मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

संपादन
चांदणे शिंपित जा ...!
 
 
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

 

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


 
जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
 
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
 
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
 
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

  २०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

 

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
 
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

  वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

संपादन
२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
 
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

 
विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
 
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
     
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

  २०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
 
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


     स्वागत Sagarmarkal, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
  आवश्यक मार्गदर्शन Sagarmarkal, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४२ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
 
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

 


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

  Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
  नेहमीचे प्रश्न
  सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
  धोरण
  दालने
  सहप्रकल्प

शिरवडे आणि शिरावडे

संपादन

आपल्याला शिरवडे लेखात लेखन करताना पाहिले.मराठी विकिपीडियावर शिरावडे नावाचे पण लेख पान आहे ही दोन्ही गावे एकच आहेत का वेगवेगळी ?

माहितगार १२:३१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

पवई पद्मावती पुरावा

संपादन

माझ्याकडे तरी नाही.

अभय नातू १३:२३, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

इंग्रजी विकिपीडियातील लेखात तसा उल्लेख दिसतो .इंटरनेटवर इतरत्र असा उल्लेख आढळला नाही पण हा लेख आढळला आणि आपल्या पवई लेखाच्या लेखनात उपयूक्त ठरेल असे वाटते.माहितगार १४:०७, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi Sagarmarkal,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

विकिपीडिया आणि विश्वकोशीय मजकूर

संपादन

नमस्कार !

आपण मराठी विकिपीडियावर उत्साहाने संपादने करत आहात; त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद ! आपण केलेल्या काही संपादनांमधील मजकूर विश्वकोशास लागतो तसा वस्तुनिष्ठ व तटस्थ नव्हता. त्यात आपली स्वतःची मते, टिप्पण्या, विचार यांचे प्रकटीकरण होत होते, व त्यामुळे त्याचे स्वरूप ज्ञानकोशीय लेख असण्यापेक्षा निबंधात्मक वाटत होते. त्यामुळे तश्या अविश्वकोशीय संपादनांमध्ये विकिपीडियाची धोरणांना अनुसरत काटछाट करावी लागली. विकिपीडियाची व्याप्ती आणि नेमके स्वरूप स्पष्ट होण्यासाठी विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हेविकिपीडिया:परिचय या दुव्यांवर टिचकी मारून तेथील विवरण वाचावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१२, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

सागर, तुमची अन्य लेखांमधील संपादने ठीकच ाअहेत. वगळलेल्या संपादनांमध्ये "..मला चीड येते", "परवा असाच विषय निघाला.." एतदर्थाची व्याक्यरचना योजून पुष्कळसे वैयक्तिक मतप्रदर्शन मांडले गेले होते. ते विकिपीडीयावर येणे अपेक्षित नाही. त्यासाठी वैयक्तिक ब्लॉग, अन्य सर्वजनिक फोरम/बुलेटिन बोर्ड स्वरूपाची संकेतस्थळे उपयुक्त ठरतील. विकिपीडियावरील माहिती वस्तुनिष्ठ व तटस्थपणे मांडणे, तसेच त्यासाठी विश्वसनीय/ विद्वत्तापूर्ण स्रोतसंदर्भांचे दाखले देऊन माहिती मांडणे अपेक्षित असते. मुखपॄष्ठावरील मुख्य सदर लेख )येथे पाहा : विकिपीडिया:मासिक सदर/मागील अंक संग्रह), उदयोन्मुख लेख चाळल्यास आशयाची मांडणी व भाषाशैली कशी असावी याचा अंदाज आपल्याला येईल.

काही मदत लागल्यास विकिपीडिया:चावडी येथे किंवा माझ्या चर्चापानावर जरूर कळवा. विकिपीडियावरील उत्साही संपादने चालू राखण्याबद्दल शुभेच्छा !

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४८, १२ ऑगस्ट २०११ (UTC)


सागर, आपला प्रयत्न स्तुत्य आहे.व्यक्तिगत मते लिहिणे टाळावे. इतर लेखांमध्ये थोडे थोडे लेखन करावे म्हणजे विकिपीडिया विश्वकोशीय लेखन संकेतांचा सराव होईल मग पुन्हा तुमच्या आवडीच्या विषयाकडे पुन्हा वळा.स्वागत साचात एक ऑनलाईन पॉवरपॉईंटचा दुवा दिला आहे अद्याप तो पाहीला नसल्यास पाहून घ्यावा.किंवा विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी आणि विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या साहाय्य पानांवर देखील काही सहाय्य उपलब्ध आहे.आपल्या आवडीच्या विषयातून असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.माहितगार ०६:४६, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

>>>नवीन सदस्यांनी केलेले लिखाण एकदम काढून न टाकता त्याला चर्चा पानावर पुनर्निदेषित करून बदल सुचवावे असे माझे व्यक्तिगत मत आहे. सागर:मराठी सेवक ०९:१३, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

सागर मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. लगेच वगळण्या मागे काही एक मत प्रणाली आहे आणि त्या मत प्रणालीच्या काही जमेच्या बाजू आहेत त्या मला वाटते संकल्प आणि अभय अधीक व्यवस्थीत समजाऊन सांगु शकतील. दुसर्‍या बाजूस नवीन आलेल्या सदस्याला त्याचा नेमका एरीआ ऑफ इंप्रूव्हमेंट न दाखवता लेखन सरळ वगळणे नवोदीतांना हतोत्साहीत करणारे ठरू शकते या दृष्टीने सदस्यांना सुचीत करून मग बदल करावेत हे अधीक सुयोग्य. पण सर्वच भाषी विकिपीडीयात या संवेदनेचा अभाव आढळतो हे खरे आहे.
बरीच वर्षे मी स्वतः,तुम्ही म्हणता तसे एकेक संपादकास मार्गदर्शनही केले आहे जेणेकरून लगेच वगळणार्‍या मंडळींनी वगळण्याच काम केल तर सहाय्य देणारी मडळी अशा सदस्यांना संपर्क करून मदत करतील तर समतोल रहातो हे खरे.पण आता मीही काहीसा व्यस्त झालो आहे आणि माझी जागा घेऊन काम करण्यार्‍या स्वयंसेवकांची गरज आहे हे खरे.तुमच्या करता मी हे काम करून देतो पण आता नवीन मंडळीनी या कामी पुढे येण्याची गरज आहे.माहितगार ०९:३७, १३ ऑगस्ट २०११ (UTC)
आधी आपण विकिपीडिया:धूळपाटी/मराठी - आव्हान आणि उत्क्रांती तुमचे हे लेखन घेऊ.येथे माझी प्रतिक्रीया वाक्या गणिक नोंदवतो आहे.माहितगार १०:००, १३ ऑगस्ट २०११ (UTC)
सागर मी आधीची प्रतिक्रीया देताना विकिपीडिया:धूळपाटी/मराठी - आव्हान आणि उत्क्रांती हे लेखन पूर्ण वाचून झाल नव्हत आताही केवळ गना जोगळेकरांच्या लेखनावरून घे/बेतलेला भागचे वाचन झाले आहे.(मी सुद्धा ग.ना जोगळेकरांचे संदर्भ देऊन येथे लेखन केले आहे.) एकतर काही परिच्छेद त्यांच्या लेखातून जसेच्या तसे उचलले असतीलतर विनाकारण कॉपीराईटचा प्रश्न निर्माण होतो , बहूधा तुम्ही तसे केले नसावे फक्त कॉपीराईटचा मुद्दा स्मरणात असू द्यावा म्हणून नमूद केले, आपण लिहू इच्छित असलेला भाग मुख्यत्वे मराठी भाषेचा इतिहास मध्ये जावयास हवा.काही भाग मराठी भाषेचा इतिहास लेखातच भाषेची झीज असा वेगळा विभाग करून टाकाता येईल किंवा कसे हे पहावे.संदर्भासहित जे लेखन आहे ते तुम्हाला कदाचित मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने याही लेखात समाविष्ट करण्यास वाव असू शकतो.
मी विकिपीडिया:धूळपाटी/मराठी - आव्हान आणि उत्क्रांती येथे लेखनाची विश्वकोशिय अंगाने बरीच चिरफाड केली आहे यास व्यक्तिगत अंगाने घेऊ नये अथवा ग.ना.जोगळेकरांच्या लेखनाची एखाद्या परिच्छेदात अवहेलना करणयचा उद्देश होता असा विचार आपण करणार नाही असा विश्वास आहे.हेच लेखन एखाद्या ब्लॉगवर अत्यंत छान असेल पण मराठी विकिपीडियास ज्ञानकोश म्हणून परिघास ज्या मर्यादा येतात त्या स्विकारावयास हव्यात त्यात आपले सहकार्य लाभेल आणि आपल्याकडून उत्तमोत्तम लेखन मराठी विकिपीडियावर होत राहील असा विश्वास वाटतो.
सवडीनुसार आपले इतरत्र वगळलेल्या लेखनावरही प्रतिसाद देईन पण पुन्हा एकदा विनंती कि अशा प्रयत्नास व्यक्तिगतरित्या किंवा आपल्या व्यक्तिगत विचारसरनीवरची टिका म्हणून पाहू नये. माहितगार ११:१९, १३ ऑगस्ट २०११ (UTC)


मला वाटते मी त्यावर मेहनत थोडी घेतली आहेच,तेव्हा इतर नवागत संपादकांना कुठे मार्गदर्शनाकरता वापरता आले तर पहा या कामात मला तेवढाच तुमचा मदतीचा हात लाभेल. सहा महिन्यात तुम्हीही इथे रूळाल मग तुम्ही स्वतःही इतर नविन सदस्यांना सहज मदत करू शकाल. तुमची परवानगी असेलतर तो मी सहाय्य नामविश्वात स्थानांतरीत करेन.

बृहन्महाराष्ट्र मंडळ

संपादन
मी आपल्या लेखनातील एखाद परिच्छेद बृहन्महाराष्ट्र मंडळ लेखात घेतो आहे. ह्या विषयात रस असल्यास लेखनाचे स्वागतच आहे माहितगार १२:०८, १३ ऑगस्ट २०११ (UTC)

देवबांध

संपादन

प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.




आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.



असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:

विस्तार साचा

संपादन

नमस्कार,

तुम्ही लेखांमध्ये {{विस्तार}} लावीत असल्याचे पाहिले. दोन सुचवण्या --

१. अशी repeatitive कामे सांगकाम्याद्वारे (bot) सहजगत्या करुन घेता येतात व तुमचा बहुमोल संपादनाचा वेळ लेखांमध्ये इतर सुधारणा करण्यात किंवा भर घालण्यात घालवता येईल.

२. विस्तार साचा सहसा छोट्या लेखांत लावला जातो, तसेच तो लेखाच्या शेवटी न लावता मजकूराच्या शेवटी (वर्गीकरणाआधी) किंवा प्रसंगी लेखाच्या सुरुवातीसही लावला जातो. याने वाचकाचे लक्ष विस्तारविनंतीकडे लगेचच जाते.

तुमचे योगदान अधिकाधिक प्रमाणात चालूच ठेवाल ही आशा.

अभय नातू १५:०७, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

अभयच्या सुचवणी क्र. २मध्ये अजून एक भर : विस्तार साचा लेखाच्या अंतिम भागात, परंतु मार्गक्रमण साचे, वर्गीकरण, आंतरविकी दुवे या तिन्ही विभागांच्या आधी, परंतु बाह्य दुवे/मुख्य वाचनीय मजकुरानंतर लावतात.
बाकी, अभय म्हणतो, तशी ही कामे सांगकाम्ये लावून करता येतील; त्यासाठी जास्त श्रमू नये.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४५, २२ सप्टेंबर २०११ (UTC)

गगण या प्रकल्पाची माहिती बद्दल

संपादन

गगण या प्रकल्पाचा इन्सॅट-३क, इन्सॅट-३इ, इन्सॅट-२ब, इन्सॅट-२अ, इन्सॅट-१ब, इन्सॅट-१ड, इन्सॅट-१क यांच्याशी काही संबंधित नाहीत. संबंधित पानांवर आपण हा बदल केलेले आहेत असे आढळत आहे. अधिक माहिती साठी गगण पानाचा किंवा http://www.isro.org/scripts/futureprogramme.aspx#Satellite या पानाचा अभ्यास करावा व चित्र:Insat3c.gif हे संचिका उपलब्ध असताना Gsat8 img.gif वापरण्याचे प्रयोजन समजले नाही. आपण बदल कराल अशी अपेक्षा आहे

सचिन ०८:२९, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

M N इत्यादी

संपादन

कृपया M, N हे लेख बघावेत. त्यात व त्या सारख्या इतर लेखात [[वर्ग:लॅटिन वर्णमाला]] हा वर्ग टाकावा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४७, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

रिकामे, छोटे लेख

संपादन

नमस्कार सागर,

नवीन लेख लिहिताना त्यात किमान दोन-चार ओळींचा मजकूर असावा. त्याचे वर्गीकरण असावे तसेच आंतरविकि दुवेसुद्धा असावे.

आपण आधीपासून असलेले छोटेछोटे लेख वाढवून मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना असे एकगठ्ठा बारके लेख तयार झाल्यास केलेल्यावर पाणी फिरल्यासारखे होते.

कृपया तुम्ही अलीकडे तयार केलेल्या लेखांत योग्य ते बदल करावे.

धन्यवाद,

अभय नातू १४:०३, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

पुन्हा एकदा -- रिकामे, छोटे लेख

संपादन

नमस्कार सागर,

नवीन लेख लिहिताना त्यात किमान दोन-चार ओळींचा मजकूर असावा. त्याचे वर्गीकरण असावे तसेच आंतरविकि दुवेसुद्धा असावे.

आपण आधीपासून असलेले छोटेछोटे लेख वाढवून मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना असे एकगठ्ठा बारके लेख तयार झाल्यास केलेल्यावर पाणी फिरल्यासारखे होते.

कृपया तुम्ही अलीकडे तयार केलेल्या लेखांत योग्य ते बदल करावे.

धन्यवाद,

अभय नातू २२:२९, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

तिसर्‍यांदा -- रिकामे, छोटे लेख

संपादन

नमस्कार सागर,

नवीन लेख लिहिताना त्यात किमान दोन-चार ओळींचा मजकूर असावा. त्याचे वर्गीकरण असावे तसेच आंतरविकि दुवेसुद्धा असावे.

आपण आधीपासून असलेले छोटेछोटे लेख वाढवून मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना असे एकगठ्ठा बारके लेख तयार झाल्यास केलेल्यावर पाणी फिरल्यासारखे होते.

कृपया तुम्ही अलीकडे तयार केलेल्या लेखांत योग्य ते बदल करावे.

तुम्हाला दोन वेळा संदेश देउन सुद्धा तुम्ही त्याची दखल घेतलेली नाही याचा खेद वाटतो.

धन्यवाद,

दुजोरा

संपादन

नमस्कार सागर ! अभय नातू यांनी आपल्या निदर्शनास आणून दिलेली सूचना विचारात घेऊन योग्य कॄती करावी, ही विनंती. त्यांनी लिहिलेले "आपण आधीपासून असलेले छोटेछोटे लेख वाढवून मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना असे एकगठ्ठा बारके लेख तयार झाल्यास केलेल्यावर पाणी फिरल्यासारखे होते." हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी विकिपीडियाचा चुथडा करायचा असल्यास, ढिगान-ढीग कोरे लेख बनवून ठेवणे हा अगदी सोपा आणि हमखास यशस्वी मार्ग आहे, याची नोंद घ्यावी. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३०, २७ सप्टेंबर २०११ (UTC)

मला तरी वाटते की, सदस्य:Sagarmarkal यांनी काही सर्व मराठी विकिपीडियाचा चुथडा केला किंवा करायचा प्रयत्न केला असे वाटत असेल, तर त्याप्रमाणे आधी कमी वाक्य असाणारे किंवा एकगठ्ठा बारके लेख या सर्व लेखांबाबत विरोध किती वेळा प्रयत्न झाला किंवा किती वेळा संबंधीत सदस्यांना संदेश दिला गेला व Speedy Deletion चा प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न झाला? जरी त्यांनी लेख (एकगठ्ठा बारके लेख) तयार केले असले तरी त्याच्यावरील Speedy Deletion चा साचा हटवावा. आपण सारे त्याबद्दल प्रयत्न केला तर त्याचा विकास होऊ शकेल. किमान उपग्रह प्रसारण संबंधीत लेख वगळू नये. सचिन १५:५३, २९ सप्टेंबर २०११ (UTC)
डॉ. सचिन,
माझी दुसरी आणि तिसरी हरकतवजा सूचना आधीच्या सूचनेची दखलही न घेता किंवा त्यास उत्तर/समर्थन न देता तसेच काम पुढे चालू ठेवण्याबद्दलची होती.
मार्कळांनी तयार केलेल्या लेखांवर आक्षेप नाही. त्यांचा आकाराबद्दल होता/आहे. त्यांचे उपग्रहांबद्दलचे लिखाण स्तुत्यच आहे पण विकिपीडिया हा collaborative effort असल्याने एकमेकांच्या संदेशाची दखल तरी घेतली जावी ही माझी माफक अपेक्षा होती. माझे इतर स्पष्टीकरण खाली, वर आहेच.
संकल्प, तुझ्या एका शब्दाने कसे वादळ उठवले बघ...काय करायचे बघ रे, बाबा... :-D
अभय नातू १६:११, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

चर्चा पानावर बदल

संपादन

नमस्कार,

एखाद्या सदस्याच्या चर्चा पानावरील आपण न लिहिलेल्या मजकूरात परस्पर बदल करणे हे विकिपीडियाच्या आचारचौकटीत बसत नाही. जर चूक असेल तर ती दाखवून द्यावी, परस्पर तिसर्‍याच्या लिखाणात बदल करू नयेत.

धन्यवाद.

अभय नातू १४:५०, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

मार्कळसाहेब,
मला वाटते तुम्ही माझा संदेश नीट वाचला नाहीत. जर चूक झाली तर ती नक्कीच दाखवून द्यावी. परवानगी वगैरेचा प्रश्न येथे येतच नाही...प्रश्न आहे आचारसंहितेचा. जर विकिपीडियाची प्रणाली लिहिणार्‍यांना अशी परवानगी द्यायची नसती तुम्हाला तो मजकूर बदलता येणार नाही याची सोय करुन ठेवली असती की!
तुम्ही मराठी सेवक, पण आपले सदस्य नाव रोमन लिपीत लिहिता मग आम्हा बापड्यांना कसे कळणार काय उच्चार आहे तो? आणि झाली चूक तर कळवा की...बदलून टाकू आमचे उच्चार. त्यासाठी असा भांडणाचा पवित्रा कशाला?
असो, मूळ मुद्दा होता तो तुम्ही रिकामे लेख तयार करण्याचा आणि नम्र भाषेत केलेल्या विनंत्यांची दखलही न घेण्याचा. आशा आहे तुम्ही तो वाचलात आणि त्यामागचा हेतूही तुम्हाला कळला असेल.
तुमचे आपल्या विकिपीडियावरील (आमच्या नव्हे) योगदान नक्कीच स्वागतार्ह आहे आणि तुम्ही अधिकाधिक योगदान करीत रहाल अशी आशा आहे.
अभय नातू १५:१३, २९ सप्टेंबर २०११ (UTC)

नमस्कार,

तुम्ही म्हणलेले रिकामी खोकी रिकामीच राहणार नाहीत हे खरे व्हावे ही मनापासूनची माझी इच्छा. आज मराठी विकिपीडियावर अतोनात रिकामी खोकी आहेत. आणि सामान्य वाचकाला ही पाहून हा काय रिकामटेकडा उद्योग चालवला आहे असा ग्रह होण्याची संभावना आहे. त्यामुळे माझ्यासह अनेक संपादक (इच्छा व संधी असूनसुद्धा) नवीन लेख तयार करण्याच्या मागे न लागता खूप वेळ अशी खोकी भरण्यात घालवतो. यासाठी विशेष:छोटी पाने येथील यादीवर माझा हल्ला असतो. या यादीनुसार आपले ५,००० सगळ्यात छोटे लेख काही महिन्यांपूर्वी १६८ किंवा कमी बाइट्सचे होते. सहा महिन्यात आपण महाप्रयत्न करून हा आकडा २७०च्या आसपास आणला आहे. असे असता ३०-४० बाइट्सचे ५० लेख तयार झाल्यास केलेल्या या प्रयत्नांवर पाणी असेच होते. मी तुम्हाला विनंती करण्यामागे नवीन खोकी एकगठ्ठा नकोत हा हेतू होता. नवीन लेख तयार झाले पाहिजेतच आणि माझा यासाठीही हट्ट असतो पण एकदम असे बरेच छोटे लेख तयार झाल्यावर आपल्या विकिपीडियावरील माहितीची आशयघनता कमी होते यात दुमत नसावे.

असो. जेथे गरज भासेल तेथे नवीन (छोटे असले तरीही) लेख जरूर तयार करावे पण एकदम भाराभर नको...हाच माझा मथितार्थ. असे लेख करताना वर म्हणल्याप्रमाणे वर्गीकरण, आंतरविकी दुवा आणि दोन-चार वाक्ये घातलीत तर उत्तमच. असे केले असता इतर संपादकांना लेखाचा उद्देश आणि रोख कळून येईल आणि ते सुद्धा त्यात आपणहून भर घालतील.

क.लो.अ.

अभय नातू

ता.क. चुथडा आसे शब्द आचारसहिंता ला धरून आहेत का
कदाचित नाही...मला या शब्दाचे विशेष काही वाटत नाही, पण तुम्हास हा शब्द गैर वाटत असल्यास त्यावर मी माझे मत कसे लादू?
मला वाटते संकल्पने हा शब्द वापरताना हलकेच घेतला जावा अशी अपेक्षा केली होती...तसे दाखवण्यासाठी त्याने वाक्याच्या शेवटी स्माइली सुद्धा घातली होती, पण हा माझा कयास आहे. संकल्पला मी अनेक वर्षे ओळखतो. त्याच्या कामाबद्दल माझी पुस्ती नकोच.
आपण सगळेच येथे घरचे खाउन लश्करच्या भाकरी भाजतो. एखादा शब्द उणादुणा (विशेषतः तसा हेतू नसताना) झाल्यास त्यावरुन रुसू नये ही विनंती.

चुथड्याबद्दल

संपादन

मार्कळ, चुथडा या शब्दाबद्दल निरनिराळ्या शब्दकोशांतील, व्युत्पत्तिकोशातील नोंदी खालीलप्रमाणे आहेत :

  • कुलकर्णी, कृ.पां. p. ३११. Missing or empty |title= (सहाय्य)
चुथडा: पुं., नाश, बिघाड, खराबी
चुथडा : [ cuthaḍā ] m P (चुथणें) Derangement and disorderly intermixture (of articles after a vehement rummaging): spoiled state (of a writing through erasures, interlineations, blots).
चुथडा : m Derangement and disorderly intermixture.

आता वरील शब्दकोशांवरून चुथडा या शब्दाचा अर्थ खराबी, नाश असा आहे; हा शब्द वाह्यात नाही व त्यामुळे आचारसंहिता वगैरे काथ्याकुटाची गरज नाही, हे उघड होते. आता मी वर लिहिलेले " मराठी विकिपीडियाचा चुथडा करायचा असल्यास, ढिगान-ढीग कोरे लेख बनवून ठेवणे हा अगदी सोपा आणि हमखास यशस्वी मार्ग आहे, याची नोंद घ्यावी :) " हे वाक्य 'चुथडा' शब्दाऐवजी 'नाश/खराबी' असा लिहून घातल्यास काय वाक्य बनते, ते पाहू :

" मराठी विकिपीडियाचा नाश/खराबी करायचा(/ची) असल्यास, ढिगान-ढीग कोरे लेख बनवून ठेवणे हा अगदी सोपा आणि हमखास यशस्वी मार्ग आहे, याची नोंद घ्यावी :)"

या वाक्यात वाह्यात काय आहे व "चुथडा असले वाह्यात शब्द आमच्या मराठी विकी वर परत येणार नाहीत याची काळजी घ्याल अशी अपेक्षा! " अशी टिप्पणी नोंदवण्याजोगे काय आहे ? तात्पर्य, तुम्हांला राग कशाने आला, त्याचे आश्चर्य वाटते. बहुधा शब्दार्थावरून आपल्या मनात काहीतरी गोंधळ उडाला असावा, अशी मला शंका वाटते.

>>> आपल्या मधुर वाणीचा परिचय आम्हास (सर्व मराठी विकी सदस्यांना) चावडी वर दिला आहात; <<<< अभय नातूंनी म्हटल्याप्रमाणे शब्दांपेक्षा हेतू व विचार महत्त्वाचा. त्यामुळे मी चावडीवर जो विचार मांडतो किंवा ज्या हेतूने लिहितो, तो हेतू/विचार ध्यानी न घेता अन्य काही दॄष्टिकोनांचे चष्मे लावून मते वाचल्यास, निक्या सत्त्वापेक्षा टरफलांवरून गैरसमजुती संभवतात. माझी वाणी मधुर किंवा कटु, यांवर कोणाचे काय मत, यापेक्षा मला मराठी विकिपीडियावर सदस्य म्हणून तार्किकदृष्ट्या व दूरगामी हिताचे मत मांडणे अधिक महत्त्वाचे वाटते. तसे करताना इतरांच्या मनात काही गोंधळ/गल्लत उद्भवून माझ्याबद्दल काही गैरसमज झाल्यास, त्यास मी जबाबदार ठरत नाही.

असो. मूळ मुद्दा असा की, लेख बनवणार्‍याने लेखात किमान माहिती भरायला दोन-तीन वाक्ये तयार असतील, तर लेख बनवण्यात हशील. अन्यथा असे लेख मराठी विकिपीडियावर फुसक्या लेखांमध्ये भर पाडण्यासाठीच उपयोगी पडायची शक्यता अधिक. दरम्यानच्या काळात अश्या पानांना भेट देणारे मराठी वाचक निराश होऊन परतण्याच शक्यताही अधिक.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०४, १ ऑक्टोबर २०११ (UTC)

या चहाला !

संपादन

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .



चहाचे सादर निमंत्रण.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०२:५४, ३० सप्टेंबर २०११ (UTC)


तुळजापूर

संपादन

सागर,

तुळजापूर ह्या लेखाचा विषय हा तुळजापूर गाव असा असावा तू तो देवी असा धरल्याचे जाणवले तुळजाभवानी असा वेगळा लेख पण विकी कर आहेच कि तेव्हा काळजी घ्या. तात्या ०७:५७, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)

चित्रे

संपादन

नमस्कार सागर,

तुम्ही चित्रे मराठी विपी वर बरीच चढवत आहात असे दिसते. तुमच्या उत्साहाला दाद द्यायलाच हवी. एकच छोटी सूचना करावीशी वाटते. ही सारी चित्रे प्रताधिकार मुक्त आहे ना याची काळजी घेतली असेलच. राधा मंगेशकर मधील त्यांचे चित्र प्रताधिकार मुक्त आहे ना? शंका वाटली म्हणून विचारले. नंतर ते परत काढायची वेळ यायला नको म्हणून आताच आठवण करून देतो.... मंदार कुलकर्णी ०६:११, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

पुन्हा छोटे लेख?

संपादन

नमस्कार,

आपली वर इतकी चर्चा झाल्यावरही आज तुम्ही नाममात्र लेखांचा एक ढीग घातलात हे पाहून काय म्हणावे सुचेना. असो, त्यात लवकरच भर घालाल ही आशा आणि अपेक्षा.

चित्रपटांचे (किंवा इतरही) लेख तयार करताना एकदा त्या नावाशी साम्य असलेले लेख चाळून पहावेत (उदा. भुजंग (चित्रपट), भुजंग) म्हणजे एकाच विषयावर अनेक लेख उगीचच तयार होणार नाहीत. जर आधीपासूनच लेख असला तर तुम्हाला अपेक्षित शीर्षकाकडून तेथे पुनर्निर्देशन करावे किंवा त्या लेखाचे स्थानांतरण तुम्हाला अपेक्षित त्या शीर्षकाखाली करावे. या दोनपैकी प्रत्येक ठिकाणी अधिक योग्य शीर्षक कोणते ते तुम्हीच ठरवावे.

अभय नातू १६:०५, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

कशासाठी?

अभय नातू १७:२४, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

विचार करा

संपादन
सागर, मला वाटते वगळलेल्या लेखात लेखाचे नाव सोडून काहिही मजकूर नाहि. असे लेख महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही. अनेक लेखात पान काढा विनंत्याही लावलेल्या होत्या. बर्याच लेखांना speedy deletion request होत्या असे दिसते. मग हे लेख काढण्याअगोदर या सगळ्या विनंत्यांचा आपल्यासारख्या (म्हणजे विकिपिडीयाचे सर्व सदस्य) सदस्यांनी विचार करून ही पाने वाढवायला किंवा त्यात भर घालायला पाहिजे होती. आपल्या रागयुक्त संदेशातून असे जाणवते आहे की आपण ही पाने वाढवायच्या विचारात होता पण अजूनही काही बिघडलेले नाही या नावांनीच तुम्ही परत पाने तयार करू शकता फक्त पान मोकळे नको काय मजकूर पानाला जोडायचा आहे ते मनाशी आधी पक्के ठरवूनच पान बनवले म्हणजे ते मोकळे राहणार नाही व येथे फेरफटका मारणार्यांना निराशा होणार नाही (जी निराशा वगळलेल्या लेखांबाबतीत आजवर अनेकांची झाली असेल.) आपल्या योगदानाची विकिपिडीयाला गरज आहे. विचार कराल अशी अपेक्षा. संतोष दहिवळ १७:५५, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

जयंत साळगांवकर

संपादन

नमस्कार सागर सर, मराठी शिकवणीचा खूप फायदा झाला! तुम्ही केलेल्या विनंतीला मन देवून मी जयंत साळगांवकर या पानावर जमेल इतकी माहिती पुरवण्याचे काम करण्यास तयार आहे. जयंत साळगांवकर पानाची लिंक मला मेल ने भेटली आहे लवकरात लवकर काम चालू करतो. राहुल सरांनी आणि तुम्ही कामाला सुरवात कशी करावी सांगितली ह्याबद्दल आभारी आहे. मला लिखाण करताना कुठे अडलेच तर मदत करावी..Bhimraopatil १४:५१, १० ऑक्टोबर २०११ (UTC)


मित्रा आभारी आहे. मराठी typing कशी करायची ते सांगितल्या बदल आणि मराठी विकिपीडिया वर शोर्ट कट कसे वापराचे त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे Anandaaghav १६:१९, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


साचा:ट्रेनिंग चालू

संपादन
नमस्कार कृपया साचा:ट्रेनिंग चालू साचाचे अवलोकन करून सुयोग्य दुरूस्त्या सुधारणा कराव्यात/सुचवाव्यात माहितगार ०८:२१, १७ ऑक्टोबर २०११ (UTC)


sagar, i want to attach some my recipe snaps to my article but i am not getting any option like UPLOAD.what to do?


दिले, फारशी दुरुस्ती लागली नाही...J १७:२९, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

पदव्या/हुद्दे/किताब इत्यादी

संपादन

नमस्कार सागर !

जयंत साळगांवकरांच्या लेखात 'ज्योतिर्भास्कर' ही सन्मानवाचक पदवी त्यांच्या अधिकृत नावाचा भाग नाही; त्यामुळे प्रस्तावनेच्या पहिल्या वाक्यातल्या ठळक टायपातील नावात, तसेच माहितीचौकटीच्या शीर्षभागी केवळ मूळ नाव लिहिले जाते; त्यांत पदवी/हुद्दे/किताब घातले जात नाहीत. त्यामुळे 'ज्योतिर्भास्कर' या माहितीचौकटीच्या शीर्षभागी लिहू नये.

पदव्या/किताब/हुद्दे प्रस्तावनेच्या पहिल्या वाक्यात ठळक टायपातील नावाआधी इटालिक टाइपात लिहिले जातात. उदा. : संत महिपती ताहराबादकर.

कृपया योग्य ते बदल करावेत, ही विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४१, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

 

.  

  विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!  
नमस्कार, Sagarmarkal

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

संपादन

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, १ जानेवारी २०१२ (UTC)

"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन

संपादन

सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

संपादन
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी

संपादन

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:५४, ११ मार्च २०१२ (IST)Reply

नमस्कार, "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" या प्रकल्प अंतर्गत काही कामे भरली आहेत. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात अजून काही भर घालायची असेल तर अवश्य करावी. आपले काही मार्गदर्शन यासाठी झाले तर बरे होईल...मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:२७, १७ मार्च २०१२ (IST)Reply
नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५०, २७ मार्च २०१२ (IST)Reply

धन्यवाद

संपादन

मराठी विकिपीडिया वर आपले स्वागत आहे

धन्यवाद

संपादन

mi v.v.s laxman ya page var photo upload kelay tyachi hi size mothi ahe mhanun tumhi kami kara ashi vinanti..majhe 101 edits zhale..madhe madhe kahi hi karat hoti edit...

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

संपादन

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:११, ११ जून २०१२ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा

संपादन

नमस्कार Sagarmarkal,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार Sagarmarkal,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले