कोकण रेल्वे क्षेत्र

(कोंकण रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
कोकण रेल्वे मार्ग
किमी
पनवेलकडे
0 रोहा (RN)
13 कोलाड
24 इंदापूर
30 माणगाव
41 गोरेगाव रोड
47 वीर
55 सापे वामणे
63 करंजाडी
71 विन्हेरे
नातूवाडी बोगदा (4 किमी)
81 दिवाणखवटी
98 खेड
112 अंजणी
128 चिपळूण
चिपळूण बोगदा (2 किमी)
138 कामठे
सावर्डे बोगदा (3 किमी)
147 सावर्डे
शास्त्री पूल
परचुरी बोगदा (3 किमी)
150 आरवली रोड
गड पूल
171 संगमेश्वर रोड
184 उक्शी
कर्बुडे बोगदा (6 किमी)
197 भोके
203 रत्नागिरी
पानवल नदी दरीपूल
टिके बोगदा (4 किमी)
219 निवसर
235 आडवली
बेर्डेवाडी बोगदा (4 किमी)
250 विलवडे
267 राजापूर रोड
284 वैभववाडी रोड
299 नांदगाव रोड
314 कणकवली
333 सिंधुदुर्ग
343 कुडाळ
353 झाराप
364 सावंतवाडी रोड
371 मादुरे
महाराष्ट्र राज्य
गोवा राज्य
पेडणे बोगदा (1 किमी)
382 पेडणे
393 थिविम
मांडवी नदी पूल
411 करमाळी
झुआरी पूल
427 वेर्णे
432 माजोर्डा
435 सुरावली
438 मडगांव
456 बल्ली
बार्सेम बोगदा (3 किमी)
472 काणकोण
गोवा राज्य
कर्नाटक राज्य
492 अस्नोटी
काळी नदी पूल
500 कारवार
कारवार बोगदा (3 किमी)
513 हारवाड
528 अंकोला
526 गोकरण रोड
555 कुमठा
568 होन्नावर
शरावती पूल
586 मंकी
595 मुरुडेश्वर
603 चित्रापूर
609 भटकळ
617 शिरूर
625 मूकांबिका रोड बैंदूर
631 बिजूर
644 सेनापुरा
658 कुंदापूर
674 बारकूर
690 उडुपी
700 इन्नंजे
706 पडुबिद्री
715 नंदीकुर
723 मुल्की
732 सुरतकल
736 तोकुर
गुरूपुरा नदी
हसन जंक्शनकडे
मंगळूर जंक्शनकडे


कोकण रेल्वे हा मुंबईमंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.

17 - कोकण रेल्वे
१,३१९ मी (४,३२७ फूट) लांबीचा गोव्यामधील झुआरी नदीवरील पूल
कारवार रेल्वे स्थानक

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे झाले आहे. रोहा ते रत्‍नागिरी या दरम्यान २२ फेब्रुवारीपासून २०२१पासून OHE अर्थात ओव्हरहेड इलेक्ट्रिक वाहिनीमधून २५ किलोव्होल्टचा विद्युत प्रवाह वाहतो. ४ मार्च २०२१ रोजी पहिल्यांदा विजेवर धावणारे इंजिन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रोहा ते रत्‍नागिरी असे पहिले विद्युत इंजिन धावले. ही चाचणी यश्स्वी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत. (७ मार्च २०२१ची बातमी.)

इतिहास

संपादन

मुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नान्डिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.

७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्‍नागिरी उत्तर, रत्‍नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवारउडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षां ३ महिन्याचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या.जवळपास ४७ हजार कुटुंब विस्थापित झाले .

मार्ग

संपादन
  • एकूण लांबी: ७४० किमी (४६० मैल)
  • स्थानके: ५९
  • वळणे: ३२०
  • मोठे पूल: १७९
  • सर्वाधिक लांबीचा पूल: २,०६५.८ मी (६,७७८ फूट) (होन्नावर येथे शरावती नदीवर)

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन