शिल्प, वास्तू व चित्र या तीनही कलांच्या अभ्यासाला मूर्तिशास्त्र म्हंटले जाऊ शकते. शिल्पकला हा मूर्तिशास्त्राचा भाग आहे. तसेच शिल्पकला व मंदिर स्थापत्य यांचा जवळचा संबंध आहे.

इतिहाससंपादन करा

जागतिकसंपादन करा

मूर्तिशास्त्राचा इतिहास हा बराच प्राचीन आहे. ग्रीक कलाकारांनी प्राथमिकपणे शरीरशास्त्राचा अभ्यास करून वास्तववादी मूर्ती घडवायला सुरुवात केली.. त्या आधी इजिप्त येथील संस्कृतीचे पुरावे आढळून येतात.

भारतसंपादन करा

मौर्य साम्राज्य भारतात असताना इसवी सन पूर्व ४थ्या शतकापासून भारतात मूर्ती बनवायला सुरुवात झाली.

राष्ट्रकूटयादव या सत्तांच्या काळात भारतात मूर्तिघडण शास्त्रात प्रगती झाली. बौद्ध काळात या शास्त्राची विशेष भरभराट झाली.

तज्‍ज्ञसंपादन करा

  • डॉ. गो.बं. देगलूरकर हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातली अन्वा, निलंगा आणि औंढा नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा खास अभ्यास केला आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा

मूर्तिशास्त्रावरील पुस्तकेसंपादन करा

  • भारतीय मूर्तिशास्त्र (नीळकंठ जोशी)
  • मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.