मत्स्यगंधा एक्सप्रेस

मत्स्यगंधा एक्सप्रेस (कन्नड: ಮತ್ಸ್ಯಗಂಧ ಎಕ್ಷ್ಪ್ರೆಸ್ಸ) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.

मत्स्यगंधा एक्सप्रेसचा फलक
मत्स्यगंधा एक्सप्रेसचा मार्ग

१ मे १९९८ रोजी सुरू झालेली ही कोकण रेल्वेवरील सर्वात प्रथम गाड्यांपैकी एक होती.

तपशील संपादन

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
10111 मुंबई लोटिट – मंगळूर सेंट्रल १५:२० ०७:३० रोज ४६ किमी/तास १,१८६ किमी
10112 मंगळूर सेंट्रल – मुंबई लोटिट १४:३५ ०६:३५ रोज
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
CSTM लोकमान्य टिळक टर्मिनस
TNA ठाणे १८
PNVL पनवेल ५३
MNI माणगाव १७३
KHED खेड २६८
CHI चिपळूण ३०९
RN रत्‍नागिरी ४१५
KUDL कुडाळ ६१०
MAO मडगांव ७५०
१० CNO काणकोण ७९५
११ KAWR कारवार ८३२
१२ ANK अंकोला ८७१
१3 GOK गोकर्ण रोड ८८२
१४ KT कुमटा ९०९
१५ HNA होन्नावार ९२८
१६ MRDW मुरुडेश्वर ९६५
१७ BTJL भटकळ ९८५
१८ BYNR बैंदूर १००७
१९ KUDA कुंदापूर १०५४
२० BKJ बार्कुल १०७६
२१ UD उडुपी १०९९
२२ MULK मुल्की ११४५
२३ SL सुरत्कल ११५८
२४ MAQ मंगळूर सेंट्रल ११८६

बाह्य दुवे संपादन