साचा चर्चा:भारतातील केंद्रीय विद्यापीठे
विश्वविद्यालय नव्हे विद्यापीठ
संपादन@V.narsikar:, तुम्ही यात साचात हिंदी शब्द व मराठी बनवलात. जसे विद्यापीठ चे विश्वविद्यालय, आझाद चे आजाद इत्यादी.. यूनिवर्सिटीला ला मराठी भाषेत विद्यापीठ तर हिंदी भाषेत विश्वविद्यालय म्हणतात. --संदेश हिवाळेचर्चा ११:५९, २५ ऑगस्ट २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ११:५९, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- तो आपला गैरसमज आहे. कृपया साचा पानाची 'इतिहास पहा' ही कळ टिचकून त्यातील कलमा व संपादन सारांश वाचावा ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) १२:०८, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
मी 'इतिहास पहा' मधील तुमची सर्व संपादने पाहिलीय, केंद्रिय शब्दाचे तुम्ही केंद्रीय असे शुद्धलेखन केले, यासाठी तुमचे स्वागत व धन्यवाद. पण तुमचे विद्यापीठ ला विश्वविद्यालय करणे ही संपादने योग्य नव्हती. --संदेश हिवाळेचर्चा १४:४८, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- पुन्हा सांगतो, आपला कदाचित गैरसमज होत आहे. मी 'सदस्य:ज' नाही. --वि. नरसीकर (चर्चा) १५:२३, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
क्षमा करा, गैरसमज झाला. या लेखात आधी ज सदस्यांनी व नंतर तुम्ही संपादने केल्यामुळे मला तुम्हीच सर्व संपादने केली असा ग्रह झाला होता. --संदेश हिवाळेचर्चा १५:३१, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- कोणाबद्दल योग्य समज करून घेणे फारच जिकरीचे व कठीण असते. गैरसमज करून घेणे मात्र फार सोपे असते. --वि. नरसीकर (चर्चा) ०९:४३, २६ ऑगस्ट २०१७ (IST)
एकेकाळी मराठीतही युनिव्हर्सिटीला विश्वविद्यालय म्हणत. तो शब्द युनिव्हर्स (विश्व)ला जवळचा आहे. विश्वविद्यालयचे विद्यापीठ कधी झाले ते आता शोधणे अवघड आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालयाला हिंदू विद्यापीठ म्हटले तर आजही कसेसेच वाटते,. तरीपण हा मराठी विकिपीडिया असल्याने सर्व विश्वविद्यालयांचे विद्यापीठ असे नामांतर करायला हरकत नाही. तमिळमध्ये युनिव्हर्सिटीला काय म्हणतात, माहीत नाही, पण आपण मद्रास युनिव्हर्सिटीला 'मद्रास विद्यापीठ'च म्हणू या. याच न्यायाने सर्व विश्वविद्यालये विद्यापीठे होतील.
आमचा एक अनुभव : आम्ही काशीहून गया-प्रयागकडे जाताना वाटेत बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा रस्ता दर्शवणारी पाटी दिसली. आम्ही लगेच टॅक्सी ड्रायव्हरला सूचना केली, की प्रयागहून परतताना विश्वविद्यालयाला भेट द्यायची. ड्रायव्हरला काय समजले ते माहीत नाही, पण त्याने मान डोलावली. परत येताना वाटेत तीच पाटी दिसल्यावर आम्ही लगेच गाडी डावीकडे वळवायला सांगितले, पण ड्रायव्हरला समजेपर्यंत गाडी खूप पुढे गेली होती आणि रिव्हर्स घेणे शक्य नसल्याने पुढून डावीकडचे वळण घेतले. बराच वेळ फिरलो तरी ड्रायव्हरला विश्वविद्यालय सापडेना. त्याला विद्यापीठ सांगितले, युनिव्हर्सिटी सांगितले, तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडेना. ड्रायव्हर स्थानिक असून त्याला बनारसमधील एवढी मोठी संस्था कुठे अाहे हे माहीत नसल्याचे पाहून अाश्चर्य वाटले. शेवटी त्याने गाडी थांबवली आणि वाटेत दिसलेल्या एका पांथस्थाला विचारले, की 'बाबा, हे हिंदू विश्वविद्यालय म्हणजे काय?' उत्तर मिळाले, 'अरे, बनारस हिंदू विश्वविद्यालय म्हणजे बीएचयू!' तेव्हा समजले की बनारसच्या सर्वसामान्य लोकांना विद्यापीठ-विश्वविद्यालय-युनिव्हर्सिटी हे शब्द ऐकवून काही बोध होत नाही, तेव्हा आपल्याला बीएचयू माहीत असायला पाहिजे. आणि शेवटी आमची टॅक्सी 'विद्यापीठा'कडे गेली. .... ज (चर्चा) १६:०४, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- ज सर, यूनिवर्सिटीला मराठीत विश्वविद्यालय असेही म्हटले जाते, परंतु विद्यापीठ म्हणण्याचा प्रघात जास्त आहे. बनारस हिंदू यूनिवर्सिटीला स्थानिक लोक (संशिप्तमध्ये) बीएचयू म्हणत असतील, तर याचा उल्लेख मराठी लेखात असावा. लेख शिर्षक विद्यापीठ असला तरी हरकत नाही.
संशिप्त नव्हे तर पूर्ण, स्वच्छ, शुद्ध, अखंड आणि एकमेव
संपादनवाराणसीकरांच्या दृष्टीने बीएचयू हे संक्षिप्त रूप नाही तर हे त्या संस्थेचे पूर्ण, स्वच्छ, शुद्ध, अखंड आणि एकमेव नाव आहे. ... ज (चर्चा) २१:३३, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- किती वाराणसीकरांच्या दृष्टीने बीएचयू हे संक्षिप्त रूप नाही तर हे त्या संस्थेचे पूर्ण, स्वच्छ, शुद्ध, अखंड आणि एकमेव नाव आहे ???
- वाराणसीकर केवळ बीएचयू हेच नाव जानतात यावर मी असहमत आहे. तेथील बहुतांश जणांना विद्यापीठाचे पूर्ण नाव माहित असेलच. तुमच्या त्या टॅक्सी ड्रॉवरला विद्यापीठाचे केवळ संशिप्तच रूप माहिती होते हे त्याचे अज्ञान म्हणावे लागेल. आमच्या भागातील उदाहरण द्यायचे झाले तर इकडे मराठवाड्यामध्ये "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ " याला अनेक जण "बामू" (BAMU) या नावानेही संबोधितात, म्हणजे त्यांना त्याचा फुलफॉर्म माहित नसतो असं नव्हे. म्हणून या विद्यापीठाचे बामू करण्यात अर्थ नाही, हे ही बीएचयू प्रमाणे संशिप्त नाव आहे.
मराठी नामे आणि हिंदी नामे
संपादनविद्यापीठ मराठी आणि विश्वविद्यालय हिंदी असेल, तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या मराठीत वेगळ्या आणि हिंदीत वेगळ्या भासतात.
महाराष्ट्रात ज्या देवाला मारुती म्हणतात त्या देवाला हिंदीत हनुमान म्हणतात. मारुती हा शब्द अनेकांना माहीत नसतो.
हिंदी प्रदेशात शंकराला कोणी ओळखत नाही, त्यांच्या दृष्टीने तो महादेव किंवा भोलेनाथ असतो. दक्षिणी भारतात शिवमंदिरे असतात, शंकराचे देऊळ शोधायला गेले तरी सापडणार नाही.
रामाच्या देवळावर 'श्रीराम जी का मंदिर' अशी पाटी असते.
गणपतीला गणेश आणि गणेशच म्हणतात.
महाराष्ट्रातल्या येशू ख्रिस्ताला हिंदीत ईसा मसीहा, आणि इंग्रजीत जीझस क्राइस्ट म्हणतात.
अमेरिकेतील ज्या शहराला मराठी-हिंदीत न्यूयॉर्क म्हणतात त्याला मराठी विकिपीडियावरील काही लोक न्यू दिल्ली, न्यू बाँबे, न्यू पनवेल या धर्तीवर 'न्यू यॉर्क' म्हणतात.
पृथ्वीच्या गोलावर काढलेल्या काल्पनिक रेषांना आणि त्यांच्या स्थानिक छेदबिंदूंना सामान्यतः (स्थानीय) अक्षांश-रेखांश म्हणतात. मराठी विकिपीडियावर मात्र त्यांच्यासाठी गुणक (कोइफिशंट) हा स्पेशल शब्द आहे. भारतीय लष्कराच्या कार्यालयांवर इंग्रजीत Personnel आणि हिंदीत वैयक्तिक असे लिहिले असते, त्याच नियमाला अनुसरून कुणीतरी को-ऑर्डिनेटचे भाषांतर कोइफिशंट केले आहे
शहरातल्या ज्या भागाला मराठीत वाडी, वस्ती, वसाहत वगैरे आणि इंग्रजीत कॉलनी म्हणतात, त्या वस्तीला कर्नाटकात ले-आउट म्हणतात.
. .... ज (चर्चा) २१:३३, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- ही नावे मी जानतो, पण मला एवढचं म्हणायचं आहे की University शब्दाला महाराष्ट्रात "विद्यापीठ" असेच म्हणतात. Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय असा शब्द नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा शब्द आहे, आणि हे राज्यातील सर्व विद्यापीठाच्या बाबतीत सारखंच आहे. मग जर Delhi University आपणास मराठी करायचे झाले आपण "दिल्ली विद्यापीठ " असेच करणार, दिल्ली विश्वविद्यालय किंवा दिल्ली यूनिवर्सिटी असे हिंदी-इंग्रजी वापरणार नाही. अनेक मराठी शब्दाचे अर्थ हिंदी वेगवेगळे असतात म्हणून तर मारूतीला हिंदीत हनुमान, शंकराला महादेव किंवा शिव, देऊळाला मंदिर असे हिंदीत म्हटले जाते. University ला मराठी भाषेत "विद्यापीठ" हा शब्द असल्याने त्याला हाच शब्द उत्तम राहिल.
केंद्रीय, राष्ट्रीय वगैरे
संपादनकेंद्रीय हा शब्द हिंदी-संस्कृतात केन्द्रीय असाच लिहिला जातो, पण राष्ट्रीय हा राष्ट्रिय असा. त्यावर शोधाशोध केल्यावर असे समजले की हे दोन शब्द बनताना वेगळे संस्कृत प्रत्यय लागतात. त्यामुळे एकात ईय आहे तर दुसऱ्या इय. मराठीत मात्र राष्ट्रिय लिहिणे चुकीचे समजले जाते. ... ज (चर्चा) १८:४६, २५ ऑगस्ट २०१७ (IST)
- इंग्रजी शब्दाच्या उच्चाराबाबतही मराठी व हिंदीत फरक असतो, जसे मराठीत बँक - हिंदीत बैंक, मराठीत स्टॅचू - हिंदी स्टेच्यू. हिंदी मध्ये अनेक शब्दाच्या वेलाट्या पहिल्या असतात, व अनुस्वार देण्याएवजी जोडशब्द वापरला जातो. जसे, अनुयायि, हिन्दी इ.