भरत जाधव
भरत जाधव (१२ डिसेंबर १९७३) हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांतील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मूळचा कोल्हापूरचे असला तरी त्याचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाले होते. भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले.
भरत जाधव | |
---|---|
जन्म | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट नाटक |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच |
प्रमुख चित्रपट | गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे, जत्रा, खबरदार, पछाडलेला |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | आली लहर केला कहर, साहेब बीबी आणि मी |
पत्नी | सरिता भरत जाधव |
३००० प्रयोग करणाऱ्या ऑल द बेस्ट या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला.[१] त्यांने नंतर 'सही रे सही' या अतिशय गाजलेल्या मराठी नाटकात काम केले.[२] जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली होती. जाधव यांनी २०१३ मध्ये भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली.[३]
भरतने ८५ पेक्षा जास्त चित्रपट आणि ८ मालिका केल्या आहेत. ८५०० पेक्षा जास्त नाटकांच्या प्रयोगांत काम केले आहे. सही रे सही या एकाच नाटकात भरत जाधवने चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले. हे नाटक गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.[२]
कारकीर्द
संपादनभरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.[४]
सही रे सही
संपादनसही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.[५]
‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजरातीत भाषांतर झाले. गुजराती नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराती नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराती रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते. याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते.
चित्रपट कारकीर्द
संपादन- खतरनाक (२०००)
- खबरदार (२००५)
- गलगले निघाले (२००८)
- गोंद्या मारतंय तंगडी (२००८)
- चालू नवरा भोळी बायको (२००६)
- जत्रा (२००६)
- डावपेच (२०११)
- नवऱ्याची कमाल बायकोची धमाल (२००४)
- नाना मामा (२००६)
- नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
- पछाडलेला (२००५)
- प्राण जाए पर शान न जाए (हिंदी, २००३)
- बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
- बाप रे बाप (२००३)
- माझा नवरा तुझी बायको (२००६)
- मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
- शिक्षणाच्या आयचा घो (२०१०)
- वन रुम किचन (२०११)
- सरीवर सरी (२००५)
- साडे माडे तीन (२००८)
- हाऊस फूल (२००४)
नाटक कारकीर्द
संपादन- आमच्यासारखे आम्हीच
- ऑल द बेस्ट
- ढॅण्ट ढॅण
- श्रीमंत दामोदरपंत
- सही रे सही
- पुन्हा सही रे सही
- तू तू मी मी
- अस्तित्त्व
संदर्भ
संपादन- ^ "Actor Bharat Jadhav reminisces his 'All The Best' days - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-18 रोजी पाहिले.
- ^ a b [https://www.mumbaitheatreguide.com/dramas/Articles/11/jan/18-punha-sahi-re-sahi-marathi-theatres-blockbuster-comedy.asp "PUNHA SAHI RE SAHI...Marathi Theatre�s Blockbuster Comedy... : www.MumbaiTheatreGuide.com"]. www.mumbaitheatreguide.com. 2022-01-18 रोजी पाहिले. replacement character in
|title=
at position 37 (सहाय्य) - ^ "Bharat Jadhav launches production house website - Indian Express". archive.indianexpress.com. 2022-01-18 रोजी पाहिले.
- ^ "Planet Powai Bio". 2006-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-10-25 रोजी पाहिले.
- ^ "भरत जाधव यांचा 'नाट्यसंपदा'चा अंक-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
बाह्य दुवे
संपादनइंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भरत जाधव चे पान (इंग्लिश मजकूर)