डॉ. एलिनॉर झेलियट (ऑक्टोबर ८, इ.स. १९२६ - जून ५, इ.स. २०१६) ह्या अमेरिकन लेखक, इतिहासकार, कार्लटन महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका आणि भारताचा इतिहास, दक्षिण-पूर्व आशिया, व्हियेतनाम, आशियाई स्त्रिया, अस्पृश्यता आणि सामाजिक चळवळीं या विषयांवरील तज्ज्ञ होत्या.[][][]

एलिनॉर झेलियट
जन्म ऑक्टोबर ८, इ.स. १९२६
अमेरिका
मृत्यू जून ५, इ.स. २०१६
अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र लेखिका, निबंधकार, समाजशास्त्र, इतिहास, कार्यकर्ती
भाषा मराठी, इंग्लिश
चळवळ दलित चळवळ
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

झेलियट यांनी ऐंशी पेक्षा जास्त लेख लिहिले तसेच भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ, मध्ययुगीन काळातील संत-कवीं आणि वर्तमानातील डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाखालील बौद्ध चळवळ या विषयांवरील तीन पुस्तकांचे संपादन केले आहे. भारताच्या अग्रणी दलित लेखक-लेखिकांमधील त्या एक होत्या.[]

झेलियट यांचा जन्म अमेरिकी क्वेकरपंथीय कुटुंबात १९२६ साली झाला.

अभ्यास

संपादन

गुंथर सोंथायमर किंवा मॅक्सिन बर्नसन या अभ्यासकांप्रमाणे एलिनॉर झेलियट यांनीही शेवटपर्यंत महाराष्ट्रात काम केले. अमेरिकेतील कार्लटन महाविद्यालयात अध्यापन करीत असताना भारताची व विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. त्यांनी चोखामेळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा. रं. बोराडे, शंकरराव खरात, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या जागतिक स्थानाचे वेळोवेळी स्पष्टीकरण केले. झेलियट यांनी दलित ही संज्ञा आता अस्मितादर्शक अर्थाने वापरली जात असल्याचे विवेचन केले तसेच दलित साहित्याची चळवळ लवकरच अखिल भारतीय स्वरूपाची होणार असे त्यांनी १९८० च्या दशकात भाकित केले. दलितांचा अभ्यास करते म्हणून मला कोणी इतिहासकार समजतच नाहीत- मानववंशशास्त्रज्ञच समजतात अशी त्यांची तक्रार होती. “दलितांना इतिहास नाही, हे खरे; पण म्हणूनच अभ्यासकांनी तो शोधायला हवा” हे त्यांचे मत होते.

त्यांनी १९६४पासून पुण्यात येउन डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड द महार मूव्हमेंट हा पीएच.डी. प्रबंध (पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, १९६९) लिहिला.

झेलियट यांचे मिनेसोटा मध्ये ५ जून इ.स. २०१६ रोजी मिनेसोटा येथे निधन झाले.[]

लिखीत पुस्तके

संपादन
  1. डॉ. आंबेडकर अ‍ॅण्ड द महार मूव्हमेंट (१९८९)
  2. कास्ट इन लाइफ
  3. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व व दलितांचा शिक्षणातील पुढाकार[]
  4. आंबेडकर्स वल्ड : द मेकिंग ऑफ बाबासाहेब अँड द दलित मूव्हमेंट (२०१३)
  5. फ्रॉम अनटचेबल्स टू दलित (१९९६)
  6. आंबेडकर्स कंव्हर्जन (२००५)
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड द अनटचेबल्स मूव्हमेंट (२००४)
  8. ॲंटोलॉजी ऑफ दलित लिचरेचर्स

संदर्भ

संपादन
  1. ^ ""AMBEDKAR, B.R." BY ELEANOR ZELLIOT". www.anti-caste.org. November 4, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 4, 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ "Eleanor Zelliot (Carleton College)". www.columbia.edu/. July 4, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Ambedkar's World". www.navayana.org. 2013-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 4, 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Wear it Parsi style". Tribune. July 4, 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Eleanor Zelliot (1926-2106) | H-Asia | H-Net". networks.h-net.org (इंग्रजी भाषेत). 2018-05-11 रोजी पाहिले.
  6. ^ "Books". www.bookganga.com. 2018-05-11 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन