एलात्तुवलपिल श्रीधरन

एलात्तुवलपिल श्रीधरन, अर्थात ई. श्रीधरन (मल्याळम: എലാട്ടുവളപ്പില്‍ ശ്രീധരന്‍ ) (६ डिसेंबर इ.स. १९३२ - हयात) हे दिल्ली मेट्रोचे प्रबंध संचालक होते. ते दिनांक ३१ डिसेंबर, २०११ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.

ई. श्रीधरन
ഇ. ശ്രീധരൻ
जन्म ६ डिसेंबर इ.स. १९३२
पलक्कड, केरळ, भारत
राष्ट्रीयत्व मल्याळी, भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

सुरुवातीचे जीवन

संपादन
 
टप्पा १ ब्रॉड गेज ट्रेन
 
टप्पा २ ब्रॉड गेज ट्रेन

ई. श्रीधरन यांचा जन्म केरळच्या पलक्कड जिल्ह्यात झाला. त्यांचे उच्चमाध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अभियंत्याचे पदवी शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पालघाट येथे पूर्ण केले. त्यांनी व्याख्याता म्हणून काही काळ काम केले व मग भारतीय रेल्वेत नोकरी धरली. त्यांचे प्रथम काम दक्षिण रेल्वेत १९५४ मध्ये प्रशिक्षणार्थी सहायक अभियंता म्हणून होते. त्यानंतर त्यांनी भारतीय रेल्वेत मुख्य अभियंता, महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्डात सदस्य, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक व दिल्ली मेट्रोत संचालक अशी पदे त्यांनी भूषविली. दिल्लीचा मट्रो रेल्वे प्रकल्प त्यांनी सर अडचणींना तोंड देत साकार केला. ते अत्यंत निश्चयी व वक्तशीर आहेत.[]

प्रशासकीय कारकीर्द

संपादन
 
पंबन पूल

१९६३ मध्ये एका वादळाने पंबन पूल काही भाग वाहून गेला. तो पूल रामेश्वरमतमिळनाडूस जोडत होता. रेल्वेने हे काम ६ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले. परंतु, श्रीधरन ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करीत होते, त्यांनी त्याचा अवधी कमी करून ३ महिने इतका केला. श्रीधरन यांना या कामाचे मुख्य बनविण्यात आले व त्यांनी तो पूल केवळ ४६ दिवसातच पूर्ववत केला []. या कामात केलेल्या कामगिरीसाठी रेल्वे मंत्र्यांचे पदक त्यांना देण्यात आले.

त्यांनी दिल्ली ,हैदराबाद,चेन्नई,बंगलोर ,मुंबई,पुणे,चंदीगढ,अहमदाबाद ईत्यादी महानगरांत मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सुरुवात केली.सध्या ते कोचीसाठी मेट्रो रेल प्रकल्पकोळिकोड या शहराच्या मोनो रेल प्रकल्पासाठी कार्यरत आहेत. ते लवकरच ताशी ३५० कि.मी वेगाने धावणाऱ्या तिरुअनंतपुरम ते मंगलोर या सुमारे ५०० कि.मी.लांबीचा रेल्वेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करतील.[]

कलकत्ता मेट्रो

संपादन
मुख्य पान: कोलकाता मेट्रो

१९७० मध्ये उपमुख्य अभियंता म्हणून कोलकाता मेट्रोच्या नियोजन, आरेखन व अंमलबजावणीच्या कामासाठी त्यांना पदभार सोपविण्यात आला. ही भारतातील पहिली मेट्रो सेवा होती.

कोचीन शिपयार्डने त्याच्या प्रथम जहाजाचा जलावतरण शुभारंभ राणी पद्मिनी या जहाजाद्वारे केला, तो ई. श्रीधरन तेथे अध्यक्ष व प्रबंध संचालक असताना केला. ते भारतीय रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून १९९० मध्ये भारतीय रेल्वेतून निवृत्त झाले.

ठेकेदारीवर

संपादन
 
गोव्यातील 'झुआरी' नदीवरील १३१९ मीटर लांब कोकण रेल्वेचा पूल
 
दिल्ली मेट्रो स्थानकावर येत असतांना

कोकण रेल्वे

संपादन
मुख्य पान: कोकण रेल्वे

ते निवृत्त झाल्यावरही त्यांची सेवा भारत सरकारला हवी होती. त्यांना १९९० मध्ये कोकण रेल्वेचे मुख्य प्रबंध संचालक म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या आधिपत्याखाली हा प्रकल्प सात वर्षात पूर्ण केला गेला. तो अनेक बाबतीत अद्वितीय आहे. त्यात अनेक खुब्या होत्या तो 'बांधा वापरा व हस्तांतरत करा' या तत्त्वाचा तो पहिला प्रकल्प होता. भारतीय रेल्वेच्या खास शैलीपेक्षा त्याची संस्थाकृत बांधणी अगदी वेगळी होती. या प्रकल्पात ८२ कि.मी मध्ये ९३ बोगदे होते जे मृदु मातीत बनविलेया गेले. ही रेल्वेलाईन ७६० किमी लांबीची आहे ज्यात सुमारे १५० पूल आहेत. हा अत्यल्प दरात पूर्ण झालेला प्रकल्प होता. त्यांनी या कामासाठी रेल्वेचे अत्यंत हुशार अभियंते निवडून घेतले होते. त्यांनी यासाठी पूर्ण समर्पण भावाने काम केले.[]

दिल्ली मेट्रो

संपादन
मुख्य पान: दिल्ली मेट्रो

२००५च्या मध्यावधीत त्यांना दिली मेट्रोचे प्रबंध संचालक बनविले गेले. यातील विविध विभाग त्याच्या अंदाजपत्रकीय किमतीत व नियोजित वेळेत वा त्याआधी पूर्ण करावयाचे होते. त्यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे 'मेट्रो मॅन' ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना फ्रान्स या देशाद्वारेही २००५ मध्ये गौरविण्यात आले. त्यांनी २००५ मध्ये निवृत्त होण्याची घोषणा केली. परंतु त्यांचा कार्यकाल, दिल्ली मेट्रोचे दुसऱ्या टप्प्याचे थकित काम बघून आणखी ३ वर्षे वाढविण्यात आला. त्यांनी दिल्लीतील जुन्या व महत्त्वाच्या इमातींना धक्काही लागू न देता बोगदा खणून व प्रत्येक तांत्रिक अडचणींतून मार्ग काढून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. सरकारी खात्यातील भ्रष्ट्राचार, दप्तर दिरंगाई, गुणवत्तेशी तडजोड, राजकय हस्तक्षेप यांना न जुमानता त्यांचे काम सुरू होते.[]

जुलै २००९ मध्ये श्रीधरन यांनी मेट्रोचा एक निर्माणाधीन पूल कोसळल्यामुळे, नैतिक जबाबदारी म्हणून, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमधील प्रबंध संचालक पदाचा राजीनामा दिला. या घटनेत ५ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या.[] परंतु दिल्लीच्या मुख्यमंत्री तो नाकारला. एका दिवसानंतर श्रीधरन यांनी राजीनामा परत घेतला.[] श्रीधरन यांनी निवेदन दिले कीई दिल्ली मेट्रोचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ते आपले पद सोडतील.[] दिल्ली मेट्रोची १४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर ते दिनांक ३१ डिसेंबर २०११ रोजी सेवानिवृत्त झाले. []

 
पूर्व दिल्लीत मेट्रो रेल्वेचे तिकीट खरीदण्यासाठी झालेली गर्दी
 
मेट्रोच्या डब्यातील दृश्य

पुरस्कार व पदके आणि पुस्तक

संपादन
  • पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००१)
  • पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २००८)
  • 'मॅन ऑफ दि इअर पुरस्कार' टाइईम्स ऑफ इंडिया तर्फे (इ.स. २००२)
  • श्रीधरन यांच्या जीवनावर ’मेट्रोमॅन श्रीधरन’ नावाचे पुस्तक एम.एस. अशोकन यांनी लिहिले आहे, त्याचा मराठी अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे,

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b c 'मेट्रोकार श्रीधरन' Archived 2014-07-30 at the Wayback Machine., लोकमत, नागपूर - ई-पेपर - मंथन पुरवणी दिनांक ११/०८/२०१३ पान क्र. ६
  2. ^ "देल्हीज सबवे बिल्डर (दिल्लीच्या सबवेचा निर्माता)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ 'मेट्रोकार श्रीधरन' Archived 2014-07-30 at the Wayback Machine., लोकमत, नागपूर - ई-पेपर - मंथन पुरवणी दिनांक १८/०८/२०१३ पान क्र. ४
  4. ^ "दिल्ली मेट्रोच्या अपघातामुळे श्रीधरन यांचा राजीनामा". IBNLive. 12 July 2009. 2009-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-12 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  5. ^ "श्रीधरन यांनी राजीनामा परत घेतला; मुख्यमंत्री म्हणतात-देशास त्यांची गरज आहे". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 July 2009. 2009-07-13 रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  6. ^ टप्पा २ पूर्ण झाल्यावर मी पद सोडेन-श्रीधरन (इंग्लिश मजकूर)
  7. ^ देश निष्णात लोकांच्या स्वाधीन करीत आहो, त्यांना काम करू द्या-श्रीधरन(इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

संपादन