मांडवी नदी (गोवा)
मांडवी नदी (Mandovi River) ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर कर्नाटकातून आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादई म्हणतात आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसऱ्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे आणि याच पुलाला मांडवी पूल म्हणून ओळखले जाते. म्हादेई नदीलाच महादयी नदी म्हणतात.
हा लेख मांडवी नदी (गोवा) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मांडवी (निःसंदिग्धीकरण).
मांडवी नदी याच्याशी गल्लत करू नका.