विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१७
विकिपीडिया आशियाई महिना २०१७ संबंधीत प्रश्न खाली नोंदवे --Tiven2240 १४:२९, १ नोव्हेंबर २०१७ (IST)
हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)
संपादन@Koolkrazy: ह्यांनी विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) लेखाचे योगदान सादर केले आहे जे @Tiven2240: ह्यांनी स्वीकार केले आहे. लक्ष वेधु इच्छीतो की ह्या लेखातील अधिकतर माहिती हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज (चित्रपट) ह्या लेखात होतीच. "सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा" ह्या अटी साठी हा आधीपासुन असलेला मजकुर सोडुन उरलेल्या मजकुराचे मोजमाप होउन हा लेख स्वीकार आहे का? धर्माध्यक्ष (चर्चा) १०:०९, १७ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @Dharmadhyaksha: मी पहिले हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज (चित्रपट) हा लेख बनवला, नंतर त्याला, हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) लेखात टाकले, जर आपला विरोध असेल, तर मी माघर घेतो. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)
- अच्छा! हे माझ्या लक्षात नही आले की दोन्ही लेख तुम्हीच लिहिले आहेत. माफ करा! धर्माध्यक्ष (चर्चा) १०:४०, १७ नोव्हेंबर २०१७ (IST)
हे लेख चालणार नही
संपादन@Tiven2240: आपल्या लक्ष्यात आणू इच्छीतो कि ह्या स्पर्धेत आशियाई लेख हवे आहेत. बाकी कही नियमांमध्ये पण काही लेख बसत नही.
- हॅरी पॉटर अॅन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट) - ब्रिटिश-अमेरिकेचा चित्रपट @Koolkrazy:
- ग्रँड बुद्ध, लिंगशान - फक्त ९५ शब्द (किमान ३०० हवे) @संदेश हिवाळे:
- म्युनिच हत्याकांड - जर्मनीतील घडामोडी (माझाचं लेख)
- लुफ्तान्सा ६१५चे अपहरण - अनेक यूरोपी देशातील घडामोडी (माझाचं लेख)
Tiven, आपणास विनंती आहे की निष्काळजीपणे लेख तपासू नए. पुढे जर कुणी मराठी विकिपीडिया बाहेरील सदस्यावे लक्ष गेले तर ते लज्जास्पद होईल. नामांकन सादरकर्त्यांनी ह्याची नोंद घ्यावी जेणे करून आणखी लेख बनवायचे असतील तर ते लवकर बनवावे. स्पर्धा ३० नोव्हेंबरला संपणार आहे. Tiven, आपण त्वरीत उरलेले लेख तपासावे व कोणाचे चार लेख मान्य होत नसल्यास त्यांना कळवावे म्हणजे ते नवे लेख बनवू शकतील. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:३०, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)
- मी ग्रँड बुद्ध, लिंगशान ऐवजी दुसरा लेख निर्माण करतो.
- --संदेश हिवाळेचर्चा १६:५०, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @Dharmadhyaksha: नोंद घेतली आहे. संघाचे जे लेख मान्य केले आहे ते तात्पुरता मान्य केले आहे. २०१८ पर्यंत त्याचे मूल्यांकन करण्यास वेळ आहे.सद्या काही दिवसांनी मला वेळ भेटले नाही तर जे अंतिम निर्णय आहे ते इव्हेंट संपण्याच्या काही दिवसानंतर येणार. जर काही सदस्यांना आपले लेख सदर करायचे असेल तर यांच्यासाठी थांबायचे आहे. संदेश यांचे इतर लेखावर ते सद्या काम करत आहेत. ३० तारिक पर्यंत आपण थांबुया व अंतिम निर्णय देऊया.
- तुमच्या संदेश नंतर मी आज रात्र जे लेख सदर केले आहेत त्याचे मूल्यांकन करेल व उद्यापर्यंत त्यांच्या चर्चापानास संदेश देणार. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:५८, २८ नोव्हेंबर २०१७ (IST)
प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स हा लेख परत सदर केला आहे
संपादनप्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स हा लेख ३०० हून कमी शब्द असल्यामुळे नाकारण्यात आला होता. त्यात मी शब्दात वाढ करून तो परत जमा केला आहे. कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद! Abhilash Mhaisne (चर्चा) १८:४३, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)
माझे योगदान
संपादन@Dharmadhyaksha:@Abhilash Mhaisne:@संदेश हिवाळे: मी स्वतः आशियाई महिन्याला योगदान दिले आहे. जर माझे लेख मी स्वतः मूल्यांकन करेल तर काही तक्रार आहे का?. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०१, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)
- तुम्ही स्वतः मुल्यांकन करू शकता, माझी काही तक्रार नाही.