विकिपीडिया:साचे

(सहाय्य:Template या पानावरून पुनर्निर्देशित)
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे. विकिपीडियावर काही संदेश अथवा सारखी माहिती वारंवार वापरावी लागते. असे संदेश व माहितीसाच्यात घातल्यास ते साचे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्यामुळे लेखन-वेळ वाचतो आणि सुटसुटीतपणा येतो. इंग्रजीत त्यांस Template असे संबोधतात.

हा लेख सोपे साचे कसे बनवावेत याचे मार्गदर्शन करतो. साचा पाने इतर पानात वापरता येतात त्यामुळे साचा पानातील माहिती इतर एक किंवा अनेक पानात एकाच वेळी प्रतिबिंबीत[] होते.

साचांचा उपयोग विविध पानात विविधपणे केलेला आढळतो. नमुन्यादाखल साचा:नाव हा साचा आणि Wikipedia:धूळपाटी/भाषांतर हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा.साचा:नाव मध्ये नाव बदलून Wikipedia:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा. अर्थात वर दिलेल्या साच्याचा वाक्यातील उपयोग उदाहरणादाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साच्याचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलला तर वाक्यातील 'अर्थाचा अनर्थ' होण्याची भिती असते.

साचा:helpme हेसुद्धा सोप्या साचाचे उदाहरण आहे. तांत्रीक अडचणीबद्दल मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने {{helpme}} असे लिहून पान जतन करून साहाय्य मागण्याकरता [[साचा:helpme]] हा साहाय्यकारी साचा वापरला जातो.

नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्ग:साचे येथे एकत्रित केले आहेत.

साचे कसे बनवावे?

संपादन

[[साचा:साच्याचे नाव]] असे लिहा.

(साचा बनवताना साचा पुढे अर्धविरामाचे : हे चिन्ह वापरून साचाचे नाव लिहावे.: चिन्ह चूकीने विसर्गाचे चिन्ह बनले तर साचा बनत नाही म्हणून आपण मराठी सॉफ्ट्वेअर वापरत असाल तर मराठी बंद करून इंग्रजीत या चिन्हाचा वापर करून पुन्हा मराठीत वापस जा.)

किंवा

{{साच्याचे नाव}} याप्रमाणे दुहेरी महिरपी कंसात साच्याचे नाव लिहावे (महिरपी कंसात साचा हा शब्द लिहू नये) असा साचा आपल्याला हव्या असलेल्या विवीध सुयोग्य लेखात एकाच वेळी वापरता येतो.

साधारणतः लेखातील शिर्षकाच्या भागात वाचकांना सूचना, संदेश देण्याकरीता, तळ टीपा , माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यात मुख्यत्वेकरुन साच्याचा वापर केलेला आढळतो.

साचा पद्धतीचा उपयोग विकिपीडियातील इंग्रजी सॉफ्ट्वेअर मधील सुचना मराठी किंवा संबंधीत भाषेत दिसाव्यात म्हणून पण केला जात असे. अर्थात, सध्याच्या पद्धतीत हीच संकल्पना MediaWiki नामविश्वाच्या स्वतंत्र स्वरूपात वापरली जाते.

माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन साच्यांमध्ये तक्ते,सारणी (टेबल्स) चा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामूळे साचे बनवितांना सारणी कशी बनवावी हे शिकून घेणे उपयूक्त ठरते.

काही साचे अधिक तांत्रिक कौशल्य वापरून बनवलेले तसेच त्यांचा प्रभाव विवीध पानात/लेखात सर्वदूर पडत असल्यामुळे आधी पासून अस्तीत्वात असलेल्या साचांमध्ये दुरुस्त्या करतांना अधीक काळजी घेण्याची आवश्यकता असते.येथे काय जोडले आहे आणि साच्याच्या आत इतर कोणते साचे आहेत , काही एच.टी.एम.एल. लिखाण आहे का?, सारणी नेमकी कशी बनलेली आहे या सर्वांचा दूरूस्ती करण्यापुर्वी सवीस्तर विचार करावा लागतो. आपण नवीन किंवा विकिपीडिया संपादनांच्या बाबतीत अननुभवी असाल तर जुन्या साच्यांमध्ये बदल स्वतः करण्यापेक्षा तशी विनंती चर्चा पानावर करणे अधिक सयुक्तीक ठरू शकते.

प्रगत साचे

संपादन

साचा पान हे विकिपिडीयाकरिता वापरल्या जाणार्‍या मेडियाविकि प्रणालीत आंतर्न्यास पद्धतीने दुसर्‍या पानांमध्ये भरण्याकरीता वापरलेले पान असते. हि विकिची उपपरिपाठ/उपशिरस्ता (सबरूटीन) सुविधा #इनक्लुड स्टेटमेंट किंवा मॅक्रो सदृश्य असते.बदली/ऐवजी मुळे साचा मॅक्रो सुविधा म्हणून वापरणे शक्य होते.प्रगत साचे हा लेख इंग्रजी विकिपीडियावर अभ्यासून शक्य असेल तर मराठीत भाषांतरीत करा.

साचे वर्गीकरण

संपादन

सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्गीकरण करून येथे एकत्रित केले आहेत.

  • लेखातील जागेनुसार साचे
    • माथ्यावर लावले जाणारे साचे
    • लेखाच्या ऊजवीकडे दिसणारे माहिती चौकट साचे आणि सुचालन साचे.
    • लेखाच्या तळाला लावले जाणारे मार्गक्रमण साचे.
    • लेखात कुठेही वापरता येतात असे साचे.
    • पुरस्कार किंवा गौरव साचे
  • उपयोगानुसार साचे
    • InterWiki Templates आंतर सहप्रकल्प साचे
    • Wikipedia:Welcome templates स्वागत साचे
    • चौकट साचे
    • निःसंदिग्धीकरण साचे .
    • मार्गक्रमण साचे
    • सुचालन साचे.

साचे सुसूत्रीकरण प्रकल्प

संपादन

साच्यांवर काम करण्यासाठी विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्याला आपण हातभार लावू शकता.

उदाहरण प्रकारानुसार साच्यांची यादी

संपादन

विकिपीडियावर संवाद साधताना विविध साचे वापरता येतात. काही साचे हे केवळ विशिष्ट लेखांतच वापरता येतात. उदा. शहर साचा केवळ शहरांवरील लेखांत वापरता येईल, इतरत्र नाही. पण काही साचे अनेक वेळा वापरले जातात.

साच्यांचा वापर लेखातील बहुधा शीर्षकाच्या भागातच वाचकांना विषयाचा थोडक्यात परिचय करून देण्याकरिता होतो. त्याशिवाय साच्याचा वापर तळटिपा, माहिती चौकटी , मार्गक्रमण, सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यांतही केला जातो. असे साचे केव्हा वापरावेत ही माहिती खाली दिली आहे.

कसा वापरावा कधी वापरावा कसा उमटतो
{{helpme}} प्रकार :नेहमी उपयुक्त सूचना संदेश या पानावर पहा

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


  • विशेषत: नवोदितांसाठी उपयुक्त. कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्या चर्चापानावर हा संदेश वापरावा, इतर संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील
{{विस्तार}} एखाद्या लेखाचा विस्तार करण्याची विनंती करण्यासाठी
{{वाद}}, {{वादग्रस्त लेख}} एखाद्या लेखाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल अथवा माहितीच्या योग्यतेबद्दल शंका असेल तेव्हा


{{काम चालू}} आपण एखाद्या लेखावर काम करत आहात हे वाचकांना व इतर संपादकांना दर्शविण्यासाठी


{{पुनर्लेखन}} एखाद्या लेखात महत्त्वाचे बदल/ पुनर्लेखन केल्यावर इतरांचे अभिप्राय मिळवण्याकरिता
{{जाणकार}} जाणकारांची मदत मिळवण्याकरिता
{{पानकाढा}}, {{पान काढायची विनंती}}, {{पान काढायची सूचना}} विकिपीडियावरील लेख/ पान काढण्याची विनंती करण्यासाठी
{{npov}}, {{नि:पक्ष}}, {{दृष्टिकोन}}, {{निःपक्षपाती दृष्टिकोन}}, {{निःपक्षपाती दृष्टिकोन-विभाग}} एखाद्या लेखाच्या/विभागाच्या नि:पक्षपातीपणा बद्दल शंका असल्यास वापरावा.
{{बदल}} लेखांत चुका (अशुद्धलेखन, चुकीचे शीर्षक/मजकूर) आढळल्यास व महत्त्वाचे बदल सुचवण्यासाठी. {{पानकाढा}} प्रमाणे हा साचा पान काढण्याविषयी सांगत नाही
{{सूचना}} सूचना संदेशाकरिता

सूचना: येथे तुमची सूचना दिसेल


{{वर्ग}} लेखाचे वर्गीकरण करण्याची विनंती करण्यासाठी
{{हा लेख}} एकाच नावाच्या संबंधित/नावासारखे अनेक लेख असले तर नि:संदिग्धीकरणासाठी उदा-मालवणी
 
{{स्रोत}} आपल्या संपादनाला स्रोत/संदर्भ पुरवण्याकरिता. येथे इतर घटक/variables देखील स्पष्ट करावे लागतात "[{{{पत्ता}}} {{{म}}}]", {{{प्र}}}
{{welcome}} नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी साचा प्रकट झाल्यावर बरीच वाक्ये उमटतात.
{{fasthelp}} अनामिक anonymous सदस्याचे स्वागत व सहकार्य करण्यासाठी साच्याचे प्रकटीकरण मोठे आहे
{{संदर्भ हवा}} एखाद्या माहितीबद्दल/वाक्याबद्दल आपल्याला शंका वाटत असेल तर संदर्भाची मागणी करण्यासाठी [ संदर्भ हवा ]

साचाचा गैरवापर कसा शोधावा व टाळावा

संपादन
  • वाक्यातील शब्दांच्या ऐवजी शब्द-साच्याचा अनावश्यक उपयोग केलेला आढळल्यास तो काढून टाकून त्या जागी साधारण शब्द वापरावा, व सहज संदर्भाकरिता तशी नोंद संबधित पानाच्या चर्चा पानावर करावी.
  • साच्यांमधील माहिती प्रतिबिंबित असल्यामुळे ती इतर लेखात जतन (सेव्ह) झालेली नसते त्यामुळेच ती इतर लेखांच्या संपादकीय इतिहासात प्रत्यक्षपणे पडताळता येत नाही. पण साचा पानाच्या इतिहासात किती काळ होती हे पडताळता येते. त्या प्रमाणेच तोच साचा एखाद्या इतर पानामध्ये कोणत्या कालावधीत होता हेही पडताळता येते. अप्रत्यक्ष पण सबळ निष्कर्ष काढता येतो. या पडताळणींचा उपयोग साच्यांचा गैरउपयोग टाळण्याकरिता केला जातो.
  1. ^ तळटीप पहा