महत्त्वाची नोंद:मूळ पानावरील होणारे अनामिक अंकपत्त्यांचे लेखन/मतप्रदर्शन व केलेले मतदान बघता तेथील चर्चा या चर्चापानावर हलविण्यात आलेली आहे. त्या पानावर केवळ प्रचालकांनीच मतप्रदर्शन/कौल/मतदान करणे अपेक्षित आहे. मूळ पान केवळ प्रचालकांनाच संपादित करण्याजोगे सुरक्षित करण्यात येत आहे.हवे असल्यास इतर सदस्यांनी कृपया येथे आपली चर्चा सुरू ठेवावी.


@अभय नातू आणि V.narsikar: मुळातच तात्पुरत्या प्रचालकांला कायम करण्याची प्रक्रिया सांगणारे धोरण मराठी विकिवर नाहीये त्यामुळे पहिले ते आणण्यात यावे आणि मग टायविन यांचे काय करायचे हे ठरवता येईल. सध्या टायविन यांचे प्रचालकत्व कसे कायम करायचे हे ठरवणारे धोरण नसल्या कारणाने, हे एकतर समुदायाच्या मताने/कौलाने अथवा पहिले धोरण आणून मगच पुढील कारवाई करण्यात यावी. आणि यांपैंकी कोणत्याही मार्गाने न गेल्यास ते समुदायाच्या आणि मराठी विकीच्या धोरणांच्या विरोधात गेल्यासारखे होईल हे मला इथे लक्षात आणून द्यावेसे वाटते. @आर्या जोशी, सुबोध कुलकर्णी, Pushkar ekbote, आणि Pooja jadhav: @Abhijitsathe, Kaustubh, आणि Rahuldeshmukh101: @Sankalpdravid, कोल्हापुरी, आणि सुभाष राऊत: आपण सर्वही माझ्या मतांवर आपले मत द्यावे ही विनंती.

  • त्यामुळे हा कौल अवैध ठरतो.
  • एकतर समुदायासमोर कौल मांडला जावा आणि टायविन यांच्या कामाचे मुल्यांकन खुलेपणाने व्हावे.
  • तात्पुरत्या प्रचालकाला कायम करण्याचे धोरण मांडून ते पारित झाल्यावरच पुढची कारवाई केली जावी.
  • तो पर्यंत टायविन यांना कसलेही अधिकार दिले जाऊ दिले जाऊ शकत नाहित, याउलट तात्पुरत्या पदाचा कालावधी संपल्यावर ते साधे सदस्य उरतील ते तसेच राहु द्यावे. आणि जर समुदायाने निवडले तर ते परत येतील.सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:३९, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

मतप्रदर्शन

नमस्कार! सर्वांना उद्देशून लिहीते आहे.गैरसमज करून घेऊ नये. टायवीन यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाबद्दल अभय सरांनी नोंदविलेल्या मताशी मी पूर्ण असहमत आहे.ज्या भाषेचे व्यासपीठ म्हणून आपण जबाबदारी घेतो ती भाषा चांगली येणे आवश्यक नव्हे अनिवार्य आहे.तांत्रिक बाबी बहुतांशी code language मधे असतात ज्यांना प्रादेशिक भाषेचे बंधन नसते.पण जेव्हा आपण जागतिक स्तरावरील ज्ञानकोश समृद्ध करीत आहोत तेव्हा ती भाषा चांगल्या दर्जाची येणे आवश्यक आहे.कारण अधिकाधिक संख्येने लोक इथे ज्ञान मिळविण्यासाठी येतात हे आपणा सर्वांनाच माहिती आहे.त्यामुळे टायवीन यांच्या निवडीला माझा विरोध आहे. दुसरे म्हणजे प्रचालक व्यक्तींचे नियोजन करताना विविध विषयातील माहिती आणि भाषा यांचा समन्वय असावा लागतो जो नरसीकर सरांच्यामधे मी अनुभवला आहे.चर्चांचे निर्णय देताना सारासार आणि विवेकी विचार लागतो जो नातू सराँसह काम करताना मिळतो.त्यामुळे यापीढे प्रचालक निवडताना ही बाब अनिवार्यपणे लक्षात घ्यावी लागेल. कधीही फारसे न फिरकणारे लोक असे कौल देताना मधेमधे लुडबूड करून स्वतःचा स्वार्थ साधून घेतात हे मागच्या वेळी अनुभवले आहे जे दुर्दैवी आहे.त्यामुळे समंजस आणि प्रगल्भ मत आणि योगदानासाठी विनम्र आवाहन.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०८:५९, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@आर्या जोशी: स्वतःचा स्वार्थ साधून घेतात कृपया यावर स्पष्टीकरण द्यावे व इथे प्रचालक मंडळी पासून मत घेण्यास कौल मांडला आहे आपण त्यात दखल का घेतली याबाबत सुद्धा माहिती द्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०९:४७, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply
@आर्या जोशी: स्वतःचा स्वार्थ साधून घेतात मी आपल्या या वाक्याशी पूर्णपणे सहमत असून इथे अजून २-३ असे सदस्या आहेत जे नियमांना डावलून संकलन करतात! मला तर अशी शंका आहे, हा स्वार्थी सदस्या बहुधा काही आर्थिक फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी या पदाचा वापर करतो! माझा या सदस्यास ठाम विरोध आहे. (११:१३, ११ ऑक्टोबर २०१८ (IST))Reply

प्रिय प्रचालक मंडळ आणि इतर,

काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या चिंतांमुळे मी काही मुद्दे स्पष्ट करू इच्छितो.

  1. सदस्यास अवैध म्हणून मत देण्याचा अधिकार नाही.
  2. विकिपीडिया हा लोकशाही नाही जेथे सर्वसंमतीने मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते.
  3. एक तात्पुरता प्रचालक हा प्रचालक आहे जो कायमस्वरुपी अवधीसाठी प्रशासकीय अधिकारवर नाही. म्हणजेच प्रचालक आणि तात्पुरते प्रचालक वेगळे नाही. दोन्ही स्थानिक धोरणां अंतर्गत शासित असतात, जे विकिपीडिया:प्रचालक वर आढळतात.
  4. स्थानिक निती (विपी:प्रचालक) नुसार माजी प्रचालक धोरण निश्चित आहे. माजी प्रचालकाला केवळ प्रचालक मंडळाचीच मते आपले प्रशासन चालू ठेवण्यासाठी घ्यावी लागतात.
  5. विकि समुदाय यात भाग घेत नाही किंवा मतदान प्रक्रियेत भाग घेण्याची त्यांना परवानगी नसते.
  6. मतदानाची ही प्रक्रिया जवळपास इतर सदस्यांसह / संपादक / कर्मचारी / अधिकार्यांकडे नजर ठेवली गेली आहे त्यामुळे मतदान प्रक्रियेत बाधा आणल्यामुळे फौंडेशन त्यांच्याशी सक्त व्यवहार केला जाईल.

त्यामुळे अशी माझी इच्छा आहे की, प्रचालक मंडळांनी कार्यकाल संपल्यावर मतदानास अंतिम स्वरूप देण्यासाठी म्हणजेच निर्णय देण्यासाठी यावे आणि नोकरशाहींची नोंद घ्यावी. आपला आभारी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:०१, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

तात्पुरत्या प्रचालकांना कायम करण्याचे धोरण मराठी विकिपीडिया समुदायाने ठरवलेले नाही. हे @अभय नातू: यांनी देखील मान्य केले आहे.[] त्यामुळे अशा पद्धतीचा कौल घेणे हे अवैध, चुकीचा पायंडा पडणारे आणि समान सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी विसंगत ठरेल. त्यामुळे हा कौलाच रद्दबातल ठरवावा अशी मी प्रचालकांना नम्र विनंती करतो. --Pushkar Ekbote (चर्चा) २३:३५, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

तात्पुरत्या प्रचालकांना कायम करण्याचे धोरण मराठी विकिपीडिया समुदायाने ठरवलेले नाही म्हणजेच तात्पुरत्या प्रचालकांना कायम करण्याचे काही वेगळे विशेष धोरण मराठी विकिपीडिया समुदायाने ठरवलेले नाही, म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या प्रचालकांना पुढे कायम करण्यासाठी सध्याच्या प्रचालकांच्या चालू धोरणाअंतर्गतच काम करावे लागेल. या पद्धतीमधे प्रचालकांव्यतिरिक्त सर्व सदस्याचे कौल हे अवैध ठरतात, कारण सदस्यांना तसा अधिकारच नाही. त्यामुळे येथे नोंदवलेले अनामिक सदस्यांचे कौल व अप्रचालकीय सदस्यांचे कौल त्वरीत रद्द करावे अथवा त्यांना ग्राह्य धरू नये, ही माझी प्रचालक मंडळाला नम्र विनंती आहे. --संदेश हिवाळेचर्चा ००:४६, १२ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

प्रिय Tiven2240,
आपल्या तांत्रिक योगदानाबद्दल मी आपले कौतुक करतो. पण आपल्या प्रतिक्रियेतील काही मुद्दे खटकले ते मांडत आहे. मला असे वाटते के, स्वत:विषयी काही एक कौल प्रक्रिया सुरु आहे, तेथे मी तटस्थ असले पाहिजे, इतर अनुभवी सहकारी लक्ष देत आहेत यावर विश्वास ठेवून. कोणत्याही सदस्यांना मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य आहे. प्रक्रिया म्हणून एखादी चूक घडली तर दुरुस्त करता येते. प्रचालक या महत्वाच्या पदावर असताना - आपण दखल का घेतली असा जाब विचारणे, सक्त व्यवहार केला जाईल...अशी विधाने तातडीने करणे पूर्णतः अयोग्य आहे असे वाटते. आपण केलेल्या खालील विधानांमधून आपण काय संदेश देऊ इच्छिता हे स्पष्ट होत नाही.

सदस्यास अवैध म्हणून मत देण्याचा अधिकार नाही.
विकिपीडिया हा लोकशाही नाही जेथे सर्वसंमतीने मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते.
एक तात्पुरता प्रचालक हा प्रचालक आहे जो कायमस्वरुपी अवधीसाठी प्रशासकीय अधिकारवर नाही. म्हणजेच प्रचालक आणि तात्पुरते प्रचालक वेगळे नाही. दोन्ही स्थानिक धोरणां अंतर्गत शासित असतात, जे विकिपीडिया:प्रचालक वर आढळतात.
मतदानाची ही प्रक्रिया जवळपास इतर सदस्यांसह / संपादक / कर्मचारी / अधिकार्यांकडे नजर ठेवली गेली आहे त्यामुळे मतदान प्रक्रियेत बाधा आणल्यामुळे फौंडेशन त्यांच्याशी सक्त व्यवहार केला जाईल.
त्यामुळे अशी माझी इच्छा आहे की, प्रचालक मंडळांनी कार्यकाल संपल्यावर मतदानास अंतिम स्वरूप देण्यासाठी म्हणजेच निर्णय देण्यासाठी यावे आणि नोकरशाहींची नोंद घ्यावी.

माझे याच्यावरील मत –
मराठी विकिपीडियात लोकशाही आहे, बहुसंख्येचे तत्व आहे म्हणूनच आपण निवडून आलात. आपल्याला मिळालेल्या ११ मतांपैकी ६ मते ही पुढील सदस्यांची आहेत. कंसात त्यांचे आजवरचे योगदान आहे - Dagduba lokhande (६), विनायक कटक (६६), Rohini (२०२), Hrithik2908 (११), Vijay bramhane(१), Ravindraphule (२४). महत्वाच्या कौल प्रक्रियेसाठीसुद्धा मतदारांचे पात्रता निकष धोरण नसल्याने हे होऊ शकले. यापुढे या धोरणाविषयी गंभीरपणे विचार केला पाहिजे असे प्रचालकांना सुचवावेसे वाटते.

मुळात तात्पुरता प्रचालक असे कुठेच पद नाही. म्हणून मागील निर्णयात म्हटले आहे :

नरसीकर - यासाठी वाटल्यास,काही कालावधीसाठी त्यांना हे पद बहाल करावे, त्याचा आढावा घेत रहावा व त्या ठरविलेल्या कालावधीनंतर (सहसा ३-६ महिने), त्यानंतर पुढे त्यांचे प्रचालकपद सुरू ठेवायचे अथवा काढायचे याचा पुनर्विचार करता येईल.
अभय नातू - यावरुन सदस्य Tiven2240 यांना १६ एप्रिल, २०१८ रोजी सहा महिन्याकरिता मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात येत आहे. साधारण १५ सप्टेंबर, २०१८च्या सुमारास येथील प्रचालक Tiven2240 यांच्या प्रचालकपदी कायमीकरण करण्यासाठी कौल घेण्याची प्रक्रिया सुरू करतील.

सद्य धोरणात असलेला माजी प्रचालक याचा अर्थ -

दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वत:हून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना(प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.

सबब, ही कौल प्रक्रिया नियमांना धरून नाही. सर्व प्रचालकांचे यावर मत घेणे मराठी समुदायाच्या हिताचे आहे. तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी टायविन यांच्या कामाचे मुल्यांकन खुलेपणाने व्हावे. त्यांचे तांत्रिक योगदान सोडले तर प्रचालक म्हणून त्याची कामगिरी समाधानकारक नाही. मी मागेही मांडले आहे, त्यांचे तांत्रिक सहकार्य प्रचालकांनी त्या त्या वेळी योग्य ते अधिकार देऊन जरूर घ्यावे. यासाठी अनेकविध जबाबदाऱ्या असलेले पद घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. टायविन यांना नरसीकर यांनी दिलेला सल्ला –‘त्यांनी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देतांना व निर्णय प्रक्रियेत तसेच कोणतीही प्रचालक कार्यवाही करतांना आवश्यक तो संयम बाळगावा’ – याच्याशी मी सहमत आहे. तपशील मुल्यांकन होईल तेव्हा मांडेन.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:०४, १३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

नमस्कार @सुबोध कुलकर्णी:,

आपण मराठी विकिपीडियावर अनेक कामी केली असतील. इथले प्रचालक व मी सुद्धा कधी आपल्या कामात आलो नाही. आपल्या साईट नोटीस व इतर प्रचालकीय कामात मी सुद्धा हातभर लावला आहे. परंतु मी आशा केली नाही की आपण देखील 'प्रभावित मताचे' बळी पडतील. आपल्याला नियम ठाऊक आहे ते वर स्पष्टपणे दिसून येते परंतु तरीही आपण काही ठिकाणी चुकता.

कुठला ही सदस्य असो भले तो प्रचालक असो, प्रतिपालक असो या संपादक त्याला विकिपीडिया:पाच आधारस्तंभचेविकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे याचे पालन करावे लागते. त्यात उचित प्रमाणे ठरले आहे की विकिपीडिया लोकशाही नाही

विकिपीडियावर मी आर्या यांची अनेक ठिकाणी मदत केली आहे परंतु ते म्हणतात की यात माझे यात स्वार्थ आहे त्याने मला खूप दुःख झाले व त्यांच्यातून अशी अपेक्षा नव्हती. ते एक स्वातंत्र्य सदस्य आहेत व ते त्यांचे पक्ष मांडतील व माझे उत्तर सुद्धा देतील, आपण त्यांचे वतीने बोलणे मला योग्य वाटत नाही.

नक्की मी सदस्य:V.narsikar यांच्या मतीने सहमत आहे व त्यांना व इतर सर्व प्रचालक/प्रशासक/प्रतिपालकाना ठाऊक आहे की मी एकही कार्य असे केले नाही ज्यानी मराठी विकिपीडियावर प्रचालक अधिकाराचा गैरवापर झाले आहे. नक्की मी उत्पात करणारे व इथे नासाडी/गोंधळ घालणारे सदस्याला तडीपार केले व भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात करेल. माझी तक्रार प्रतिपालक कडे सुद्धा केली गेली परंतु त्यांना सर्व माहिती आहे व ते नेहमी माझ्या कामावर लक्ष देतात. विकिस्रोत वर सुद्धा आपण म्हटले की आपल्याला प्रचालक व तांत्रिक प्रचालक अधिकार कसे भेटले. उत्तर देताना म्हणतो ते माझे कार्य व विश्वास पाहून मला सदस्य अधिकार दिले आहे.

जसे आपण म्हटले: अनेकविध जबाबदाऱ्या असलेले पद घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही

फक्त हे पान पहा मराठी विकिपीडियाचे निर्मिती पासून तर आजपर्यंत ३८ प्रचालकीय अधिकार सदस्य आले परंतु सर्वात जास्त प्रचालकीय काम माझ्या हातून झाले आहे. हे फक्त अभय व नारसिकर यांच्या माझ्यावर विश्वासामुळे झाले आहे.

प्रभावित मत हे इथे स्पष्टपणे दिसून येते. आपल्यासमोर धोरण आहेत, आपल्यासमोर माझे प्रचालकीय कार्य आहेत सर्व पारदर्शक आहे, तरीही आपण एका सदस्याचे प्रभावात येउन आपले चुकीचे मत मांडत आहेत हे पाहून मला खेद आहे. कधीकधी मला हसताना वाटते पहिला नवीन धोरण निश्चित करा, नंतर मी स्वतःचे स्वार्थ घेतो, नंतर आई पी द्वारे हल्ला, नंतर पाळीव खाते, नंतर अभय यांनी सांगितलेले शब्दाचे गैरसमज, व आता धोरण दाखवून त्याच्याविरोध म्हणतात किती अजून येतील ते सुद्धा पाहू. Todo lister मध्ये ला रा टाकून, सर्व चर्चापानावर माझे नाव घेऊन खोटे आरोप व निराधार गोष्टी करून काहीही भेटणार नाही. इतके वेळ जर आपण संपादनात लावले असते तर आज मी आपल्याला खुशी खुशी तुमच्या नामांकणात कौल दिले असते. जर १०० सदस्यांना सुद्धा आपण प्रभावित केले तरीही माझ्या कामावर असर पडणार नाही. संपूर्ण ५२,००० लेखाच्या चर्चापानावर सुद्धा लिहा की मी गैरवापर केले आहे तरीही माझी संपादने व कार्य थांबणार नाही. मराठी विकिपीडियावर मी जे चांगले काम केले आहे ते सर्वांना ठाऊक आहे बोलणाराने खूप असतात करणारे कमी. माझ्या सारखे विश्व अधिकार व जबाबदारी एकदा घेऊन पहा फक्त बोलू नका तर करून दाखवा माझ्यापासून काही प्रेरणा घेऊन पहा. स्वार्थ पाहिले असते तर आज इतके मोठे अधिकाराची जबाबदारी घेतली नसती. असो मी आपल्याला काही थांबू शकत नाही परंतु विकिपीडियाचे धोरणाचे व इतर तत्वाचे उल्लंघन करून पाहा. आपल्यावर कार्यवाही करणारे पहिला सदस्य:Tiven2240 असेल. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:५२, १३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी: इथे परत शिष्टमंडळाची हमरातुमरी झालेली चुकली बहुधा अरेच्या दुःख होतंय ! आणि एवढं सगळं होऊन मनमानी कारभार सुरूच आहे! अभय नातू तुमच्यासारखा देव मनुष्य तुम्हीच! एवढ कसा सहन करता तिकडे सुबोध काहीतरी नीट बोलला तर नेसरीकर ने ते फक्त प्रचालकांना प्रबांधित केलं हीच का ती कलयुगातली लोकशाही! अभय अजब तुझं सरकार आणि लोकांना दिलेलं अभय !!!! ( https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना_निवेदन#पुन्हा_एकदा ) सत्य जर अस्तित्वात असेल व जनाची नाही आणि मनाची असेल तर अशा लोकांनी पदाचा त्याग करावा. अभय रावांनी व नेसरकारांनी याना अभय दिलंच आहे. आता सत्याचा चेहरा दाखवीला म्हणून मला कदाचित बॅन करतील पण अर्वाच्य भाषा वापरणारे असेच पदांची मजा घेतील या पानांचे स्क्रिनशॉट घेतलेले आहेच हे जर नीट घडला नाही व हि लोक कारवाईस पात्र ठरली नाहीत तर हे लवकरच विविध वृत्तपत्रास पाठविलं जाईल हे लक्षात ठेवा. विकिपीडिया हि कोणाचीही वैयक्तिक जहागिरी , मालमत्ता, जाहिरात किंवा वाद घालण्याचे ठिकाण नाही, हे चांगल्या गोष्टी, कार्य , घटना, जतन करण्याची जागा आहे ! यावर लेखी उत्तर व त्वरित कारवाईची अपेक्षा करत आहे, तसेच ती केल्यास जाहीर करावे हि विनंती करीत आहे ! या टायवेनं व खोलेनी वैयक्तिक द्वेषाने माझा आय डी बॅन केल्याने हा मेसेज नवीन खोटा आय डी ना बनविता टाकला असे. (103.51.153.82 ११:०४, १४ ऑक्टोबर २०१८ (IST))Reply
पुन्हा आपल्यावर बंदी तर लागणार आहे ही नक्की आहे, तुमचे कितीही खाते तडीपार केली तरीही आपण काय सुधारत नाही. मराठीत म्हणतात काथा जाळून गेले परंतु कथेचा वळ गेला नाही. नक्की तुम्ही स्क्रीनशॉट घ्यावे त्याला वृत्तपत्रास सुद्धा टाकावे त्यांनी आमचे काहीही होणार नाही. विकिपीडिया एक स्वतंत्र प्रकल्प आहे आणि त्याचा संबंध वास्तविक दुनियापासून काही नाही. नक्की गोसावी आपल्याला तर इथे जाहिरात कराची आहे ते मी व इतर प्रचालक/प्रशासक/प्रतिपालक/संपादक होऊन देणार नाही. @Sureshkhole: याचा यांच्यात काहीही संबंध नाही त्यांच्यावर खोटे आरोप करू नका. एका शब्दात आपल्याला सांगण्यास इच्छितो विकिपीडिया इस नॉट फॉर योर प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१३, १४ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply


तेथे देण्यात आलेले प्रचालकांव्यतिरिक्त असलेले कौल येथे स्थानांतरीत

  विरोध- माझा विरोध आहे. - [[सदस्य:--आर्या जोशी (चर्चा) ०९:३९, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)|--आर्या जोशी (चर्चा) ०९:३९, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)]]Reply
  विरोध- माझा विरोध आहे,कारण यांचे सुनिश्चित धोरण नाही.. - नविनघाणेकर
  1. ^ https://mr.wikipedia.org/s/3xas
Return to the project page "कौल/माजी प्रचालक".