कोकण कन्या एक्सप्रेस

कोकण कन्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यामधील मडगांव स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसला मुंबई ते गोवा दरम्यानचे ५८० किमी अंतर पार करायला १३ तास व २५ मिनिटे लागतात. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला कोकण कन्या हे नाव दिले गेले आहे.

२५ जानेवारी १९९८ रोजी सुरू झालेली ही कोकण रेल्वेवरील सर्वात प्रथम गाड्यांपैकी एक होती. दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेसमांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.


तपशील संपादन

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
10111 मुंबई छशिट – मडगांव जंक्शन 23:05 10:45 रोज 63 किमी/तास 767 किमी
10112 मडगांव जंक्शन – मुंबई छशिट 18:00 05:50 रोज 63 km/h
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
1 CSTM छत्रपती शिवाजी टर्मिनस 0
2 DR दादर 8.6
3 TNA ठाणे 32.9
4 PNVL पनवेल 65.9
5 MNI माणगाव 172.0
6 KHED खेड 240.0
7 CHI चिपळूण 269.6
8 SGR संगमेश्वर रोड 312.2
9 RN रत्‍नागिरी 345.0
10 VID विलावडे 392.0
11 RAJP राजापूर रोड 408.8
12 VBW वैभववाडी रोड 435.3
13 KKW कणकवली 456.4
14 SNDD सिंधुदुर्ग 474.1
15 KUDL कुडाळ 484.7
16 SWV सावंतवाडी रोड 505.5
17 PERN पेडणे 524.0
18 THVM थिविम 534.9
19 KRMI करमळी 552.3
20 MAO मडगांव 579.6

बाह्य दुवे संपादन