मुरुदेश्वर

कर्नाटकातील पर्यटन स्थळ
(मुरुडेश्वर, कर्नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)

मुरुदेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भातकल तालुक्यामधील एक नगर आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या १५० किमी उत्तरेस स्थित आहे. मुरुदेश्वर हे हिंदू धर्मातील भगवान शंकराचे एक नाव असून हे गाव जगामधील द्वितीय क्रमांकाच्या उंच शंकराच्या मूर्तीसाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुरुडेश्वरची कथा शिवपुराणामध्ये पहावयास मिळते.

मुरुदेश्वर
ಮುರುಡೇಶ್ವರ
भारतामधील शहर

येथील प्रसिद्ध शंकराचा मोठा पुतळा
मुरुदेश्वर is located in कर्नाटक
मुरुदेश्वर
मुरुदेश्वर
मुरुदेश्वरचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 14°5′37″N 74°29′1″E / 14.09361°N 74.48361°E / 14.09361; 74.48361

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा उत्तर कन्नड जिल्हा
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


मुरुदेश्वर राष्ट्रीय महामार्ग १७ वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे.

शंकर मंदिराचे विशाल गोपुर