मधू दंडवते

भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी

मधू दंडवते (जानेवारी २१, इ.स. १९२४ - नोव्हेंबर १२, इ.स. २००५) हे भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते.

मधू दंडवते

कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९९०
मतदारसंघ राजापूर

जन्म २१ जानेवारी, १९२४ (1924-01-21)
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १२ नोव्हेंबर, २००५ (वय ८१)
राजकीय पक्ष जनता दल, जनता पक्ष
पत्नी प्रमिला दंडवते
धर्म हिंदू

कारकीर्दसंपादन करा

दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.

त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले [१].

हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ "मधू दंडवतेज बॉडी डोनेटेड टू जे.जे. हॉस्पिटल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)



कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.