विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा ३
प्रचालकांना विनंती
संपादनविनंती: 'चेंबुर रेल्वे स्थानक' आणि 'चेंबूर रेल्वे स्थानक' हे २ लेख आहेत. त्यापैकी एकच लेख पुरेसा आहे. कृपया "चर्चा:चेंबुर रेल्वे स्थानक" हे पान बघावे आणि योग्य ती कार्यवाही करावी.
प्रचालकांना विनंती
संपादनदादर रेल्वे स्थानक येथे प्रत्यक्षात दोन स्थानके असून एक मध्य मार्गावर आहे तर दुसरे पश्चिम मार्गावर आहे. दोन्ही स्थानाकांचा संकेत निराळा असून दोन्हीचे फलाट क्र्. १ पासुन सुरु होतात. त्यामुळे एखादा तपशील देताना फलाट क्र्. २ असे लिहिले तर गोंधळ होउ शकतो की कोणत्या मार्गावरचा? मध्य की पश्चिम ? तरी रेल्वेच्या अधिकृत नावानुसार 'दादर मध्य रेल्वे स्थानक' आणि 'दादर पश्चिम रेल्वे स्थानक' असे २ वेगळे लेख तयार केल्यास सोयीचे राहील.
प्रचालकांना विनंती
संपादनलोकल्स" वापरावे की "उपनगरीय गाड्या" वापरावे याविषयी मार्गदर्शक तत्व / धोरण आवश्यक आहे .... जेणे करुन लेखनामध्ये सुसुत्रता राहील.
तसेच विकिपिडियावर कित्येक ठिकाणी उपनगरी असा शब्द दिसत आहे. कोणता शब्द बरोबर आहे....उपनगरी की उपनगरीय याचा कृपया खुलासा केल्यास शंका निरसन होईल.
प्रचालकांना विनंती
संपादन"लौजी रेल्वे स्थानक" या लेखात बोरीबंदर या स्थानकाचा उल्लेख केला आहे. सध्या भारतीय रेल्वेवर "बोरीबंदर" नावाचे कोणतेही स्थानक अस्तित्वात नाही. तरी योग्य ते संपादन केल्यास लेखाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे मला वाटते.
प्रचालकांना विनंती
संपादनअंधेरी या स्थानकात ९ फलाट असून या स्थानकाचा संकेत ADH आणि उपनगरीय संकेत AD असा आहे. कृपया माहिती लिहावी.
प्रचालकांना विनंती
संपादनयेथे "पळसदरी रेल्वे स्थानक" असा लेख्र असुन रेल्वे स्थानकावरील अधिकृत फलकानुसार या स्थानकाचे मराठीत 'पळसधरी' आणि हिंदीत 'पलसदरी' असे नाव आहे. तरी योग्य ती सुधारणा आवश्यक असल्यास करावी.
प्रचालकांना विनंती
संपादनकित्येक लेखात सह्याद्री पर्वतरांग असा उल्लेख आहे. पण भूशास्त्रानुसार सह्याद्री हा पर्वत नाही. सह्याद्रीला कडा किंवा डोंगररांग असे संबोधणे शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य आहे. आवश्यक तिथे बदल करावेत.
प्रचालकांना विनंती
संपादनयेथे "छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" असा लेख्र असुन रेल्वे स्थानकावरील अधिकृत फलकानुसार या स्थानकाचे नाव मराठीत "श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर" असे आहे. तरी योग्य ती सुधारणा करावी.
मराठी विकिपीडिया सोशल नेटवर्किंग खाते
संपादन@Mahitgar:@अभय नातू:@Rahuldeshmukh101:
जसे मे २०१७ पासून नवीन मुखपृष्ठ येतील त्यात सोशल नेटवर्किंग खाते बनवण्याची गरज आहे. ते खाते अधिकृत असतील त्याकरिता आपले मत व्यक्त करा. कुठल्याही खाते बनवण्यास एक ई-मेल लागते, का मराठी विकिपीडिया कडे असे ई-मेल आहे का? ज्यांनी हे खाते बनवले जातीत. एक दुसरी गोष्ट म्हणजे एक फोन नंबर जे सुद्धा महत्वाचे आहे याकरिता. मी मेटावर विचारले की ((उधारण-marathi@wikipedia.org)) असा मिळेल का तर त्यावर काही जवाब दिसत नाही. यावर लवकर झाले की आपण अधिकृत खाते बनू शकते आणि मराठी विकिपीडियाला एक नवीन जागा सोशल नेटवर्किंग साईट्सवर देऊ अशी अपेक्षा आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५४, ६ एप्रिल २०१७ (IST)
- marathi@wikipedia.org असा इमेल पत्ता मिळणे शक्य नाही असे वाटते परंतु मराठी विकिपीडियाची अधिकृत मेलिंग लिस्ट केली असता त्याचा इमेल पत्ता वापरता येईल. या पत्त्यावर पाठवलेले विपत्र लिस्टला सबस्क्राइब केलेल्या सगळ्यांना येईल.
- हाच इमेल पत्ता वापरून सोशल नेटवर्किंग खातीही तयार करता येतील. इतर विकिपीडियांनी यासाठी काय केले आहे हे कळल्यास सुसूत्रता ठेवता येईल.
- अभय नातू (चर्चा) १९:४२, ६ एप्रिल २०१७ (IST)
@अभय नातू:लिस्ट जर तयार करण्यात आली की खूप चांगले होईल. मी इथे पहिले परंतु मराठीचे काही लिंक सापडले नाही. लिस्ट कशी तयार करू याची जाणकारी घ्या की मी मराठी करीता तयार करून सोसिअल मीडियाचे काम चालू करेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:२८, ६ एप्रिल २०१७ (IST)
phabricator
संपादनमी येथे phabricator वरच्या प्रस्तावावरून आलो. माझ्या मते येथे कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्णयासाठी कौल घ्यावा. - प्रबोध (चर्चा) ०२:०४, ३ मे २०१७ (IST)
1 मे 2017 बाबत
संपादननिवेदन आहे की मुखपृष्ठात एक शुभेच्छा चित्र टका. याचे डेमो सदस्य:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ इथे दिसते. यासोबत २ चलचित्र सुद्धा टाका. File:Abhay Natu talks about contributing to Wikipedia.webm व File:Abhay Natu urges to contribute to Marathi Wikipedia.webm १ मे करिता निवेदन --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:४९, ३० एप्रिल २०१७ (IST) ॉ
- टायवीन,
- चित्रात शुद्धलेखनचूक दिसत आहे दिवसाची ऐवजी दिवसाच्या पाहिजे. मुखपृष्ठावर अशी चूक दाखवणे बरोबर नाही. चलचित्रे घालण्यास हरकत नाही परंतु त्यात मी असल्याने त्याला इतर कोणी तरी अनुमोदन दिले तर बरे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २२:१३, ३० एप्रिल २०१७ (IST)
@अभय नातू: ती चूक मी सकाळी बरोबर करणार. चलचित्र बाबत याला मी नामनिर्देशन केले आहे यावर तुम्ही अनुमोदन दिले तरी चालेल असे वाटते. चित्रात जर अजून चूक असेल तर नोंदवे तेही बरोबर करेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:४९, ३० एप्रिल २०१७ (IST) @अभय नातू: चित्रात दिनाचे लिहिले आहे चालेल नाही का?--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:५८, १ मे २०१७ (IST)
- महाराष्ट्र दिनाच्या संदेशात चलचित्र घालण्यास माझे अनुमोदन.
- शिवाय दर्शनी संदेशातल्या "दिवसाची" शब्दाचे लेखन "दिवसाच्या" असे लिहून दुरुस्त करावे ही विनंती.
- --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १२:५४, १ मे २०१७ (IST)
वरील प्रस्तावास माझेही अनुमोदन. --वि. नरसीकर (चर्चा) १३:००, १ मे २०१७ (IST)
बद्दल केले आहे. चलचित्र टाकून ग्या अशी मागणी --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४१, १ मे २०१७ (IST)
- बदल झाल्याचे पाहिले. तत्परतेबद्दल धन्यवाद! :)
- --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १७:३४, १ मे २०१७ (IST)
टायवीन,
चित्र लगेच बदलल्याबद्दल धन्यवाद.
चलचित्र अजून घातलेले नाही. १ मे आता संपतच आला आहे (भारतात तरी). असे असता अजून एखाद्या दिवशी हे घालावे असे वाटते.
अभय नातू (चर्चा) १९:१५, १ मे २०१७ (IST)
चलचित्र १ मे चा उल्लेख देते असे नाही परंतु ते माझ्याकरीता व अन्य विकिपीडियन करीता एक प्रोत्साहन म्हणून काम करते. असे चलचित्र मराठी विकिपीडिया बाबत आहेत आणि खूप कमी आहेत याला जर ३६५ दिवस मुखपृष्ठवर ठेवले तरीही ते आपल्या करीता प्रोत्साहनपर असेल अशी माझे म्हणणे
मराठी विकिपीडियाच्या १५व्या वाढदिवसाची शुभेच्छा, प्रचालक हे विकिपीडियाचा शान राखवण्यास आपले उल्लेखनीय योगदान देतात. आजचा दिवशी तुमच्या व इतर विकिपीडियनच्या नावानी
कॉमन्सवर चढवलेली मराठी भाषेतील काही अमुफ्त पुस्तके.
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर काही मराठी भाषेतील पुस्तके चढवलेली आहेत. त्याने प्रताधिकार उलंघन होते. मराठी भाषेतील असल्यामुळे मी प्रचालकांना @अभय नातू:,@Mahitgar: व अन्य सदस्याना @संदेश हिवाळे: @ज: निवेदन देतो की प्रताधिकार बाबत खालील सदस्यांना संदेश द्यावेत.
- @साळुंके सुवर्णा:
- @रुपाली तांबे:
- @राणी थिटे:
- @आश्विनी बाळासाहेब दौंडकर:
- @पोखरकर अनु:
- @कांबळे प्रमिला:
- @तळोले मोना:
- @दामिनी दौंडकर:
कंमोंस्वारील चालू असलेले तक्रार --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:११, ४ जुलै २०१७ (IST)
- हा विषय मुख्यत्वे @सुबोध कुलकर्णी: यांच्याशी संलग्न आहे तो ते पहातील.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३२, ४ जुलै २०१७ (IST)
माहितगार सरांशी सहमत आहे. कुलकर्णी सर मदत करा.
--संदेश हिवाळेचर्चा १४:५४, ४ जुलै २०१७ (IST)
- @Tiven2240:,
- ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
- तेथे पाहिले असता सदस्य:Dharmadhyakshya यांनी मराठी विकिपीडियावर त्यांना प्रताधिकाराबद्दल आवाज उठवल्यामुळे बॅन करण्यात आले असे लिहिले आहे. थोडा शोध घेता कळले की सदस्य:Mahitgar यांनी त्यांना बॅन केले होते.
- माहितगार,
- या बॅनबद्दलची पार्श्वभूमी कोठे मिळेल? विशेषतः हा बॅन घालण्याआधीच्या कृती आणि संवाद याबद्दल मला कुतुहल आहे.
- अभय नातू (चर्चा) १९:३१, ४ जुलै २०१७ (IST)
@अभय नातू: हा बॅन बद्दल मी प्रश्न विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन#Dharmadhyaksha विचारले व @Mahitgar: यांनी जवाब दिले आहे. मी त्यांच्या बॅन बद्दल आजही विरोध करत आहेत आणि ते जोग्य नाही असे माझे म्हणे आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:४३, ४ जुलै २०१७ (IST)
- @Tiven2240:,
- पुन्हा एकदा धन्यवाद. तेथील भला मोठा मजकूर वाचून फारसा काही अर्थबोध झाला नाही. त्यातील व्यक्तिशः मजकूर वगळून नेमके मुद्दे काय आहेत हे समजणे फारच कठीण वाटले.
- पुन्हा एकदा सवडीने वाचतो म्हणजे कदाचित कळेल. तुम्ही त्या उत्तराचा सारांश काढला असेल तर तो ही वाचायला आवडेल.
- अभय नातू (चर्चा)
@अभय नातू: तुम्ही एकाद्या वाचा माझ्या प्रमाणे हे सर्व "ओल्ड माहितगार पोलिसी" आहेत ते काही नवीन नाही परंतु मी जेव्हा त्यांना ब्लॉक केले तेव्हा सर्व गोस्ट पाहत होतो आणि माझ्या हिशोबाने ते योग्य नाही. धर्मदक्षय यांनी कॉमन्स वरील चित्र काढली असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सर्व चित्र डिलीट केले आहे. जास्त माहिती धर्मदक्षय पासून माझे झालेले संवाद पहा [१]. जर जोग्य असेल तर ब्लॉक काढण्यास विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:४७, ४ जुलै २०१७ (IST)
टायवीन, यापुढे या विषयावर अधिक दबाव टाकू नये आणि मध्यस्तीचे प्रयत्नही करु नयेत हि नम्र आगहाची विनंती. मराठी विकिपीडियाच्या बाबत ते बदनामी थांबवून सहकार्याची भूमिका घेतील तेव्हा मी स्वत:हून योग्यवेळी त्यांच्यावरील बॅन काढेन. त्यांच्या सातत्याने खोटे बोलून बदनामी करण्याने ब्लॅकमेलींगचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावरील बॅन काढला जाणार नाही. धर्माध्यक्ष दिशाभूल करत आहेत. धर्माध्यक्षांना victim play करायचे तर play करुद्यात, सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे तरच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. त्यांनी कॉपीराईट फ्री असलेले साहाय्य पानावरील चित्र तेही द्वेषाने वगळले यासाठी त्यांना बॅन केले आहे. कॉपीराईटेड छायाचित्र वगळण्यासाठी त्यांना बॅन केलेले नाही ते फोडत असलेला टाहो दिशाभूल करणारा चुकीचा आणि नाटकबाजीचा आहे.
त्यांच्यावरील पहिला बॅन महाराष्ट्र दिनाच्या काळात नवागत लेखकांना मार्गदर्शन नकरता इंग्रजी विकिपीडियास्टाईल नियम लावून केलेल्या वगळा वगळी साठी तात्पुरताच् होता, त्यानंतर कॉपीराईटमुक्त छायाचित्र वगळण्याचा आगाऊपणा केला, वरुन मराठीभाषा असो की भारत असो त्यांची वृत्ती अरेरावीची असते. त्यांना मी हाताळतो आहे इतरांनी तुर्तास लक्ष घालू नये. मराठी विकिपीडिया स्वतंत्र पॉलीसी बनवतो आणि त्याबाबत तडजोड होणार नाही. तुर्तास विषय येथेच थांबवण्यासाठी आभारी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:०८, ४ जुलै २०१७ (IST)
प्रताधिकार उल्लंघन करणारी खाती गोठवण्याचा प्रस्ताव
संपादन- ता.क. वरील सदस्यांचे योगदान व त्यांची चर्चा पाने पाहिला असता लक्षात येईल की यांना वारंवार विनंती, सूचना व इशारे देण्यात आलेले होते व काही वेळा त्यांना तात्पुरता बॅनदेखील देण्यात आलेला होता. यांनी इतर ठिकाणीही केलेले संभाव्य प्रताधिकार उल्लंघन पाहता त्यांना लगेचच एकगठ्ठा बॅन करावे हा प्रस्ताव मी मांडत आहे. किमानपक्षी त्यांच्या योगदानावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- अभय नातू (चर्चा) १९:३४, ४ जुलै २०१७ (IST)
- सुबोध कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली विकिमिडीया फाऊंडेशनच्या एजन्सीसाठीच काम चालू आहे. सुबोध कुलकर्णींना निरोप दिला आहे. कॉमन्सवरील संपादकांकडे लेखकांच्या मृत्यूच्या तारखा नाहीत -ते डोळ्यावरपट्टी बांधून संशयाने सर्वच याच्यावर डिलीशन साचे लावत आहेत. मृत्यूच्या तारखांची सुबोध कुलकर्णींनी राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आणि इतर संस्थांच्या साहाय्याने यादी बनवली आहे, १८४७ च्या कायद्यांतर्गतही येणारी बरीच पुस्तके कॉपीराईट फ्री असणे अभिप्रेत असावे. हा मुद्दा सुबोध कुलकर्णी कॉमन्सवर निपटतील. पुस्तके तशीही मराठी विकिस्रोतासाठी असणार आहेत आणि तेथील अटी पुरेशा कडक ठेवल्या आहेत त्याची सुबोध कुलकर्णींना कल्पना आहे.
टायवीनने निरोप्याचे काम केले आहे, निरोप्याचे काम पार पाडल्या बद्दल त्यांचे आभार मानणे पुरेसे आहे.
@Mahitgar: आभार मुळे धन्यवाद :) @सुबोध कुलकर्णी: डिलिशन request पाहिले परंतु जे उसर प्रॉब्लेम वर आपले विचार स्पस्ट कराल तर खूप आभारी --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:५८, ४ जुलै २०१७ (IST)
- वर उत्तर दिले आहे, योग्य गोष्टी योग्य वेळी करेन. तुम्ही ह्या विषयात यापुढे लक्ष न घालता; इतर कनस्ट्रक्टीव्ह कामात लक्ष दिल्यास अधिक चांगले राहील.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१३, ४ जुलै २०१७ (IST)
- माहितगार,
- टायवीन यांना निरोपे म्हणून त्यांच्या कामगिरीचे मोल कमी लेखू नका. आणि निरोप्या म्हणल्यास निरोप्यालाच बडविण्याची चूक करू नये ही विनंती. टायवीन यांनी कोठे काय कधी करावे हे तुम्ही-आम्ही सांगू नये असे वाटते.
- असो, आपण सुज्ञ आहात. योग्य तेच कराल ही खात्री आहे.
- मूळ मुद्दा म्हणजे बॅनचा, तर त्याबद्दल मी मागीलपुढील माहिती बघत आहे. तुमची काही मदत लागल्यास मागेनच.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १०:३७, ५ जुलै २०१७ (IST)
- आपल्याकडे वेळ असल्यास या यादीतील् चित्रे विनापरवाना पडून आहे त्यांच्याकडेही पहावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३१, ५ जुलै २०१७ (IST)
- यादी तयार करुन दिल्याबद्दल धन्यवाद. माझी सूचना/सजेशन वाचली असे गृहित धरतो.
- अभय नातू (चर्चा) १९:४६, ५ जुलै २०१७ (IST)
सर्व संबंधित सदस्य व प्रचालक,
प्रथमच नमूद करू इच्छितो की, सदर अनियमितता माझ्या संपर्कातील सदस्यांकडून प्रशिक्षण व सरावादरम्यान झालेल्या आहेत. MGS & CIS विकिस्रोत प्रकल्पामध्ये संस्थेने जतनमुल्य असलेली २५०० पुस्तके स्कॅन केलेली आहेत. या पुस्तकांची प्रताधिकाराच्या दृष्टीने छाननी सुरु आहे. त्यासाठी १९१४ पूर्वीची, लेखक मृत्यूनंतर ६० वर्षे झालेली अशा वेगवेगळ्या याद्या बनविणे सुरु आहे. पाबळ येथील विज्ञान आश्रम ही संस्था ग्रामीण भागातील युवा पिढीला केवळ तंत्रज्ञान व संगणक साक्षर न करता विकिपीडिया,विकिस्रोत,विक्शनरी अशा ज्ञाननिर्मिती प्रकल्पाच्या कामातही प्रशिक्षित करण्यास उत्सुक आहे. त्यामुळे तेथील १०-१५ युवतींनी या कामात अतिशय पुढाकार घेतल्याने त्यांचे प्रशिक्षण काम करता करता सुरु आहे.दोन कार्यशाळाही घेतल्या गेल्या. त्यांना बॅन न करता अभय नातू यांनी सुचविल्याप्रमाणे - योगदानावर लक्ष ठेवून त्यांना सूचना देत कामात अचूकता आणण्यासाठी थोडे दिवस वेळ द्यावा अशी विनंती मी करत आहे. मीही अधिक सजगतेने अशा चुका घडणार नाहीत याची काळजी घेतच आहे. कॉमन्सवरील पुस्तके वगळण्याची विनंती मीच नोंदविली आहे. नियमात न बसणारी सर्वच पुस्तके यथावकाश यात येतील. आणि प्रताधिकारमुक्त पुस्तकेच काही दिवसांत तेथे असतील, जी क्रमाक्रमाने विकीस्रोतवर ओसिआर करून आणण्याचे प्रस्तावित आहे. आपण सर्व जण हे समजून घ्याल आणि या प्रक्रियेत सहकार्य कराल याची आशा आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:१६, ६ जुलै २०१७ (IST)
@सुबोध कुलकर्णी: तुमचे बोलणे कळले व कॉमन्स वर त्याची नोंद दिली आहे. जवाब दिल्याबद्दल व काळजी घेतली बद्दल धन्यवाद ---टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:४८, ६ जुलै २०१७ (IST)
- नमस्कार @सुबोध कुलकर्णी:,
- वरील गोष्टीचे स्पष्टीकरण केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही व पाबळ येथील सदस्य करीत असलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे. यात सहभागी युवतींनी मारुती चित्तमपल्लींच्या पुस्तकावरुन मराठी विकिपीडियावर पक्ष्यांबद्दलचे अनेक लेख निर्माण केले आहेत. हे लेख लिहिले जात असताना त्यात थेट नक्कल असल्याची शंका आल्याने मी त्यांना अनेकदा साद घातली व सूचना देऊ केल्या. त्यांस काहीही प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रश्नांकित असलेली संपादने चालूच राहिली. असे भविष्यात होऊ नये याची काळजी घेण्याची त्यांना सूचना करता येईल का? कोणतीही शंका असल्यास त्यांनी माझ्याशी (आणि इतरांशीही) थेट संपर्क साधावा. मी शक्य तितकी मदत करेन ही खात्री बाळगावी. असे काम करणारे नवीन सदस्य आपल्याला नक्कीच हवे आहेत आणि म्हणनच तेव्हा शक्य तितका संयम राखून त्यांना सरसकट बॅन केले नाही.
- असे असताही प्रताधिकार व संबंधित विषय महत्वाचे आहेत आणि त्याबद्दल त्यांचे मार्गदर्शन व्हावे किंवा त्यांनी येथे माहिती, मदत मागावी असे मला तीव्रपणे वाटते. क्वचित आणि अनवधानाने चुका होणे शक्य आहे, नव्हे अपेक्षितच आहे. त्या चुका लक्षात आल्यावर/आणून दिल्यावर लगेचच त्या सुधारल्या तर उत्तम. त्यासाठी या सदस्यांना येथे (आणि कॉमन्सवरही) इतरांशी संवाद साधण्यास उद्युक्त करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो.
- असो, जुनी मराठी पुस्तके स्कॅन करण्याबाबत मला एक प्रश्नवजा सूचना तुमच्यापुढे आणावीशा वाटते. काही पुस्तकांच्या प्रती चाळल्या असता दिसून येते की ती ऑलरेडी जीर्णावस्थेत आहेत. असे असता अधिक वेळ न घालवता भराभर स्कॅन केलेले बरे. या इंटेलेक्युअल प्रॉपर्टीची ताबडतोब प्रत न केल्यास ती कायमची गायब होण्याची शक्यता आहे. तरी अशा (प्रताधिकार मुक्त नसलेल्या परंतु दुर्मिळ असलेल्या) पुस्तकांच्या प्रती काढून त्या सध्या प्रकाशित न करता कुलुपबंद ठेवाव्यात आणि जेव्हा त्या प्रताधिकारमुक्त होतील तेव्हा त्या खुल्या कराव्या. असे करणे लॉजिकल आहे. यासाठी कायद्यात काही तरतूद आहे का? सीआयएसचे कायदेतज्ञ याबद्दल माहिती काढू शकतील?
- आपल्याकडून व आपल्या सहकाऱ्यांकडून येथे (आणि कॉमन्सवर) अधिकाधिक योगदान व्हावे अशा आशा व अपेक्षेसह,
- अभय नातू (चर्चा) १९:४४, ६ जुलै २०१७ (IST)
नमस्कार @सुबोध कुलकर्णी:,
आपण मराठी विकी स्रोत बाबत मांडलेली मीमांसा वाचली. गेल्या १-२ वर्षां पासून A2K दरवर्षी मराठी विकी स्रोत ला आपल्या वार्षिक विकास आराखड्यात मांडत आली आहे. आजवर ह्या काठी मोठा फंड सुद्धा खर्ची घातलेला आहे.
मला असे वाटते कि आता वेळ आली आहे कि ह्यातून निष्पन्न काय झाले ह्याची पण चर्च्या व्हावी कारण आपण लोकांच्या केवळ मोठं मोठ्या गोष्टी कधी पर्यंत ऐकायच्या ? जुलै महिन्यात विकी सोर्स चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे तो मी मराठी विकिपीडिया वाचक वर्गासाठी येथे देतो आहे ह्यात मराठी कुठेच नाही ह्यावर सुबोध आपण स्पष्टीकर द्यावे असे मला वाटते.
Hello all,
We've just published the July 2017 Indic Wikisource statistics. We are very happy to announce that, we have now 11 Indic Wikisources. From the birth of Punjabi Wikisource, within a two month, they have beaten Marathi and Assamese Wikisource.
Here is the top 3 rank according to different criteria few stats ...
As per Number of article
- Sanskrit Wikisource ( 17214 pages) - supported by 0.04% scan pages.
- Kannada Wikisource ( 12537 pages) - supported by 0.62% scan pages.
- Telugu Wikisource ( 11881 pages) - supported by 24.89% scan pages.
As per Number of page Validation
- Telugu Wikisource ( 20159 pages)
- Tamil Wikisource ( 6312 pages)
- Gujarati Wikisource ( 5652 pages)
As per Number of page Proofread
- Telugu Wikisource ( 25184 pages)
- Bengali Wikisource ( 10793 pages)
- Tamil Wikisource ( 9244 pages)
As per percentage supported by scan pages.
- Bengali Wikisource (94.64%)
- Telugu Wikisource ( 24.89%)
- Gujarati Wikisource (20.21%)
Full Indic Wikisource stats here below where Language subdomains are ranked by the number of page verifications : [category q3] + 2x[category q4] https://wikisource.org/wiki/Wikisource:Indic_Wikisource_Stats
I want to specially mention that there are no visible improvement on proofreading works and page content supported by scan at Marathi,Assamese, Sanskrit, Panjabi , and Kannada Wikisource.
Regards,
Jayanta Nath
Indic Wikisource Community
मराठी विकिपीडियावर अपलोडर गट प्रस्ताव
संपादनमराठी विकिपीडियावर लेखांची गुणवत्ता वाढवण्यास चित्र जरुरी आहे. मराठी भाषांतील अधिक अधिक मुक्त प्रतिमा नाही त्यामुळे मराठी विकिपीडियावर उपलोअडर गट तयार करण्यास याची सुरुवात केली पाहिजे असे वाटते. विकिपीडिया फेअर ऊस पोलिसी अंतर्गत याची स्थापना करण्यास मी प्रस्ताव सादर करत आहे. माननीय प्रचालक व मराठी विकिपीडिया समुदाय आपल्या मत द्यावे अशी आशा आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२६, १७ जुलै २०१७ (IST)
- सदस्य Mahitgar यांची नोंद - मराठी विकिपीडियावर प्रताधिकार कायदे विषयक सुजाण सदस्यबळ अनुपलब्धतेमुळे तुर्तास अस्विकार
- अभय नातू (चर्चा) २०:४९, २० जुलै २०१७ (IST)
- सदस्य
अभय नातू वमाहितगार यांचे मताशी सहमत.
- सदस्य
--वि. नरसीकर (चर्चा) २१:१३, २० जुलै २०१७ (IST) --वि. नरसीकर (चर्चा) ११:०१, २२ जुलै २०१७ (IST)
- स्पष्टीकरण - वरील नोंद माहितगार यांची आहे. मी ती फक्त स्थापित केली. मी यावर (अजुन तरी) माझे मत दिलेले नाही. :-)
- अभय नातू (चर्चा) २३:०४, २१ जुलै २०१७ (IST)
- सद्य स्थितीत प्रचालक हे uploader आहेतच त्यामुळे वेगळ्या गट निर्मितीची गरज वाटत नाही. संतोष दहिवळ
@संतोष दहिवळ: हे तर माहीत आहे; परंतु मराठी विकिपीडियावर जे चित्र लेखात गरज आहे याकरिता हमेशा प्रचालकांना कष्ट का? मराठी उपलोअड विझर्ड पूर्वी बंध करण्यात आले आहे व मराठी विकिपीडियावर कॉपीराईट बदल काही स्पस्ट नाही. सध्या वर्ग:मराठी चित्रपट नामसूची पहा. मराठीत असून यावर चित्र नाही. परंतु इतर विकीवर याचे चित्र आहे तर लोक का मराठीत माहिती घेतली जेव्हा मराठीत चित्रपटाचे चित्रच नाही? लेख केवळ प्रमाणच नव्हे तर दर्जा देखील असला पाहिजे याची ठाऊक प्रचालकांना आहेत परंतु यावर उपाय चर्चा नाही। मिडियाविकी:Sitenoticeवर अनेक नोटिस टाकून जर याचे उपाय दिसत आहे तर चांगले, परंतु मला काही पुढे दिसत नाही व प्रोत्साहन मिळत नाही. याचे परिणाम स्वरूप तुम्ही मराठी विकिपीडियावर सक्रिय असलेली सदस्य पहा पूर्वी ३०० पार आज १३५ सक्रिय सदस्य आहेत. याने मराठी विकिपीडियाची प्रगती फारच दिसत नाही. कॉमन्स व इतर सहप्रकल्पावर मराठी विकिपीडिया नाहीसा झाला आहे परंतु आपण आज सुद्धा आपल्या परीचयात लॉ-विधी विषयाचे अभ्यासक/प्राध्यापक/विद्यार्थी/वकील अथवा संबंधीत संस्था आहेत का ? याना शोदात आहेत. तथास्तु ! --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:००, २३ जुलै २०१७ (IST)
"स्म्रिती मन्धाना" या पानाचे शीर्षक बदलण्याबाबत
संपादन"स्म्रिती मन्धाना" या पानाचे शीर्षक "स्मृती मानधना" असे असले पाहिजे, असे वाटते. मराठीत हा बरोबर उच्चार आहे. तसे शीर्षक बदलता येईल का? ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:५२, १७ सप्टेंबर २०१७ (IST)
- नमस्कार,
- स्मृती मानधना हा उच्चार (विशेषतः मानधना या भागाचा) बरोबर असल्याचा संदर्भ कोठे मिळेल? आंतरजालावार अनेक ठिकाणी या नावाचे शुद्धलेखन Mandhana आहे. याचा उच्चार मंधाना किंवा मानधना होउ शकतो. समालोचनात मंधाना हा उच्चार आढळतो. तरी मानधना बरोबर असल्याचा संदर्भ देउन शीर्षक बदलता येईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०४:४२, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! वृत्तपत्रातील उल्लेख संदर्भ म्हणून ग्राह्य धरले जात असतील तर हे काही संदर्भासाठी दुवे :
http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-smruti-mandhana-talking-68329 http://www.lokmat.com/oxygen/blue-jersey-girls/
०८:३१, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
- वृत्तपत्रातील factual संदर्भ नक्कीच ग्राह्य धरता येतील परंतु नावांच्या , विशेषतः अमराठी नावांच्या उच्चाराबद्दल मराठी वृत्तपत्रांतून असंख्य चुका आढळतात. तरी वरील दोन संदर्भांशिवाय एखादा मिळाल्यास उत्तम.
- सध्यापुरते वरील मजकूर लेखाच्या चर्चापानावरही नोंदवीत आहे म्हणजे इतर वाचकांच्याही ध्यानात येउन त्यांचाकडून संदर्भ मिळण्याची शक्यता वाढेल.
- अभय नातू (चर्चा) ०९:१६, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
"बाबासाहेब घोरपडे" या शीर्षकाविषयी
संपादनइचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या विषयीच्या पानाचे शीर्षक बाबासाहेब घोरपडे असे आहे. खरेतर बाबासाहेब हे त्यांचे संबोधनात्मक नाव होते. त्यांच्या नावे इचलकरंजीत असलेल्या संस्थांची नावे सुद्धा नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह आणि नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटी अशीच आहेत. तेव्हा ह्या पानाचे नाव सुद्धा नारायणराव बाबासाहेब घोरपडे किंवा नारायणराव घोरपडे असे असले पाहिजे, असे वाटते. यावर चर्चा व्हावी, अशी विनंती.
ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:५७, १७ सप्टेंबर २०१७ (IST)
- नारायणराव घोरपडे यांनी अनुवाद लेखन आणि स्फुट लेखन कोणत्या नावाने केले आहे ?
- बाकी वस्तुनिष्ठतेचा भाग म्हणून ज्ञानकोशांचा कल व्यक्तीपूजा टाळण्याकडे असतो याची आपणास कल्पना असेलच, आवश्यक उल्लेखापलिकडे बिरुदावल्या टाळलेल्या बऱ्या असो.
बग
संपादनसर काही दिवसांपासून मी मराठी विकिपीडियावर संपादन करू शकत नाही. प्रस्तुत चित्रात जसे बग दिसते ते माझ्या खात्यानी येते. लॉग आऊट केल्यावर हे येत नाही.कृपा यावर मदत करा. --Tiven2240
- @Tiven2240:,
- गाळण्यांवर @Mahitgar: यांनी काम केलेले आहे तरी ते तुमचे शंकानिरसन करू शकतील.
- अभय नातू (चर्चा) ००:१२, २८ ऑक्टोबर २०१७ (IST)
- @माहितगार:,
- सदस्याचे नाव पूर्णपणे अ-देवनागरी लिपीत असेल (उदा. Tiven2240 किंवा mahitgar) तर कोणती तरी गाळणी येथे सदस्यांना लिहिण्यापासून अडवते आहे. कृपया यात त्वरित लक्ष देउन ती गाळणी बदलावी. मला त्या गाळणीचे नाव कळविल्यास मी ते करेन.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०५:३१, ३१ ऑक्टोबर २०१७ (IST)
- ता.क. मला वाटते आहे की संपादन गाळणी क्र ४, ७, ८, २२, ५२, ५६, ५८, ५९ यांपैकी काही येथे कार्यान्वित होत आहेत. इतर कोणती असल्यास कळवावी.
- सदस्यांना संपादने करण्यापासून अडविणाऱ्या गाळण्या लगेच तात्पुरत्या प्रलंबित कराव्या आणि त्यातील त्रुटी काढून प्रलंबन काढावे
- @Tiven2240:,
- @Abhijeet Safai:,
- मी याचे कारण असणारी मिसकन्फिग्युर्ड गाळणी प्रलंबित केली आहे. अधिक समस्या आल्यास (तुमचा ब्लॉक हटल्यावर) कळवावे म्हणजे इतर गाळण्याचांचेही समीक्षण करता येईल.
- अभय नातू (चर्चा) ०७:१४, ३१ ऑक्टोबर २०१७ (IST)
मुखपृष्ठासाठी काही सूचना
संपादननमस्कार ! मराठी विकिपिडीयाच्या मुखपृष्ठावर अधिक काही नोंदी असाव्यात असे जाणवते आहे. १.ग्रामीण भागातील विद्यार्थी जर हे अधिक संख्येने वापरणे आपल्याला अपेक्षित असेल तर त्यांना आवश्यक अशी माहिती येथे संक्षेपात दिसावी आणि तिचा अंतर्गत दुवा संबंधित लेखाला जोडलेला असावा.उदा.दिनविशेष नोंदविताना त्या दिवशी एखादा ग्रामीण सण उत्सव असेल तर त्याविषयी माहिती असावी.२.मराठी साहित्याकडे वाचक म्हणून समाजाला दिशा द्यायची असेल तर एखादी आशयपूर्ण कविताही मुखपृष्ठ पानावर असावी. त्याविषयीचे लेख गरजेनुसार करता येतीलच.ज्या महिन्यात एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तीचे जन्मदिवस वा पुण्यतिथी असेल त्यांचे सदर आद्ययावत करून ते मासिक सदरात घेता येईल का असा विचार पूर्वनियोजन करून करता यावा. विज्ञान विषयक लेखही असे घेता येतील.३. मासिक सदर काहीवेळा महिन्यापेक्षा अधिक काल दिसते किंवा छायाचित्र ही बरेच दिवस एकच दिसते सातत्याने. याविषयीही अधिक काम व्हावे असे वाटते. काही सहाय्य लागल्यास मी ते देण्यास उत्सुक आहेच. अन्य संपादकांचे मतही यावर अवश्य स्वागतार्ह वाटते. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा)
काही सूचना/सुधारणा
संपादनवरील प्रस्ताव उत्तम आहे आणि त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठाची उपयोगिता वाढून अधिकाधिक वाचक आतील लेख/पाने वाचतील अशी खात्री आहे. त्यात काही सुधारणा सुचवू इच्छितो.
१. मुखपृष्ठावर नवीन विभाग घालतानाच असलेल्या विभागांची उपयुक्ततेचा आढावा घ्यावा व उपयुक्त वाटत नसलेले विभाग काढून टाकावे.
२. हे बदल आधी धूळपाटीवर व्हावे व तेथील चर्चापानावर साधारण आराखडा मांडावा. या आराखड्यातत बदल होणे साहजिक (नव्हे, अपेक्षितच) आहे पण आराखडा असल्याने एकाधिक संपादकांना त्यावर काम करता येईल.
३. नवीन विभागांत लिहू घातलेल्या मजकूराचे लेख (उदा. कविता, सण/उत्सव) असावेत आणि त्या लेखांची पातळी किमान दर्जाची तरी असावी.
४. अशा लेखांची वेगळी रांग असावी (उदा. विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन, विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन, इ.). त्यायोगे येऊ घातलेल्या लेखांवर अनेक सदस्य काम करू शकतील.
इतरही सूचना/सुधारणांचे स्वागत आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १७:५३, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)
टायवीन (सदस्य: Tiven2240 ) ला ब्यान करा
संपादनसदस्य Tiven2240 हा अमराठी भाषांतून सदस्यांना संदेश देता यावेत का? ह्या कौल प्रक्रियेत ढवळाढवळ करीत असलेले दिसून येतआहे. कोणत्याही मतदान प्रक्रियेत प्रचालक याचे शिवाय कोणीही ढवळाढवळ करणे म्हणजे मतदान प्रक्रियेशी छेडणे असे होते. सदस्य Tiven2240 अनेक सदस्यांनी दिलेल्या कौलास वारंवार संपादित करीत असल्याचे दिसते. अभिजित ह्याचा तर त्याने टाइम स्टॅम्प उडवला.
मतदार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने आणि हा अपराध Tiven2240 ह्याने अनेकदा केल्याने त्यास मराठी विकिपीडियावरून त्वरित ब्यान करावे - क्रमश (चर्चा)
- @क्रमश: नमस्कार, मराठी विकिपीडियावर कौल देताना साचा:कौलचे उपयोग होतो. मी फक्त या साच्यानुसार करत आहेत. प्रचालकांना सारव्याची नोंद आहे व मी काय कोणासोबत चर्चा करतो याचीही माहिती आहे. तुमचा संदेश दिला बद्दल धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:४३, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
- टायवीन आपणास हे करण्यास कुणी सांगितले. तुम्ही एक साधारण सदस्य आहात तेव्हा मुकाट्याने काम करा. उत्पात करणे बंद करा. जर प्रचालकांना काळात नसेल तर ते तुमची मदत मागतील हा उगाच चा फाजील शहाणपणा बंद करा. - क्रमश (चर्चा) २१:४५, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
टायवीन (सदस्य: Tiven2240 ) हा सदस्य येथे धमक्या देत आहे त्यास ब्यान करा
संपादन" मी काय कोणासोबत चर्चा करतो याची माहिती आहे ?" - टायवीन हा सदस्य येथे धमक्या देत आहे.
- प्रचालकांनी माझी टायवींच्या विरुद्धचा दुसरी तक्रार नोंदवावी
टैवीन ह्या सदस्याने आपल्या विकीबाहेरील संबंधाचा वापर करून मुस्कटदाबी करून धमक्या दिल्या. स्टुअर्ट सोबत आपले संबंध आहेत आणि म्हणून आपण येथे काहीही केले तरी प्रचालक काहीही करूशकणार नाही असे त्याचे म्हणणे दिसते.
सदस्य टायवीन ह्यास इतर सदस्यांना कमी लेखणे, कौल प्रकियेत गडबडी करणे, त्यावर कुणी हटकले तर त्यांना धमक्या देणे ह्या कारणावरून त्वरित ब्यान करावे. - क्रमश (चर्चा)
- @क्रमश: तुमचे अकाऊंट फक्त विरोध करायला तयार केले आहे का? विकिपीडियावर लेखन केले तर चांगले होईल. व्यक्तिगत आरोप लावू नये. जर तुम्ही काही वेगळे खात्यावरून संपादन करतात व हा खाता फक्त आरोप करण्यास बनवले आहे तर मग checkuser वापरायला लागेल. विकिपीडियाचे वंडाळीसम त्वरित बंद करा. पुढच्या लेखनात शुभेच्छा --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१३, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240:
- सदस्य:क्रमश यांच्या सूचनेत तथ्य आहे. विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन#टायवीन (सदस्य: Tiven2240 ) ला ब्यान करा येथे नमूद केल्यानुसार, व तपासले असता असे दिसले कि, आपण सदरहू प्रक्रियेत विनाकारण सदस्यांनी टाकलेल्या सही/मजकूरात ढवळाढवळ करीत आहात.आपणास हवे असेल तर तेथे आपली प्रतिक्रिया आपण देऊ शकता. आपली अशा प्रकारची कृती त्वरीत थांबवावी अशी मी आपणास विनंती करतो. आपण याची गंभीरतेने दखल व नोंद घ्याल अशी आशा आहे.दोघांनीही वृथा वाद बंद करावा ही पण विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:१९, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
- @क्रमश:
- सदस्य:Tiven2240 यांना गंभीर सूचना देण्यात आलेली आहे याची आपणही कृपया नोंद घ्यावी ही विनंती. त्यांची अशाप्रकारची कार्यवाही पुढेही सुरू राहिली तर पुढील प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल.दोघांनीही वृथा वाद बंद करावा ही पण विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:१९, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
@अभय नातू: वरील सूचनेच्या माहितीसाठी.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:१९, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
@V.narsikar: धन्यवाद मी तुमच्या शब्दांचा मान ठेवत आहे. :) परंतु मला हे खाते फक्त वंडाळीसम करीता बनवले आहे असे वाटत आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३४, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
- नोंद घेतली.
- नरसीकरजी हे हाताळीत असल्याने अधिक चर्चा न वाढविता तटस्थ रहात आहे.
- अभय नातू (चर्चा) ०८:४८, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
मतदान हस्तक्षेप प्रकरण
संपादनवरील चर्चेवर माझी निरीक्षणे (ऑब्झर्व्हेशन्स)
संपादनएखाद्या सदस्याने वेगळ्या नावाने अथवा ( येथे प्रचलित असलेला शब्द) "पाळीव" सदस्यखाते तयार करून कोणावर विनाकारण भलतेसलते आरोप-प्रत्यारोप करणे येथे नवीन नाही.पण काही-काही आरोपात खरोखरीच महत्त्वाच्या सूचना किंवा तथ्थ्ये दडलेली असतात. त्याकडे निव्वळ दुर्लक्ष करणे शक्य नाही व येथे असे कदापीही दुर्लक्ष होत नाही.
(१) सदस्य:क्रमश यांची निरीक्षणे त्यांनी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन#टायवीन (सदस्य: Tiven2240 ) ला ब्यान करा येथे नोंदविलीत. ती खरे तर बरोबरच आहेत.याबद्दल वाद नाही.पण या सदस्याचा अशी मागणी करण्यामागचा हेतू हा पूर्ववैमनस्य अथवा दुखावल्या गेल्यामुळे वचपा काढणे असा एकंदरीने वाटत आहे.प्रथम एखाद्यास उद्युक्त करणे, ज्याने त्या सदस्यास राग येतो व रागाच्या भरात नंतर त्याने केलेल्या निवेदनामधील कोणतेही एखादे सूत्र पकडून त्या सूत्रास विस्तारीत करणे व अद्वा-तद्वा विधाने करणे असे साधारण अशा प्रकरणांमध्ये दिसते.एखाद्याच्या सहनशक्तीचा पूर्ण कस लागतो.'तू माझी खोडी काढतो काय? आता बघच मी ही वार करतो.' अशी काहीशी भावना या वादात उत्पन्न होते.अशा प्रकरणात काही हितसंबंधही गुंतलेले राहू शकतात अथवा कोणाबद्दल गैरसमज पसरविणे हापण एक हेतू असू शकतो.हे सर्वकाही अर्थातचा मला व आपणास नवीन नाही.
(२) त्यावर उत्तर/प्रतिक्रिया म्हणून सदस्य:Tiven2240 यांनी नोंदविलेलेही बरोबरच आहे. सदरहू सन्माननीय सदस्यांनी विकिवर येथील संपादनाव्यतिरिक्त व सदस्यखाते तयार करण्याव्यतिरिक्त पूर्वी एकही संपादन केलेले नाही. एक शब्दच काय, एक अक्षर नव्हे, तर किमान एखादा पूर्णविराम अथवा स्वल्पविरामही नाही.हे मी देखील तपासले.
(३)त्यानंतर, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन#टायवीन (सदस्य: Tiven2240 ) हा सदस्य येथे धमक्या देत आहे त्यास ब्यान करा ही दुसरी मागणी आल्यावर मी चर्चेत उडी घेतली व सारवासारव केली, तंबी दिली. बडगा उगारल्याशिवाय अनेक गोष्टी नियंत्रणात येत नाहीत पण तसे करणे खरेतर फारच अप्रिय असते. सदस्य:Tiven2240 यांनी माझे विनंतीस मान देऊन माघार घेतली.त्यांना धन्यवाद देतो.
(४) या प्रकरणी अधिक वैयक्तिकरित्या विस्तृत तपास केला असता, तथाकथित खात्यावरुन आरोप करणाऱ्याचा अंकपत्ता मिळाला आहे व तो कोण याचा अदमासपण आला आहे.आज रात्रीपर्यंत चित्र अधिक स्पष्ट होईल.तंत्रज्ञानाने बरीच मजल गाठली आहे त्याचा हा परिपाक.तो अंकपत्ता मी सध्या उघड करणार नाही कारण त्यास अधिकृतता नाही.हा प्रकार पुढे सुरू राहिला तर,विकिवरील मार्गिका वापरून, अधिकृत माहिती मिळवून त्यायोगे विकिच्या नियमांनुसार नाईलाजाने योग्य कार्यवाही करावी लागेल.अर्थातच, तो अंतिम व अप्रिय निर्णय असेल.
(५) ज्या कारणाने हा बखेडा उत्पन्न झाला, ती कारणे निरस्त करावीत, म्हणजेच अमराठी भाषांतून सदस्यांना संदेश देता यावेत का? या प्रस्तावावर टायविन यांनी केलेली अनावश्यक संपादने उलटवावीत. अशी कार्यवाही करणे येथे योग्य ठरेल काय? @अभय नातू: यावर आपले उत्तर जर 'होय' असेल तर,अशी प्रशासकीय कार्यवाही करावी ही विनंती.काही वेगळे मत असेल तर कृपया नोंदवावे.
--वि. नरसीकर , (चर्चा) ११:०१, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
(ता.क.:हे प्रकरण उद्भवले नसते तर विकिवर अजून २-३ लेखांची भर पडली असती.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:०८, ११ नोव्हेंबर २०१७ (IST))
- टायवीन यांनी कौलांमध्ये केलेले बदल पाहिले. त्यांत साच्याचा वापर दुरुस्त करुन कौल योग्य प्रकारे दिसावा यासाठीचे बदल दिसत आहेत. कौलांमध्ये किंवा इतर सदस्यांनी मांडलेल्या मतांमध्ये मटेरियल[मराठी शब्द सुचवा] बदल केलेला दिसत नाही.
- असे असता AGF या तत्त्वानुसार टायवीन यांचे बदल कायम ठेवावे असे माझे मत आहे.
- सदस्य:क्रमश: यांनी मराठी विकिपीडियावरील कौलांमध्ये ढवळाढवळ होऊ नये यासाठी संदेश दिला असे मी मानतो. यात क्रमशः यांचा थोडा गैरसमज झाल्याचे वाटते. तरी त्यांवरही ताशेरे ओढण्याचे कारण नाही.
- दोघेही (क्रमशः आणि टायवीन) हे मराठी विकिपीडियाच्या भल्यासाठीच काम करीत आहेत असे समजून हे काम दोघेही पुढे चालू ठेवतील ही आशा व अपेक्षा.
- तरी दोन्ही बाजूंना AGF तत्त्व लावून हे प्रकरण दप्तरदाखल करावे ही विनंती.
- अभय नातू (चर्चा) १७:३०, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @V.narsikar आणि अभय नातू:
- उपरोल्लेखित चर्चेत सदस्य:V.narsikar (प्रचालकही) म्हणतात -
“ | पाळीव सदस्यखाते तयार करून कोणावर विनाकारण भलतेसलते आरोप-प्रत्यारोप करणे येथे नवीन नाही.पण काही-काही आरोपात खरोखरीच महत्त्वाच्या सूचना किंवा तथ्थ्ये दडलेली असतात. त्याकडे निव्वळ दुर्लक्ष करणे शक्य नाही व येथे असे कदापीही दुर्लक्ष होत नाही. | ” |
- यावरुन हे (V.narsikar, प्रचालक) पाळीव खात्यांना प्रोत्साहीत करतात किंवा त्यांचे समर्थन करतात.
- तसेच
- सदस्य:अभय नातू यांनीही त्यानंतर नरसीकरांच्या या विधानाविषयी काहीही मत मांडले नाही यावरुन तेही (अभय नातू, प्रचालक) नरसीकरांच्या या विधानाचे मूक समर्थन करतात.
- (अन्य संदर्भ - विकिपीडियाचा मागील इतिहास)
- -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४५, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
- नरसीकरजी त्यांच्यावरील आरोपाचे खंडन करतीलच पण मी पाळीव खात्यांबद्दलच्या नरसीकरजींच्या विधानाचे मूक समर्थन करतो हे विधान मला हास्यास्पद वाटते.
- मी येथे टायवीननी काय केले व त्याउप्पर पुढे काय करावे यावर नरसीकरांनी मागितलेले मत दिले. पाळीव खात्यांबद्दलची ही चर्चा नाही. मुद्दामहून पाळीव खात्यांबद्दलची चर्चा येथे उकरुन काढणे हे खोडसाळपणा असू शकेल पण पुन्हा एकदा AGF गृहित धरुन तो दहिवळांचा गैरसमज आहे असे मी मानतो व त्यास जाहीर न करता पाळीव खाती राखणे हे चुकीचे आहे इतकेच प्रत्युत्तर देतो.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २३:१९, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
नमस्कार! बरेच दिवसांनी आपला सहभाग नोंदविल्याचे दिसले.आपण येथील चर्चेत 'यावरुन हे (V.narsikar, प्रचालक) पाळीव खात्यांना प्रोत्साहीत करतात किंवा त्यांचे समर्थन करतात.' या केलेल्या विधानाचे मी खंडन करीत आहे. सध्या व पूर्वीही माझी कधीही अशाप्रकारची भूमिका राहिलेली नाही.आजवर येथे केलेल्या संपादनातून व वाचनातून हे निरिक्षण मी नोंदविले आहे. कोणाचा त्यापोटी काही गैरसमज होत असेल तर त्यावर माझे काहीच नियंत्रण नाही.तरी आपले मनात झालेला माझेबद्दलचा गैरसमज कृपया दूर करावा ही विनंती. चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:२२, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
माझे मत
संपादन@V.narsikar: पाळीव म्हणून वरील सांगितलेले शब्दांशी सहमती आहे. परंतु मतदान मध्ये मी फक्त २ संपादन केले होते ते म्हणजे आर्या जोशी व Abhijeet Safai यांचे मत {{कौल}} मुटबिक करणे. नोंद घ्यावी @अभय नातू: यांचे हे प्रस्ताव माझ्याकरीता व अन्य विकीमेडिअन्स करीता म्हणत्वचे आहे याकरिता मी साचानुसार व्यवस्तीत केले होते. या प्रस्तावमुळे मी पूर्वी ब्लॉक झालू होतू, या प्रस्ताव मुले मराठी विकिपीडियावर एक प्रचालक आपल्या प्रचालक शक्तीचा दुरुपयोग करण्यास काढण्यात आला आहे. हा प्रस्ताव मराठी विकिपीडियावर नवीन क्रांतीची सुरुवात आहे यामुळे थोडे उत्सुकता आहे. चुकीमुळे क्षमस्व --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:१९, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
- येथील या प्रकरणावर झालेली विस्तृत चर्चा व अभय नातूंनी केलेली 'अझ्युम गुड फेथ'ची सूचना स्वीकारुन ही चर्चा पूर्ण झाली आहे असे जाहिर करण्यात येते.चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:२२, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
प्रचालक श्रीहरि
संपादननमस्कार,
सदस्य:श्रीहरि हे येथील पहिल्या काही प्रचालकांपैकी एक आहेत. डिसेंबर २००७नंतर त्यांचे संपादन येथे दिसत नाही तरी ते प्रचालकपदातून मुक्त होण्यास पात्र आहेत. त्यांना मी याबद्दल एक संदेश दिलेला आहे.
माहितीखातर.
अभय नातू (चर्चा) ०८:०३, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
- याची विनंती m:Steward requests/Permissions#श्रीहरि@mrwiki वर नोंदली आहे. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १४:३०, ११ डिसेंबर २०१७ (IST)
सहप्रकल्प
संपादनमराठी विकिपीडियाचे सहप्रकल्प मराठी विकिस्रोत व मराठी विक्शनरीवर कुठलेही प्रचालक सक्रिय नाही. कृपा यावर काय करायचे आपले मत व्यक्त करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:१०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
- विकिस्रोतावर सक्रिय प्रचालक नसल्यास खालील पर्याय आहेत -
- १. बिना प्रचालक प्रकल्प चालेल तसा चालू देणे. जर या प्रकल्पावर क्वचितच बदल होत असतील तर असे होऊ देणे ठीक वाटते.
- २. तेथील सदस्यांनी प्रचालकपदासाठी अर्ज करणे. यासाठीचे तेथील निकष काय आहेत याची खात्री करुन घेणे फायदेशीर ठरेल.
- ३. प्रकल्प बंद करुन टाकणे. असे होऊ नये हे माझे वैयक्तिक मत आहे व वरील दोन पर्यायांपैकी एक चोखाळता येईल अशी आशा आहे.
- अभय नातू (चर्चा) १७:१५, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
विनंती
संपादननमस्कार अभय,
मराठी भाषा पंधरवड्या निमित्य महाराष्ट्र शासनतर्फे मंत्रालयात "मराठी विकिपीडिया कार्यशाळा" मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिनांक १२ जानेवारीस आयोजित करण्यात येत आहे. तश्या आशयाचा राज्यपालांचा आदेश (शासन निर्णय ) महाराष्ट्र शासनाच्या सांकेतिक स्थळावर येथे ठेवलेला आहे. ह्या कार्यशाळेत मंत्रालयातील वेगवेगळ्या विभागातील ६० पेक्ष्या ज्यास्त अधिकारी/कर्मचारी यांनी नोंदणी केली आहे. ह्या कार्यशाळेस प्रशिक्षक म्हणून योगदान देणाऱ्या विकिपीडियन्स पैकी श्री हरीश सातपुते आणि अस्मिता पोटे ह्यांना खाते विकासक हा अधिकार दिनांक १० ते १३ जानेवारी साठी देण्यात यावा अशी मी विनंती करीत आहे. दोन्ही प्रशिक्षक हे मराठी विकिपीडियावर अनेक वर्षापासून कार्यरत आहेत तसेच हरीश ह्यांनी मराठी विकिपीडिया ह्यक्याथोन आणि अस्मिता ह्यांनी मराठी विकिपीडिया महिला संपादनेथॉन हे उपक्रम ह्या पूर्वी यशस्वीरीत्या संयोजित केलेल्या आहेत.
धान्यवाद
राहुल देशमुख २२:४७, ९ जानेवारी २०१८ (IST)
नमस्कार,
मंत्रालयातील कार्यशाळेसाठी सदस्यांची खाते बनवण्यासाठी मला खाते विकासक हा अधिकार देण्याची विनंती - ̺ अस्मिता २३:३१, ९ जानेवारी २०१८ (IST)
नमस्कार,
मंत्रालयातील कार्यशाळेसाठी सदस्यांची खाते बनवण्यासाठी मला खाते विकासक हा अधिकार देण्याची नम्र विनंती - Harish satpute (चर्चा) ०४:४६, १० जानेवारी २०१८ (IST)
- कृपा नोंद घ्यावी मराठी विकिपीडियावर सदस्यांची खाते बनवण्यासाठी काही वेगळे गट तयार करण्यात आले नाही सद्या त्यासाठी कायद्यानुसार विनंती विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#प्रशासकांच्या (स्वीकृती अधिकारी) अधिकारांत बदलवर टाकली आहे जर काही जास्त समर्थन भेटले तर काही लवकर होऊ शकतो. धन्यवाद --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 ०६:५३, १० जानेवारी २०१८ (IST)
मराठी विकिपीडियावर चित्रे
संपादनमराठी विकिपीडियावर १२,०००+ असे चित्र आहेत त्यात प्रताधिकार विषयक परवाना उपलब्ध नाही गेल्यास आहे. ते सर्व चित्र काढण्यासाठी पात्र आहेत. ती सर्व चित्र वगळण्यास विनंती. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:१८, १४ जानेवारी २०१८ (IST)
- मी आज ४,९९९ चित्र काढण्यास {{विनापरवाना}} टाकला आहे. वर्ग:१५ जानेवारी २०१८ पासून विनापरवाना --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:०७, १५ जानेवारी २०१८ (IST)
- प्रस्तुत विनंती करून २ महिने पार पडले आहे.--टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:१९, २२ मार्च २०१८ (IST)
- @Tiven2240:
- कृपया या बाबतीत राहुल देशमुख (सदस्य:Rahuldeshmukh101) यांचे मत घ्या. त्यांनी या विषयात काम केलेले आहे तरी त्यांच्याशी मसलत करणे आवश्यक आहे.
- अभय नातू (चर्चा) ०९:१८, २२ मार्च २०१८ (IST)
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेत सहभागासाठी आवाहन
संपादनही लेखन स्पर्धा सुरु होवून दोन महिने झाले आहेत.अखेरच्या मे महिन्यात आपल्या समुदायाकडून चांगले योगदान होण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो हे सुचवावे. मी चावडीवर आवाहन केले आहे.व्यक्तिगत संदेश पाठविले आहेत. मुखपृष्ठ साईट नोटीस असायला हवी असे वाटते.ती कृपया टाकावी. दिलेल्या यादीत बरेच विषय आहेत, तरीही आपल्या दृष्टीने महत्वाच्या अशा ५०० लेखांची यादी करण्यास सुरु करूया का?
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:११, २७ एप्रिल २०१८ (IST)
@अभय नातू, Tiven2240, आणि सुबोध कुलकर्णी: नमस्कार! नमस्कार! ज्ञानकोश संपादित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी संपादकांनी त्या लेखाचा आणि त्याच्या आशयाचा विचार कसा करावा याची मार्गदर्शक तत्वे ठरवणे गरजेचे वाटते आहे. आणि ती जर आधीच असतील तर त्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागणार आहे असे वाटते आहे. विश्वकोश ,संस्कृतीकोश यांच्या कामात संपादक समिती असते जी हे निर्णय करते. मराठी विकिपीडियाचा मुक्त ज्ञानकोश आणि त्याचा वाढता वाचकवर्ग लक्षात घेता हे तातडीने करावे अशी नम्र विनंती! सहकार्याच्या आणि प्रतिसादाच्या अपेक्षेत. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १२:३६, २३ मे २०१८ (IST)
- @Tiven2240:
- तुम्ही यावर काम केलेले आहे. अशी मार्गदर्शक तत्वे (guiding principles) कोठे आहेत का? नसल्यास ती येथे तयार करावी या वरील प्रस्तावाला अनुमोदन. असल्यास ती पडताळून मराठी विकिपीडियासाठी दुरुस्त करुन लागू करावी.
- अभय नातू (चर्चा) २०:३५, २३ मे २०१८ (IST)
@अभय नातू: मार्गदर्शक तत्वे टायगर स्पर्धेसाठी की मराठी विकिपीडिया साठी? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:४४, २३ मे २०१८ (IST)
- @Tiven2240:, प्रोजेक्ट टायगर साठी. -- अभय नातू (चर्चा) २१:४७, २३ मे २०१८ (IST)
- @अभय नातू आणि आर्या जोशी: प्रोजेक्ट टायगर साठी मार्गदर्शक तत्वे विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा या पानावर नियम या विभागात माहिती दिली आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:५२, २३ मे २०१८ (IST)
@अभय नातू, Tiven2240, आणि सुबोध कुलकर्णी:
नमस्कार! मला केवळ टायगर स्पर्धेसाठी नियमावली अपेक्षित नसून एकूणातच विकीवरील सर्वच लेखांच्या संपादनासाठी नियमावली अपेक्षित आहे.संपादकांच्या व्यक्तीगत आकांक्षा या जर लेखात अभिव्यक्त होत असतील तर ते ज्ञानकोशीय लेखनास अपेक्षित असे होणार नाही.यासाठी तटस्थपणे पण आपण लिहित असलेल्या लेखाचे आशय व मांडणी याचा सारासार विचार होणे गरजेचे वाटते.अन्यथा संपादकांच्या व्यक्तीगत आस्था आणि मते लेखात प्रतिबिंबित झाली तर हा ज्ञानकोश वापरणार्या सर्वसामान्य समाजगटाची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १२:१०, २४ मे २०१८ (IST)
- नमस्कार @आर्या जोशी: मराठी विकिपीडिया व इतर भाषिक विकिपीडिया आपल्या पाच आधारस्तंभ वर आधारित आहे. त्याची माहिती आपल्याला विकिपीडिया:पाच आधारस्तंभ वर भेटेल. विकिपीडियावर अनेक धोरण उपस्तीत आहेत. त्याची माहिती आपल्याला वर्ग:विकिपीडिया आवश्यक व वर्ग:विकिपीडिया धोरण वर भेटेल. जर आपल्याला एक नवीन धोरण किव्हा धोरणात सुधारणी कराची असेल तर आपण विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे वर आपला प्रस्ताव टाका. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१५, २४ मे २०१८ (IST)
Technical administrators
संपादनइंटरफेस/अॅडमिनीस्ट्रेटर, टेक्निकल प्रचालक/अॅडमिनीस्ट्रेटर असे नवीन अधिकार सर्व विकिपीडियावर देण्यात येणार आहेत. हे अधिकार मूळ प्रचालक अधिकारांंचाच एक भाग आहे. प्रचालक हे लवकर .js , .css आणि मिडियाविकी गॅजेट
संपादित करू शकत नाही. यासाठी मराठी विकिपीडियावर एक धोरण तयार करण्यात येणार आहे. Css आणि js ची किमान मूलभूत माहिती असणे, विकिमीडिया विकिची गोपनीयता अपेक्षांची जाणीव असणे, आणि खात्याच्या सुरक्षिततेची चांगली समज असण्याऱ्या सदस्यांना हे अधिकार देण्यात येणार आहेत. सध्या, एका विकीवर २ असे प्रचालक असणे गरजेचे आहे व किमान ६ महिने निष्क्रिय असण्याऱ्या सदस्यांचा हा अधिकार काढण्यात येईल.जे प्रचालक या अधिकारसाठी विनंती करतील त्यांना हे अधिकार देण्यात येईल. इतर सदस्य यासाठी विकिपीडिया:अधिकारविनंती येथे विनंती करू शकतात. प्रशासक व प्रतिपालक हे अधिकार देतील.
मराठी विकिपीडिया समुदायाला धोरणात बदल करण्याचे अधिकार आहेत.यासाठी सर्व सदस्य आणि प्रचालकांना ७ दिवसांची मुदत आहे. आपले मत/विचार कृपया खाली नोंदवावे. मराठीत या अधिकाराला काय म्हणूया? यासाठी सुद्धा मत नोंदवा.
अधिक वाचन:
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२०, १६ जुलै २०१८ (IST)
चर्चा
संपादन@Pooja Jadhav, आर्या जोशी, Sureshkhole, संतोष दहिवळ, आणि Aditya tamhankar:@सुबोध कुलकर्णी, Pushkar Ekbote, ज, प्रसाद साळवे, आणि संदेश हिवाळे:कृपया आपले मत खाली नोंदवा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:२५, २० जुलै २०१८ (IST)
- या अधिकाराचे नाव बदलून इंटरफेस अॅडमिनीस्ट्रेटर केले गेले आहे. @अभय नातू आणि V.narsikar: याचे मराठी नाव तांत्रिक प्रचालक असे असले पाहिजे की इंटरफेस अॅडमिनीस्ट्रेटर/प्रचालक? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२९, ६ ऑगस्ट २०१८ (IST)
- तांत्रिक प्रचालकच ठीक वाटते. -- अभय नातू (चर्चा) ०७:०६, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
मत
संपादन- पाठिंबा - अभय नातू
- पदनाम - तांत्रिक प्रचालक - अभय नातू (चर्चा) ०८:३४, १९ जुलै २०१८ (IST)
- पाठिंबा- वि.नरसीकर. - V.narsikar
- पदनाम - तांत्रिक प्रचालक - या पदनामास समर्थन - --वि. नरसीकर , (चर्चा) ०९:३५, २० जुलै २०१८ (IST)
- पाठिंबा- sureshkhole. - sureshkhole
- पदनाम - तांत्रिक प्रचालक - WikiSuresh (चर्चा) १२:४२, २० जुलै २०१८ (IST)
नवा सदस्य गट सक्षम करण्यासाठी
संपादन- मी अनेकदा अलिकडच्या संपादनांवर लक्ष ठेऊन त्यातील संपादने साचे लावून, आवश्यक सुधारणा करुन, प्रताधिकार भंगासाठी तपासून वेगळे करत असतो.
- मी आपल्याला गाळण्यांच्या दृश्यतेसाठी आधीही सूतोवाच केलेले आहे. तेव्हा या ठिकाणी[१] आधीच झालेल्या ठरावा अंतर्गत.
- निरिक्षक (new page reviewer), संपादन गाळणी मदतनीस(Edit filter helper) हे दोन अधिकार मागत आहे.
- या ठिकाणी हे नवे सदस्य गट सक्षंम करण्याची चर्चा आणि कौल आधीच झालेला आहे त्यामुळे कुठलीही तांत्रिक अडचण नसावी असे मला वाटते. WikiSuresh (चर्चा) ००:३३, २६ जुलै २०१८ (IST)
- @Sureshkhole: चर्चा व कौलची दुवे द्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:०४, २६ जुलै २०१८ (IST)
- @Tiven2240: उपरोक्त अर्जात दुवे पुर्वोल्लेखीत आहेत, या उपर कोणत्या दुव्यांची पृच्छा करित आहात हे मजला समजले नाही.WikiSuresh (चर्चा) ०८:०३, २६ जुलै २०१८ (IST)
- या ठिकाणी हे नवे सदस्य गट सक्षंम करण्याची चर्चा आणि कौल आधीच झालेला आहे याचे दुवे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:०५, २६ जुलै २०१८ (IST)
- [२] येथे ही चर्चा उपलब्ध आहे, सदर चर्चेत मी मागत असलेल्या अधिकारांविषयीचा निर्णयही झालेला आहे. त्यात "अर्ज करुन इतर इच्छुक आणि पात्रता असणाऱ्या सदस्यांनी हा अधिकार मिळवण्याची सुविधा आहे." (हाच दुवा मी आधीही दिला होता, शिवाय तो सध्या आपल्या चर्चेच्या खालीच लगोलग दिसत आहे, तरी नजरचुकीने आपल्याला तो दिसला नसावा!)
- ठीक. कृपया नोंद घ्यावी हे अधिकारविनंती पान नाही. अधिकार विनंती साठी मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:अधिकारविनंती असे पान उपलब्ध आहे. आपण तिथे उपलब्ध असलेले अधिकारांची विनंती करू शकता. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:५२, २६ जुलै २०१८ (IST)
@अभय नातू:@V.narsikar:, विपीचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच नवीन संपादकांचे लेखन पाहून त्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी WikiSuresh यांनी मांडलेला प्रस्ताव उचित आहे असे वाटते.आपल्यासारख्या अनुभवी प्रचालकांनी नवीन जबाबदाऱ्या घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन देऊन सक्षम करायला हवे असे माझे मत आहे. त्यासाठी ही जबाबदारी सुरेश यांना देण्यास माझा पाठींबा आहे. या कामाची गरज व इतर अनुषंगिक चर्चा तसेच कौल प्रक्रिया पूर्वीच झालेली आहे. परंतु कोणीही पुढाकार न घेतल्याने इतका काळ हे प्रलंबित राहिले असे दिसते. तरी आता लवकर यावर पुढील कार्यवाही करावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५२, २८ जुलै २०१८ (IST)
- वाचले. --वि. नरसीकर , (चर्चा) २२:०७, २८ जुलै २०१८ (IST)
- विकिपीडिया:अधिकारविनंती येथे मी म्हणत असलेले पर्याय उपलब्ध नाहीत. तेव्हा विनंती करण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. WikiSuresh (चर्चा) २२:३२, २८ जुलै २०१८ (IST)
@Tiven2240: सदस्य सुरेश खोले यांचे म्हणण्यानुसार, उपरोक्त पर्याय उपलब्ध करून द्यावा ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५७, २९ जुलै २०१८ (IST)
@Sureshkhole:आपण (इंग्रजी विकिवर दिलेले) उपरोक्त पदांचे निकष पूर्ण करता काय याचे कृपया आपले विनंतीत योग्य ते विवेचन द्यावे ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५७, २९ जुलै २०१८ (IST)
@सुबोध कुलकर्णी, Sureshkhole, आणि Tiven2240:
- इंग्रजी विकितील en:Wikipedia:New pages patrol/Reviewers व en:Wikipedia:Edit filter helper
या पानांचे येथे भाषांतर करून हवे आहे.ते उपलब्ध झाल्यानंतर, कोणासही ते वाचता येईल व ही दोन पदे म्हणजे काय याचे आकलन होऊ शकेल.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५७, २९ जुलै २०१८ (IST)
मराठी विकिपीडियावर निरिक्षक
संपादनमराठी विकिपीडियावर निरिक्षक (new page reviewer) असे सदस्य अधिकार असणे आवश्यक आहे का? NPP हे पेज क्युरेशन (page curation) स्क्रिप्ट चालवण्यासाठी एक अधिकार आहे. इंग्लिश विकिपीडियावर हे स्क्रिप्टचे अधिक गैरवापर चालू होते व ते रोखण्यासाठी या अधिकारा गटचे निर्माण करण्यात आले होते. मराठी विकिपीडियावर असे स्क्रिप्ट आहेतच नाही तर हे अधिकार सक्षम करण्याची गरज मला वाटत नाही. प्रचालक नवीन पानावर नजर ठेवत असतात. त्यात सुरेश सुद्धा त्यांची मदत करत आहे असे दिसत आहे. प्रचालकांचे काम कमी करण्यासाठी सुरेश मदत करत आहेत त्याबद्दल धन्यवाद. पेज क्युरेशन हे स्क्रिप्ट मराठी विकिपीडियावर असले तर त्यांनी खूप मोठे प्रकारावर उत्पात होण्याची शंका आहे. याबद्दल ट्विनकल याची चर्चा सुद्धा चावडीवर झाली होती. सुरेश याना विकिपीडियावर संपादन, देखरेख साचे व सुधारण्यासाठी साचे लावण्यासाठी NPP अधिकाराची गरज नाही.
संपादन गाळणी मदतनीस
संपादनसंपादन गाळणी मदतनीस (Edit filter helper) हे विकिपीडियावर संपादन गाळणी चाचणी/सुधारण्यासाठी एक अधिकार आहे. सुरेश याना संपादन गाळणी काशी चालते व नवीन कसे बनवतात याबाबत माहिती असेल तर मी त्यांचे स्वागत करतो. आपण एक उधारण द्यावे ज्यांनी याची पुष्टी होईल. मराठी विकिपीडियाचे सुरक्षता बाबत प्रचालक जबाबदार आहेत. असे फार महत्वाचे टेक्निकल जबाबदारी फक्त तांत्रिक माहिती असलेली लोकांनाच द्यावे असे माझे मत आहे.
धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२५, २९ जुलै २०१८ (IST)
- @V.narsikar: होय, ह्या पानांचे भाषांतर लवकरच मराठीत मी आणतो, जेणेकरुन आपण म्हणता तसे ते सर्वांना उपलब्ध होईल. आपली सूचना खूप महत्त्वाची आहे.
- गाळण्या आणि नवीन पानांच्या निरीक्षणाच्या इतरही व्यवस्था आहेत. त्यांची माहिती मी लवकरच मराठीत आणीनच.
- संपादन गाळण्यांद्वारे नवीन संपादने गाळून त्यातील वेगवेगळ्या बाबीं गाळल्या जातात जेणेकरुन त्याची शहानिशा करणे सोपे होते. ज्यां गाळण्यांमधील संदर्भाविना मोठा मजकूर, अपशब्द गाळणी, संदर्भाविनाची संपादने, प्रताधिकार भंग शंका असलेला मजकूर इ. वेगळे काढले जाते. मला गाळण्यांद्वारे वेगळे काढलेली संपादने तपासून त्याद्वारे मी आधिही करत असलेले प्रताधिकार भंगा विरुध्दचे काम पुढे न्यावयाचे आहे.
- म्हणूनच नवीन पानांचीही ह्याच साठीची तपासणी होणे आवश्यक आहे. आणि पेज क्युरेशन स्क्रिप्ट चालू करणे फ़ार मोठे काम नाही शिवाय इतर पर्याय जसेकी टूल मराठीसाठी लागु करणे सुध्दा शक्य आहे.
- बाकी टायवीन यांच्या एकूण रोखावरून त्यांना मला हे दोऩ्हीही अधिकार मिळावे असे अपेक्षित नाही असे दिसते. मी या उपर काहीही लिहिण्यास नकार देत आहे आणि ही विनंती येथेच थांबवत आहे. आपण पुऩ्हा एकदा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्यांचा हुरुप घालवण्याचे काम केले आहे हे ही मी नोंदवत आहे.
- ह्या बद्दलची सर्व तांत्रिक माहिती सर्वांना खुली करण्याचा नरसीकर दादांची सुचना मात्र मी पाळत आहे. लवकरच तांत्रिक माहिती मराठीत नविन पानांवर उपलब्ध होईल. WikiSuresh (चर्चा) १८:२५, २९ जुलै २०१८ (IST)
@अभय नातू:@V.narsikar: सुरेश यांनी आम्हला वेगेवगल्या विषयांवर सहाय्य केले आहे. तांत्रिक विषयाची त्यांना माहिती आहे. या विकीचा दर्जा सुधारण्यास असलेल्या त्यांच्या सूचनांना माझे अनुमोदन आहे आणि आवश्यक ती जबाबदारी सुरेश यांना देण्यासही माझा पाठिंबा आहे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १८:३६, १ ऑगस्ट २०१८ (IST)
@आर्या जोशी: मध्यंतरी मी विकिवर उपलब्ध नव्हतो.वरील एकूण विवेचनावरून असे दिसते कि, सदस्य सुरेश खोले यांनी, 'विनंती येथेच थांबवित आहे' असे आपल्या संदेशाचे वर असलेल्या संदेशात नमूद केले आहे. या बाबतीत त्यांना पुढे जायचे असेल तर त्यांनी, मी वर नमूद केल्याप्रमाणे, रितसर विनंती करावयास हवी. ती प्राप्त झाल्यावर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. सध्या प्राप्त परिस्थितीत, हा प्रस्ताव 'जैसे थे' आहे याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:३३, १ ऑगस्ट २०१८ (IST)
- मी इथे विनंती नोंदवली, तेव्हा मी आधीचे या विषयावरील निर्णयाचा दुवा दिला होता. तो दुवा मला दोनदा द्यावा लागला कारण तो टायवीन यांना दिसला नाही.
- जेव्हा तो दुवा दिसला तेव्हा त्यांनी मला अधिकार विनंतीवर विनंती नोंदवण्यास सांगितले (कारण त्यांच्यामते हे अशा विनंतीसाठीचे पान नाही). त्या दुव्यावर मी मागत असलेले अधिकाराची विनंती करण्याची सोय नाही हे मी सांगितले ते ही टायवीन यांना कळले नाही.
- त्यापुढे त्यांनी मला पदांचे निकष पूर्ण करता का हा प्रश्न इथेच विचारला. आता मला कळत नाही की, जर हे अधिकार विनंतीचे पान नाही तर मग टायवीन हे मला इथे का प्रश्न विचारीत आहेत?
- त्यांनी स्वत:च मी मागत असलेल्या अधिकारा विषयी एकाची गरज नाही असे घोषीत केले (ज्या त्यांच्या निर्णयाबाबत मला आक्षेप आहेत!). दुसऱ्याविषयी पुढे कसे जायचे ह्याविषयी काहीच माहिती न देताच. शिवाय तांत्रिक ज्ञानाची(?) गरज आणि जबाबदारीचा मुद्दा समोर आणला!
- त्यानंतर मी गाळणीचा कसा वापर करणार आहे हे सांगितल्यावरही माझ्या उत्तरावर काहीही न बोलता मौन बाळगले आहे.
- अधिकार विनंती दुव्यावर मी मागत असलेले अधिकारांबाबत विनंती करण्याची सोयच नाही, हा मुद्दा कदाचित टायवीन यांना कळलेला दिसत नाही किंवा तो टाळला आहे.
- शिवाय इतर कोणतेही प्रचालक सक्रिय नसल्याने, शिवाय वरील सर्व संवादावरून टायवीन यांच्याशी संवादच शक्य नाही तर हा प्रस्ताव त्यांच्याकडून पुढे जाणे शक्य नाही. यावर मी काय करणे अपेक्षित आहे?
- उपरोक्त संवादावरून मराठी विकिच्या सुरक्षिततेच्या रक्षणासाठी आणि पुढील विसंवाद टाळण्यासाठी काय अपेक्षित आहे हे सूज्ञांस काय सांगावे?
WikiSuresh (चर्चा) २२:२७, १ ऑगस्ट २०१८ (IST)
माझे मत
संपादन१. मराठी विकिपीडियावर नवीन पानांसाठी निरीक्षक आणि गाळणी मदतनीस या दोन्ही कार्यांची आवश्यकता नक्कीच आहे.
- १.१ जसजसे नवीन संपादक मोठ्या प्रमाणात येथे येतील तसतसे नवीन पानांची संख्याही वाढत जाईल. अशा पानांची, विशेषतः नवीन सदस्यांकडून तयार होणाऱ्या पानांची गुणवत्ता आपल्याला अपेक्षित आहे इतकी नसते. सध्या अनुभवी सदस्य हे काम जमेल तसे करतात. जर असे निरीक्षक असले तर त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक प्रमाणात सोपविता येईल.
- १.२ या कामासाठी लागणारी उपकरणे असल्यास ती अशा निरीक्षकांना देता येतील. या उपकरणांचा गैरवापर होणे (मुद्दाम किंवा अनवधानाने) सोपे असते त्यामुळे ही उपकरणे अनुभवी व थोडेसे तांत्रिक ज्ञान असलेल्या सदस्यांनाच देण्यात यावी.
२. गाळणी निरीक्षक - वरील प्रमाणेच.
@Tiven2240:, @Sureshkhole:,
- येथे १.१ आणि १.२ दोन्ही एकाच वेळी होणे आवश्यक नाही. तांत्रिक बाबतीत अननुभवी सदस्यांना ते शिकविणे सोपे असते. विकिपीडियावर काम करणारे, तेही असे अनग्लॅमरस काम करणारे सदस्य मिळणे कठीण असते म्हणून छोट्यामोठ्या कारणांवरुन अशा सदस्यांना परावृत्त करू नये.
- असे असता या दोघांनी वरील गोष्टी कशा करता येतील या बद्दल मत द्यावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:४९, ६ ऑगस्ट २०१८ (IST)
@अभय नातू: सद्या ही चर्चा सुरेश याना हा अधिकार देण्याबाबत आहे. आपण ही चर्चा धोरण चावडीवर नेले तर नवीन सदस्यगट त्यावर चर्चा करता येईल. मी जसे वर म्हणालो मराठी विकिपीडियावर पेज क्युरेशन टूल उपलब्द नाही व हे अधिकार इंग्लिश विकिपीडिवर ते चालवण्यास दिले जाते. आणि संपादन गाळणी बाबत या ठिकाणी सुरेश याना त्याची माहिती/अनुभव नाही. इतर तांत्रिक माहिती असलेले सदस्यांना हे अधिकार बाबत आपण धोरण चावडीवर चर्चा करू. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:०२, ६ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- मी येथे sureshkhole यांना ही जबाबदारी तरी द्यावी असे म्हणत आहे. एकदा हे काम सुरू झाले की त्यासाठी काय साधने उपलब्ध आहेत, त्यांसाठी काय अधिकार लागतील आणि ते द्यायचे कि नाही ही चर्चा करता येईल.
- हे काम केल्यावर sureshkhole यांना लागणाऱ्या माहिती व साधनांबद्दल कल्पना येईल व त्याद्वारे पुढील धोरणात्मक चर्चाही सुलभ होईल.
- अभय नातू (चर्चा) ०५:१७, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू: नवीन पानांसाठी निरीक्षक याबद्दल पूर्वी चर्चा करा. मोठे विकिपीडियावर त्याचे उपयोग साचे/टॅग लावण्यास येते. तसेस sureshkhole याना हे जबादारी देण्यास माझे समर्थन आहे परंतु पेज क्युरेशन हे मराठी विकिपीडियावर आले की यांनी नक्कीच मोठे प्रमाणात उत्पात होण्यास शक्यता आहे. एकाद्या सदस्याला विनाकारण जे सादन उपलब्ध नाही ते करून व त्यांनी होणाऱ्या उत्पातचे जबाबदार मी नाही. मी पेज क्युरेशन वापरले आहे व त्यामुळे इंग्लिश विकिपीडियावर तडीपार सुद्धा झालो होतो. त्यांच्याकडे या संपादन उलटण्यास मनुष्यबळ आहे परंतु मराठीवर नाही. पूर्वी ट्विनकल हे मराठी विकिपीडियावर येण्यासाठी आपण स्वतः म्हटले की मोठ्या प्रमाणात उत्पात होण्याची शक्यता आहे. पेज क्युरेशन अधिक प्रगत आहे. व संपादन गाळणी याचे अधिकार प्रचालकांना दिले आहे मी जसे वर सुरेश याना म्हटलं आपण एक उदाहरण द्यावे त्यावर त्यांनी त्यांचे नांमकन बंद करून दिली. त्यांच्याकडे त्याची माहिती आहेच नाही असे स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे जबाबदारी तरी द्यावी असे करणे शक्य आहे परंतु त्याचे परिणाम जे काही चांगले वाईट त्यामुळे मराठी विकिपीडियाचे सुरक्षता पासून खेळण्यासारखे आहे. मी त्यांना हा जबारारी देण्यासाठी विरोध नाही केला परंतु सुरक्षता मुद्दे पहाची जबादारी प्रचालक म्हणून करायला लागेल. ऑटो विकी ब्राउझर वरील होण्याऱ्या उत्पात बदल सुद्धा मी सुरक्षपणे बंद केला. नक्की यावर एक धोरण व एक सदस्य गटचे प्रस्ताव सद्या त्यावर माझे काम चालू आहे ते लवकर चावडीवर येईल. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:४७, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- तुम्ही विसंंवादी सूर का लावीत आहात हे कळले नाही. मी sureshkhole यांना लगेचच सगळी साधने द्या असे कोठे म्हणले आहे? उलट, आधी त्यांना जबाबदारी द्या आणि नंतर गरजेनुसार साधने (जी ते स्वतःही शोधू शकतात) द्या असे म्हणले आहे. मोठ्या विकिपीडियांवर होते म्हणून तसेच झाले पाहिजे असे नाही हे माझे मत कायमच आहे आणि आत्ताही आहे. मोठ्या विकिपीडियावर मनुष्यबळ असते, आपल्याकडे नाही म्हणून काही गोष्टी वेगळ्या प्रकारे कराव्या लागतील, त्यातीलच एक ही.
- तुम्हाला (किंवा इतर कोणालाही) जबाबदार ठरविण्याचे कोठून आले हे कळले नाही तरी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आपण जी पावले घेऊ त्यांसाठी आपण सगळेच जबाबदार आहोत.
- सुरक्षिततेशी खेळणे हे जरा जास्त गंभीर वाटते. इतके सीरियसली घेऊ नका हा मैत्रीपूर्ण सल्ला. आणि साधने नसताना सुरक्षितता आत्ता आहे त्यापेक्षा कमीजास्त कशी होईल?
- असो. माझ्या म्हणण्याचा मथितार्थ आधी (साधनांशिवाय, किंवा ज्याद्वारे जास्त गडबड होण्याची शक्यता नाही अशा साधनांसह) काम सुरू होऊ देत. कालांतराने जसे लागेल तशा सोयी आपण (मराठी विकसमाज) उपलब्ध करुन देऊ हा आहे.
- अभय नातू (चर्चा) ०६:५९, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
@अभय नातू:, एकदा नारसिकरांचे मत ग्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३९, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
प्रश्नांना उत्तरे
संपादनमी उपरोक्त अधिकार का मागितले आणि आता तांत्रिक उपलब्धतांमध्ये काय शक्य आहे याचा परत एकदा आढावा घेत आहे.
- एका वाक्यात सांगायचे झाले तर नविन आलेली आणि जुनी गाळणीने नोंदवलेली सगळी प्रताधिकार भंगासाठी, उत्पाताची संपादने शोधून काढून त्यांना कारवाईसाठी समोर आणणे आणि पानांचे वर्गिकरण, साचे लावणे. यांत प्रचालकांच्या बरोबरीने काम करणे. ह्यातही माझा हेतू प्रताधिकार भंग आटोक्यात आणणे आणि लेखांचा दर्जा सुधारत नेणे हा आहे. शिवाय सदस्यांच्या अनुभवा नुसार मी त्यांच्यावर होऊ शकणाऱ्या कारवाईची मागणी करित असतो हे ही माझ्या इतिहासावरून स्पष्ट दिसते आहेच. अनेक नविन सद्स्यांनी केलेला प्रताधिकार भंग मी नोंदवताना काळजी घेतली आहे तसेच जुन्या धेंडाच्या बाबतीत कडक कारवाईची मागणीही केली आहे.
- सुरक्षितता आणि गांभिर्याने घेणे आणि टायवीन यांच्यावर या सगळ्याबद्दल जबाबदारी असणे हे सगळे वाचून माझे सकाळी सकाळी भरपूर मनोरंज झाले आहे. टायवीन यांना त्यांच्या विनोदी योगदानाबद्दल धन्यवाद!!! (त्यांनी अगदी सद्भावना गृहीत धरणे घोकण्यापेक्षा प्रत्यक्षात आणावे हा सल्ला!!!) क्षणभर मला अधिकार देणे हा टायवीन यांच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे की काय अशी भिती वाटली.
- जिथे मराठीत अशी अवजारे उपलब्धच नाहीत तिथे ती हाताळण्याचा अनूभव कसा असेल? आणि तो नाही म्हणून अधिकार नाकारणे आधी कोंबडी की अंडे हा प्रश्न उभे करण्याइतपत हास्यास्पद आहे.
- नातू यांचे मत मला पटते, पहिले टप्प्या टप्प्याने जायला हरकत नाही. आणि तसेही मी काही हजारो पानांमध्ये एकाच वेळी गोंधळ करणार नाही, नजर चुकीने काही झाले तरी ते एखाद्या-दुसऱ्या पानासाठी होईल. आत्तापर्यंत सिध्द झालेली एकच चुक मला माझ्याकडून झालेली आठवत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणांचा किती बाऊ करावा हे सूज्ञांस काय सांगावे.
- नरसीकर दादांनी आधीच सहमती दर्शवली आहे, या चर्चेनंतर त्यांनी आपले मत द्यावे. मला काहीही निर्णय असेल तो मान्य आहेच, काम तर तसेही चालु आहेच त्याची गती सध्या कमी आहे एवढेच. WikiSuresh (चर्चा) ११:५३, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
- @V.narsikar: आपले मत द्यावे. म्हणजे ही विनंती निकालात निघेल. सुरेश खोले संवाद हवा? १०:५५, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
- सुरेश खोलेंना त्यांनी मागणी केलेले अधिकार देण्याबाबत माझी सहमती आहे. अहो! पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे कसे येणार? फक्त आवश्यक त्या बाबी संबंधीत सदस्य पूर्ण करतात किंवा कसे हेच फक्त बघायचे आहे.समजा काही गोंधळ झाला तरी तो उलटवता येतो किंवा दुरुस्त करता येतो. विकित तशी सोय आहे. एखादा गोंधळ झाल्याने काही स्फोट होत नाही. अनेक सदस्यांकडून भूतकाळात असे झाले आहे, किंबहूना, माझेकडूनही असे अनेक वेळा झालेले आहे. फक्त जबाबदारीने काम करावयाची खात्री हवी.'टू अर इज ह्यूमन' हे सूत्र ध्यानात घ्यावयास हवे. अभय नातूंचे यावरील मत ध्यानात घेऊन पुढे कार्यवाही करण्यास मी सकारात्मक आहे. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:५८, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
- खोले हे मराठी विकिपीडियावर असलेले चांगले संपादक आहेत. त्याचा हा उत्साह पाहून मी मराठी विकिपीडियावर नवीन सदस्य गटाचे प्रस्ताव टाकले आहे. प्रस्ताव इथे पाहता येईल. हे अधिकार फक्त खोले याना नाही तर सर्व सदस्य जे प्रचालक नाही त्यांना सुद्धा देता येईल. संपादन गाळणी याबद्दल अभय नातू थोडे संशोधन करून काम करतील अशी आशा आहे. ते जर थोडे विलंब केले तर चांगले होईल तर त्यावर सुद्धा उपाय काढता येईल. पेट्रोलरचे प्रस्तावावर समुदायाचा समर्थन भेटेल अशी आशा. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:१३, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
संदर्भ
संपादन- ^ "विकिपीडिया:कौल/जुने कौल ४". विकिपीडिया. 2012-01-07.
- ^ "विकिपीडिया:कौल/जुने कौल ४". विकिपीडिया. 2012-01-07.
स्वागत साचा
संपादननमस्कार @अभय नातू आणि V.narsikar:,
मराठी विकिपीडियावर एकाद्या नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी आपण {{स्वागत}} साचा वापरतो. सद्या असलेले साचा याचे विस्तार २००७/८/९ या वेळी झाला. त्याच्या नन्तर त्यात काही खास बदल केले गेले नाही. २०१७ मध्ये जेव्हा मी मुखपृष्ठ नूतनीकरण करत असताना मी त्यावेळी त्या मुखपृष्ठाच्या आधारावर (जे आता प्रकाशित आहे) स्वागत साचा सुद्धा बनवला. तो साचा सदस्य:Tiven2240/welcome2017वर पाहता येईल. या साच्यात विकिपीडियावर असलेले धोरण, नवीन सदस्यांना मार्गदर्शन व विकिपीडिया:सही याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. रंगीन असल्यामुळे वाचक सुद्धा आकर्षीत होतात. यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आपण या नवीन साच्यात उचित बदल करून याला मूळ साच्यात विलीन करावा. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:४३, ४ ऑगस्ट २०१८ (IST)
- मला हा साचा उपयुक्त वाटत आहे. हा साचा वापरला जावा यास माझा पाठिंबा आहे.
- यातील मजकूर {{स्वागत}} साच्यात घातला असता सगळ्या सदस्यांना नवीन संदेश मिळेल परंतु त्याला माझी हरकत नाही, किंबहुना असेच व्हावे असे वाटते, ज्यायोगे नवीन सहाय्य व इतर उपयोगी पानांकडे जुन्या सदस्यांचेही लक्ष जाईल.
- अभय नातू (चर्चा) १२:०४, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
स्वातंत्र्य दिन लोगो
संपादनप्रशासक @अभय नातू:,
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर आपण मराठी विकिपीडियाचा लोगो बदलला तर ते चांगले दिसेल असे माझे मत आहे. मी एक नवीन प्रतिमा अपलोड केली आहे आणि ते बाजूला पाहिले जाऊ शकते. सद्या चाललेले संपादन अभियानाला सुद्धा यांनी प्रोत्साहन भेटेल. तांत्रिक माहिती आपल्याला इथे भेटेल --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:४४, १४ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- यासाठी ३ रेझोल्युशन/आकाराची चित्रे लागतात. ती तयार आहेत का?
- अभय नातू (चर्चा) २१:२७, १४ ऑगस्ट २०१८ (IST)
- ते ऑनलाइन आपण करू शकता, कॉमन्सवर मूळ चित्र उपलब्ध आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२४, १४ ऑगस्ट २०१८ (IST)
@अभय नातू: आपले आभारी, धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०५:१२, १५ ऑगस्ट २०१८ (IST)
प्रचालकांना नोंद
संपादन- Sureshkhole (चर्चा · स्थानांतराची नोंद · रोध नोंदी · अपभारणे) block User
- प्रसाद साळवे (चर्चा · स्थानांतराची नोंद · रोध नोंदी · अपभारणे) block User
- संदेश हिवाळे (चर्चा · स्थानांतराची नोंद · रोध नोंदी · अपभारणे) block User
या तिन्ही सदस्यांना दिनांक २१ जुलै २०१८ रोजी यांच्या वादामुळे अंतिम निर्णय चर्चा:बाबासाहेब अांबेडकरवर दिला आहे. याचा अंतर्गत जर हे सदस्य कुठल्याही संदर्भात एक दुसऱ्यावर वाद/व्यक्तिगत हल्ला किव्हा विकिपीडियाचे तत्कालीन धोरण विरुद्ध काम केल्यास अनंत काळपर्यंत तडीपार केले जाईल. याची नोंद प्रत्येक प्रचालकांनी घ्यावी व उल्लंधन करण्यास एकही ताकीद न देता तिन्ही सदस्यांना वाद घालण्यास तडीपार करावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:०२, २१ जुलै २०१८ (IST)
तांत्रिक प्रचालक अधिकार
संपादनमराठी विकिपीडियावर तांत्रिक प्रचालक असे नवीन सदस्य गट तयार करण्यात आले आहे. सद्या प्रचालक काही महत्वपूर्ण पाने संपादन करू शकत नाही. मराठी विकिपीडियावर हा अधिकार मिळवण्यास मी Tiven2240 (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल) विनंती करत आहे. प्रशासक @अभय नातू: यांनी २४ तास ही विनंती धरून ठेवा. जर कोणतेही गंभीर आक्षेप सापडले नाहीत तर मला अधिकार द्या. तोपर्यंत मराठी विकिपीडिया समुदाय आपले मत नोंदवू शकतो. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:३३, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:, तांत्रिक प्रचालक या प्रस्तावित धोरण पानावर एकाच ओळ आहे. याची आधी स्पष्टता समुदायाला येणे आवश्यक आहे असे वाटते. शिवाय ही महत्वपूर्ण पाने कोठली? तसेच २४ तास कालावधीत समुदाय आपले मत नोंदवू शकतो हे विधान आपणास योग्य वाटते का? तात्पुरत्या प्रचालकाला हा अधिकार शक्यतो देऊ नये असे मला वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३६, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:
- समुदायाचे मत घेतल्याशिवाय कोणत्याही महत्त्वाच्या पदाचे वाटप करणे हाच मुळात गोंधळ आहे, ही विनंती कुठे द्यायची हेच जिथे टायविन यांना समजलेले नाही त्यावरून ही विनंती फ़ेटाळली जाणेच योग्य आहे, शिवाय आधीच्या कामाचे(तात्पूरत्या प्रचालक पदाचे) योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय कोणतेही नविन अधिकार देण्यात येणे चुकीचे आहे.
- शिवाय २४ तासात द्यायला एवढी काय घाई आहे. तांत्रिक प्रचालक रिकामे राहिले तरी चालते त्याने कोणतेही आकाश सध्या कोसळत नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ११:४४, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- नमस्कार सुरेश व सुबोध,
- कदाचित आपल्याला या अधिकार बदल माहिती नसावी व कदाचित माहिती असून सुद्धा काही प्रश्न विचारण्यास वाटले असेल असे आपल्या मतातून दिसत आहे. असो, आपल्याला त्याची माहिती असण्याची गरजेचे आहे. मराठी विकिपीडियावर या अधिकार बाबत चर्चा नेहमी मी व फौंडेशनची कर्मचारी आपल्याला देत असत. कदाचित आपली नजर त्यावर गेली नाही असेल. आपल्याला याबाबत चर्चा पहायचे असेल तर आपण विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/जुनी चर्चा ३#Technical administrators पाहावे. कर्मचारी यांनी पाठवलेले संदेश आपल्याला इथे, इथे आणि इथे भेटेल. जर आपल्याला इंग्लिश मजकुर समजत नाही आपण मशीन भाषांतर किव्हा प्रचालक नारसिकर याना सांगून मराठीत भाषांतर घेऊ शकता.
- आपल्या माहितीसाठी: तांत्रिक प्रचालक हे मूळ प्रचालक अधिकाराचे एक भाग आहे. मी नेहमी मराठी विकिपीडियावर तांत्रिक कामे करत आहे. याची माहिती आपल्याला आहे व प्रशासक याना सुद्धा आहे. हे अधिकार मी विदमान प्रचालक असल्यामुळे इथे (प्रशासकांचे चावडीवर(bureaucracts noticeboard)) विनंती करण्यास योग्य आहे व हे इथले नाही तर सर्व विकिपीडियाचे औपचारिकता आहे आणि अनुभवी सदस्यांना यांची माहिती आहे. इतर सदस्य ज्यांना तांत्रिक माहिती आहेत व जे .css आणि .js बाबत माहिती ठेवतात ते विकिपीडिया:अधिकारविनाती यावर आपले नामनकन करू शकतात.
- आपल्या माहितीसाठी: हे अधिकार मिळवण्यास प्रचालकांना कौल किव्हा समुदायाचे मत घेण्यासाठी गरजेचे नाही कारण प्रतिपालक ते प्रचालक जे तांत्रिक काम करतात त्यांना विनंती केल्यावर देत आहे आणि ते जास्त ते प्रचालकांना हे अधिकार देतात जे यावर काम करत आहेत. हे अधिकार मला प्रशासक देतील यात शंका नाही परंतु मराठी विकिपीडियावर प्रशासक सक्रिय आहे आणि हे औपचारिकता आहे की ते अधिकार बदलाची जबाबदारी घेतात. मी २४ तास फक्त आपले मत बाबत पाहण्यास प्रतीक्षेत होतो आणि ते आलेले आहे. नोंद घ्यावी नवीन अधिकार देण्यास विदमान अधिकाराची मूल्यांकन बाबत नवीन गैरसमज निर्माण करू नये. प्रशासकांना अधिकार आहे ते माझ्यातून हे तात्पुरता प्रचालक अधिकार काढण्यास, त्यासाठी काही वेळ किव्हा वाट पाहण्याची गरज नाही आणि हे जेव्हा हा पद संपेल तेव्हा विदमान प्रचालकांना ते मूल्यांकन करण्यास अधिकार आहे आणि समुदाय नाही तर प्रचालक मंडळी त्यावेळी निर्णय घेतील की यापुढे हा अधिकार देण्यात येईल का नाही. त्यावेळी त्याबाबत सुद्धा आपल्याला काही महिन्यात शंका येईल. कृपया विकिपीडिया:प्रचालक हे पूर्वीच वाचून ठेवा कारण मी आता जास्त चर्चेत नाही तर कामात विश्वास ठेवत आहे. आपल्या मत दिल्याबद्दल धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:१९, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- वाचले.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:२०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- लगेचच हव्या असलेल्या बदलांचे काही नमूने येथे द्यावे ज्याने तुमचा मुद्दा स्पष्ट होईल.
- @Sureshkhole आणि सुबोध कुलकर्णी:,
- हे अधिकार प्रचालकांचेच अधिकार आहेत आणि आता वेगळे केले गेले आहेत हे Tiven2240चे म्हणणे खरे आहे. असे असताही त्यांनी उदाहरणे दिल्यावर हा मुद्दा स्पष्ट होईल. समर्पक उदाहरणे मिळे पर्यंत किंवा अजून २४ तास यांपैकी जे आधी होईल तोपर्यंत हे अधिकार Tiven2240 यांना देत नाही आहे. त्यानंतर ७ दिवसांसाठी तात्पुरते अधिकार दिले जातील. दरम्यान Tiven2240 हा मुद्दा अधिक विषद करतील ही अपेक्षा.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १९:२६, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू:
- जर आपल्याला इंग्लिश मजकुर समजत नाही आपण मशीन भाषांतर किव्हा प्रचालक नारसिकर याना सांगून मराठीत भाषांतर घेऊ शकता.
- आणि हे जेव्हा हा पद संपेल तेव्हा विदमान प्रचालकांना ते मूल्यांकन करण्यास अधिकार आहे आणि समुदाय नाही तर प्रचालक मंडळी त्यावेळी निर्णय घेतील की यापुढे हा अधिकार देण्यात येईल का नाही. त्यावेळी त्याबाबत सुद्धा आपल्याला काही महिन्यात शंका येईल. कृपया विकिपीडिया:प्रचालक हे पूर्वीच वाचून ठेवा कारण मी आता जास्त चर्चेत नाही तर कामात विश्वास ठेवत आहे.
- तांत्रिक प्रचालक हा मुद्दा समजला आणि जुना झाला, पण माझे मत हे आहे की, जर सध्या साध्या प्रचालकाच्या अधिकार कपात होऊन जर हे वेगळे तांत्रिक प्रचालकाचे अधिकार येत असतील तर ते टायवीन यांना दिले गेले जाऊ नयेत. त्यांचे अधिकार कमी आहेत तेच बरे आहे. उपरोक्त स्पष्टीकरणातच त्यांची उद्दाम भाषा स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अधिकार कमी झाले असतील तर ते उत्तमच आहे. मी फ़क्त टायवीन यांना दिल्या गेलेल्या सहा महिने मुदतीचा मान राखून त्या आधी त्यांचे पद काढण्याचा प्रस्ताव मांडत नाहीये एवढचं.
- माझ्या उपरोक्त विधानाची कारणमिमांसा टायवीन यांच्या प्रचालकीय योगदानाच्या मूल्यांकनात करूयात. सध्या समुदायातला एक सक्रिय सदस्य म्हणून माझा टायवीन यांना कसलेही नविन अधिकार मग ते नव्या नावाने त्यांच्याकडे असलेले जुने अधिकारच का असेनात द्यायला पाठींबा देऊ शकत नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २०:१२, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू: सद्या तर {{Ambox}} हा साचा योग्यपने चालत नाही. त्यासाठी आवश्यक बदल करायचे आहे. विशेष/तांत्रिक माहिती असलेले सदस्यांना संदेश टाकला आहे आणि जवाब अपेक्षित आहे. काही नवीन गॅजेट/स्क्रिप्ट विकीवर आणायचे आहेत त्यात .json/css ची संपादने अपेक्षित असू शकते. सद्या यावर घाई नाही. परंतु लवकर अधिकारी लोक या सदस्य अधिकारात नवीन बदल करतील ते असं की प्रचालक सुद्धा संपादन इतिहास पाहू शकत नाही. अधिक माहिती आपल्याला इथे भेटेल. त्यावेळी अजून तांत्रिक संपादन करण्यास त्रास होईल अशी अपेक्षा आहे. यावर आपले विचार मान्य केले जाईल. जर मी हा अधिकार चालवण्यास पात्र नाही तर ही विनंती आपण बंद करावे. आवशक असल्यावर आपल्याला पुन्हा चर्चापानावर कोड देईल कारण आपण प्रशासक आपल्यामुळे फक्त खाली ती संपादने तुम्ही करू शकता. कदाचित पेट्रोलर व संपादन गाळणी संपादक अधिकार त्यांना भेटले नाही तर ते हडबडले आहेत, पूर्वी महिलांची वकिली व आता २३५ सक्रिय सदस्यांचे वतीने बोलणाराने सदस्यांवर मला काहीही स्पष्टीकरण देण्याचे नाही. ते आपले काम करतील व मी माझे. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:१४, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- कदाचित पेट्रोलर व संपादन गाळणी संपादक अधिकार त्यांना भेटले नाही तर ते हडबडले आहेत, पूर्वी महिलांची वकिली व आता २३५ सक्रिय सदस्यांचे वतीने बोलणाराने सदस्यांवर मला काहीही स्पष्टीकरण देण्याचे नाही.
- हा माझ्यावर वैयक्तिक आरोप आहे आणि ही जर प्रचालकाच्या पदावर असलेल्याची भाषा असेल तर, अधिकार न मिळाल्याने कोण आपली पायरी सोडतयं ते स्पष्ट दिसतयं. मला कसल्याही पदाची किंवा अधिकाराची भूक नसून काम करायला जे पाहिजे ते मागितले होते, आता ते देण्याची सध्याच्या काही प्रचालकांची इच्छा नसल्यास मी काय करणार त्याला?
- मी सक्रिय सदस्य म्हणुन बोललोय सगळ्यांच्या वतीने नाही. प्रचालक पदासाठी आवश्यक गांभिर्य आणि परिपक्वता टायवीन यांच्याकडे बिलकूल नाही हे वरील विधांनांवरून स्पष्ट होते.
यापूढे मला आता मूल्यांकनाच्या दिवशीच बोलायाचे आहे, तेव्हा हवा तो गोंधळ घाला सद्भावनेच्या नावानी टायवीन यांनी घालावा सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:०१, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
ता. क. टायविन यांचा उताविळपणा एवढा वाढला आहे की, त्यांनी मी लावलेले साचे कुठलेही कारण न देता किंवा चर्चा न करता फ़क्त काढलेच नाही तर Athletics abbreviations Bot Bombay या पानांवर संपादन युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे सत्ता न मिळाल्यास चवताळणे कोणी केले आहे हे उघड आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:२०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- येथे दोन-तीन गोष्टी स्पष्ट करीत आहे
- १. काम करण्याच्या आड प्रक्रिया कधीही येऊ देऊ नका. हा फॉर्म भरला का? तिथून शिक्का मारला का? या साहेबांची सही आणली का? ही असली थेरे करायला आपण सरकारी कार्यालय नाही आहोत.
- काम करणे सुरळित होण्यासाठी प्रक्रिया गरजेची आहे पण प्रक्रिया हेच काम नाही. <-- हे येथेच नाही, इतर ठिकाणीही लक्षात घ्या. खूप फायदा होईल.
- २. काम करण्यासाठी प्रक्रियेत फेल-सेफ[मराठी शब्द सुचवा] आणि मर्यादित कालावधीसाठी बदल करणे हितावह आहे. प्रक्रियेकरता काम अडून पडले आणि मग सदस्यांचा इंटरेस्ट गेला किंवा सदस्यच गेला तर काम तसेच राहणार. फुकटची कामे करणाऱ्यांना नसत्या प्रक्रिया पार पाडायला न लावता त्यांच्याकडून अधिकाधिक काम करुन घेणे हेच येथे पाहिजे.
- ३. प्रक्रियेतील बदलांचा कोणी गैरफायदा घेतला तर त्यावर कडक कार्यवाही करावी आणि पुढे असे प्रक्रियाबदल जपून करावे. अझ्यूम गुड फेथ या तत्त्वाचा पुरस्कार करावा आणि ट्रस्ट बट व्हेरिफाय हे तत्त्वही लावावे.
- वरील एक उदाहरणातील बदल करण्यासाठी @Tiven2240: यांनी माहिती गोळा करावी आणि नंतर मला संदेश द्यावा त्यात बदलांचा आराखडा (बदल नव्हेत) द्यावा. त्यानंतर २४ तासांसाठी हा अधिकार त्यांना दिला जाईल. जर असा अधिकार (२४ तासंसाठीही) न देता वरील बदल घडवून आणणे कोणाला शक्य असल्यास कळवावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १९:१२, ३० ऑगस्ट २०१८ (IST)
पुन्हा एकदा
संपादनवैयक्तिक हमरीतुमरी सुरू झालेली आहे. किती वेळा हे चालणार? यापुढे वैयक्तिक हेवेदावे दिसल्यास लगेचच काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- @Sureshkhole:, जर मूल्यांकनाच्या वेळी लिहायचे असेल तर ते येथे दोन-तीनदा लिहून पुन्हा नंतर बोलेन असे लिहिण्यात काय हशील? हे म्हणजे काम करुन पुन्हा नामानिराळे होण्याचा प्रकार आहे. जर मूल्यांकन करायचे तर करा पण करीत नसल्याचा आव नको. याशिवाय, इतर ठिकाणी चाललेल्या संपादनयुद्धाचा तांत्रिक प्रचालक अधिकाराशी संबंध नाही. मुद्दे एकमेकात घोळू नयेत.
@Tiven2240:, कोणत्या सदस्याने कोणाची वकिली केली याचा येथील मुद्द्याशी काय संबंध? येथे त्याचा उल्लेख कशाला?
येथे शब्दाने शब्द वाढतो आहे. हे अनेकदा झाले आहे. लगेचच थांबवा.
अभय नातू (चर्चा) १९:१२, ३० ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू: आपले मत दिल्याबद्दल धन्यवाद. या चर्चेत फक्त २ लोक आहेत आणि ज्यांच्या संदर्भात हे आहे त्यांना त्याबद्दल ठाऊक आहे. ही विनंती तांत्रिक प्रचालक या संदर्भात होती आणि पुन्हा नेहमी प्रमाणे त्याची दिशाभूल केले गेले आहे. असं नाही की त्यांना तांत्रिक प्रचालक काय आहे व त्यांनी काय फायदा विकिपीडियाला होईल याबद्दल माहिती नाही, परंतु टायविन हे तांत्रिक प्रचालक नाही झाले पाहिजे हे त्यांचे स्पष्ट मत आहे.(इतना प्यार😊) असो सर्वांचे वेगळे वेगळे मत असते. माझे मते २ वेळी त्यांनी गंभीर परस्तीती त्यांनी निर्माण केले आहे आणि त्यांना मी ताकीद सुद्धा दिली आहे आणि गंमत अशी की ते मला धमकी देतात की ते माझ्यावर कारवाही करतील. तरीही त्यांच्यात अझुम गुड फाइथ मी ठेवले आहे. या पुढे त्यांना गुड फेथच्या नावांनी मी तर आसरा देणार नाही याची आपण माहिती घ्यावी. असते; एका वेळी, दोन वेळी, परंतु हे तर चालू आहेत आणि आपली समुदायाच्या नावांनी फक्त मोठे मोठे बोलतात. (पेट्रोलर हे तर मुख्य उधारण आहे). ते विकिपीडियावर संपादन नाही तर दुसर्यांना त्रास देण्यासाठी आहेत. आणि त्यांचे मनाप्रमाणे झाले नाही तर मग त्याचे खेळ चालू. (पुढे कारवाही करण्याची धमकी). ते प्रचालकांना आपले गुलाम समजतात की ते जसे बोलतील तसे प्रचालक करतील. जे सदस्याला Bot या पानाचे मराठी मध्ये पुनर्निर्देशन का केले आहे याची जाणीव नाही त्यांच्याबद्दल अझुम गुड फेथ ठेवून काय फायदा हे तर मूर्खपणा आहे असे मला वाटते. मूल्यांकनाच्या वेळ येईल तेव्हा पाहूया परंतु त्यांना घाई झाली आहे की त्यांना त्याची संधी/भाव कधी भेटेल. साईटोईड शिवाय त्यांनी मराठी विकिपीडियाला काहीही तांत्रिक बाबतीत मदत केली नाही परंतु मी तांत्रिक प्रचालक नाही झाले पाहिजे यासाठी समुदायाचे सर्वात सक्रिय सदस्यांच्या वतीने बोलण्यास ते प्रथम उभे आहे. ते सक्रिय फक्त चर्चेत आहेत, टायविनला चर्चापानावर इंग्लिश मध्ये धमकी देण्यास आणि त्याचे पुरावे शोधणे ज्याचे आतापर्यंत काहीही फायदा झाले नाही. ते फक्त सुरेश आहेत त्यामुळे मराठी विकिपीडियावर ३ सक्रिय सदस्य कंटाळून संपादने सोडली आहेत आणि याला पुरावेची गरज नाही ते प्रचालक आणि प्रशासक सर्वांना माहीत आहे. मला आता पर्यंत समजले नाही की ते मराठी विकिपीडियाचे प्रचालक टायविनला इंग्लिश शिकवतात की चाचणी घेण्यात की त्याला इंग्लिश येते की नाही? असो व्यक्तिगत तर बोलायचे नाही परंतु नेहमी प्रमाणे गुड फेथ च्या नावाने चर्चा बंद करूया नेहमी पुन्हा काही नवीन मुद्यावर हे तर चालू राहील. त्यांची सवय मी तर बदलू शकत नाही परंतु सगळ्या गोष्टींत त्यांचे फुकट सल्ला घेण्यास शोभा देत नाही. त्यांचे असे बोलणे आहे की प्रचालकला मराठी चांगली येत नाही त्यामुळे ते तांत्रिक प्रचालक बनण्याचे लायक नाही हे तर स्पष्ट मूर्खपणा आहे. असो त्यांना प्रचालकपद हे मुकुट वाटते परंतु जबादारी त्यांच्या स्वभावात दिसत नाही. असो जसे मी म्हटले की मी त्यांचे मन तर बदलू शकत नाही परंतु माझे प्रचालकीय कामात अडथळा निर्माण केली तर त्यांना मी बक्षणार नाही. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:३५, ३० ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू आणि V.narsikar:
पुन्हा वैयक्तिक आरोप केला जातोय आणि अनावश्यक मुद्दे समोर आणले जात आहेत जसेकी,
- माझे योगदान काय? आपण प्रचालक आहात तपासून पहा काय योगदान दिले आहे मी? वैयक्तिक आरोप नकोत!
- मी सक्रिय सदस्यांपैंकी आहे की नाही? - वैयक्तिक आरोप!
- प्रताधिकार भंग आणि उत्पाती सदस्यांवर कारवाईची मागणी - त्रास देणे म्हणून? - वैयक्तिक आरोप!
- माझी इंग्रजी - पुन्हा वैयक्तिक आरोप?
- मी प्रचालक होण्याची इच्छा कधीच व्यक्त केलेली नाही, तरीही टायवीय यांना मला प्रचालक व्हायचे आहे असे का वाटते आहे? तसे असते तर मी सोज्वळ राहिलो असतो आणि गोडगोड बोललो असतो. - वैयक्तिक आरोप आहे.
- मला माझे प्रताधिकार भंग आणि निरिक्षकाचे काम करण्यात जास्त रस आहे. - - वैयक्तिक आरोप!
- माझ्यासाठी दोनदा मुर्ख हा शब्द टायवीनने वापरलेला आहे - शिविगाळ
माझ्यावर सूडबुद्धीने आरोप केल्याबद्दल, टायवीन यांनी अपमानास्पद वागणूक केल्या बद्दल आणि प्रचालक पदाचा गैरवापर करून मला धमक्या दिलेल्या आहे, हे सूड-सत्रच सूरू केलेले आहे, ह्याबद्दल टायविन यांनाच अवरुद्ध करण्यात यावे आणि अशी मी विनंती करत आहे.
- तांत्रिक प्रचालकाची विनंती फ़ेटाळण्यासाठीची योग्य पार्श्वभूमी टायविन यांनी स्वत:चा उद्दामपणा दाखवून पुन्हा एकदा केलेली आहे. वरील टायवीन यांच्या उपरोक्त विधानानंतर माझा त्यांच्याबद्दल असलेला उरला सुरला सगळा विश्वास संपलेला आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:३७, ३० ऑगस्ट २०१८ (IST)
- टायवीन खरे आहे.केवळ आणि केवळ सुरेश खोले यांच्यामुळेच मी मराठी विकिपीडिया संपादन थांबवले आहे. मी लेखावर काम करत असतांना त्यात व्यत्यय आणून मला मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न केला. व प्रशासकांनी काम चालू साचा लावून मी संपादन करत असताना खोले यांनी मला संपादनात आडथळा आणला तरी खोले यांनाच मोकळे रान दिले.
- सदर सदस्यानी मराठी विकिपीडियाचे खूप नुकसान केले आहे. अनेक लोक त्यांना कंटाळले आहेत.चर्चा आणि तीही नेहमीच भांडणाच्या आवेशाने यामुळे सदस्य कंटाळले आहेत.
- खोले यांना कायम ब्लॉक करणे हे मराठी विपि साठी हितावह आहेच. तो सुदिन लवकर येवो.. सत्य परेशान हो सकता है पराजीत नही. परंतु तो पर्यंत आनेकार्थी नुकसानच..
- मी तरी खोले आहेत तो पर्यंत संपादन इच्छा असूनही बंद ठेवाणार आहेच. प्रसाद साळवे (चर्चा) ०६:४९, ३१ ऑगस्ट २०१८ (IST)
- खोलेंमुळे मराठी विकिपीडियाला नुकसान होतेय व होत राहिल, हे मी अनेकदा नोंदवलेय. ते आपली मते सतत भांडखोर वृत्तीनेच मांडतात, त्यामुळे अनेक सदस्य त्यांना परेशान झालेले आहेत. "त्यांची चूकी झाल्यावर त्याबद्दल माफी मागायला ते कमी करत नाही..." असे काहीतरी त्यांनी लिहिले होते, पण प्रत्यक्षात वारंवार चूका करूनही त्यांनी माफी मागितली तर नाहीच पण त्या चूका केल्याचेही अमान्य करत राहिले!! सध्या सहीसोबत "संदर्भ द्या" वगैरै लिहिलयं, पण इथेही ही तीच समस्या, संदर्भ देऊनही खोले त्यांना खरे मानायला तयार नसतात!! त्यामुळे ह्या त्यांच्या दोन्ही बाबीं पुरत्या फसव्या आहेत. स्वत:ला गैरसोयीची वाटणारी पण योग्य असणारी अनेक मजकुरे त्यांनी लेखांतून काढली आहे, व त्यावर स्पष्टिकरण मात्र दिलेले नाही (मी सिद्ध केले आहे). या सर्वांमुळे खोलेंना विकिपीडियावर ब्लॉक करने आवश्यक आहे.--संदेश हिवाळेचर्चा ०९:२४, ३१ ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी: इथे परत शिष्टमंडळाची हमरातुमरी झालेली चुकली बहुधा अरेच्या दुःख होतंय ! आणि एवढं सगळं होऊन मनमानी कारभार सुरूच आहे! अभय नातू तुमच्यासारखा देव मनुष्य तुम्हीच! एवढ कसा सहन करता तिकडे सुबोध काहीतरी नीट बोलला तर नेसरीकर ने ते फक्त प्रचालकांना प्रबांधित केलं हीच का ती कलयुगातली लोकशाही! अभय अजब तुझं सरकार आणि लोकांना दिलेलं अभय !!!! ( https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया_चर्चा:कौल/माजी_प्रचालक ) सत्य जर अस्तित्वात असेल व जनाची नाही आणि मनाची असेल तर अशा लोकांनी पदाचा त्याग करावा. अभय रावांनी व नेसरकारांनी याना अभय दिलंच आहे. आता सत्याचा चेहरा दाखवीला म्हणून मला कदाचित बॅन करतील पण अर्वाच्य भाषा वापरणारे असेच पदांची मजा घेतील या पानांचे स्क्रिनशॉट घेतलेले आहेच हे जर नीट घडला नाही व हि लोक कारवाईस पात्र ठरली नाहीत तर हे लवकरच विविध वृत्तपत्रास पाठविलं जाईल हे लक्षात ठेवा. विकिपीडिया हि कोणाचीही वैयक्तिक जहागिरी , मालमत्ता, जाहिरात किंवा वाद घालण्याचे ठिकाण नाही, हे चांगल्या गोष्टी, कार्य , घटना, जतन करण्याची जागा आहे ! यावर लेखी उत्तर व त्वरित कारवाईची अपेक्षा करत आहे, तसेच ती केल्यास जाहीर करावे हि विनंती करीत आहे ! या टायवेनं व खोलेनी वैयक्तिक द्वेषाने माझा आय डी बॅन केल्याने हा मेसेज नवीन खोटा आय डी ना बनविता टाकला असे. (103.51.153.82 ११:०२, १४ ऑक्टोबर २०१८ (IST))
विकिपीडिया चर्चा:कौल/माजी प्रचालक इथे जवाब दिले आहे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१४, १४ ऑक्टोबर २०१८ (IST)
विकिपीडिया चर्चा:कौल/माजी प्रचालक इथे उत्तर (जबाब नाही !) दिलेले आहे! गेट वेल सून महाशय!!! (103.51.153.82 १८:४०, १४ ऑक्टोबर २०१८ (IST))
Discussion regarding bot
संपादनSince I can read and understand (a little bit) Marathi but can't talk. So, I am writing my message in English only. I got a message on my hiwiki user talk page. In that message, it is said that bot accounts with no activity from a long time should be removed from bot flag. I think this is a very good decision if those bots are not working on any wiki because that account can be hacked and can make destructive work. But if bot and bot user both are active on some wikiprojects shouldn't come in this category. Even if your policy is saying that flag should be removed from such accounts, I don't have any problem. Since, my bot is also inactive on mrwiki from long time. I can do the from my bot if you have something for me. If you don't have any work for my bot, you can remove the bot flag, I don't have any problem. (Bot account: user:sanjeev_bot)☆★संजीव कुमार (बातें) ००:३६, २९ सप्टेंबर २०१८ (IST)
- @संजीव कुमार: Thank you for your reply regarding inactive bot that I had added on your talk page. As I look forward your bot has done constrictive edits to this wiki and we hope that it will continue. Our motive is to remove out all the unnecessary flags on this wiki and as said in the message if the bot owner needs to continue it may inform the administrators/bureaucrats here and you have done so. Please provide us a consent that you want to continue your bot operation on this wiki so we may retain your flag. Again thanks for your contributions. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३७, २९ सप्टेंबर २०१८ (IST)
- @टायवीन जी: I am not saying to continue flag. Since, my bot can do few things:
- Can fix redirect (there is also other bot is doing the same, so my bot is not required for this.)
- Can mark for deletion the pages which are redirected on non-existing/deleted pages. (If you wish, but for this, I need your permission, as I have seen that your wiki don't want delete suggestions from the people who don't know Marathi.
- Can do anytype of replacements. (Since, I don't know Marathi so this can be done if someone ask for.) I think you have such bots, if yes, my bot doesn't need flag.
- Can remove non-required templates (as did in past) and add few required templates (as I did yesterday).
- Can fix redirected categories. Since, your wiki is also have bots for that.
- So, according to above, my bot can do only one thing (point 2) which is pending on your wiki. If you wish, I can do that otherwise, it is better to remove bot flag. If I will need in future, I shall ask for it again.☆★संजीव कुमार (बातें) १५:१५, २९ सप्टेंबर २०१८ (IST)
- @टायवीन जी: I am not saying to continue flag. Since, my bot can do few things:
मराठी विकिपीडियावर प्रचालकांची आवश्यकता व त्यांची कौशल्ये
संपादनसादर नमस्कार !
मी प्रथमच असे काही निवेदन येथे देते आहे, परंतु २०१६ पासून सातत्याने सक्रिय सहभाग देत असल्याने आपणही काही नोंदवू शकतो आणि इतर संपादक प्रगल्भतेने आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या पातळीवरून याकडे पाहतील अशी अपेक्षा आहे. हे निवेदन प्रचालकांना आहे तरीही विकीच्या पारदर्शकतेमुले सर्वजण हे वाचू शकतील. मला इंग्रजी विकीवरची धोरणे माहिती नाहीत तथापि मराठीचा वाढता वाचकवर्ग पाहता येथे आपण हे करू शकू काय असे वाटते-
१.अशा निर्णय प्रक्रियांमध्ये सर्वांना सहभागी करण्यापेक्षा जे नियमित सक्रिय आहेत अशा संपादकांच्या मतांचा विशेष आदर केला जावा कारण ते येथे रोज अनुभव घेत असतात, योगदान देत असतात. या विकीवरील अनेक नावे मी बाहेर ऐकते पण ही मंडळी मला अडीच वर्षात एकदाही इथे फिरकलेली दिसलेली नाहीतंं. असे असताना नियमित सहभाग देणया व्यक्तींच्या मतांचा आदर हा व्हायलाच हवा असे वाटते.
२. एकूणातच तांत्रिक कौशल्ये आणि संपादकीय कौशल्ये असलेल्या अधिक व्यक्ती येथे लागणार आहेत असे जाणवते आहे, नव्हे ती गरज निर्माण झालेली आहे.
३. त्यामुळे या विकीवरील वैविध्यपूर्ण संपादक पाहता त्यांची त्यांची बलस्थाने ओळखून त्यांनी प्रचालक पदासाठी अर्ज करावेत आणि त्यांना आपल्या बलस्थानाव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या पण येत नसलेल्या बाबी अन्य सदस्यांनी शिकविण्यात मदत करावी किंवा परस्पर पूरक होऊनही हे काम करता येणे येथे कठीण अजिबात नाही. आणि इतर सदस्यनी कुरघोडीच्या भूमिकेतून बाहेर येत अशा सदस्यांना निवडून द्यावे.कंपूशाहीचे राजकारण फार अनुभवाला येते आहे दुर्दैवाने!
४. सर्वच प्रचालकांनी परस्परांना मदत करत आणि संपादकांशी अनाठायी भांडणे न करता हा विकी समृद्ध करणयास हातभार लावावा.
मी थोडे स्पंष्ट आणि परखड लिहिले आहे पण त्याशिवाय माझया अनुभवाच्या अंती तयार झालेले मत नेमक्या शब्दात मांडणे मला शक्य झाले नसते.
पुनश्च एकदा विनंती ज्यांना हे वाचून यातील मतितार्थ लक्षात येईल त्यांनीच नोंदवावे काही. मला अनाठायी वाद करण्यात वेळ घालविण्यापेक्षा अनेक लेख संपादन करण्यासाठी समोर दिसत आहेत. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १६:३६, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)
सदस्य:संदेश हिवाळे यांना कायमचे अवरुद्ध करण्याबाबत
संपादन@V.narsikar आणि अभय नातु:
- मी आधीही अनेकदा हिवाळे यांच्या बद्दल तक्रार केलेली आहे अनेक इतर सदस्यांनीही अशी तक्रार केलेली आहे. हिवाळे यांच्या उत्पाती, न ऐकण्याच्या स्वभावामूळे अनेकदा अनेक सदस्यांना मनस्ताप झालेला आहे. शिवाय त्यांनी केलेला प्रताधिकार भंग इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की अजुनही तो पूर्णपणे काढला गेलेला नाही.
- सध्या विनोदी निबंधावर हिवाळे यांनी केलेला उत्पात आणि इतर विकींवर हिवाळे कळसूत्री खाते चालवण्यासाठी आणि उत्पातासाठी कायमचे अवरुध्द केले गेलेले आहे.
- मराठीवर सगळ्यात जास्त वादग्रस्त केलेला आंबेडकरांचा लेख श्री हिवाळेंच्या उपकारामुळेच अडकलेला आहे. तेव्हा त्यांना ताबडतोब अवरुध्द करण्यात यावे. यापूढे आपल्याला त्यांचा त्रास सहन करण्याचे मला एकही कारण दिसत नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १७:२०, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:
- सांगकाम्या Narayanbot1 शी माझ्या सदस्यखात्याचा कोणताही संबंध नसताना Tiven2240 यांनी मी Narayanbot1चा चालक असल्याचे विकिसमुदायासमोर लिहिले असल्याचे मी आज येथे पाहिले. मी त्याचा चालक नाही हे त्यांना समजावण्याचा येथे प्रयत्न केला परंतु तरीही मीच त्याचा चालक असल्याचे जाणीवपूर्वक ते विकिसमुदायाला भासवत असल्याचे दिसत असून माझी विकिपीडियावर मानहानी करत आहेत तरी यासाठी त्यांना अवरुद्ध केले जावे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२५, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)
- तुम्ही येथे समजावण्याचा प्रयत्न केलेला दिसत नसून मानभावीपणे ताशेरे ओढलेले दिसत आहेत. तुम्हाला बदल करण्याचे आवाहन केल्यावरही तुम्ही ते न करता अधिक चर्चाच चालून ठेवली. याशिवाय यात मला गोवण्याचा प्रयत्नही केलेला दिसत आहे.
- तुम्ही तेथे सरळ शब्दांत संवाद साधावा. प्रस्तुत विषयवस्तु सोडून इतर गोष्टी मध्ये आणू नयेत. असे झाल्यावरही सहकार्य न झाल्यास तेथे संदेश द्यावा.
- तेथील संवादावरुन कोणाला अवरुद्ध करावे हे सध्या नेमके ठरविता येत नसल्याने अवरुद्ध करण्याचे पाउल उचलत नाही आहे.
- अभय नातू (चर्चा) २३:४८, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)
तपासणी
संपादनप्रचालक, कृपया २००३ नोम पेन्ह दंगली व सिंगापूरमधील संस्कृती हे विकिपीडिया आशियाई महिन्यात तयार झालेले लेख गुण मिळवण्यास पात्र आहेत की तपासा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०७:४४, १३ डिसेंबर २०१८ (IST) (आयोजक व आंतरराष्ट्रीय गटातील सदस्य)
@अभय नातू आणि V.narsikar:,यामागची पूर्ण पार्श्वभूमी न मांडता आपल्याला तपासणी करण्यास आवाहन केले आहे. आपण हे जाणून घेण्याकरता माझ्या चर्चा पानावरील हा विभाग पहावा ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३९, १३ डिसेंबर २०१८ (IST)
- @Tiven2240: मला वैयक्तिकरित्या लेख बरोबर वाटत आहेत.@सुबोध कुलकर्णी: मला मोबाईलवरून सखोल तपास शक्य नाही. दुसरे असे कि आपण वर दिलेला दुवा उघडत नाही.@Tiven2240 आणि सुबोध कुलकर्णी: हा वाद शक्यतो आपले दोघांचे स्तरावरच सोडवावा.यात प्रचालकानी/प्रचालकांनी दिलेला निर्णय दोन्ही बाजूस मान्य राहील काय हा वादाचा मुद्दा आहेच.निर्णय काहीही असला तरी विरूद्ध बाजूस पटेल काय? कोणत्याही वादात हा प्रश्न असतोच.मग काय जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, अत्यूच्च न्यायालय सुरू.@अभय नातू: माहितीस्तव.वि. नरसीकर , (चर्चा) १६:४८, १३ डिसेंबर २०१८ (IST)
संदर्भाशिवाय लेख न लिहिण्याचे आवाहन
संपादनसादर नमस्कार ! मधल्या काळात सर्व सामाजिक माध्यमांवर एक चित्रफीत फिरत होती, येथील सर्वानी ती पाहिली असेलच. विकिपीडियाच्या संस्थापकाना ज्ञानकोशाची आवश्यकता काजाणवली आणि त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न असा हा प्रवास मांडला गेला आहे. असे असताना मराठी विकीवर अनेक संपादक नुसताच मजकूर चढवून ठेवतात जो विनासंदर्भ असतो. मी स्वतः अशा अनेक लेखात फक्त योग्य संदर्भ जोडण्याचे काम केले आहे, करीत असते. आपण नव्या जुन्या सर्वच संपादकांना यासाठी आग्रह धरणे आवश्यक वाटते आहे. आता संदर्भ जोडण्याचे साधनही आपल्याकडे आहे. google books चे संदर्भ शोधणे आणि जोडणे कठीण नाही. जरा सर्वानीच सकारात्मक दृष्टीने पाहूया. ज्ञानकोशाचे संपादक म्हणून अभिमान बाळगताना आपण योग्य पद्धतीने आणि जबाबदारीने जगाला ज्ञान पोचवतो आहोत की केवळ स्वतःचे हौस म्हणून हे करीत आहोत याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायलाच हवे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा)`
- If we look at the guidelines about references, they tell clearly about what needs to be referenced. If I am not wrong, what needs to be referenced is following - "the information which is challenged or which is likely to be challenged, needs to be referenced." So if one challenges some information and a secondary reference cannot be provided, that information can be and should be removed. For medical articles, tertiary source needs to be cited like review articles. Kindly feel free to discuss about it. Thanks. -- डॉ. अभिजीत सफई १४:४४, ५ जानेवारी २०१९ (IST)
हे पानही पहा,QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ००:१५, ७ जानेवारी २०१९ (IST)
रोलबॅक अधिकाराबाबत
संपादन- @अभय नातू:, मराठीवर उत्पाताशी लढण्यासाठी रोलबॅक अधिकार नाहीत, तसा सदस्य गटच कधी तयार केला गेला नाही. किंवा कुणाला तसे अधिकार दिले गेलेले नाहीत. तेव्हा, असा गट निर्माण केला जावा आणि तो अनुभवी सदस्यांना दिला जावा ही विनंती.
- मला सध्या हिंदी, विकिडाटा, आणि इंग्रजीवर हे अधिकार कायमस्वरुपी मिळालेले आहेत, त्यामुळे मला हे अधिकार वापरण्याचा निटसा अनुभव आहे.
- मराठीवर हेच काम मी ट्विंकल वापरून करतो, त्याची ही माहिती
- @सुबोध कुलकर्णी:@आर्या जोशी:@Pooja Jadhav:@ज्ञानदा गद्रे-फडके:@सुशान्त देवळेकर: यांनी यावर आपली मते द्यावीत, उत्पात परतवणे आणि लेख त्याच्या उत्तम आवृत्तीला परतवणे ही कामे करण्यासाठी हे अधिकार सर्रास इतर विकिंवर वापरले जातात. मराठीवर असा सदस्य गटही तयार केला गेलेला नाही व असे अधिकार तर कधीच दिले गेलेले नाहीत. तेव्हा यावर पुढील चर्चा होऊन हा सदस्य गट व अधिकार निर्माण करण्यात यावेत ही विनंती.
- सध्या हेच काम ट्विंकलच्या सहाय्याने करता येते, त्याचे स्थानिकीकरणही मी केलेले आहे. पण मुळत: रोलबॅकर अधिकार असल्याने ते इतर अनेक अवजारांच्या सहाय्याने वापरता येतात व सहज हेच काम करता येते. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २०:०२, २२ जून २०१९ (IST)
पाठींबा - @अभय नातू: सध्या मोबाईलवर नुसत्या आयपीवरून अनेक चुकीची संपादने केली जात आहेत. तसेच एकच सक्रीय प्रचालक आणि अपुरे सजग संपादक असल्याने व्यवस्थापन मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. तरी सहा महिन्यांसाठी QueerEcofeminist यांना हे काम करण्याची संधी दिली जावी असे माझे मत आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३५, ९ जुलै २०१९ (IST)
पाठींबा - @अभय नातू:QueerEcofeminist हे चांगल्या पद्धतीने नवनवीन सन्कल्पना शिकून घेत मराठी विकीच्या व्यासपीठावर सुधारणा करण्यास उत्सुक आहेत. त्याना अशी संधी देण्यात यावी असे मला वाटते. --आर्या जोशी (चर्चा) १४:४४, ९ जुलै २०१९ (IST)
- @QueerEcofeminist, सुबोध कुलकर्णी, आणि आर्या जोशी:
- नमस्कार,
- रोलबॅक करणे हा पटकन होणारी क्रिया आहे. हे करताना चुकून एखादे वेळेस नको असलेले (अथवा हवे असलेले) बदलही रोलबॅक होऊ शकतात. अर्थात ही चूक लक्षात आल्यावर सुधारताही येते परंतु या प्रक्रियेत संपादकांचे गैरसमज होउन अनेकदा नसते वादविवाद होण्याची मोठी शक्यता आहे.
- सदस्य QueerEcofeminist यांचे पूर्वी अनेकदा अनेक सदस्यांशी तंटे झालेले आहेत. यात खरे कोण, खोटे कोण याची शहानिशा न करताही QueerEcofeminist यांचा पवित्रा अनेकदा टोकाचा असल्याचे दिसलेले आहे. यात इतर सदस्यांनी तेल ओतून हे वाद पराकोटीलाही नेण्याचीही उदाहरणे आहेत.
- असे असताही त्यांनी हा अधिकार दिल्यावर असे वाद झाल्यास ते चिघळू नयेत यासाठीची हमी दिल्यास आणि खबरदारी घेतल्यास हा अधिकार द्यावा असे मला वाटते.
- यासाठी एक सजेशन आहे की असा वाद उद्भवल्यावर जर काही जुन्या सदस्यांनी विनंती केली, तर QueerEcofeminist यांनी एखादा दिवस रोलबॅक करणे थांबवणे आणि वादास स्वल्पविराम (तरी) द्यावा असे वाटते.
- हे लिहिण्यामागे मराठी विकिपीडियावर कमीतकमी घर्षण होउन महत्तम काम व्हावे हीच इच्छा आहे.
- काही दिवसांनी सदस्यगट तयार करुन इतर सदस्यांनाही त्यात शामिल करुन घेता येईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०७:३६, १० जुलै २०१९ (IST)
- @अभय नातू:
- * परत एकदा आठवण म्हणून, माझ्याकडे इतर चार विकिंवर रोलबेकर अधिकार आहेत, शिवाय मी मराठीवर अनेकदा ट्विकलच्या मदतीने उत्पात उलटवत असतो त्यामुळे मराठीसारख्या ढिसाळ कारभार असलेल्या विकिच्या तुलनेत इंग्रजी विकिवरही मला रोलबेकर अधिकार न मागता न्यु पेज रिव्हूवरबरोबर मी त्याचा उपयोग करू शकतो असा अंदाज करून, म्हणून दिले गेले आहेत. (हे माझ्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपाला आणि आपल्या काळजीला उत्तर म्हणून लिहित आहे.)
- * मी इंग्रजीवर तेच काम केले आहे जे मी मराठीवर करतो, किंबहुना मी मराठीपेक्षा कितीतरी जास्त प्रताधिकार भंग इंग्रजी आणि कॉमन्सवरून काढायला मदत केली आहे, मी कॉमन्सवर फक्त डिलिशन रिक्वेस्टच केल्या आहेत. त्यामुळे माझे तुम्हाला आग्रही आणि अतिरेकी वाटलेले काम वास्तविक इतर विकिंवर मला विश्वासू म्हणून प्रस्थापित करते. तेव्हा, नक्की इतर सदस्य आणि तंटे आणि रोलबेक कसा? कुठे वापरायचा ह्याची माहिती मला आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे आपण मला रोलबेक अधिकार देताना इतर विकिंवर प्रचालकांनी किती वेळ घेतला आणि काय प्रश्न विचारले आहेत, हे प्रत्यक्ष पाहून मिळवावीत.
- * आपल्या माहितीसाठी इतर ठिकाणी मला हे अधिकार देताना इतर विकिवरच्या प्रचालकांनी काय प्रश्न विचारले किंवा किती वेळ घेतला हे आपणच बघावे. आपली काळजी नक्की कुठे आहे हे मला कळते. पण इतर चार विकिवरचे प्रचालक काय बघतात आणि हे अधिकार कसे दिले जातात हे पहाणे येथे आवश्यक आहे असे मला वाटते.
- * इंग्रजीवर, हिंदीवर, विकिडेटावर, कॉमन्सवर धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २०:०८, १२ जुलै २०१९ (IST)
- If a user has userrights on a particular Wikimedia project means he should get it on Marathi Wikipedia? Where is the usergroup community consensus for making this new usergroup and where is the requirements to be met for the same? There is no such demand of such userright as I see that there is only one person asking for it and if it is being created only for a benefit of just a certain user than I think this is unfair. It clearly smells hatcollecting. Thanking you. --Tiven2240 (चर्चा) २२:३३, १२ जुलै २०१९ (IST)
- @QueerEcofeminist:
- इतर विकिपीडियावर अधिकार दिले गेले ते तुमचे तेथील काम पाहून. ते तुम्हाला मिळाले यात आनंदच आहे. माझे लिहिणे हे तुमच्या मराठी विकिपीडियावरील इतरांशी झालेले वाद आणि त्यातील तुमचे इतरांशी संवाद न साधता थेट हमरीतुमरीवरे येणे याबद्दल आहे. त्याचा तुमच्या इंग्लिश किंवा इतर विकिपीडियांवरील अधिकारांशी संबंध नाही. इंग्लिश (किंवा इतर) विकिपीडियांवर येथील वाद याच प्रकारे झाले असते तर त्याचे पर्यवसान तेथे काय झाले असते याची कल्पना करता येते परंतु ते येथे आणण्यात हशील नाही.
- तुमचे काम आग्रही, अतिरेकी आहे हे हे मी लिहिलेले नाही. उगीचच माझ्या तोंडी काहीबाही शब्द घालू नका. वाद झाल्यावर किंवा तुमच्या लिखाणावर साधा आक्षेप आला असता त्यावर तुमची उत्तरे काय असतात हे पाहून हे लिहिलेले आहे. लिखाणावर नाही. तुमची विश्वासार्हता इतर विकिंवर आहे हे वाचून आनंद वाटला परंतु मराठी विकिपीडियावर ही विश्वासार्हता परत मिळविण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि प्रयत्न खर्ची घालावा लागेल, हे नक्की.
- मी इतर विकिंच्या प्रचालकांचे काय पहावे याच्या सूचना दिल्याबद्दल धन्यवाद. यात मी हे पाहिले नाही हे तुम्ही गृहित धरत आहात. इतर विकिंवर काय होते याचे अंधानुकरण मराठी विकिपीडियावर केले जात नाही.
- विकिपीडियावरील घटनांबद्दल न बोलता तुम्ही तुमची मागणी कशी self-evident आहे हेच तुम्ही सांगत आहात. तुम्हाला मी दिलेले सजेशन मान्य नाही आणि त्यात तडजोड करणेही मान्य नाही असे दिसते. त्याचा खेद वाटतो.
- आपण येथे ट्विंकल आणि इतर प्रकारे मराठी विकिपीडियावर योगदान करीत आहात याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि हे चालूच ठेवाल ही आशा.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०९:१८, १४ जुलै २०१९ (IST)
- @अभय नातू:
- मुद्दा एक - मी हे नाकारात नाहीये कि, या अटींची मी पुर्तता करत नाहीये, मुळात मी हेच सांगतोय की, मला या अटीं आणि इतरही अनेक अटीं पुर्णपणे माहित आहेत.
- @अभय नातू:
असे असताही त्यांनी हा अधिकार दिल्यावर असे वाद झाल्यास ते चिघळू नयेत यासाठीची हमी दिल्यास आणि खबरदारी घेतल्यास हा अधिकार द्यावा असे मला वाटते. यासाठी एक सजेशन आहे की असा वाद उद्भवल्यावर जर काही जुन्या सदस्यांनी विनंती केली, तर QueerEcofeminist यांनी एखादा दिवस रोलबॅक करणे थांबवणे आणि वादास स्वल्पविराम (तरी) द्यावा असे वाटते.
- * मुद्दा दोन - जर आपण माझी संपादने तपासलीत तर मी मराठीवर आधीच हे ट्विंकलच्या सहाय्याने हे काम करतो हे आपण आधीच जाणणे अपेक्षित होते, ते तसे मला तुमच्या आक्षेपात दिसलेले नाही. शिवाय, इतर सदस्यांशी मी कसा वागेन याचे आधीच आडाखे बांधणे यात काय हाशिल आहे हे मला कळत नाही.
- * आपल्या अटींची आणि इतरही अनेक अटीशी बांधील राहूनच मी ट्विंकल वापरतो हेही माझ्या संपादन इतिहासावरून कळते. आपण माझा इतिहास तपासला आहे, असा आपला दावा आहे तरीही आपल्या हेही लक्षात आले नाही, याबद्दल खंत वाटते. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:०३, १४ जुलै २०१९ (IST)
- इतर सदस्यांशी मी कसा वागेन याचे आधीच आडाखे बांधणे यात काय हाशिल आहे
- वर सांगितलेच आहे तरी पुन्हा सांगतो - आत्तापर्यंतचे वागणे पाहून आडाखे नाही तर असे होऊ नये ही आशा आणि झालेच तर त्यातून तुमचा वेळ, इतर सदस्यांचा वेळ वाया जाउ नये आणि मुख्यत्वे मराठी विकिपीडियावरील एकंदर वातावरण कलुषित होऊ नये यासाठीचा उपाय सुचवला आहे. याला आडाखे म्हणू नयेत.
- इतिहास उघडच आहे. तुमचा ट्विंकल किंवा इतर उपकरणे वापरुन केलेली संपादने हा त्याचा एक भाग. इतरांशी झालेले वितंडवाद आणि त्यातील तुमचे लिहिणे/वागणे हा दुसरा. हा दुसरा होणार नाही ही आशा/अपेक्षा बाळगूनच तुम्हाला हा अधिकार देण्यासही माझी तयारी आहे (इतर सदस्यांना हे हॅट कलेक्शन वाटत आहे हा वेगळा विषय आहे.) परंतु तुम्ही तुमचा निवडक इतिहास नाकारित आहात. त्याहीपेक्षा त्यातून घालविलेला विश्वास परत मिळविण्यासाठीचे सजेशन दिलेले असताना त्यावर बोलणे सोडून माझ्यावर घसरत आहात. यातून पुन्हा एकदा तसलेच वाद घालीत वेळ घालविण्याची तुमची प्रवृत्ती दिसते आहे.
- माझे अजून एक सजेशन आहे. माझ्या म्हणण्यावर दोन दिवस विचार करुन मग उत्तर द्यावे. आपण हा अधिकार मिळविण्यासाठी दोन पावले पुढे येणे आवश्यक आहे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ११:२२, १४ जुलै २०१९ (IST)
विरोध सदस्य QueerEcofeminist याच्यामुळे मराठी विकिपीडियाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे तसेच भांडखोर वृत्तीमुळे विकिपीडिया संपादने कमी होत आहेत. दर्जा सुधारण्याच्या बहाण्याने सदर सदस्य दर्जा खालावत आहेत. अशा सदस्याला विकिपीडिया मराठीवरून कायम तडीपार केले जावे. तरी रोलबॅक अधिकार मिळण्यास मी तीव्र विरोध करतो. प्रसाद साळवे (चर्चा) १२:५३, १४ जुलै २०१९ (IST)
प्रचालक Kaustubh
संपादननमस्कार,
सदस्य:Kaustubh हे येथील पहिल्या काही प्रचालकांपैकी एक आहेत. मे २०१५ नंतर त्यांचे संपादन येथे दिसत नाही तरी ते प्रचालकपदातून मुक्त होण्यास पात्र आहेत. त्यांना मी याबद्दल एक संदेश त्यांच्या सदस्य चर्चा पानावर दिलेला आहे.
माहितीखातर.
--Tiven2240 (चर्चा) २०:४३, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
- मला असे वाटते प्रचालक पदातून मुक्त होण्यास अनेक इतरही पात्र आहेत, आपल्या धोरणानुसार एक वर्षभर निष्क्रिय असलेले आणखी काही सदस्य आहेत, त्यांचेही प्रगत अधिकार काढले जातील ही आशा. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २२:२९, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
- बरोबर आहे.
मला वाटते नरसीकरजी (?) आणि मी सोडून इतर कोणतेही प्रचालक सध्या क्रियाशील नाहीत.मराठी विकिपीडियावरील प्रचालकांची आणि त्यांच्या शेवटच्या संपादनांची यादी खाली दिली आहे. आत्तापर्यंत कोणीही निष्क्रिय प्रचालकांना काढणेबद्दल आग्रह धरला नव्हता आणि ते परततील या समावेशक आशेने ती पदे तशीच आहे. - नवीन प्रचालक उमेदवार आल्याने आणि वरील विनंती पाहता असलेले निष्क्रीय प्रचालक काढण्याची वेळ आली आहे. हे लगेचच सुरू केले जाईल.
- प्रचालकांपैकी @V.Narsikar: आणि @Kaustubh: या दोन सदस्यांची शेवटची संपादने एक वर्षापेक्षा अधिक जुनी असल्याचे आढळून येते.
नमस्कार, सर्वानुमते जे ठरेल त्याप्रमाणे निर्णय घेण्यास माझी हरकत नाही. मी प्रचालक नसलो तरी विकिपीडिया संपादक म्हणून कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेन... धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:००, २५ फेब्रुवारी २०२० (IST)
- @Kaustubh:
- वरील संदेश देण्याचा उद्देश प्रचालकपद काढून घेण्याचा नसून तुम्ही प्रचालकपदावरुन मुक्त करण्यासाठी पात्र आहात याची सूचना देण्यासाठी होता.
- जर तुम्ही प्रचालकपदाचा वापर करू शकणार असाल (आणि करणार असाल :-) ) तर (माझा तरी) तुमचे प्रचालकपद रद्द करण्याचा इरादा नाही
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०६:२२, २७ फेब्रुवारी २०२० (IST)
प्रचालक आणि त्यांच्या शेवटच्या संपादनांची यादी
संपादनप्रचालक | शेवटचे संपादन |
---|---|
कोल्हापुरी | १७ जून, २०१९ |
Sankalpdravid | ७ फेब्रुवारी, २०२० |
अभय नातू | २३ फेब्रुवारी, २०२० |
सुभाष राउत | २० जानेवारी, २०२० |
Kaustubh | ४ मे, २०१५ |
Abhijitsathe | २७ सप्टेंबर, २०१९ |
V.narsikar | १ फेब्रुवारी, २०१९ |
Rahuldeshmukh101 | २९ मार्च, २०१९ |
सर्व सदस्य व अभय,
नमस्कार
माझे काही वैयक्तिक कारणास्तव मी येथे काहीच काम करू शकलो नाही. सर्व आलबेल असले तर मे २०२०चे सुमारास परत कार्य सुरू करीन अशी अपेक्षा आहे.आपल्या सर्वांना धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१४, २४ फेब्रुवारी २०२० (IST)
Table of active sysop actions
संपादनप्रचालक | शेवटचे संपादन |
---|---|
कोल्हापुरी | 2015-06-16 20:27 |
Sankalpdravid | 2016-03-25 06:17 |
अभय नातू | २३ फेब्रुवारी, २०२० |
सुभाष राउत | 2011-07-11 11:50 |
Kaustubh | 2009-04-16 13:49 |
Abhijitsathe | 2019-09-27 11:39 |
V.narsikar | 2019-01-27 10:16 |
Rahuldeshmukh101 | 2017-03-02 03:11 |
मुद्दा फ़क्त सक्रिय असण्याचा नसून सक्रिय प्रचालक असण्याचा आहे, त्यामुळे जर त्यांनी वर्गवारी किंवा शुद्धलेखन करण्यात आपली सक्रियता दाखवली असेल तर ते निरूपयोगी आहे. तसे संपादन करणारे आपल्याकडे शेकड्यानी संपादक आहेत. त्यांना प्रचालक अधिकार वापरायचे नसतील किंवा वापरता येत नसतील तर तो बिनकामाचा मुकूट त्यांच्याकडून काढून घेणे अपेक्षित आहे. जेणेकरून इथे वैश्विक प्रचालक किंवा इतर सदस्य आपले प्रचालकीय अधिकार वापरू शकतील. त्यामुळे फ़क्त नुसती संपादने केलेल्यांना प्रचालकीय निष्क्रिय धरून काढून टाकण्यात यावे. धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १०:१६, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
- जे सदस्य प्रचालक अधिकार वापरण्यास पात्र आहेत ते समुदायाच्या समोर आपले काम दाखवून व नामांकन करून अधिकार मागू शकतात, यात कोणत्याही अडचण दिसून येत नाही. पुन्हा नोंद घ्यावी प्रचालक हे फक्त मुकूट नाही तर मराठी विकिपीडियावर असलेली एक जबाबदारी आहे. या विकी आणि इतर विकिमीडिया प्रकल्पांवर मुकूटचे लोभ स्पष्टपणे सर्वाना दिसून येत आहे. परंतु कार्य अधिकारापेक्षा अधिक बोलते. प्रचालक अधिकारांचे उत्तम वापर करणारा सदस्यच प्रचालक असावा अशी माझी मागणी आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ११:१२, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
- आपल्या विकि समूहात प्रचालकांची कमतरता आहे हे खरेच आहे. पण म्हणून जबाबदारीचे भान नसलेल्या सदस्यांना प्रचालक बनवणेही धोक्याचे ठरेल. आजघडीला आपल्याकडे तर तोऱ्यात वागणारे व जबाबदाऱ्या झटकणारे सदस्यही प्रचालक पदाचा मुकूट धारण करण्यासाठी हापापलेले दिसताहेत.--संदेश हिवाळेचर्चा २१:२०, २६ फेब्रुवारी २०२० (IST)
- संदर्भ म्हणून येथे सदस्यांनी ठरविलेला नियम उद्धृत करीत आहे. त्यातील काही शब्द वरील चर्चेसाठी उपयुक्त असल्यामुळे ठळक केलेले आहेत.
- १) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग एक(१) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.
- अभय नातू (चर्चा) ०६:१६, २७ फेब्रुवारी २०२० (IST)
मराठी विकिपीडियावरील संदेशांमध्ये दुरुस्त्या करण्याबद्दल
संपादन@अभय नातू:
मराठी विकिपीडियामध्ये दिसणाऱ्या काही संदेशांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका आहेत. ते कुठून दुरुस्त करता येतील, याचे मार्गदर्शन करावे अथवा अशी दुरुस्ती करण्यासाठी काही विशेष अधिकारांची गरज असल्यास, हे संदेश कृपया दुरुस्त करावे. धन्यवाद!
दुरुस्त करणे आवश्यक असलेल्या संदेशांची यादी देत आहे.
- संपादन चालू राहुदे --> संपादन चालू राहूदे
- कृपया जतन करण्यापुर्वी झलक कळ वापरून पाहा --> कृपया जतन करण्यापूर्वी झलक कळ वापरून पाहा
- आपण हे देखील मान्य करता कि,हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे. -->
- आपण हे देखील मान्य करता की हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे.
- नविन पानांची यादी हेही पाहा --> नवीन पानांची यादी हेही पाहा
- खुणपताका --> खूणपताका
तसेच विकिपीडियावरील स्वागताचा "मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो." हा संदेश चुकीचा नसला तरी फारच भाषांतरीत वाटतो. तोसुद्धा "मराठी विकिपीडियावर आपले स्वागत!" असा करावा, अशी विनंती. धन्यवाद!
--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:३७, १० मार्च २०२० (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके:
- "अॅट्रीब्यूशन" या शब्दाऐवजी "ॲट्रीब्यूशन" हा शब्द वापरावा. येथे "ॲ" हा एकच वर्ण आहे, "अ+ॅ" असे दोन वर्ण नाहीत. अशी दोन वर्ण काही ब्राऊझरमधून तुटलेल्या शब्दाप्रमाणे दिसतात.--संदेश हिवाळेचर्चा २१:५४, १० मार्च २०२० (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके:
- हे चुकीचे शुद्धलेखन व व्याकरण लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
- यातील अनेक संदेश अनेक वर्षांपूर्वी एक माजी प्रचालकांनी लिहिले होते व त्यावेळी झालेल्या चुका अजून सुधारल्या गेलेल्या नाहीत. हे संदेश प्रणाली अंतर्गत असल्यामुळे फक्त प्रचालकांनी त्यांत बदल करण्याची मुभा आहे. हे संदेश प्रणालीच्या आत शोधणे किचकट आहे. एकदा सापडले की सुधारणे सोपे आहे.
- सदस्यांनी चुका लक्षात आणून दिल्यावर (जसे तुम्ही केलेत) हे काम प्राधान्याने केले जाते. याशिवाय मी स्वतः वेळोवेळी असे अनेक बदल करीत आलेलो आहे.
- वरील चुका सुधारणे सुरू केले आहेच आणि त्यासरशी दिसणाऱ्या इतरही चुका सुधारत आहे. मला वाटते अशा चुका ढीगानी आहेत आणि त्या शोधून काढण्यात तुम्ही आणि इतर सदस्य करू शकाल. असे संदेश येथ नोंदवावेत किंवा एखादे उपपान करुन तेथे यादी करावी म्हणजे नेटाने हे स्वच्छतेचे काम करुन टाकता येईल.
- पुन्हा एकदा धन्यवाद.
- ००:१५, ११ मार्च २०२० (IST)
- ता.क. शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका सुधारण्याबरोबरच क्लिष्ट भाषा सोपीही करीत आहे.
@अभय नातू: आपण लगेचच दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि कार्यवाही सुरू केल्याबद्दल आभार! लवकरच अशा संदेशांसाठी एक स्वतंत्र पान तयार करत आहे. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:५४, ११ मार्च २०२० (IST)
@अभय नातू: एखाद्या पृष्ठाची माहिती ( Page information हा पर्याय ) पाहत असता विविध तक्ते दिसतात, त्यापैकी तिसऱ्या 'संपादनांचा इतिहास' नावाच्या तक्यात "अलीकडिल संपादनाचा दिनांक" असे आहे त्याऐवजी "अलीकडील संपादनाचा दिनांक" असे असावे. तसेच "सध्याची संपादनसंख्या..." हे "सध्याची संपादन संख्या..." असे असावे का यावरही लक्ष द्यावे. मला आढळणाऱ्या शुद्धलेखनातील चूका मी येथे नोंदवत राहिल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:०९, ११ मार्च २०२० (IST)
- Dear all, for your kind information, the text that are seen on this wiki are originated from translate wiki translations and hence administrators cannot edit all pages. Kindly update translations on translate wiki so that it gets reflected properly here and on other wikis. Thanks for your discussions. Regards. --Tiven2240 (चर्चा) १३:४९, १२ मार्च २०२० (IST)
- @Tiven2240:
- Admins can override translatewiki messages locally.
- From my experience, these overrides are then backfilled into translatewiki. I'm not sure if this has changed.
- अभय नातू (चर्चा) ०९:१३, १३ मार्च २०२० (IST)
इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाच्यातसा उतरवू नये. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.
@अभय नातू: असा मजकूर एखादे संपादन उलटवण्यापूर्वी दिसतो. यातही शुद्धलेखन व्हावे, दोन शब्दादरम्यान जागा (स्पेस) असावी. याचा येथे बऱ्याच ठिकाणी याचा अभाव दिसतो.--संदेश हिवाळेचर्चा १४:०५, १६ मार्च २०२० (IST)
- नोंद मिडियाविकी:Edittools धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) २२:४०, १६ मार्च २०२० (IST)
झाले. - अभय नातू (चर्चा) ०४:०८, १७ मार्च २०२० (IST)
ऍडव्हान्स साईट नोटीस
संपादनप्रशासक @अभय नातू:,
कृपया सदस्य:Tiven2240/मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js ला मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js इथे हलवा व सदस्य:Tiven2240/मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices ला मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices इथे हलवा.
हे एक नवीन गॅजेट आहे ज्यांनी आपण अनेक साईट नोटीस एका वेळी मराठी विकिपीडियावर चालवू शकू. मिडियाविकी:Gadgets-definition इथे खाली दिलेल्या ओली जोडा.
*AdvancedSiteNotices[ResourceLoader|default]|AdvancedSiteNotices.js
मराठी विकिपीडियावर एकही तांत्रिक प्रचालक नसल्यामुळे हे कार्य फक्त प्रशासक करू शकतो त्यामुळे ही बदल जाहीर करण्यास विनंती करत आहेत. हे गॅजेटचे लाईव्ह उदाहरण आपल्याला मराठी विकिस्रोतावर भेटू शकेल जिथे मी त्याला प्रकाशित केले आहे. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) १५:५४, १५ एप्रिल २०२० (IST)
- @Tiven2240:
- झाले. -- अभय नातू (चर्चा) ०८:५३, १६ एप्रिल २०२० (IST)
- @अभय नातू: .js पान सुद्धा तयार करा व मिडियाविकी:Sitenotice याला डिलिट करा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:२२, १६ एप्रिल २०२० (IST)
- @Tiven2240:
- नुसतेच .js अशा नावाचे पान? नेमके कळले नाही.
- अभय नातू (चर्चा) ०७:१९, १७ एप्रिल २०२० (IST)
@अभय नातू:
- मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js हे बरोबर सेव्ह झालेले नाही . जावा स्क्रिप्ट असलेले पान असे दिसतात. कृपया आवश्यक बदल करावे. सर्व झाल्यावर मिडियाविकी:Sitenotice याला डिलिट करा नाहीतर दोन साईट नोटीस दिसतील --Tiven2240 (चर्चा) १०:००, १७ एप्रिल २०२० (IST)
- @Tiven2240:, तुम्ही सेव्ह केलेले पान मी स्थलांतरित केले होते. मला वाटते तुमच्या सदस्यपानाखालील पानावर बदल करावे लागतील. कळवावे. -- अभय नातू (चर्चा) १०:०३, १७ एप्रिल २०२० (IST)
- @अभय नातू: कृपया एकदा एडिट बटन दाबून पुन्हा सेव्ह करून पहा. --Tiven2240 (चर्चा) १०:१५, १७ एप्रिल २०२० (IST)
- सदस्य:Tiven2240/मिडियाविकी:Gadget-AdvancedSiteNotices.js यात असलेले मजकूर पहा कॉपी पेस्ट करा --Tiven2240 (चर्चा) १०:२०, १७ एप्रिल २०२० (IST)
जसेच्या तसे नकल-डकव केले तरीही तसेच दिसत आहे. -- अभय नातू (चर्चा) १८:२४, १७ एप्रिल २०२० (IST)
- @अभय नातू: एकदा पान डिलिट करून पाहा. त्यानंतर कॉपी पेस्ट करून पहा. नाही झाल्यावर बग फाईल करता येईल -Tiven2240 (चर्चा) २१:३१, १७ एप्रिल २०२० (IST)
Shubham_nakod
संपादनShubham_nakod (चर्चा · योगदान)
Hello. I am an admin on Wikidata. You may wish to review edits by this user. Bovlb (चर्चा) २१:१२, ७ मे २०२० (IST)