वामन लक्ष्मण कुलकर्णी

(वा.ल. कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)

वामन लक्ष्मण कुलकर्णी (१९११ - ) हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे आहेत.

वामन लक्ष्मण कुलकर्णी

कुलकर्णी यांचा जन्‍म पूर्वीच्‍या खानदेश जिल्‍ह्यातील चोपडे या गावी झाला. त्‍यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्‍कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्‍युत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्‍सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्‍कूलमध्‍ये शिक्षक म्‍हणून कार्य (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्‍सन हायस्‍कूल, मुंबई येथे शिक्षकी पेशा केल्‍यानंतर विल्‍सन महाविद्यालयात प्राध्‍यापक म्‍हणून अध्‍यापनाचे कार्य.  नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्‍कालीन मराठवाडा विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्‍यापक व विभागप्रमुख म्‍हणून कार्यरत झाले. येथे त्‍यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्‍यानंतर १९७४ ते १९७६ मध्‍ये मुंबई विद्यापीठाच्‍या मराठी विभागात प्राध्‍यापक व विभागप्रमुख अध्‍ययन-अध्‍यापनाचे कार्य व १९७६ मध्‍ये निवृत्‍त.[नियतकालिक संदर्भ १]

वा.ल. कुलकर्णी यांचे साहित्य

संपादन

[]

१) वामन मल्‍हार : वाङ्मयदर्शन (१९४४)

२) वाङ्मयातील वादस्‍थळे (१९४६)

३) वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९)

४) वाङ्मयीन टीपा आणि टिप्‍पणी (१९५३)

५) वाङ्मयीन दृष्‍टी आणि दृष्टिकोन (१९५९)

६) श्रीपाद कृष्‍ण : वाङ्मयदर्शन (१९५९)

७) साहित्‍य आणि समीक्षा (१९६३) (स्फुट निबंध संग्रह)

८) मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५)

९) साहित्‍य : शोध आणि बोध’ (१९६७),

१२) न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३)

१३) हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३)

१४) साहित्‍य : स्‍वरूप आणि समीक्षा (१९७५)

१५) विविधज्ञानविस्‍तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६)

१६) मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०)

१७) नाटककार खाडिलकर : एक अभ्‍यास[]

१८) तुकारामाची कविता []

संपादन कार्य

संपादन

१) मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०)

२) हरिभाऊंच्‍या कादंबरीतील व्‍यक्‍ती (१९६२)

३) मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३)

४) काव्‍यातील दुर्बोधता (१९६६)

५) मराठी समीक्षा (१९७२)

६) एका पिढीचे आत्‍मकथन (१९७५)

संदर्भ

संपादन
  1. ^ भागवत श्री.पु., रसाळ सुधीर, पाडगावकर मंगेश इ. (संपा.)¬¬. साहित्य  : अध्यापन आणि प्रकार. मुंबई : मौज प्रकाशन गृह, दुसरा आवृत्ती : 2 ऑक्टोबर 2011.
  2. ^ [१]
  3. ^ "संग्रहित प्रत". 2019-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-02-05 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "नियतकालिक संदर्भ" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="नियतकालिक संदर्भ"/> खूण मिळाली नाही.