प्रमिला दंडवते (ऑगस्ट २७, इ.स. १९२८- जानेवारी १, इ.स. २००२) या महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेत्या होत्या. त्या इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रिय मंत्री मधु दंडवते यांच्या त्या पत्नी होत्या.