सदस्य चर्चा:Sandesh9822/जुनी चर्चा १
स्वागत | Sandesh9822/जुनी चर्चा १, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Sandesh9822/जुनी चर्चा १, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७८१ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे. mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor. Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way. Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority. Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
आभार
संपादननमस्कार संदेश!
आपण बौद्ध धर्म व तत्संबंधी लेखात केलेल्या योगदानाबद्दल आपणास हा बार्नस्टार देण्यात येत आहे.आपण या विकित बरीच भर घातली आहे.याबाबत व इतरही लेखांत आपण आपले योगदान असेच निरंतर पुढे सुरू ठेवाल या अपेक्षेसह. वि. नरसीकर (चर्चा) १६:५८, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)
मी बौद्ध धर्म, भीमराव रामजी आंबेडकर व तत्संबंधी पृष्ठांत अधिक माहितीची भर घालित असतो. परंतु मला विकीपेडीया उपयोगाचे खूपच कमी ज्ञान आहे, कृपया मदत करा, मला मला विकीपेडीयाचा संपूर्ण उपयोग कसा करावा हे सांगा. आणि बार्नस्टार म्हणजे काय?
१४:४२, १ जानेवारी २०१७ (IST)
सदस्यपान
संपादनदुसरे असे कि आपण हा संदेश आपल्या सदस्य पानावर लावू शकता. तसेच आपल्याबद्दलची इतरही माहिती तेथे टाकू शकता.
--वि. नरसीकर (चर्चा) १७:०१, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)
मला हा संदेश पानावर लावता येत नाही आणि स्वत:ची बद्दलची माहिती कुठे व कशी टाकावी हे ही मला माहिती नाही. कृपया मदत करा.
१४:४५, १ जानेवारी २०१७ (IST) संदेश हिवाळे
फारच सोपी आहे. सदस्य:संदेश हिवाळे हे आपले सदस्य पान आहे. तेथे सरळ येथून नकल डकव (कॉपी पेस्ट) करा. झाले.अलीकडील बदल मध्ये आपल्या नावाचा लाल दिसत असलेला दुवा निळा होईल.
- दुसरे, कोणास संदेश द्यावयाचा तो त्यासदस्याचे चर्चापानावर टाकावा.म्हणजे तो त्यास मिळतो.डावीकडच्या कडपट्टीत (साईडबार) असलेले वेगवेगळे दुवेही टिचकुन बघा म्हणजे येथे या विकिवर काय काय आहे ते कळेल.
- बार्नस्टार बद्दल माहिती विकिपीडिया:बार्नस्टार येथे मिळू शकेल.आपले पुढील लेखनास शुभेच्छा.आपण विविध विषयांवरही असेच लेखन पुढे सुरू ठेउ शकता. आपल्या लेखनास शुभेच्छा.
CommonsDelinker
संपादननमस्कार
सदस्य चर्चा:CommonsDelinker यांच्या चर्चा पानावरील आपली शंका आपला हा संदेश दृष्टोत्पत्तीस पडली. User:CommonsDelinker हे बॉट (ॲटोमॅटीक सदस्य खाते) मुलत: मराठी विकिपीडिया बाहेरुन [येथून अमराठी अभारतीय User:Magnus_Manske कडून चालवले जात असल्याची शक्यता असू शकेल असे वाटते. आपण त्यांच्याशी तेथील चर्चा पानावर त्यांना शंका विचारु शकताच.
विकिमिडीया कॉमन्स या छायाचित्रे सांभाळणाऱ्या बहुभाषिक बहुराष्ट्रीय प्रकल्पाचा उल्लेख बऱ्याचदा 'मूळ स्रोतातून' असा केला जातो. आपण शंका विचारलेले छायाचित्र बहुधा येथे मूळ स्रोतात राहीले असावे ते तेथिल अमराठी सदस्य कदाचित अभारतीय सदस्य User:Jcb यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये वगळले असावे असे प्रथमदर्शनी वाटते. आपण त्यांनाही तेथे त्यांच्या चर्चा पानावर शंका विचारु शकता. येथे त्यांनी नमुद केलेले कारण कॉपीराईट उल्लंघन असे प्रथम दर्शनी दिसते. वस्तुत: कॉपीराईट उल्लंघनाची असंख्य छायाचित्रे तिथे सातत्याने वगळली जातात आणि CommonsDelinker कडून त्या लिंक्स वगळल्या जातात हे सर्व भाषी विकिपीडीयातून मोठ्या प्रमाणावर सातत्याने केले जात असावे. मराठी विकिपीडियावरून त्यांनी वगळलेले इतर छायाचित्र दुवे इत्यादी आपण कदाचित येथे अभ्यासू शकाल
कॉपीराईट कायद्या बद्दल जिथ पर्यंत माझी कल्पना आहे बाबा साहेब आंबेडकरांचा मृत्यू इ.स्वी. १९५६ मध्ये झाला होता. त्यानंतर ६० वर्षे म्हणजे (१९५६ +६०) अदमासे डिसेंबर २०१६ पर्यंत कॉपीराईटेड रहाते. जानेवारी २०१७ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावरील कॉपीराईट बहुधा संपावयास हवा, जानेवारी २०१७ नंतर कॉपीराईट संपण्याची शक्यता असल्याची बाब User:Jcb यांच्या आपण निदर्शनास आणल्यास कदाचित ते आपणास काही सहकार्य करु शकतील तेव्हा त्यांच्याशी जरुर संपर्क करावा असे सुचवावेसे वाटते.
आपल्या सवडीनुसार मराठी विकिपीडियावरील इतर साहाय्य पानांचे वाचन केल्यास गैर समज टळण्यास कदाचित मदत होऊ शकेल असे वाटते. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन होत राहो हि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३१, १९ डिसेंबर २०१६ (IST)
मला तुमचा प्रश्न वा म्हणूणे कळाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्षरी जवळजवळ सर्वच विकि पेजवरून गायब करण्यात आली आहे, कृपया त्यांची सही पानावर समाविष्ठ करा. १६:१६, ११ जानेवारी २०१७ (IST)
- कॉपीराईट कायद्या बद्दल जिथ पर्यंत माझी कल्पना आहे बाबा साहेब आंबेडकरांचा मृत्यू इ.स्वी. १९५६ मध्ये झाला होता. त्यानंतर ६० वर्षे म्हणजे (१९५६ +६०) अदमासे डिसेंबर २०१६ पर्यंत कॉपीराईटेड रहाते. जानेवारी २०१७ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावरील कॉपीराईट बहुधा संपावयास हवा, जानेवारी २०१७ नंतर कॉपीराईट संपण्याची शक्यता असल्याची बाब " User:Jcb यांच्या आपण निदर्शनास आणल्यास" कदाचित ते आपणास काही सहकार्य करु शकतील तेव्हा त्यांच्याशी जरुर संपर्क करावा असे सुचवावेसे वाटते.
व्लादीमीर हाफ्किन
संपादननमस्कार,
व्लादीमीर हाफ्किन en:Waldemar_Haffkine या भारतात राहून गेलेल्या जीवाणू वैज्ञानिका बद्दल मराठी विकिपीडियावर अद्याप लेख नाही. महाराष्ट्र आणि भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान पहाता असा लेख असावा असे वाटते. आपल्या सवडी आणि आवडी नुसार त्यांच्या बद्दलच्या लेखात लेखन योगदाना बद्दल विचार करावा अशी विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०४, २० जानेवारी २०१७ (IST)
हो या महान शास्त्रज्ञाचा लेख बनवेन उद्या. आपण सर्वांनीच संपादनासाठी सहकार्य करा.
संदेश हिवाळे (चर्चा) ००:५६, २१ जानेवारी २०१७ (IST)
मी व्लादीमीर हाफ्कीन लेख बनवला आणि तो इतर इंग्रजी विकि लेखाशी जोडला. लेखाच्या विस्तारासाठी सर्व मराठी विकि मित्रांनी त्यात संपादन करा.
- लेख विस्तारात नक्कीच सहभागी होईन. खूप खूप आभार.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३३, २१ जानेवारी २०१७ (IST)
विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती
संपादनमराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:०३, २१ जानेवारी २०१७ (IST)
साहाय्य
संपादनकाळजी नसावी गोष्टी सावकाश सावकाश माहिती होतील. इतरही सदस्य आणि प्रचालक मदत करतीलच. साचे आणि चित्र या दोन्ही प्रकारांचा एकुण पसारा नाही म्हटले तरी जरा गुंता गुंतीचा आहे हे खरे असले तरी थोडे थोडे करत गेले म्हणजे जमत जाते. काही वेळा मदतही मागावी लागते पण त्यासाठी नेमक्या कोणत्या लेखात कोणत्या साचा बद्द्ल अथवा कोणत्या चित्रा बद्दल मदत हवी याची कल्पना मिळाल्यास बरी पडते.
आपली पहिली चर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीपासून झाली. त्यांच्या सहीवरील कॉपीराईटची समस्या भारतीय दृष्टीने १ जानेवारी पासून मिटली आहे. (जागतील काही देशात कॉपीराईट मृत्यूपासून ७० वर्षे म्हणजे अजून १० वर्षे लागू रहातो.) ती विकिमिडीया कॉमन्सवरच पुन:स्थापित करुन मिळाल्यास तुम्हाला मराठी शिवाय इतर भाषी विकिपीडियात सुद्धा मोकळेपणाने वापरता येईल आणि त्या पुन:स्थापनेसाठी म्हणूनच मी https://commons.wikimedia.org/wiki/User_talk:Jcb यांच्या चर्चा पानावर चर्चा करण्याचे सुचवले. त्यात अवघडण्यासारखे काही नाही. तुम्ही स्वत: केलेत म्हणजे आत्मविश्वास येण्यात मदतच होईल. त्यांच्या सोबत लागल्यास चर्चेत मी सुद्धा सहभागी होईन. शेवटी विकिमिडीया कॉमन्सवर अनुमती पुन:स्थापनेची अनुमती मिळालीच नाहीतर भारतीय भाषी विकिपीडियावर स्थानिक स्तरावर सही चढवता येईल आपण मराठी विकिपीडियावरही करु पण त्या आधी कॉमन्सवर प्रयत्न केलेला चांगला.
सगळ्याच गोष्टी एकदम लिहित नाही नाहीतर कन्फ्युजन वाढेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१७, २१ जानेवारी २०१७ (IST)
धन्यवाद, सर्व गोष्टी एकदम नाही तर हळूहळूच शिकायच्या आहेत. कुठे समस्या वाटली तर तुम्हाला कळवेन. जसा हिंदी विकि सदस्यांचा व्हॉटऍप चा ग्रूप आहे तसाच ग्रुप मराठी विकि सदस्यांचा आहे का ? किंवा बनू शकतो का ? कारण तीथे मराठी विकि संदर्भात जास्त चर्चा होऊ शकते. मराठी विकि सदस्यांना जोडून एक ग्रूप बनवता आला त्याने मराठी विकिला फायदा होईल.
संदेश हिवाळे (चर्चा) ०९:५७, २३ जानेवारी २०१७ (IST)
- व्हॉटऍप चा ग्रूप चांगली सूचना आहे, प्राध्यापकमंडळींनी सुद्धा तसा आग्रह केला आहे. माझेच स्मार्टफोन घेणे होत नाहीए पण लौकरच चालू करण्याचा विचार निश्चितच आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४५, २५ जानेवारी २०१७ (IST)
बुद्ध आणि त्यांचा धम्म
संपादनडॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित मूळ इंग्रजी आवृत्तीत भगवान असा कोठेही उल्लेख नाही. सुरवातीच्या काही आवृत्तीत भाषांतरकाराने तो अनावश्यक शब्द घालून चूक केलेली आहे. परंतु नंतर सुधारित अनुवादक : घन:शाम तळवटकर, प्रा. म. भि. चिटणीस, शां. शं. रेगे भाषांतरकाराने ती चूक दुरुस्त केली.[१] भगवान('तृष्णेला नष्ट करणारा) शब्दाचा अर्थ ईश्वर होतो कि नाही हे महत्वाचे नाही. परंतु मूळ ग्रंथातील योग्य भाषांतर होणे आवश्यक आहे.एम.डी.रामटेके व अनेक अर्वाचीन अभ्यासकांनी भगवान हा शब्द त्याज्य मानला आहे.आपण निरनिराळ्या अनुवादकांची शिर्षकाबाबत पुस्तके पाहून खात्री करावी ही विनंती.संदेश हिवाळे प्रसाद साळवे १२:३७, २६ जानेवारी २०१७ (IST)
अभिनंदन
संपादनटायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत आहे. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... संदेश हिवाळे (चर्चा) २०:२२, २६ जानेवारी २०१७ (IST)
भीमराव रामजी आंबेडकर
संपादनमी भीमराव रामजी आंबेडकर या लेखावर मागील चार वर्षापासून संपादन करत आहे. आपण बनवलेले उपविभाग तपासावेत. बौद्ध धर्माचा प्रसार हा उपविभाग होऊ शकत नाही. तसेच मुख्य व उप विभाग तयार करताना योग्य साचे वापरावेत. तसेच आपण तयार केलेले 13.शेतकर्याचे कैवारी या मुख्य विभागांतर्गत 13.२ शेतकऱ्यांचे कैवारी हा उपविभाग त्याच नावाने कसा काय होऊ शकेल.. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथात पुढील तीन ग्रंथांचा उल्लेख देखील चुकीचा आहे.
- आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
- हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
- दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितिज पब्लिकेशन, नागपूर, २००४.
- बाबासाहेबांचे प्रशंसक या विभागाचे संपादन विद्रूप झाल्यामुळे तो उपविभाग संदर्भसूचित घुसलेला आहे त्याकडे लक्ष द्यावे.
- ३५.१ सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते हा उपविभाग फक्त मतांची आकडेवारी दाखवणारा छोटा उपविभाग एकत्र करता आला असता. तसेच त्यात अंतर्भूत आकडे हे देवनागरी लिपीत संपादित केलेले नाहीत. त्यावर माझे संपादन सुरु होते परंतु आपण तो देखील उलटवला आहे. म्हणून चर्चे नंतर उलटवावा.
- मी ३८ मुख्य विभाग व त्या अंतर्गत उपविभाग जे अतिशय विस्कळीत होते ते दुरुस्त केलेले आहेत ते पाहावे.
- मुख्य विभाग २८ अंतर्गत देखील बरेच काम बाकी आहे त्यात मदत करावी.
गैरसमज नसावा. आपण लेखात मोलाची भर टाकल्याबद्दल आपले आभार. पुढील संपादनास शुभेच्छा. प्रसाद साळवे १८:३२, २७ जानेवारी २०१७ (IST)
तुमचे ‘बाबासाहेबांचे प्रशंसक’ मधील संपादन उत्कृष्ट आहे. बाबासाहेबांमुळे बौद्ध धर्माचा प्रसार गतीने झाला. बाबासाहेब लिखित पुस्तके मधील चूकिचे पुस्तके वगळ्यामुळे धन्यवाद. शेतकऱ्यांचे कैवारी ऐवजी शेतकऱ्यांचे कार्य हा बदल सुद्धा योग्य आहे.सीएएन आयबीएन सर्वेक्षणातील मते हे एकाखाली एक असणेच उत्तम दिसते, तुम्ही ती रचना बदलली आणि एकाच ओळीत महान भारतीय व त्यांची मते लिहिलीत त्याऐवजी आपण ती मतेच देवनागरीत लिहायला हवी होती. बाकी तुमचे संपादन उत्कृष्ट आहे. बाबासाहेबांविषयी सर्व लेखात मी तुम्हाला मदत करीन. मी समतेचा पुतळा (स्टॉचू ऑफ इक्वालिटी) लेख बनवलाय, त्यात त्या स्मारकाची प्रतिमा जोडा. मुख्य विभाग २८ मध्ये मदत करतो. संदेश हिवाळे (चर्चा) ०७:०१, ३१ जानेवारी २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:, धन्यवाद संदेश सर, लेखात अशीच भर घालून लेख समृद्ध करवा. समतेचा पुतळा मध्ये मी नक्कीच मदत करील.
सर्वात महान भारतीय
संपादननमस्कार,
तुम्ही पुन्हा एकदा या लेखाचे शीर्षक हलविल्याचे पाहिले व लेखात सर्वेक्षणाचा उल्लेख आहे अशी टिप्पणीही पाहिली.
असे असताही हा लेख अनेक सर्वेक्षणांबद्दलच असून सर्वात महान भारतीय या विषयावर नाही तरी शीर्षक पुन्हा एकदा सर्वात महान भारतीय सर्वेक्षण येथे हलवित आहे. कृपया पुन्हा हे सर्वात महान भारतीय येथे हलवू नये.
तुमच्या समजूतीबद्दल व सहकार्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०७:५७, ७ फेब्रुवारी २०१७ (IST)
- ता.क. सर्वात महान भारतीय या शीर्षकाकडून सर्वात महान भारतीय सर्वेक्षण येथे पुनर्निर्देशन अबाधित ठेवले आहे ज्यायोगे सर्वात महान भारतीयचा शोध घेतला असता किंवा हा दुवा दिला असता वाचक अपेक्षित लेखाकडे आपोआपच जातील.
सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण) असे शिर्षक योग्य राहिल. संदेश हिवाळे (चर्चा) ०८:३०, ८ फेब्रुवारी २०१७ (IST)
आपली विनंती
संपादनएखाद्या सदस्यास संदेश द्यावयाचा तर तो त्याच्या चर्चापानावर देणे अपेक्षित असते. त्याच्या सदस्यपानावर नव्हे. याची कृपया नोंद घ्यावी.--वि. नरसीकर (चर्चा) १२:१०, ११ फेब्रुवारी २०१७ (IST)
- दुसरी बाब अशी कि, आपण केलेली विनंती आहे कि आदेश?--वि. नरसीकर (चर्चा) १२:१४, ११ फेब्रुवारी २०१७ (IST)
सर, क्षमा असावी. मी त्यात कृपया शब्द टाकला होता म्हणजे मी तुम्हाला विनंतीच केली होती. संदेश हिवाळे (चर्चा) १२:३३, ११ फेब्रुवारी २०१७ (IST)
- माझी नजरचूक झाली. माफी मागतो.--वि. नरसीकर (चर्चा) १२:२७, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)
माफी नका मांगू सर, तुम्ही वरिष्ठ आहात. मला अजून सर्व विकि नियमांची आणि सर्व विकि संपादन कौशल्याची माहिती नाही. कृपया, मला विकि लेखावर चित्र लावणे वा टाकणे शिकवा. संदेश हिवाळे (चर्चा) १५:३७, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)
आभार
संपादनआपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धम्म या सोबतच विविध लेखांत मौलिक भर टाकून लेख समृद्ध करत आहात..त्याबद्दल आपले आभार .. लेखनास शुभेच्छा ..आपल्या संपादनास दुरूस्ती सह थोडाफार हातभार लावत जाईल आपल्या संपादनास मनःपूर्वक सदिच्छा प्रसाद साळवे १८:०१, १३ फेब्रुवारी २०१७ (IST)
मनापासून धन्यवाद सर, आत्ताच बौद्ध धर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील अनेक लेख वरवर वाचले, त्यात अजून जास्त भर घालणे आवश्यक आहे. कृपया त्यासाठी सहकार्य करा. आणि मला लेखात चित्र टाकणे शिकवा' कारण अनेक लेखात ते आवश्यक आहेत.
आपल्या सर्व मराठी विकिपीडियन्स चा एखादा व्हॉटऐप ग्रुप निर्माण करता आला तर त्याने मराठी विकि ला अधिक फायदा होईल. संदेश हिवाळे (चर्चा) १८:२३, १३ फेब्रुवारी २०१७ (IST)
शुभेच्छा
संपादनव्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार संदेश हिवाळे, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
धन्यवाद सर, तुम्हालाही प्रेम दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा... संदेश हिवाळे (चर्चा) १४:२५, १४ फेब्रुवारी २०१७ (IST)
Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg
संपादननमस्कार,
संदेश सर, आपण कॉमन्सवर चढवलेल्या File:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg संचिकेस आपण लावलेला परवाना (लायसन्स) छायाचित्र सहसा स्वत: छायाचित्र काढले असल्यास लावायचा असावा, परवाना योग्य नसल्यास काळाच्या ओघात कुणितरी त्याला डिलीट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. File:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg छायाचित्र कुणि, कधी काढले आणि कॉपीराईट कुणाकडे आहेत पब्लिक डॉमेन मध्ये आले आहे का याची माहिती चौकशी करुन सुयोग्य लायसन्स लावल्यास छायाचित्र वगळले जाण्याची शक्यता कमी राहील.
@Salveramprasad: आपल्या माहितीस्तवसुद्धा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५७, १९ फेब्रुवारी २०१७ (IST)
धन्यवाद सर, वरील माहिती महत्त्वाची सांगितलीय तुम्ही, प्रसाद साळवे सरांच्या मदतीने मी ते करतो. संदेश हिवाळे (चर्चा) २२:५१, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
महात्मा फुले
संपादननमस्कार,
तुम्ही जोतीराव गोविंदराव फुले हा लेख ज्योतीराव गोविंदराव फुले येथे स्थानांतरित केलेला पाहिला. त्या लेखाच्या चर्चा पानावर त्यांचे नाव ज्योतीराव नसून जोतीराव असल्याची नोंद आहे. नक्की काय नाव आहे याची शहानिशा करता येईल का?
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:१५, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
नमस्कार अभय सर, महात्मा फुले यांचे खरे नाव हे ज्योतीराव आहे, परंतु याचा जोतीराव असा उच्चार होतो. मराठी साहित्यात त्यांचा उल्लेख वा नाव ज्योतीराव गोविंदराव फुले हेच आहे, फक्त ज्योतीराव नावाचा उच्चार जोतीराव असाही केला होतो. अनेक ठिकाणी ज्योतीराव ऐवजी जोतीराव लिहिलेलं आढळतं, पण ते खरे नाही. अंग्रेजी व हिंदी विकि लेखात सुद्धा त्यांचा नावाचा उल्लेख क्रमश Jyotirao व ज्योतिराव असा आहे. संदेश हिवाळे (चर्चा) २२:३६, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
- धन्यवाद संदेश
- @ज:, आपले मत द्याल का?
- अभय नातू (चर्चा) २२:५०, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
मला मिळालेले संदर्भ
संपादनमराठी विश्वकोशातील नोंद "फुले, महात्मा जोतीराव गोविंदराव:" अशी दिसते
१) प्रा. हरी नरके यांच्या ब्लॉगवरील हा लेख
२) नागनाथ कोतापल्ले संपादीत पुस्तकाचे कव्हर
या दोघांनी जोतीराव असे लेखन केल्याचे दिसते
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३८, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
धन्यवाद
संपादननमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा) १२:२५, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
धन्यवाद वि. नरसीकर सर, तुम्हालाही मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
परभाषी चर्चा
संपादनपरभाषी विकिपीडियनशी परभाषी चर्चा सहसा विकिपीडिया:आंतरविकि दूतावास येथे केल्या जातात. आपल्या माहितीस्तव.
धन्यवाद आणि शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५३, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
धन्यवाद सर, क्षमा असावी, मी केवळ त्या हिन्दी विकि सदस्याला उत्तर म्हणून तिथे लिहले. संदेश हिवाळे (चर्चा) १२:२०, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)
हा बंधूप्रकल्प आपण पाहिला आहे का ?
संपादनविकिस्रोत बंधू प्रकल्पांची माहिती आपण घेतली आहेत का ? इंग्रजी विकिसोर्सचा दुवा पहावा. एकदा नजर टाकून झाल्या नंतर सांगा म्हणजे उपयोगांची माहिती देईन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१६, ५ मार्च २०१७ (IST)
या प्रकल्पांची मला माहिती नाही, कृपया याच्या उपयोगांची माहिती सांगा. संदेश हिवाळे (चर्चा) ११:३०, ५ मार्च २०१७ (IST)
- विकिस्रोताबद्दल हे ऑनलाईन गूगल सादरीकरण पहावे बाकी पुढे सांगतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०२, ५ मार्च २०१७ (IST)
- @Salveramprasad: साळवे सर आपणही वरील विकिस्रोत पॉवरपोईंट पहावे असे वाटते. आणि आपण दोघांनी पुढाकार घेतल्यास डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी स्वत: लिहिलेले इंग्रजी साहित्य इंग्रजी विकिस्रोतावर आणि मराठी साहित्य मराठी विकिस्रोतावर घेता येईल. खाली सुबोध कुलकर्णींचा संदेश दिसतो आहे त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला समन्वय करता येईल. डॉ. बाबासाहेबांचे साहित्य विकिस्रोतावर येऊन युनिकोडीत झाल्यास शोध घेण्यास, संदर्भ देणे पडताळणे अधिक सुलभ होईल असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५०, ९ मार्च २०१७ (IST)
@Mahitgar: सर...आपण दिलेल्या लिंक्स व ppt पाहिली.. बंधू प्रकल्पात आपल्या सादेस कर्तव्य बजावण्यास तत्पर आहोत प्रसाद साळवे २३:५२, ९ मार्च २०१७ (IST)
विकिस्रोतसाठी पुढची पाऊले
संपादनसुरवातीस स्टेप्सची संख्या बरीच वाटेल पण एकदा माहित झाल्यानंतर काही वाटणार नाही.
- १) कॉपीराईट मुक्त झालेल्या पुस्तकंना विकिमिडीया कॉमन्सवर लायसन्स लावण्याची पद्धत पाहून घेणे, इंग्रजी, मराठी दोन्ही भाषेतील साहित्य प्रथमत: विकिमिडीया कॉमन्सवर चढवावे लागेल.
- २) डो. बाबासाहेब आंबेडकर लिखीत प्रकाशीत पुस्तकांच्या (शक्यतो १९५६ आधीच्या आवृत्त्या) ऑनलाईन उपलब्ध होतात का पहाणे (या बाबत बंगाली विकिस्रोतचे सदस्य Bodhisattwa यांचे मार्गदर्शन उपयूक्त ठरु शकेल), जे साहित्य ऑन स्कॅनकरुन विकिमिडीया कॉमन्सवर टाकणे→बाबत महाराष्ट्र ज्ञानमहामंडळाची काय मदत होऊ शकेल का याबाबत सुबोध कुलकर्णीं यांची मदत होऊ शकेल का पहावे.
- ३) इंग्रजी विकिसोर्सवर एखाद्या पानाचे स्टाईल गाईड सहीत प्रूफ रिडींग करुन अनुभव घेतलेला बरा,
- ४) मराठी विकिस्रोतसाठी OCR इनबील्ट नसल्यामुळे तुमचे जीमेल अकाऊंट वापरुन गूगल ड्राईव्हवर एखादी मराठी पिडीएफ चढवून पहावी, त्यावर राईट क्लिक केल्यावर यासह उघडा पर्याय निवडल्यावर OCR चे युनिकोड कन्व्हर्शन करुन मिळते ते करुन पहावे.
- ५) इंग्रजी विकिसोर्सवर ऑथर तर मराठी विकिस्रोतवर साहित्यिक या नामविश्वात डॉ. आंबेडकरांच्या नावाचे पान बनवून त्यात त्यांच्या साहित्याची यादी नोंदवावी.
- ६) आता विकिमिडीया कॉमन्सवरी पुस्तकाची File:अमुकतमुक.PDF हे नाव इंग्रजी विकिस्रोतवर Index:अमुकतमुक.PDF असे लिहावे मराठी विकिस्रोतवर इँडेक्सच्या एवजी अनुक्रमणिका:अमुकतमुक.PDF असे लिहावे म्हणजे संबंधीत अनुक्रमणिका विकिस्रोतवर तयार होते.
- ७) मग कमित कमी एकेका पानाचे प्रुफ रिडींग पूर्ण करावे.
- ८) उर्वरीत प्रुफरिडींगसाठी टिम बनवण्याचे प्रयत्न ऑनलाईन तसेच कॉलेजातूनही करता येऊ शकतात.
- पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०७, १० मार्च २०१७ (IST)
माहितगार सर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य कशाप्रकारे मराठी विकिस्त्रोवर येऊ शकते? संदेश हिवाळे (चर्चा) १७:५२, १० मार्च २०१७ (IST)
- इथे मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: लिहिलेले साहित्य म्हणतो आहे. (इतरांनी त्यांच्या बद्दल लिहिलेले साहित्य सहसा अजून कॉपीराईटेड असेल त्यामुळॅ त्याचा समावेश करता येणार नाही.)
- मी वरच्या दिलेल्या क्रमाने गेलात तर सोपे पडेल. क्र, एक ला मी कॉमन्सवर चढवलेल्या पुस्तकांचे लायसन्सींग पाहण्यास सुचवले त्याची एखाद दोन उदाहरण लिंक्स देतो. एक पाच मिनीटे द्याल.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:१७, १० मार्च २०१७ (IST)
- विकिमिडीया कॉमन्सवरील File:छन्दोरचना.djvu चे कॉपीराईट फ्री असल्याचा परवाना कसा लावला आहे ते अभ्यासावे. त्यानंतर
मराठी विकिस्रोतात अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu येथे कॉमन्सवरील पुस्तक कसे दिसते पहावे. जमल्यास एखाद्या परिच्छेदाचे प्रुफरीडींग करुन जतन करुन पहावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३३, १० मार्च २०१७ (IST)
- @Mahitgar: सर आपण सांगितलेल्या एक एक पायरीचा मला निट अभ्यास करून त्या प्रमाणे पुस्तके अपलोड करण्याची कृती आजमावण्यास उत्सुक आहे.. कदाचित मला https://drambedkarbooks.com/dr-b-r-ambedkar-books/ या लिंक्स ची मदत होईल...?? प्रसाद साळवे २२:२२, १० मार्च २०१७ (IST)
- मला वाटते होता होईतो सोर्स / स्रोत अधिक डायरेक्ट / व्हेरीफायेबल असलेला अधिक चांगला कारण https://drambedkarbooks.com/dr-b-r-ambedkar-books/ इथली काही बुक्स पाहिली त्यांनी त्या पुसतकांना एडीट केलेले असावे असे प्रथमदर्शनी दिसते, एक तर त्यामुळे त्यावरचा कॉपीराईट शंकास्पद होतो, दुसरे त्यांच्या कडूनकाही त्रुटी राहून गेली तर ती विकिस्रोतवर जशीच्या तशी येईल. अगदीच एखादा ग्रंथ प्रयत्न करुनही मिळालाच नाही तर त्यांना संपर्क करुन त्यांनाच विकिमिडीया कॉमन्सवर चढवण्यास सांगितलेले बरे म्हणजे त्यांच्या त्रुटींची जबाबदारी तुमच्यावर येणे टळेल असे वाटते. s:en:Author talk:Bhimrao Ramji Ambedkar येथे बंगाली विकिस्रोत सदस्य Bodhisattwa यांना आपणास मार्गदर्शन करण्याची विनंती करणारा संदेश टाकला आहे. तो पर्यंत s:en:Author:Bhimrao Ramji Ambedkar येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्रजी साहित्याची सूची अद्ययावत करण्यास हरकत नसावी. ते इंग्रजी विकिसोर्स प्रकल्प वेगळे चालतात त्यांच्या स्वत:च्या नियमावली बऱ्याच असतात. त्यामुळे तिथे एक एक पाऊल शिकत टाकलेले बरे पडते. (कारण मीही तिथे तसेच करतो)
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:३०, १० मार्च २०१७ (IST)
- s:en:Author talk:Bhimrao Ramji Ambedkar येथे बंगाली विकिस्रोत सदस्य Bodhisattwa यांचे उत्तर आले आहे. त्यांनी अर्काईव्ह.ऑर्ग वरची ३ पुस्तके जुनी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वत: हयात असतानाच्या प्रिंट) प्रकाशित म्हणून सुचवली आहेत. उदाहरणार्थ त्यातील पहिले The Problem of The Rupee हे विकिमिडीया कॉमन्सवर चढवून File:छन्दोरचना.djvu प्रमाणे लायसन्स लावावा. हे आपण स्वत: करुन पहा मग पुढची स्टेप वर दिलीच आहे तरीही लागली तर पुन्हा सांगेन,
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:५०, ११ मार्च २०१७ (IST)
विकोसोर्स प्रुफ रिडींग
संपादननमस्कार,
मी आपणाश् विक्सोर्स प्रकल्पा संदर्भाने वर चर्चा केली आहेच. आपण आणि साळवे सरांनी Indian Copyright Act 1914 येथे मूळ कायद्यात आहे ते लेखन जसेच्या तसे दिसते का तपासण्यासाठी प्रुफ रिडींग मध्ये सहभाग नोंदवल्यास विकिस्रोत प्रकल्पाचा अनुभवही होईल आणि कॉपीराईट विषयाबद्दल परिचय सुद्धा वृद्धींगत होण्यास मदत मिळेल. कॉपीराईट विषयक लेखन विश्लेषणात प्रगती होण्याच्य दृष्टीने सुद्धा उपयूक्त ठरेल. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२६, १४ मार्च २०१७ (IST)
- @Mahitgar: सर विकोसोर्स प्रुफ रिडीँग सदस्य: सुबोध कुलकर्णी सरांशी चर्चा करून सुरु केले आहे. धन्यवाद सर. प्रसाद साळवे २२:११, १४ मार्च २०१७ (IST)
धन्यवाद सर संदेश हिवाळे (चर्चा) २२:२७, १४ मार्च २०१७ (IST)
हे करुन पहाणार?
संपादनFile:Letter from Ambedker to Bhaurao 1931.jpg हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्त लिखीत इंग्रजी पत्र विकिमिडीया कॉमन्सवर आहे. इंग्रजी विकिस्रोतवर फाईल शब्दा एवजी Index: शब्द लिहावा म्हणजे Index:Letter from Ambedker to Bhaurao 1931.jpg असे लिहून लेखक वगैरे माहिती भरुन सेव्ह करावे. मग त्या इंडेक्स पाना खाली पत्राचे पान दिसेल ते ऊघडून प्रत्येक शब्द मूळ पत्रा प्रमाणे टाईप करावा.
शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१५, ३० जुलै २०१७ (IST)
- मला तरी विकि सॉर्स विषयी विशेष माहिती नागी, आणि मी त्यात कामही केले नाही. तरीही मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करून पाहतो.
संपर्क
संपादननमस्कार, मला आपल्याशी महत्वाची चर्चा करायची आहे. मला subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवून संपर्क करावा हि नम्र विनंती.
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:३९, ६ मार्च २०१७ (IST)
Information/warning
संपादनTo explain u better i am writing this in english @Mahitgar:@अभय नातू: please take note of it and if necessary translate it in marathi
I've noticed that this user and user:Sandesh Hiwale is same this can be proved here please do explain this to the user or it may be found guilty under Wikipedia:Sock puppetry which I think applies globally and can be banned from editing globally if I am wrong do correct me and if it doesn't applies on marathi Wikipedia do leave this as a message --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:४२, १० मार्च २०१७ (IST)
तुमच्या भावना कळल्या, पण मराठी विकिमध्ये मराठीतून लेखन करणे चांगले आहे. संदेश हिवाळे (चर्चा) १७:४८, १० मार्च २०१७ (IST)
- टायवीन एकतर तुम्ही इंग्रजी विकिपीडियावरच तिथले नियम लावू न तिथेच काम करा इंग्रजी विकिपीडियाचे नियम तुमच्या डोक्यातून जातील तेव्हाच मराठी विकिपीडियावर या आणि कोणत्याही कारनाने इंग्रजीतून लिहिण्याचा फालतू पणा बंद करा. इंग्रजीतून लेखनाबद्दल टायवीनराव तुम्हाला हि फायनल वॉर्नींग आहे हे लक्षात घ्या, भाषे बाबत मी लवचिक आहे तडजोड करत नाही. हे पुन्हा लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२२, १० मार्च २०१७ (IST)
- टायवीन,
- एकाच सदस्याची दोन खाती असणे हे (थेट) नियमाविरुद्ध नाही. काही वेळा (विशेषतः लॅटिन वर्णमाला न वापरणाऱ्या विकिप्रकल्पांवर) इंग्लिश नाव असलेले खाते असणे साहजिक आहे. जर ही दोन खाती एकमेकांचे विवादात समर्थन करीत असेल किंवा एका खात्याचा उपयोग (गुप्तपणे) त्रयस्थ सदस्यावर हल्ले करण्यासाठी केला जात असेल तर हे वर्तन नियमबाह्य ठरू शकते.
- आपला आक्षेप हिवाळे यांची दोन खाती असण्याबद्दल आहे कि त्यांतील एखाद्या खात्यावरुन तुमच्यावर हल्ले होत आहेत असा आहे?
- माहितगार,
- तुमचे भाषाविषयक धोरण कडक असले तरी फायनल वॉर्निंग म्हणजे काय ते कळले नाही. आपण टायवीन यांना इंग्लिशमधून लिहिल्यास बॅन केले जाईल असे सांगत आहात का? असे करणे बरोबर कि नाही हे मी येथे सांगत नाही आहे, केवळ फालतूपणा आणि फायनल वॉर्निंग या शब्दप्रयोगांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
- आपण येथील वरिष्ठ सदस्य आहात तरी वादाच्या भरात फालतूपणा, इ. शब्द (वादात इतक्या लवकर :-}) करणे थोडेसे खटकले. असो, आपण सुज्ञ आहात, योग्य तेच शब्द वापराल ही खात्री आहे.
- अभय नातू (चर्चा) २०:५१, १० मार्च २०१७ (IST)
- नातू साहेब, आपण चर्चेत उशीरा आला आहात म्हणजे त्यांना भाषा मुद्यावरुन पुरेशा वेळा सुचना दिलेल्या नाहीत असे नाही, हे लक्षात घेतलेत तर शब्दांच्या वापरात घाई झालेली नाही. आणि टायवीन नावाच्या सदस्याला आऊट ऑफ द वे जाऊन बरीच मदत केलेली आहे, तुमच्या पेक्षाही अधिक फ्लेक्झीबल वागलो आहे. त्यांचे वागणे विचीत्र होते तेव्हा चीड येणे स्वाभाविक आहे,
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०३, १० मार्च २०१७ (IST)
- चर्चेत उशीरा आलो याचा अर्थ मी वाचत नाही असा होत नाही, साहेब!
- माझा उद्देश तु्मची चूक दाखवणे नसून चर्चेचा सूर टिपेला लागायच्या आधी खाली घेता आला तर पहावा यासाठी होता. तुम्हाला माझे सांगणे नको असेल तर मी ते मागे घेतो.
- अभय नातू (चर्चा) २१:०५, १० मार्च २०१७ (IST)
- आपण नीट वाचत असाल तर मग विस्वासही ठेवण्यास काही हरकत आहे का ? इंग्रजीतून लिहिणे हे शाऊटींग टाईप असते. किमान विकिपीडियावर संदेशने त्यांचे प्रत्यक्ष काही घोडे मारलेले नाही. साळवे आणि संदेश या दोघांना वेगळे काढून कशा न कशावरुन यांच्याच फक्त मागे लागणे मागच्या काही दिवसांपासून चालू आहे. संदेश आणि साळवेंच्याही त्रुटी आहेत नाही असे नाही पण ते पहाण्यासाठी तुम्ही आम्ही आहोत. टायवीनला स्वत:साठी लागणरी सर्व मदत दिलेली आहे. छायाचित्र कॉपीराईट विषयक त्यांच्या काही गैर अपेक्षा पूर्ण करता नाही आल्या. टायवीनचे स्वत:चे काम झाले नाही की तो प्रचालकांच्या मागे लागतो त्या सदस्याला करता मला करत नाही अशी तक्रारीची सवय एकदा नाही पुन्हा पुन्हाची सवय आहे त्यांची. मुख्य म्हणजे To explain u better i am writing this in english हे वाक्य म्हटले तर दोन शेडचे आहे -मी तुमच्या पेक्षा अधिक शहाणा आहे हा वास त्यास येतो-आणि ते सहन करण्याचे प्रयोजन प्रथम दर्शनीतरी दिसत नाही, यामुळे इंग्रजी टाळण्यासाठी सांगत असतो आणि ते लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२६, १० मार्च २०१७ (IST)
- नीट वाचत असल्यामुळे आणि तुमच्यावर विश्वास असल्या मुळेच इतका वेळ गप्प बसलो होतो. आणि माझा रोख फक्त चर्चा थोडी मवाळ करण्याचा होता.
- मला उद्देशून विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर दिले आहेच. इतर बाबींचा आपण पाठपुरावा करीत आहातच. असे असता मी परत माझ्या कामास लागतो.
- अभय नातू (चर्चा) २१:३७, १० मार्च २०१७ (IST)
@अभय नातू: डबल अकाउंट बद्दल माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद संदेश यांनी काही माझ्यावर हल्ला केला नाही मी हा संदेश त्याउद्देशाने लिहिले कि त्यांना दुसऱ्या विकीवर हा प्रशन पडला नाही पाहिजे. मी खाली बोलत होतो की काही कायद्याचा उलंदन होते असेल तर वॉर्निंग असे घ्या. माहितगार आणि तुमचे नाते चांगले आहे यात तुम्ही माझ्यासाठी जगडे घेऊ नाही. माहितगार यांनी हमेशा मला मदत केली आहे आणि प्रत्येक गोस्ट समजावले आहे. हो ते बरोबर कि मी प्रचालकवर दबाव टाकतो कारण मला मराठी विकीच्या प्रगती पाहिजे. To explain u better i am writing this in english माझे मराठी वीक असल्यामुळे लिहितो. जर तुम्हाला ते काही वेगळे वाटत असेल तर मग त्यात माझी गळती नाही कारण मी हाय इंग्लिशवाला व्यक्ती आहे. शानेपन करणे माझे स्वभाव नाही परंतु दुसऱ्यांचे साला घेऊन जर तुम्ही 3-4 वर्षी पूर्वी मराठी विकिपीडिया चालवली असती तर आज मला हा स्टेप उचलण्याची गरज नसली असते. मी आणि माझे हाच अगर स्वभाव असला तर मला पुढे काही प्रगती दिसत नाही. जर तुम्हाला खराब वाटत असेल तरी चालेल परंतु माझ्या मनात मराठी विकिपीडियाचे लोस आणि गाईन तुम्हीच आहे. परंतु मी आजही तुमचे आदर करतो आणि करत राहील कारण तुमचे नाव या विकिपीडियाचे इतिहासात लिहिले जाणार. थोडक्यात आताही वेळ आहे इट्स बेटर तो हॅव सम देण नटिंग जर मी मनाला लागले असेल तर लागुदे i believe in saying it to u unlike listening like other members --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५३, १० मार्च २०१७ (IST)
- टायवीन,
- माझे संबंध माहितगारांसह बव्हंश सदस्यांशी चांगले आहेत. आणि ते मी तसे ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपण दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
- माझा मुख्य उद्देश सगळ्याच सदस्यांना आपल्या मनाजोगे काम करता येणे हा आहे. यासाठी जी काही मदत लागेल ती मी करतो, तरी आपण ती मागण्यास संकोच करू नयेत. आपले एकमत नेहमीच होईल असे नाही परंतु तुम्ही (आणि इतर अनेक सदस्यांनी) केलेल्या कामाचे महत्व राखण्याचा मी प्रयत्न करेन.
- यासाठी माझ्या सदस्यपानावर इंग्लिशमध्ये (किंवा मला कळणाऱ्या इतर भाषांपैकी एकात) लिहिल्यास माझी व्यक्तिशः काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचे योगदान चालूच ठेवाल ही आशा आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:०४, १० मार्च २०१७ (IST)
धन्यवाद साहेब तरीही माझ्याशी जमले नाहीतरच मी इतर भाषा वापरेल असा अस्वासन मी देतो. माहितगार साहेब जर मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. अकिर बायबल मधून दोन ओळी संगनायस इच्छितो "एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा." कलस्सैकरांस ३:१३--टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१५, १० मार्च २०१७ (IST)
भ्रष्टाचारी अभय नातू
संपादनव्यक्तिगत आरोप झाकला
|
---|
अभय नातू पुन्हा तुझा पैसे खाऊन कोणाची हि वकिली करण्याचा धंदा सुरु का ? ह्या अगोदर पण अनेकदा असेच पैसे खाऊन आपण लोकांचे वकीलपत्र घेत आला आहेत त्यातच मराठी विकिपीडियाचे विकीकॉन्फरन्स घेण्याचे स्वप्न भंगले होते. चालुद्या ..... विघ्नसंतोषी लोकांचे काय करणार न ...! ज्या सदस्यास ब्यान करण्याची मागणी लोक करीत असतांना आणि तो इतरत्र ह्या पूवीच हाकलून दिलेला असताना त्याच्या खोट्या राजकारणी स्तुती सुमनांनी हुरळून जाऊन तुम्ही जी खैरात त्याचेवर करता आहात ह्याची आमहाला लाज वाटते. असो बनवा माल, खेळा राजकारण , डुबावा विकिपीडिया ..... लगे राहो !!! - Fan of Jokers |
बाबासाहेब आंबेडकर
संपादनविकिपीडियावर व्यक्तिविषयक लेख लिहिताना लेखाचे नाव हे ज्या नावाने लोक त्या व्यक्तीला ओळखतात ते असावे, असे माझे पहिल्यापासूनचे मत आहे. परंतु विकिपीडियाच्या पाॅलिसीचे निमित्त सांगून अशी सुपरिचित रूढ परिचित नावे बदलली जातात. तुकारामावरील लेखाचे नाव 'तुकाराम बॊल्होबा आंबिले' ठेवणे, दारासिंगवरील लेखाला दारासिंग रंधावा हे नाव देणे, व्ही. शांतारामचे 'शांताराम राजाराम वणकुद्रे' करणे, हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्तला 'वसंत कुमार शिवशंकर पादुकोण' म्हणणे वगैरे मला कधीच मान्य नव्हते.
त्यामुळे आंबेडकरांवरील लेखाला 'बाबासाहेब आंबेडकर' हेच नाव असावे.
छत्रपती शिवाजीला आख्खा महाराष्ट्र 'शिवाजी' म्हणतो, त्यामुळे शिवाजीवरील लेखाचे नाव छत्रपती शिवाजी शहाजी भॊंसले असे असू नये ('शिवाजी म्हणतो' या नावाचा मुलांचा एक खेळही आहे. भोसलेतील 'भो'वर एके काळी अनुस्वार होता, त्यामुळे भोंसलेचे इंग्रजी स्पेलिंग Bhonsala असे होई, याची आठवण म्हणून 'भो'वर अनुस्वार दिला आहे. आशा भोसले अजूनही आपल्या नावाचे स्पेलिंग Asha Bhonsle करते.) ... ज (चर्चा) २०:५०, ११ मार्च २०१७ (IST)
व्यक्ती ज्या नावाने प्रसिद्ध आहेत तेच लेखनाम असायला हवे, व मूळ नावाचा अगदी सुरूवातीलाच उल्लेख असावा. मला आंबेडकरांच्या लेखाचे नाव बाबासाहेब आंबेडकर असणे अपेक्षित होते, ते काहीसे विकि नियमांशी जुळणारेही होते पण आता ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे झाले आहे. भारतरत्न व डॉ. नसायला हवेत केवळ बाबासाहेब आंबेडकर पुरेसं नाव आहे. संदेश हिवाळे (चर्चा) २३:४१, ११ मार्च २०१७ (IST)
गुढीपाडवाचे शुभेच्छा!
संपादन
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐
|
|
तुम्हालाही गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा...!! संदेश हिवाळे (चर्चा) १०:५७, २९ मार्च २०१७ (IST)
अजिंठा वेरूळ नि:संदिग्धीकरण
संपादनकदाचित यापुर्वी नि:संदिग्धीकरण नीटसे झालेले नव्हते म्हणून कन्फ्युजन होते. आता नि:संदिग्धीकरण प्रक्रीया केली आहे. मराठी विकिपीडियावर खालील प्रत्येक लेखांचे स्वतंत्र अस्तीत्व आहे.
- अजिंठा (गाव)
- अजिंठा (लेणी)
- वेरूळ (गाव)
- वेरूळ (लेणी)
- अजिंठा-वेरुळची लेणी (एकत्रित लेख) संपादनास खुला आहे. हा एकत्रित लेख आधी मासिक सदर राहून गेला होता त्यामुळे ज्ञानकोशीय दर्जा संदर्भ वगैरे बद्दल अधिक कटाक्ष असू शकतो.
काही शंका शिल्लक राहील्यास मदत हवी असल्यास जरूर विचारावी पण आताच्या नि:संदिग्धीकरण प्रक्रीये नंतर बहुधा कन्फ्यूजन होणार नाही अशी आशा आहे. आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:००, २९ मार्च २०१७ (IST)
माहितगार सर, धन्यवाद. आता थोडीशीच समस्या शिल्लक आहे, कृपया ती ही दुरूस्त करा.
वेरूळ (लेणी) या लेखाचा इंग्रजी दुवा Verul हटवून त्याजागी Ellora Caves जोडा.
व वेरूळ ला Verul दुवा जोडा.
अजिंठा-वेरूळची लेणी चा Ajanta Caves दूवा हटवा आणि तोच अजिंठा (लेणी) ला जोडा.
मी अजिंठा ला इंग्रजी दुवा जोडलाय, तुम्ही फक्त वरील तीन दुवे त्या त्या प्रमाणे जोडा.
संदेश हिवाळे (चर्चा) १३:३६, २९ मार्च २०१७ (IST)
- केल तरीपण पुन्हा एकदा तपासून घ्यावे. वेरुळ मधल्या रु च्या युनिफॉर्म शुद्धलेखनासाठी पुन्हा एकदा स्थानांतरणे कुणी केल्यास ती तेवढ्या पुरतीच असतील तरीही इतर लेखांमध्ये दुए देण्या आधी ज्यांना शुद्धलेखनासाठी बदल करावयाचे आहेत त्यांना तसे करुन घेऊ द्यावेत. वेरुळ लेण्यांचे इतर लेखातील दुवे नंतर देणे अधिक सयूक्तीक असावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, २९ मार्च २०१७ (IST)
माहितगार सर, आता ठीक आहे, माझ्याकडून चुकून वर्ग:बौद्ध धर्माचे संप्रदाय हा Category:Schools of Buddhism ऐवजी Category:Buddhist Schools दुव्याशी जोडला गेला आहे. कृपया या वर्गाला Category:Schools of Buddhism शी जोडा. संदेश हिवाळे (चर्चा) १४:३०, २९ मार्च २०१७ (IST)
- केले.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०६, २९ मार्च २०१७ (IST)
धन्यवाद सर...!! संदेश हिवाळे (चर्चा) १७:३०, २९ मार्च २०१७ (IST)
सोशल मीडिया
संपादनसर आपले मत विकिपीडिया:चावडी/सोशल मीडिया अपेक्षित आहे. कृपा आपले मत द्यावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१५, २० एप्रिल २०१७ (IST)
मला आपलं म्हणणं निटसं कळलं नाही, कृपया विस्ताराने सांगा. [[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: maroon; color: orange">संदेश हिवाळे </span> <span style="color: orange"></span>]] (चर्चा) १४:५४, २१ एप्रिल २०१७ (IST)
- सर हा युग सोसिअल मीडियाचा आहे. आपण कदाचित फेसबुक वर किव्हा ट्विटर पाहिले तर तुम्ही अनेक संस्था पाहिले असेल ज्यांचे खाते त्यावर असतील. उधारण पहा इंग्लिश विकिपीडिया त्याचे फेसबुक https://www.facebook.com/wikipedia ट्विटर https://www.twitter.com/wikipedia इन्स्टाग्राम https://www.instagram.com/wikipedia/ असे अनेक विकिपीडियाचे खाते आहे. जेव्हा इतर काही करतात तर आपण ते केले की आपण ट्रेंड मध्ये असतो. जर पाण्याच्या धारविरुद्ध गेले की आपण आऊट-डेटेड किव्हा जुने रीत प्रमाणे अविकसित असू. याच करणीत मराठी विकिपीडिया सुद्धा आपले सोसिअल मीडिया खाते बनवतील व इतर लोकांना विकिपीडियाची माहिती पोहूचू. याचकाराण मी प्रस्ताव टाकला आहे की असे खाते मराठी विकिपीडियाचे सुद्धा असावे यांनी आपले पाहूच इतर विकी प्रमाणे वाढेल ज्याने आपल्याला खूप फायदा होईल यामुळे तुम्हीही विकिपीडियाचे सदस्य म्हणून मी तुम्हाला हा संदेश दिला आपले मत तक्रार दाखल करण्यास विकिपीडिया:चावडी/सोशल मीडिया
सदस्य पान
संपादनतुमचे सदस्य पानावर काही चित्र आहेत त्यांना जर व्यवस्तीत ठेवायची असेल तर हा कोड वापरा.
<Gallery> File:Nehru Yuva Kendra Jalna.jpg|[[नेहरू युवा केंद्र]] File:Chaitya Bhoomi, Mumbai – Samadhi place of Dr. Babasaheb Ambedkar.jpg|[[चैत्यभूमी]] – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळ File:Eleanor Zelliot.jpg|[[एलिनॉर झेलियट]] File:Dr. B.R. Ambedkar with wife Dr. Savita Ambedkar in 1948.jpg|[[डॉ. सविता आंबेडकर]] व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] File:Drambedkarandconstitution.jpg|घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९ </Gallery>
यांनी तुम्हाला तुमचे चित्र असे दिसतील👇
-
चैत्यभूमी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधी स्थळ
-
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटना संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९
--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२८, २२ एप्रिल २०१७ (IST)
- धन्यवाद. मी हेच वापरतो.
निकोललाई नोस्कोव आणि वेलरी लेओटिइव
संपादननमस्कार संदेश हिवाळे! आपण मराठी भाषेत गायक निकोलाई नोस्कॉव (Nikolai Noskov) किंवा वेलरी लिओटिइव (Valery Leontiev) बद्दल लेख करू शकता? आपण या लेख केल्यास, नंतर मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --178.66.98.155 १९:३०, २५ एप्रिल २०१७ (IST)
- होय, लिहतो. मात्र वेळ लागेल कारण माझे इंग्रजी ज्ञान विशेष उत्तम नाही आणि माझे काही अर्धवट लेख पूर्ण करायचे आहे.
--संदेश हिवाळेचर्चा २१:३४, २५ एप्रिल २०१७ (IST)
मी वेलरी लिओटिइव लेख बनवलाय. --संदेश हिवाळेचर्चा २१:४१, ५ जुलै २०१७ (IST)
हॅपी बर्थडे मराठी विकिपीडिया
संपादनमराठी विकिपीडिया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला मराठी विकिपीडियाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. २००३ साली या दिवशी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाले. वसंतपंचमी हा आपला पहिला लेख होता.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५२, १ मे २०१७ (IST)
धन्यवाद टायवीन, तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा... --संदेश हिवाळेचर्चा २१:१४, १ मे २०१७ (IST)
मार्च २०१७ बाबत शुभेच्छा
संपादननमस्कार Sandesh9822,
विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे चवडावे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.
|
---|
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५९, ३ मे २०१७ (IST)
Tiven2240, अगदी मनापासून धन्यवाद. माझे नुकतेच ३०००+ संपादने पूर्ण झाले आहेत. जगाभरातील सक्रिय विकिपीडियामध्यें आपली विकिपीडिया १७ व्या स्थानी ही पण महत्त्वाची व आनंदाची गोष्ट आहे. लेखांच्या संख्येमध्ये ही आपली विकिपीडिया अशीच प्रगती पथावर असावी, (म्हणजे सर्वजण प्रयत्नशील आहोतच यासाठी). मी विकिपीडियाचा सर्वात सक्रिय सदस्य ऐकूण आश्चर्य व बरे वाटले. तुमचे ही अमूल्य योगदान असेच चालू ठेवा, तुमच्याकडून मला अनेक मदती मिळाल्या त्याब्द्दलही धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:२९, ३ मे २०१७ (IST)
... ...
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! आर्या जोशी (चर्चा) १५:४३, ११ मे २०१७ (IST) बोधीवृक्ष लेखासाठी धन्यवाद आर्या जोशी (चर्चा)
- आर्या जोशी, खरं तर तुमचेच मनापासून धन्यवाद. कारण बोधीवृक्ष तुमच्याच प्रयत्नांनी पूर्ण झालाय. पुढील लेखनासाठी तुम्हाला शुभेच्छा!
अभिनंदन
संपादनसंदेशजी, आपण आज मराठी विकिपीडियावर ३३३३ संपादनांचा टप्पा पार केला त्या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ...! आपण मराठी भाषेतील अनेक लेखात सुधारणा करून भर घालत आहात व अविश्रांत योगदान कौतुकास्पद आहे. या योगदानाबद्दल बार्नस्टार . व पुढील संपादनास सदिच्छा.
पुन्हा एकदा अभिनंदन. प्रसाद साळवे ०९:४६, २० मे २०१७ (IST)
@प्रसाद साळवे: सर, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०९:५९, २० मे २०१७ (IST)
भरत जाधव
संपादन... ... नमस्कार, भरत जाधव ह्यांच्या विकी पृष्ठावर, आपण त्यांच्या वैयक्तिक माहिती मध्ये धर्माचा उल्लेख केलाय. त्यांच्या धर्म बद्दल सत्य असत्यता काहीही असो पण माहिती अनावश्यक आहे. कृपया अशा बाबी वगळाव्या. - धन्यवाद
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! Prashantvd75 (चर्चा) ०२:१४, २० जून २०१७ (IST)
- Prashantvd75, वयक्तिक जीवनाच्या माहिती मध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. धर्म हा वयक्तिक बाबींत येत नाही का? तुम्ही भरत जाधव हे बौद्ध असल्याचा संदर्भ मागण्याऐवजी त्यांचा धर्म उल्लेखच हटवण्याची मागणी केली, यात अर्थ नाही! अनेक इंग्रजी लेखातही personal life मध्ये religion चा उल्लेख असतो.
--संदेश हिवाळेचर्चा ११:३४, २१ जून २०१७ (IST)
आपली सध्या 4,250 संपादने झाली आहेत. लवकरच आपण ५००० च्या टप्प्यापर्यंत पोचाल. हार्दिक अभिनंदन! आपण असेच विकिपीडियात योगदान करत रहावे ही आशा व अपेक्षा.--वि. नरसीकर (चर्चा) १५:०९, २६ जून २०१७ (IST)
- वि. नरसीकर सर, धन्यवाद!
निकोलाई नोस्कोव्ह
संपादनप्रिय संदेश हिवाळे! गायक निकोलाई नोस्कोव्हबद्दल (en:Nikolai Noskov) तुम्ही मराठीत लेख काढू शकता का? आपण हा लेख केल्यास, मी कृतज्ञ असेल! धन्यवाद! --217.66.156.142 २१:०२, ५ जुलै २०१७ (IST)
- @अभय नातू: सर या मेसेज मधील अनामिक 217.66.156.142 कोण असावे. जे विविध ip पत्याद्वारे सर्वत्र हा मेसेज फिरवत आहे. प्रसाद साळवे २१:३०, ५ जुलै २०१७ (IST)
यापूर्वी यांच्याच विनंतीवरून मी वेलरी लिओटिइव लेख लिहिलेला आहे.
--संदेश हिवाळेचर्चा २१:४४, ५ जुलै २०१७ (IST)
- सांस्कृतीक देवाण घेवाणीच्या दृष्टीने अशा एखाद दोन लेखांचा अनुवाद करण्यास हरकत नाही. पण काही वेळा विनंत्यांचा उद्देश छुप्या जाहीरातीचाही असतो जसे एखादा बॅंड आहे त्यांना आपले सगळे गायका बद्दल लेख लिहून हवे असतात. तेही होण्यास हरकत नाही पण मराठी विकिपीडियाकडे संपादक संख्या कमी असताना भारतीय/मराठी लोकांच्या दृष्टीने कोणत्या माहिती आणि ज्ञानासाठी आपण वेळ अधिक द्यायचा ह्याबद्दल विचार करुन वेळ देणे सयुक्तीक असावे असे वाटते.
साहाय्य लेखांचे वाचन आणि अभिप्राय
संपादनसंदेश सर,
आपण मराठी विकिपीडियावर उत्तम लेखन करतच आहात. मराठी विकिपीडियावर वेळोवेळी साहाय्य लेख लिहिले आहेत, त्यातील काही आपल्या सवडी नुसार डोळ्या खालून घालून चर्चा पानांवर अभिप्राय लिहिल्यास भावी सुधारणात मदत होऊ शकेल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४१, १७ जुलै २०१७ (IST)
- साहाय्य लेख म्हणजे काय? व ते कुठे पहावेत?
--संदेश हिवाळेचर्चा १६:४९, १७ जुलै २०१७ (IST)
- सध्या सहाय्य:आशय येथून गेलात तरीही पुरेसे असावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:४४, १७ जुलै २०१७ (IST)
- मराठी विकिपीडियावर असलेली सर्व साहाय्य पानाची सूची इथे भेटेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:०३, १७ जुलै २०१७ (IST)
- टायवीन, खूप खूप धन्यवाद.
लेणे, लेणी आणि लेण्या
संपादनएकवचन लेणे; अनेकवचन लेणी.......लेणे या शब्दाचे प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप 'लेण्या-' आणि लेणी या शब्दाचे 'लेण्यां-' होते. मात्र लेण्या असा स्वतंत्र शब्द मराठीत नाही!!! त्यामुळे महाराष्ट्रातील लेण्या, बौद्ध लेण्या या दोन्ही वर्गांची नावे बदलणे क्रमप्राप्त आहे..... ज (चर्चा) ०९:४६, १८ जुलै २०१७ (IST)
- होय, जवळजवळ अर्ध्यावर लेखातील 'लेण्या वरून लेणी' असे वर्ग बदलून झालेत, बाकी लेण्यासंबंधी सर्व लेखातील वर्ग बदलून झाले की वर्गाचेही नाव बदलतो.
--संदेश हिवाळेचर्चा ११:१९, १८ जुलै २०१७ (IST)
- @ज:, काम पूर्ण झाले झालेय. पहा.
--संदेश हिवाळेचर्चा १२:४२, १८ जुलै २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:, हे काम इतके किचकट होते की ते सुरू करायची माझी हिंमत होत नव्हती. काम पूर्ण झाले ही खुशीची गोष्ट आहे..... ज (चर्चा) १३:४७, १८ जुलै २०१७ (IST)
काम किचकट होतेच, वेळ लागला पण झाले. बहुतांश लेण्यासंबंधीच्या लेखात भाषाशैलिय सुधारणा आवश्यक आहे. लेण्यासाठी 'साचा:माहितीचौकट लेणी' असावा असे वाटते.
सहज सुचले म्हणून
संपादनआ.ह. साळुंखें अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सांस्कृतीक धोरण समितीने 'शुद्ध लेखन' हा शब्द प्रयोग टाळून 'प्रमाण लेखन' असा शब्द प्रयोग वापरण्याचे सुचवले होते. ते सयुक्तीक वाटल्यास पहावे. मराठी विकिपीडियावर अडचण एवढीच होते की मराठी विकिपीडियाची ज्ञानकोश म्हणून पण प्रमाण लेखन शैली आहे. ऱ्हस्व दिर्घादी प्रमाण लेखन आणि ज्ञानकोशीय प्रमाण लेखन शैली दोन्ही कडे प्रमाण शब्द वापरताना जरासे कन्फ्युजन होऊ शकते. पण जिथे कन्फ्युजन होण्याची शक्यता नसेल तेथे मी व्यक्तिश: 'शुद्ध लेखन' एवजी 'प्रमाण लेखन' असा शब्द प्रयोग वापरत असतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३९, २७ जुलै २०१७ (IST)
- 'प्रमाण लेखन' हा शब्द जास्त योग्य वाटतो, पुढे ही सुद्धा हा शब्द वापरत जाईल.
बौद्धधर्म का कालक्रम
संपादननमस्ते संदेशजी, https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE इस लेख को हटाने के लिये नामांकित किया गया है। परन्तु मुझे लगता है कि उसका रक्षण होना चाहिये। मैं चाहूँगा कि आप किसी परिचित को सहायता करने को कहें और हि.वि में वो लेख सुरक्षित रहे उसके लिये कुछ प्रयास करें। धन्यवाद। NehalDaveND (चर्चा) ०७:२२, ७ ऑगस्ट २०१७ (IST)
- नमस्ते @NehalDaveND: जी,
- मैं इसमें कुछ करता हूँ, किंतु कृपया पहले मुझे यह बताएँ की इसमें त्रुटीयाँ कहाँ कहाँ है? और लेख को सुरक्षित रखने के लिए कहाँ और क्या बदलाव आवश्यक है? ताकी लेख आसानी से सुरक्षित हो सके।
- @प्रसाद साळवे: सर, कृपया, तुम्ही यात काही मदत करा.
व्यस्तता
संपादननमस्कार, आपले संदेश आहेत हे पाहिले. आज गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विकिस्रोतावर काही साहाय्य पाने प्रिऑरिटीने अपडेट करावयाची आहेत. त्या शिवाय काही इमेल लिहावयाची आहेत त्यामुळे जरासा व्यस्त आहे. हातातील काम झाल्या नंतर (एक-दोन दिवस) आपणास शक्य ती मदत करेन. व्यस्ततेबद्दल आणि विलंबाबद्दल क्षमस्व आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२८, १९ ऑगस्ट २०१७ (IST)
ठिक आहे, चालेल. --संदेश हिवाळेचर्चा १२:३६, १९ ऑगस्ट २०१७ (IST)
चर्चा पानावरील मजकूर हटविणे
संपादनआपण नुकताच साचा चर्चा:भारतातील केंद्रीय विद्यापीठे या चर्चा पानावरील हटविलेला मजकूर पुनर्स्थापित करावा ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १५:४३, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- मी तुमचा संदेश उशिरा पाहिला, आणि तोपर्यंत तुम्ही तो मजकूर पूर्ववत केला होता. त्याबद्दल धन्यवाद.
--संदेश हिवाळेचर्चा १७:१०, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- तो मी नव्हेच.
विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे
संपादनप्रिय सदस्य,
असफ बार्तोव्ह (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी हे पान पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:२१, ८ सप्टेंबर २०१७ (IST)
इंग्रजी विकिपीडियाच्या दृष्टीने काही टिपा
संपादनइंग्रजी विकिपीडिया अनब्लॉकची प्रक्रीया प्रत्यक्षात ऑक्टोबरपासून पुढे चालू करून पहाता येईल. तो पर्यंत तेथे अप्रयक्ष अंकपत्ता संपादने सुद्धा टाळावीत. इंग्रजी विकिपीडियावर नियमांची संख्या खूप आहे, त्याचीच Phd करणे प्रत्यक्षात आपल्याला शक्य नसते, लगेच पुन्हा अडचण येऊ नये म्हणून काही टिपा.
- १) सुरवातीस वर्षभर तरी मोबाईलवरूनची संपादने इंग्रजी विकिपीडियावर टाळावीत कारण, चर्चा पानांवरील चर्चा मोबाईलवरून नीटशा होत नाहीत आणि चर्चेत सहभाग झाला नाही की ब्लॉकींगची शक्यता वाढते. कारण इतर लोक काय म्हणताहेत ते आपल्याला माहित होणे अवघड जाते.
- २) एकापेक्षा अधिक सदस्य खाती असतील तर कोणत्या उद्दीष्टाने दोन खाती वापरत आहात ते तेथिल सदस्यपानांवर स्पष्ट नमुद करावे लागेल.
- ३) आपल्या तेथिल चर्चा पानांवर आता पर्यंत नमुद आक्षेप वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
- (मला वाटते कदाचित व्यक्ति ओळख मध्ये ओळख विशेषणांच्या संख्येवर तिथे इंग्रजी विकिपीडियावर मर्यादेचा काही अधिकृत बंधन असावे जसे मराठी विकिपीडियात डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, प्राध्यापक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री आणि भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक सुद्धा होते. १६ च्या आसपास संख्या होते आहे आणि वाचनास कठीण जाते असा काही इंग्रजी विकिपीडियाचा दृष्टीकोण असू शकतो. त्या शिवाय व्यक्तिची ज्ञानकोशीय दखल घेण्या एवजी वर्णनात्मक विभूतीपूजा असलेले चरित्र लिहिल्यासारखे होते. या बाबत इंग्रजी विकिपीडियाच्या लेखाच्या चर्चा पानावर चर्चा करुन तेथिल नियम समजून घेऊन आपणास काही तडजोड करावी लागू शकेल असे वाटते. तसेही व्यक्तीने केलेल्या कार्यावर लक्ष केंद्रीत केले की वाचकास आपसूक समजते वर्णनपरतेची, आलंकारीकतेची आणि विशेषणांची गरज तेवढीच कमी होते)
- बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राबद्दलचे कमी वापरल्या गेलेला एक संदर्भ दूवा आपणास देऊन ठेवेन. तो आपणास मराठी आणि नंतर इंग्रजी विकिपीडियात संदर्भ देण्यासाठी वापरता येईल.
- ४) माझ्या सहीत बरेच जण इंग्रजी विकिपीडियावरच्या लेख चर्चा पानावर काय बदल करणार आहोत हे लिहून ठेऊन मग एक दोन दिवसांनी बदल करतात. म्हणजे बघा आम्ही पूर्व सूचना दिली होती असे म्हणता येते. आणि नंतरच्या कटकटींमध्ये वेळही कमी जातो. किमान सुरवातीचे काही महिने असे पथ्य आपण इंग्रजी विकिपीडियावर पाळावे असे वाटते.
- ५) अजून एक महत्वाचे म्हणजे गूगल बुक्स वगैरे सारख्या ठिकाणाहून शक्यतोवर पुस्तकातील संदर्भ वापरण्याची सवय ठेवणे-मी तर बऱ्याचदा लेखन करण्यापुर्वी बराच काळ बरेच संदर्भ शोधून चर्चा पानावर नोंदवून ठेवत असतो; इंग्राजी विकिपीडियावर सविस्तर संदर्भ जोडण्यासाठी cite नावाचे टूल आहे तेही माहित करून घ्यावे.
- ६) बऱ्याचदा चर्चा पानावरील निर्णय आपल्या मनासारखे होत नाहीत, हतोत्साहीत न होता काही काळ अशा विषयाकडे दुर्लक्ष करावे.
- ७) अजून एक महत्वाचे उत्पात नसलेली दृष्टीकोण भिन्नतेची संपादने चर्चा पानावर चर्चा न करता अथवा / २४ तासाच्या आत उलटवू नयेत.
- अजून काही सुचले तर नंतर सांगेन. या आठवड्यात आपल्यासाठी अजून काही इंग्रजी विकिपीडिया सदस्यांशी चर्चा करून ठेवतो.
- आपल्या प्रयत्नांना शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०९, ११ सप्टेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद सर,
- इंग्रजी विकिपीडिमध्ये पुढे संपादने करताना तत्पूर्वी वरील बाबीं नक्कीच विचारात घेईल.
एक संदर्भ
संपादनआजच्या आधीच्या संदेशात मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा संदर्भासाठी एका संशोधन प्रबंधाचा दुवा देईन म्हटले. shodhganga.inflibnet.ac.in हि वेबसाईट भारतभरातील विद्यापीठातील Phd प्रबंध ऑनलाईन उपलब्ध करते. गेल्या आठवड्याभरापासून shodhganga.inflibnet.ac.in वेबसाईट उघडण्यात काही समस्या दिसते आहे ती काही दिवसात दूर होईल अशी आशा करू.
[shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/96412/10/10_chapter%204.pdf ह्या Phd प्रबंधाचा दूव्यावरुन pdf] वेबसाईट चालू झाल्या नंतर डाऊन लोड करण्याचा विचार करावा. आता पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल लिहिलेल्या विवीध चरीत्रग्रंथांचा अभ्यासपूर्ण तौलनीक शोध/मागोवा या प्रबंढात घेतलेला दिसतो. आपणास नक्कीच उपयूक्त वाटेल असे वाटते.
संपूर्ण प्रबंधासाठी आणि विकिपीडियावर संदर्भ उधृत करण्यासाठी http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/96412 हा दुवा पहावा. ← या दुव्यावरील 10 क्रमांकाची pdf मी आपल्याला सुचवलेllI shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/96412/10/10_chapter%204.pdf पिडीएफ पानावर प्रबंधाचे चौथे प्रकरण आहे -त्यातील भाग १ पृष्ठ ११७ ते १७८. इतर प्रकरणेही अवश्य वाचावीत पण या चौथ्या प्रकरणाच्या भाग १ मध्ये, तब्बल सात चरित्रकारांनी लिहिलेल्या चरित्रांचा (म्हणजे चांगदेव खैरमोडे, ॲड. बी.सी. कांबळे, सविता आंबेडकर, बळवंत वराळे, नानकचंद रत्तू, वसंत मून, भालचंद्र फडके यां सर्वांनी लिहिलेल्या चरित्रा सोबत धनंजय कीर यांनी लिहिलेल्या चरीत्राचा तौलनिक अभ्यास आहे. वाचण्यासाठी रोचक आहेच पण विकिपीडिया संदर्भासाठीही अत्यंत उपयूक्त वाटतो.
आज आत्ता shodhganga.inflibnet.ac.in उघडते आहे PDF लौकरात लौकर आवर्जून डाऊनलोड करून घ्याव्यात. वाचन सावकाश केले तरी चालेल. तुम्हाला वाचण्यास आवडेल असे वाटते.
आपल्याला हा संदर्भ लेखात सविस्तरपणे वापरावयाचा झाल्यास आपल्या सोईसाठी चर्चा:डॉ._बाबासाहेब_अांबेडकर#तात्पुरती संदर्भ यादी येथे एक उदाहरण बनवून ठेवले आहे.
वाचन लेखनासाठी शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२८, १२ सप्टेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद सर, मी shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/96412/10/10_chapter%204.pdf येथील पिडीएफ पानावर प्रबंधाचे चौथे प्रकरण डाऊनलोड केले आहे, बरेचशे व वरवर वाचले, खूप महत्त्वपूर्ण आहेत. यातील इतरही प्रकरने व बाकीचे प्रबंध सुद्धा डाऊनलोड करून घेतो. चर्चा:डॉ._बाबासाहेब_अांबेडकर#तात्पुरती संदर्भ यादी असा संदर्भ मी आजवर वापरलेला पुढे लेखात मी हाही वापरेन.
- --संदेश हिवाळेचर्चा १९:०२, १२ सप्टेंबर २०१७ (IST)
कुटुंब माहिती चा हिंदी विकिवरील साचाही बघावा. - नरसीकर
धर्म संस्थापके वर्ग
संपादननमस्कार,
या वर्गाचे नाव बदलून वर्ग:धर्म संस्थापक असे करावे.
तुम्ही येशू ख्रिस्त आणि अब्राहम या दोन्ही लेखांचे वर्गीकरण येथे केलेले आहे. नक्की कोणाला संस्थापक धरावे? दोन्हीपैकी एका लेखातून हा वर्ग काढावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०४:२०, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
- लेखनाव बदल करतो.
- अब्राहम यांच्या इंग्रजी लेखात Founders of religions व Prophets of Islam हे दोन वर्ग असल्याने मी त्यांना हा मराठी वर्ग वापरला. येशू ख्रिस्त व अब्राहम हे दोघं एकाच परंतु काही भिन्न परंपराचे संस्थापक असू शकतात.
- परंपरांच्या स्थापकांना धर्मसंस्थापक म्हणता येणार नाही. योग्य त्या लेखात हा वर्ग ठेवून दुसऱ्या लेखातून तो काढून टाकावा.
- अभय नातू (चर्चा) ०९:१२, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
परंपरांच्या स्थापकांसाठी स्वतंत्र्य वर्ग बनवावा लागेल. --संदेश हिवाळेचर्चा १५:३१, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
- ठीक परंतु मग परंपरा म्हणजे काय आणि ती पंथापासून वेगळी असते का असे प्रश्न उभे राहतील.
- अभय नातू (चर्चा) १९:५२, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
- धार्मिक संप्रदायांचे संस्थापक असा वर्ग ठेवला तर योग्य राहिल ?
- --संदेश हिवाळेचर्चा १९:५९, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
लेखातील चित्रे
संपादनमराठी विकिपीडियावरील लेखांत स्वतंत्र चित्रे घालत असताना ती उजवीकडे १८०pxची असावी हा संकेत आहे. हा संकेत कटाक्षाने पाळावा.
अभय नातू (चर्चा) ०२:४९, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
- मला हे नव्यानेच माहिती झाले, यापूढे लेखांत चित्रे घालत असताना ती उजवीकडे १८०pxची असेल.
केशवराव विचारे
संपादननमस्कार,
केशवराव विचारे एक सत्यशोधक कार्यकर्ते होते. त्यांच्या बद्दल हा एक संदर्भ दुवा उपलब्ध आहे. लेख लिहिण्यास आवडले असता पहावे हि विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३१, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
- केशवराव विचारे यांच्यावर मी लेख तयार करेन.
- --संदेश हिवाळेचर्चा १५:३०, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
साचा Infobox cave
संपादनसाचा:Infobox cave तयार केला आहे. त्यास वापरुन बघुन आपला प्रतिसाद कृपया कळवावा ही विनंती, म्हणजे काही बदल असतील तर ते करणे सोपे होईल.--वि. नरसीकर (चर्चा) १८:४५, २२ सप्टेंबर २०१७ (IST)
- कार्ले लेणी लेखात वरील साचा वापरून पाहिला असता तो पूर्ण उघडतच नाही, कदाचित माझ्याकडुन तो वापरण्यात काही त्रुटी राहिल्या का?
--संदेश हिवाळेचर्चा २०:३९, २२ सप्टेंबर २०१७ (IST)
- आता कार्ले लेणी हा लेख बघावा. त्या साच्यात मी किंचित बदल केले आहेत. आता थेट इंग्रजी विकिहून साचा आयात करुन त्यात मराठी माहिती टाकली कि झाले.सवडीने त्यात बदल करीलच.वैयक्तिक कामात ३-४ दिवस व्यस्त आहे म्हणून ही पर्यायी योजना.
--वि. नरसीकर (चर्चा) ११:४१, २३ सप्टेंबर २०१७ (IST)
लेणीचा फक्त इंग्रजीच साचा वापरता येईल की मराठी साचा ही वापरता येईल? मराठी साचाही वापरता यायला हवा. साचात लेणीचे गट (समूह) याचाही उल्लेख असावा. --संदेश हिवाळेचर्चा ११:४९, २३ सप्टेंबर २०१७ (IST)
जरा सवड मिळाली कि करतो--वि. नरसीकर (चर्चा) ११:५३, २३ सप्टेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद सर.
- --संदेश हिवाळेचर्चा ११:५७, २३ सप्टेंबर २०१७ (IST)
- तुम्हाला नेमका कोणती साचा बनवून हवा होता?
--वि. नरसीकर (चर्चा) १९:५७, ३ ऑक्टोबर २०१७ (IST)
लेणी साचाच मला हवा होता. त्यांचे नाव मराठी भाषेत असावे असे वाटते. मी दुसऱ्या लेखांत संपादन करण्यात थोडा व्यस्त होतो म्हणून तुम्ही बनवलेला हा साचा वापरता आला नाही. मी साचा पाहिला असता मला त्यातील अनेक शब्दापुढे काय लिहावे हे कळले नाही. --संदेश हिवाळेचर्चा २०:०६, ३ ऑक्टोबर २०१७ (IST)
| उन्नतन = | शोध = | भूविज्ञान = | प्रवेश_संख्या = | प्रवेश_यादी = | अडचण = | धोके = | पोहोच = | गुहा दर्शवा = | गुहा लांबी दर्शवा = | प्रकाशयोजना = | अभ्यागत = | वैशिष्ट्ये = | गुहा सर्वेक्षण = | सर्वेक्षण प्रारूप =
ह्या शब्दांपुढे साधारपणे काय काय लिहावे? --संदेश हिवाळेचर्चा २०:०९, ३ ऑक्टोबर २०१७ (IST)
वंशावली
संपादनआपण केलेल्या विनंतीनुसार, सदस्य:V.narsikar/धूळपाटी वंशावली येथे वंशावलीचा साचा तयार केला आहे. तो हव्या त्या लेखात नकल-डकव करू शकता.तो तयार करण्यास सतत सुमारे १४ तास लागलेत.त्यात नावाच्या अथवा तत्सम चुका असतील तर त्या कृपया दुरुस्त करून घ्याव्यात.--वि. नरसीकर (चर्चा) १६:२२, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
- खूप खूप धन्यवाद सर, खूपच चांगली वंशवेल बनवली तुम्ही...
- पण, मला यात काही थोटेसे बदल सुचवावेस वाटतात, कृपया ते करा, त्यानंतर हा वंशवेश परिपूर्ण होईल.
- (तिसरी ओळ) "७ अपत्य" या तक्त्यावर १ रेषेएवजी ७ रेषा असू द्या... ( ३ मुले प्रमाणे)
- ती ओळ आधीच लांब-लचक आहे. त्यात हे शक्य नाही. मजकूर फारच बाहेर जाईल. तसेच राहू द्यावे.जमेल तेंव्हा, संगणकावर हे पान बघा म्हणजे कळेल.
- (दुसरी व तिसरी ओळ) रामजी व भीमाबाई या पालकांची रेषा भीमराव आंबेडकर तक्त्यावर आलेली नाही, कृपया हे करा.:
- (चौथी ओळ) बाबासाहेबांचे मुलं गंगाधर, रमेश, इंदू, राजरत्न यांनाही चार स्वतंत्र्य तक्त्ये असू द्या.
१७:५२, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
--वि. नरसीकर (चर्चा) २०:१९, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)
- हे काम आता पूर्ण झाले आहे. ते पुन्हा एकदा तपासावे ही विनंती. मगच अन्य ठिकाणी वापरावे.मोठ्या व्यक्तिंचे लेख अनेक लोकं बघतात. त्यात अजिबात चुका नकोत असे माझे मत आहे.(स्वतःच्या चुका स्वतःस एकदम लक्षात येत नाहीत-म्हणजे मी केलेल्या कामातील) शुभेच्छा. --V.narsikar (चर्चा) १०:१६, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)
- खूप खूप धन्यवाद, वंशावली अगदी योग्य बनली आहे. आता तिला मराठी व इंग्रजी विकितही वापरता येईल. याआधी त्यातील काही सदस्यांचे जन्म मृत्यू वर्ष जोडतो.
- --संदेश हिवाळेचर्चा १०:३१, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)
इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नेम आयडेंटिफायर
संपादनआपण केलेल्या नामबदलामुळे माझा ५-६ परिच्छेद भाषांतरीत केलेला मजकूर उडला. माहितीसाठी.--V.narsikar (चर्चा) ०८:४३, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)
- क्षमस्व, परंतु लेख शिर्षक बदलल्याचे लेख मचकूर कसा उडू शकेल? कदाचित तेव्हा आपण दोघे एकाचवेळी संपादन करत असेल. तेव्हाच हे होऊ शकते. लेख नामबदल करूनही ते पूर्वी प्रमाणे झाले.
- --संदेश हिवाळेचर्चा ०९:४८, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)
- जे घडले ते सांगीतले. तसे त्यापेक्षा इतर कोणतेही सुयोग्य कारण दिसत नाही. माहिती असावी म्हणूनच सांगीतले. मजकूर उडण्याची क्रिया अपरिवर्तनीय आहे. धन्यवाद.--V.narsikar (चर्चा) १०:०३, ९ ऑक्टोबर २०१७ (IST)
दगडुबा लोखंडे
संपादननमस्कार,
इंग्रजी विकिपीडियावर en:User_talk:Dagduba_lokhande#Block_evasion येथे Dagduba_lokhande हे सदस्यखात्याची संपादने आपल्या संपादनांशी मिळती जुळती असल्याचा आक्षेप घेतला गेल्याचे दिसते आहे. दोन्ही खात्यातील इंग्रजी व्याकरण क्षमतेत व्यक्तीश: मला फरक जाणवतो पण आपण हाताळत असलेले विषय एकसारखे असल्यामुळे तसे वाटणे संभवनीय आहे. इंग्रजी विकिपीडियावर एकाच व्यक्तीला विशेषत: बॅन केलेले असताना एकापेक्षा अधिक सदस्य खाती वापरणे अयोग्य समजले जाते. त्यांच्या तसे वाटण्यामुळे तुमच्या स्वत:च्या सदस्य खात्यावरील बॅन काढला जाण्याची चर्चा पुढे जाणे मुश्किल होणारे आहे.
तसही इंग्रजी विकिपीडियावर नियमांची पिएचडीकरण्यात वेळ घालवण्या पेक्षा, आपण, सदस्य:प्रसाद साळवे, आणि अगदी सदस्य:Dagduba_lokhande यांनी इंगोजी विकिपीडियावर आपल्याला अभिप्रेत संपादनांची चर्चा आधी तेथील फक्त लेख चर्चा पानांवर करावी; लेख पानात संपादने करण्याची तेथे मुळीच घाई करू नये. कारण होतय काय की विभूती पुजा, (हिरो वरशीप) आणि त्या सोबत येणारी आदरार्थी विशेषणे मनुष्य स्वभावासाठी स्वाभाविक असली तरी ज्ञानकोषात ती टाळली जाणे अभिप्रेत असते . शिवाय ज्ञानकोशात पडताळण्याजोगे समिक्षीत ग्रंथातील संदर्भ देणे गरजेचे असते. जाणारा प्रत्येक नवा माणूस मराठी एवजी इंग्रजी विकिपीडियावर आधी जातो. या दोन पैकी एक नियम तुटला की मराठी समाज बांधवांची सदस्य खाती एका नंतर एक तेथे बॅन होत जातात. आणि इफेक्टीव्हली एका मोठ्या समाजाचे प्रतिनिधीत्व नकळत संपुष्टात येते.
खरं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा गौतम बुद्ध अथवा बौद्ध धर्माची ओळख / प्रतिष्ठा नव्याने निर्माण करण्याची आवश्यकता नाही. ती ओळख प्रतिष्ठा अलरेडी आहेच. त्यांच्या संबंधी संस्था चित्रपट वगैरे बद्दल लेखन करू नये असे नाही. पण य गोष्टी वरवरच्या आहेत. कोणत्याही तत्वज्ञाची खरी ओळख त्याच्या तत्वज्ञानातून होत असते, मग गौतम बुद्ध असोत अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा त्यांच्या साहित्याने प्रभावीत आधीचे आणि नंतरचे तत्वज्ञ. त्यांनी नेमक काय लिहिल आहे आणि अगदी त्यांच्या टिकाकारांनीही त्यांच्या ग्रंथातून काय लिहिल आहे टिका झाली असेल तर त्या टिकेस उत्तर दिलेले ग्रंथ याचा अभ्यास करून संदर्भासहीत लेखन करण्याने खरोखर त्या तत्वज्ञांना न्याय दिल्यासारखे होऊ शकते, या बाबीकडे मला आपणा सर्वांचे लक्ष वेधावेसे वाटते.
या दृष्टीने मी यापुर्वीही सुचवल्या प्रमाणे १) विकिस्रोत प्रकल्पात डॉ.आंबेडकरांची ग्रंथसंपदा आणणे २) लेखनापुर्वी समिक्षण झालेल्या संबंधीत विषयाच्या दोन ग्रंथातील मजकुर अभ्यास करून त्याचे संदर्भ तयार करण्याचा प्रयत्न करणे ३) लेखचर्चा पानावर आपण काय बदल करु इच्छितो त्याची चर्चा करणे याबाबींच्या महत्वाकडे मी आपले लक्ष वेधू शकतो. परस्पर इंग्रजी विकिपीडियावर जाऊन तेथिल नियमांचे उल्लंघन होऊन बॅन होणाऱ्या इतरांना आपण थांबवू शकत नाही. आपण आपल्या परीने जराशी सुधारणा केली तर इंग्रजी विकिपीडीयावर अधिक आश्वासक पद्धतीने काम करता येईल असे वाटते.
अर्थात मराठी विकिपीडियावर आपण इंग्रजी विकिपीडियाचे निकष जसेच्या तसे स्विकारत नाही आपण स्वतंत्रपणे साकल्याने तर्कसुसंगतपणे आणि साकल्याने अधिक सर्वसमावेशकतेचा विचार करतो याची आपणा सर्वांना कल्पना आहेच.
आपल्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
Mahitgar (चर्चा) १०:१४, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)
- दोघांची संपादने साम्य वाटत असली तरी मी Dagduba_lokhande हे खाते वापरत नाही. सर, क्षमा करा पण खरं तर मी इंग्रजी विकिपीडियाला वैतागलोय, सहा-सहा महिने खूप मोठा कालावधी असतो. सहा महिण्यापूर्वीच्या संपादन चूका त्यांना मी आजपण करतोय की काय असे वाटते. व तेथून अनब्लॉक होण्यासाठीचा मला विशेष उल्हास-उत्साहही राहिलेला नाही. दगडुबा लोखंडेची संपादने जर चूकिची असतील तर त्यावर हवी कारवाई / बॅन करा, त्यावर मला काही देणंघेणं नाही, पण मी 'तो' आहे असे म्हणजे चूकिचेच असेल.
- --संदेश हिवाळेचर्चा १०:४२, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
संपादननमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)
आशियाई महिना २०१७
संपादननमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१७ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
कृपा खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
- हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
- लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
- सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)
जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपा चर्चापानावर विचारा.आशियाई महिना लेख
संपादननमस्कार सदस्य:संदेश हिवाळे आशियाई महिन्यात सदर केलेला लेख ग्रँड बुद्ध, लिंगशान मान्य नाही करण्यात आहे. त्याचे कारण= लेख फक्त ९५ शब्दाचा आहे! आशियाई महिन्यात ३०० शब्धची लेख हवी. व थेरीगाथा याचे नाकाराचे करण= यावर शक आहे कारण पाली भारतीय भाषा आहे. जर काही तक्रार असेल तर चर्चापानास नोंद करा.
--उयोजक विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१७
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५७, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)
- हरकत नाही, वरील दोन्हीही लेख 'आशियाई महिणा २०१७' प्रकल्पामधून वगळा. माझे सध्या श्रीलंका मधील धर्म लेखावर काम सुरू आहे, काम पूर्ण झाले की याची आशियाई महिणामध्ये नोंद करतो. धन्यवाद.
- --संदेश हिवाळेचर्चा १६:०२, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)
Offline Wikipedia in the languages of India
संपादनWe are working on a distribution system for the Wikipedians in the languages of India.
https://meta.wikimedia.org/wiki/Internet-in-a-Box
Wondering if you could translate these three sentences into Mr?
https://meta.wikimedia.org/wiki/Internet-in-a-Box/India#Marathi
Best James Heilman, MD (talk · contribs · email)(please leave replies on my talk page) १४:५४, २८ डिसेंबर २०१७ (IST)
WAM Address Collection
संपादनCongratulations! You have more than 4 accepted articles in Wikipedia Asian Month! Please submit your postal mailing address via Google form or email me about that on erick@asianmonth.wiki before the end of Janauary, 2018. The Wikimedia Asian Month team only has access to this form, and we will only share your address with local affiliates to send postcards. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. Please contact your local organizers if you have any question. We apologize for the delay in sending this form to you, this year we will make sure that you will receive your postcard from WAM. If you've not received a postcard from last year's WAM, Please let us know. All ambassadors will receive an electronic certificate from the team. Be sure to fill out your email if you are enlisted Ambassadors list.
Best, Erick Guan (talk)
WAM Address Collection - 1st reminder
संपादनHi there. This is a reminder to fill the address collection. Sorry for the inconvenience if you did submit the form before. If you still wish to receive the postcard from Wikipedia Asian Month, please submit your postal mailing address via this Google form. This form is only accessed by WAM international team. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. If you have problems in accessing the google form, you can use Email This User to send your address to my Email.
If you do not wish to share your personal information and do not want to receive the postcard, please let us know at WAM talk page so I will not keep sending reminders to you. Best, Sailesh Patnaik
Confusion in the previous message- WAM
संपादनHello again, I believe the earlier message has created some confusion. If you have already submitted the details in the Google form, it has been accepted, you don't need to submit it again. The earlier reminder is for those who haven't yet submitted their Google form or if they any alternate way to provide their address. I apologize for creating the confusion. Thanks-Sailesh Patnaik
देविदाहेगाव
संपादन'देविदाहेगाव' हे नाव बरोबर आहे काय कि देविदहेगाव असे हवे?--वि. नरसीकर , (चर्चा) १८:५१, १० जानेवारी २०१८ (IST)
- माहिती नाही, कारण हे देविदहेगाव/देविदाहेगाव गाव माझ्या परिचयाचे नाही. मी केवळ यात मजकूराची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे. आपणास जे योग्य वाटेल तसा बदल करा.
- --संदेश हिवाळेचर्चा २२:०६, १० जानेवारी २०१८ (IST)
कार्यशाळा लेख
संपादनसंदेश हिवाळे कार्यशाळेत बनवलेले लेख फक्त टेम्पोरारी असते जर ते आउट ऑफ स्कोप असतील तर त्यात {{पानकाढा}} साचा लावा ते प्रचालक लवकर काडून टाकतील. सद्या लेख बनवलेले आहेत ती नंतर काढतील प्रचालक. सद्या सदस्य नवीन आहेत यामुळे थोडे प्रॉब्लेम असतील. कृपा समजून घ्यावे. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १५:१०, ११ जानेवारी २०१८ (IST)
- टायवीन, मला संदेश पाठवल्या बद्दल धन्यवाद. मला वाटते की, कार्यशाळेतील नवीन सदस्यांना कविता (poem) लेख बनवण्याऐवजी आपल्या गावाचे, विद्यालय-महाविद्यालचे म्हणजेच काहितरी ज्ञानकोशीय लेख बनवायला हवेत.
--संदेश हिवाळेचर्चा १६:३५, ११ जानेवारी २०१८ (IST)
- काही विषय निश्चित केले नाही म्हणून असू शकते परंतु मी कधी कार्यशाळा गेलू नाही. पाहावे लागेल काय होते. सद्या वंडाळीसम रेव्हर्ट करतो मी तुम्हाला वेळ असेल तर वर्ग:११ जानेवारी २०१८ कार्यशाळा पहा त्यात आऊट ऑफ स्कोप लेखात {{पानकाढा}} साचा लावू शकता. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १६:४३, ११ जानेवारी २०१८ (IST)
- काही अविश्वकोशीय लेखांना वरील साचा लावता येईल, पण अशा लेखांची मालिका सुरूच असणे चांगले असणार नाही. कार्यशाळा आयोजकांनी नव्या सदस्यांना अविश्वकोशीय लेख लिहिण्यापासून टाळायला हवे. कारण याने {{पानकाढा}} चा कमीतकमी उपयोग करता येईल.
--संदेश हिवाळेचर्चा १६:५२, ११ जानेवारी २०१८ (IST) आपण हा कार्यशाळा आयोजित करणारे सदस्यांना एक नोटीस देऊया कार्यशाळा संपल्यावर. आज काही मोठी कार्यशाळा नाही परंतु उद्या खूप मोठी कार्यशाळा आहे ज्यात १०० पेक्षा जास्त सदस्य असतील. मंत्रालय मुंबईत आहे ते. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १६:५६, ११ जानेवारी २०१८ (IST)
ओके, चालेल. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सदस्यांना विश्वकोशीय लेख लिहिण्याविषयीचे मार्गदर्शन कार्यशाळेतून मिळावे. --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, ११ जानेवारी २०१८ (IST)
तुम्ही आणि @Sachinvenga: यासाठी प्रचालकांना चावडीवर निवेदन करा. मी असोसिएट करतो --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १७:१५, ११ जानेवारी २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: सरांनी या प्रकरणात लक्ष घालावे, ही विनंती. हे काम चावडीवरील निवेदनाशिवाय होऊ शकत असेल तर उत्तमच असेल.
--संदेश हिवाळेचर्चा २१:०२, ११ जानेवारी २०१८ (IST)
- प्रिय संदेश,टायविन - आपण पहात आहात की कार्यशाळेनंतर सलग नवीन सदस्य बनणे आणि उत्साहाने लेख लिहिणे सुरु आहे. संबधित प्राध्यापक व आयोजक सूचना देत आहेत,तरी सुरुवातीस काही प्रमाणात हे घडणार असे वाटते. मी संपर्क करून सांगितले आहे. आज दोन ठिकाणी आढावा घेण्याचे नियोजन केले आहे. काही चांगले संपादक येत आहेत. त्यांना जरूर मार्गदर्शन करावे.या निमित्ताने विषय विविधता वाढत असल्याचे दिसत आहे.
धन्यवाद, --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०४, १२ जानेवारी २०१८ (IST)
- नवीन सदस्यांद्वारे कमीत कमी अविश्वकोशीय लेख बनतील याकडे कृपया लक्ष द्या. त्यांना वर्ग:रिकामी पाने व वर्ग: अत्यंत छोटी पाने येथीलही लेख लिहिण्यास प्रोत्साहित करावे.
टिप्पणी
संपादनमला आशा आहे की आपल्याला विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#कार्यशाळा कशी हवी? वर टिप्पणी करणे आवडेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:१९, १३ जानेवारी २०१८ (IST)
चर्चा:धार्मिक लोकसंख्यांची यादी
संपादनचर्चा:धार्मिक लोकसंख्यांची यादी येथे आपले मत नोंदवावे,--. Sachinvenga चर्चा . : १५:०२, १३ जानेवारी २०१८ (IST) धन्यवाद..
वंजारी -> बंजारा
संपादननमस्कार, आपल्याला माहित असेल वंजारी आणि बंजारा ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. दुर्दैवाने वंजारी -> banjara असे मराठी आणि इंग्रजी पेज जोडले गेले. इंग्रजी vanjari पेज मराठी वंजारी ला जोडता येणार नाही. तरी कृपया वंजारी->vanjari_caste असे जोडले तर बरे होईल. संतोष गोरे (चर्चा) २०:१३, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)
- हे दुर्दैवाने नव्हे तर चूकीने झाले असेल, पाहतो. --संदेश हिवाळेचर्चा २०:२५, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)
- संतोष गोरे, पान जोडले. दोष इंग्रजी विकिपीडियात आहे, मराठी विकिपीडियात नव्हे. वंजारी हा लेख इंग्रजी पान ‘Vanjari (caste)’ शी जोडला होता परंतु हे पान Vanjari caste ऐवजी Banjara कडे पुनर्निर्देशित करण्यात आले आहे. म्हणून वंजारी लेख Banjara कडे वळतो. इंग्रजी विकिपीडियात तुम्ही Vanjari (caste) पानाचे पुनर्निर्देशन (Banjara काढून) Vanjari caste कडे करु शकता.--संदेश हिवाळेचर्चा २०:५८, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)
व्हॅलेंटाईन अभिवादन
संपादनव्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार संदेश हिवाळे, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
- धन्यवाद टायवीन, तुम्हाला ही प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आपली सही
संपादनमाफ करा जरा वैयक्तिक चर्चा करीत आहे पण,आपली सही कृपया तपासावी कारण त्यात दोन वेळा 'संदेश हिवाळे' असे लिहून येते. ते दिसावयास चांगले दिसत नाही असे माझे मत आहे. अर्थातच पुढे आपली ईच्छा.चर्चा:मांग या लेखात नुकतेच तसेच आधीही बघितले--वि. नरसीकर , (चर्चा) १६:१३, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)
- दोन नावे येतात यामुळे मी ही आधीपासून त्रस्त आहे. आणि मी हे सुधारण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश आहे नाही. पुन्हा प्रयत्न करतो, तुम्ही यासाठी मदत करू शकाल का?--संदेश हिवाळेचर्चा १९:१४, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)
- एकदा सही रीसेट करून पहा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:११, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)
करून पाहतो.--संदेश हिवाळेचर्चा ०९:२५, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
वामन लक्ष्मण कुलकर्णी
संपादनकृपया वा.ल. कुलकर्णी हा लेख पहावा. त्यात काही त्रुटी दाखवल्या जात आहेत, त्या दुरूस्त करा. विनंती. धन्यवाद
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! कैलास अंभुरे (चर्चा) ११:५९, २ मार्च २०१८ (IST)
- @कैलास अंभुरे: नमस्कार, आपण बनवलेला लेख वा.ल. कुलकर्णी आधीच विकिवर उपलब्ध आहे (वामन लक्ष्मण कुलकर्णी). कृपया, तुमच्या 'वा.ल. कुलकर्णी' या लेखातील मजकूर 'वामन लक्ष्मण कुलकर्णी' या लेखात स्थांनातर करा. नंतरच्या त्रुटी असतील तर मी दुरूस्त करतो. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १२:१२, २ मार्च २०१८ (IST)