मराठी विकिबुक्स ही मराठी भाषेतील एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा आहे.

स्वरूप

संपादन

सध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा आहे. वस्तुतः कालांतराने ज्ञानेश्वरी आणि तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्त्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतरित केले जाणे अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे विकि विश्वविद्यापीठाची सुद्धा संकल्पना आहे. विकिस्रोत व विकि विश्वविद्यापीठाची या सहप्रकल्पांची सुरुवात होईपर्यंत हा भार 'विकिबुक्स' हा प्रकल्प मोठा अभिमानाने सांभाळत आहे. विकिबुक्स प्रकल्पामध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.

सद्यस्थिती

संपादन

सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या १४९ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिबुक्स लवकरच प्रगती करेल.

बाह्य दुवे

संपादन