नेत्रावती एक्सप्रेस

एक रेल्वेगाडी

नेत्रावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. ही गाडी कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येते.

नेत्रावती एक्सप्रेसचा मार्ग

इतिहास

संपादन

सुरुवातीला ही गाडी मुंबई ते कोची दरम्यान लिंक ट्रेन म्हणून पुणे, गुलबर्गा, कृष्णराजापुरम, पलक्कडमार्गे धावत होती. ती शोर्नुर जंक्शन येथे वेगळी होत होती. जुन्या मार्गाने या गाडीला मुंबईहून मंगलोर पोहोचण्यासाठी ४८ तास लागत होते. १९९८मध्ये कोंकण रेल्वे कार्यरत झाल्यावर या गाडीचा मार्ग बदलून कोंकण रेल्वे मार्गे करण्यात आला. यामुळे या गाडीचा मुंबई – मंगलोर प्रवास वेळेत लक्षणीय घट होऊन तो १६ तासांवर आला. ही लिंक एक्सप्रेस नंतर कोची पर्यंत सलग ठेवण्यात आली.[] आणि तेथून पुढे १० फेब्रुवारी २००१ पासून तिरुवनंतपुरमपर्यंत (केरळची राजधानी) वाढवण्यात आली.[]

पार्श्वभूमी

संपादन

मंगलोर शहर नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. आधी या गाडीचे शेवटचे स्थानक मंगलोर असल्याने तिचे नाव नेत्रावती एक्सप्रेस ठेवण्यात आले.[]

मार्ग

संपादन

नेत्रावती एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्‍नागिरी, कुडाळ, मडगांव, उडुपी, कोळिकोड, एर्नाकुलम, अलप्पुळातिरुवनंतपुरम ही आहेत.

रेल्वे क्रमांक[]

संपादन
  • ६३४५: मुंबई लो.टी.ट. - ११:४० वा, तिरुअनंतपुरम - १८:४० वा (दुसरा दिवस)
  • ६३४६: तिरुअनंतपुरम - १०:०० वा, मुंबई लो.टि.ट. - १६:४० वा (दुसरा दिवस)

इंजिन

संपादन

रोयपुरम...लालागुडा ...कृष्णराजपुरम ...ईरोड येथील डब्ल्यू.ए .पी-7 हे विद्युत इंजिन लोकमान्य टिळक टर्मिनसपासून ते तिरुवनंतपूरम पर्यंत वापरले जाते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Introducing the Railway Budget for 1997-98 on 26th February, 1997" (PDF).
  2. ^ "Netravati and Raptisagar Express trains extended to capital".
  3. ^ "Netravati Express Route". 2017-02-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-01 रोजी पाहिले.
  4. ^ Indian Railways Website
  5. ^ "Indian Railways Loco Link - Netravati Express 16345 Mumbai Lokmanya Tilak Terminus(LTT) To Trivandrum Central(TVC)".