त्र या लेखातील बाह्यदुवे उघडून(टिचकून) बघावेत ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१३, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

मराठी शेयर

संपादन

नमस्कार निनाद, धन्यवाद !! वाचून फार छान वाटले की आपण संचिका चढविण्यासाठी ॲप चा वापर करता, सर्व प्रथम मला सांगा, तुमच्या नेटवर्क कनेक्षन बद्दल?? आपण कुठले कनेक्षन मोड वापरता ?? डेटा कनेक्षन की वायफाय?? फोन मॉडेल कुठलाही (ॲन्ड्रॉइड )ही असु द्या. संतोष शिनगारे १७:०२, २७ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

संपादन गाळणी विषयी

संपादन

@Katyare:

नमस्कार,

सर्वप्रथम आपण नवागत सदस्याच्या दृष्टीने रखमाबाई लेखाच्या चर्चा पानावर ज्या पद्धतीने संदेश लिहून काळजी घेतलीत त्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. आता थोड संबधीत गाळणी विषयी.संबंधीत गाळणी(१२७)कडून संदर्भा शिवायच्या एखाद्या(एकट्या दुकट्या) संपादनास अडवले जात नाही.बरीच मोठी संपादने बऱ्याच वेळा मर्यादीत कालावधीत केली गेल्यासच संपादन अडवले जाते.१) गाळणी कॉपीराईटचे उल्लंघन न करता स्वभाषेत लेखन करण्याची नैसर्गिक मानवी क्षमता किती तासात किती असू शकते याचा अभ्यास करून बनवली आहे त्यामुळे कॉपीराईटचे उल्लंघन वारंवार होत असेल तर आपोआपच संदर्भ देणे बाध्य व्हावे हा एक उद्देश आहे.२) खूप वेळा एकाच पानात (अतीरेकी प्रमाणातील) उत्पात करण्यावर निर्बंध आणणे, ३) संपादन युद्ध चालू असलेल्या लेखात संदर्भा शिवाय मजकुर पुन्हा पुन्हा लावण्याचे प्रयत्न असे एकुण ३ उद्देश या गाळणीतून पार पाडले जातात.

तसे पहाता आजचे रखमाबाई जनार्दन सावे लेखातील आपले आजचे पहीलेच संपादन होते ते गाळणी कडून अडवले जाणे निश्चीत अभिप्रेत नव्हते.संपादन गाळणी सॉफ्टवेअर लेव्हललाच दोन बग असावेत अशी शंका आहे आणि संबंधीत परीक्षणे चालू आहेत.(परिक्षण कालावधीकरता निर्बंध कमी केले आहेत)

आपण रखमाबाई जनार्दन सावे चे संपादन जतन (सेव्ह) करण्यापुर्वी झलक (Preview) पहाण्याची कृती केली होतीत का आणि केली असल्यास किती वेळा हे सहज आठवल्यास कळवावे.झलक पहाणे मोजले जावयास नको असताना मोजले जात आहे आणि त्यामुळे फाल्स पॉझीटीव्ह येतो आहे अशी प्रथम दर्शनी शंका वाटते.हे जेव्हढ्या निश्चीत पणे सांगता येईल तेवढ्या लवकर बग बगझीलावर नोंदवता येईल.

आपण रखमाबाई लेखातील संपादन पुर्वस्थितीत आणतानाही संपादन गाळणीने थांबवणे अपेक्षीत नव्हते.या दुसऱ्या बगचे परिक्षण करून झाले आहे. तो बगझीलावर लवकरच नोंदवेन.

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२५, २९ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

@Katyare:

नमस्कार,

मलाही वाटतेकी थोड्या फार अडचणी येतील पण गॅजेट्स प्रकरण एकदाचे धसास लागलेले बरे.मध्यंतरात टायपींग बद्दलच्या इतर प्रणाली किंवा मराठी विक्शनरी प्रकल्पात टायपींग करून कॉपीपेस्ट प्रकार वापरून घ्यावा. मी नरसिकरजींची गॅजेट्स पुर्ववत करत आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४८, २ डिसेंबर २०१३ (IST)Reply

धन्यवाद

संपादन

माझ्य लिहिन्यात सुधाराणा करण्यासाथी आभार व्य्क्त करते.मला जोडाक्शर कसे टाइप करायचे याची माहीती देता येइल काय?किन्वा तसा एखादा लेख सूचवू शकत असल्यास बघा अशी मि आपनाणास विन्ती करते. -मनकर्निका मी मदतकेंद्रात मदत मागीतली होती त्यात मला इन्पुट सिस्टीमचा लेख सुचविण्यात आला. तो वाचून बरेच कळले.मूळ टंकलेखक असल्यामुळे ते जमले.आपले पुन्हा आभार. दुसरे असे कि येथे स्त्रीवर्ग नाही काय? -मनकर्णिका

कर् हेगड व कण्हेरगड

संपादन

ही दोन एकाच किल्ल्यांची नावे आहेत काय? कृपया तपासावे ही विनंती.सस्नेह. --वि. नरसीकर १०:२०, ८ जानेवारी २०१४ (IST) तसे असल्यास लेखात योग्य ते बदल करावेत ही विनंती.--वि. नरसीकर ११:३२, ८ जानेवारी २०१४ (IST)

४०,००० लेखांसाठी जाहिरात

संपादन

निनाद,

जाहिरात छान लिहिले आहेत. ही इतर संस्थळांवर घातल्याबद्दल धन्यवाद. आशा आहे प्रतिसाद मिळेल.

अभय नातू (चर्चा) ०६:३३, २३ जानेवारी २०१४ (IST)Reply

आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. --वि. नरसीकर १०:१९, २३ जानेवारी २०१४ (IST)


मनोगत

संपादन

प्रयत्‍न केला. मनोगत उघडता आले नाही. Firefox can't find the server at www.manogat.com. असा संदेश येतो. .....J (चर्चा) ०९:४५, २३ जानेवारी २०१४ (IST) == कंट्रोल एफ़ फ़ाइव्ह केले. त्यानंतर मोझिला फायरफॉक्स आणि इंटरनेट एक्सप्लोरल दोन्ही वापरून मनोगत उघडायचा प्रयत्‍न केला. प्रत्येक वेळी Server not found हेच उत्तर येते. माझ्या संगणकावर आणखी ब्राउझर नाहीत. एकेकाळी ऑपेरादेखील होता, पण तो केव्हातरी पुसला गेला. आता कोणता मार्ग शिल्लक उरला आहे? ...J (चर्चा) १०:४९, २३ जानेवारी २०१४ (IST) =---Reply

जमत नाही

संपादन

>>I.Expl.च्या ब्राउजरच्या खिडकीत google search टाकून ते उघडा व त्यात manogat टाकून प्रयत्न करून बघा. --वि. नरसीकर (चर्चा) ११:४२, २३ जानेवारी २०१४ (IST)

+१ हेच सांगायला आलो होतो :) निनाद १४:३८, २३ जानेवारी २०१४ (IST) <<

सर्व काही करून झाले. संगणकावरच्या एखाद्या फ़ायरवॉलने मनोगतला मनाई केली आहे का तेही पाहिले. तसा काही प्रकार नाही. ..,.J (चर्चा) १८:४४, २३ जानेवारी २०१४ (IST)Reply

मिपा वरील लेख

संपादन

नमस्कार

मराठी विकिपीडियावर उपलब्ध माहिती वापरूनच मिसळपाव या मराठी संस्थळावर नुकताच फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते या शीर्षकाचा छोटेखानी परिचय लेख लिहिला आहे.तो लेख किंवा गरजेनुसार त्यातील माहिती पुन:प्रसारीत करण्यास जस्ट फिल फ्री.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४८, ३१ जानेवारी २०१४ (IST)Reply

सदस्य पान

संपादन

सदस्य पानावर जे चौकोनी रकाना तयार केला आहे तो कसा तयार करतात आणि एकूण संपादने कशी मोजावी ह्याची माहिती द्यावी हि विनंती.

दिपाली परिचारक (चर्चा)

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

संपादन

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:३७, ९ एप्रिल २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा

संपादन

नमस्कार निनाद,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार निनाद,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया आशियाई महिना साठी प्रोत्साहन

संपादन

नमस्कार , मी टायवेंन [मराठी विकिपीडिया आशियाई महिना आयोजक] तुह्मला विकिपीडिया आशियाई महिना मध्ये आमंत्रित करतो . विकिपीडियाच्या तुमचा योगदान संपूर्ण दुनियेला दकायेचे हे चांगले मोका आहे. तुम्ही योगदान साठी विकिपीडिया आशियाई महिना च्या लिंक वर साइन अप करू शकता. विकिपीडिया मराठी तुमचा योगदानाचे आभारी आहे --Tiven2240 (चर्चा) १७:४७, १६ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना बाबत

संपादन

तुमच्या नाव विकिपीडिया आशियाई महिना साठी जोडण्याकरिता मी तुमच्या आभारी आहे . विकिपीडिया आशियाई महिना २०१६ च्या नोव्हेंबर महिना मध्ये आयोजीत केले आहे आजपासून ८ दिवस बाकी आहे तुमच्या लेख जोडायला . तुमच्या लेख जोडण्याकरिता इथे SUBMIT बटण दाबा . जर काही प्रश्न या विशयावर असेल तर मला संपर्क करा. --Tiven2240 (चर्चा) ०८:५३, २३ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

युएसएसडी

संपादन

युएसएसडी हा लेख सुंदरच!!

--वि. नरसीकर (चर्चा) ११:१७, २९ नोव्हेंबर २०१६ (IST)Reply

लाल दुवे

संपादन

व्यवस्थापकिय दृष्टीकोनातून, व पुढे-मागे जमले तर ते लाल दुवे काढता यावेत व कोणताही लेख सर्वांगसुंदर व्हावा या अपेक्षेपोटी, मी बहुतेक लेखात, ज्यात लाल दुवे आहेत, 'लाल दुवे असणारे लेख' हा वर्ग लावत असतो. आपला माझेबद्दल गैरसमज नाहीच अशी मला खात्री आहे व पुढेही राहणार नाही. धन्यवाद. सहजच वाटले म्हणून व बरेच दिवसांत काहीच चर्चा झाली नाही म्हणून हा लेखनप्रपंच.--वि. नरसीकर (चर्चा) १६:४३, १५ डिसेंबर २०१६ (IST)Reply

धन्यवाद

संपादन
 

नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.   वि. नरसीकर (चर्चा) १२:२१, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

मार्च २०१७ बाबत शुभेच्छा

संपादन
 
नमस्कार निनाद,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे नववे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.

 


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५०, ३ मे २०१७ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण

संपादन
 

नमस्कार! मागील वर्षी, आपण मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) २०१६ मध्ये सहभागी होण्यासाठी साइन अप केले होते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होता, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार केले.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४०

२०१६ मधील सहभागी होण्याऱ्या तुम्ही मराठी विकिपीडियाच्या WAM टीममधून मिळणारे हे शेवटचे संदेश असेल. आपण WAM २०१७ साठी साइन अप केल्यास, आपण २०१७ इव्हेंटवर नियतकालिक अद्यतने प्राप्त करणे सुरू ठेवू शकाल.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४४, १ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

छान वाटले

संपादन

आपणास येथे बरेच दिवसांनी बघितले. छान वाटले. _/\_ नमस्कार.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:१४, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting

संपादन

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)Reply

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities

संपादन

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)Reply

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

संपादन

नमस्कार निनाद,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

विकी लव्हज् वुमन २०२१

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

पुनर्निर्देशन

संपादन

नमस्कार. तुमचे चालू खाते "सदस्य:Katyare" हे तुमच्या जुन्या खात्याकडे (सदस्य:निनाद) पुनर्निर्देशित होते. एखाद्या बिगर अनुभवी सदस्यास तुम्हाला संपर्क करायचा असल्यास ते गोंधळू शकतात. कृपया पुनर्निर्देशन दुरुस्त करावे. धन्यवाद :-) —usernamekiran (talk) ०४:३८, १२ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open

संपादन

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline

संपादन

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)Reply

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

Files need a license

संपादन

Hi! You (Katyare) have uploaded some files without a valid license. You can see them at this link (search for your name or scroll down to 64 files). I can help you add it with my bot if you make a clear statement that you are the photographer of the photos and that you license all your photos with that license (mention one). If you reply please ping me because I'm not active on this wiki. --MGA73 (चर्चा) २१:४२, १ जानेवारी २०२४ (IST)Reply