सप्टेंबर १८
दिनांक
साचा:सप्टेंबर२०२४ सप्टेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६१ वा किंवा लीप वर्षात २६२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसोळावे शतक
संपादन- १५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.
अठरावे शतक
संपादन- १७३९ - बेलग्रेडचा तह - बेलग्रेड ऑट्टोमन साम्राज्याच्या हवाली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८५० - अमेरिकेच्या काँग्रेसने फ्युजिटिव्ह स्लेव्ह ऍक्ट हा कायदा लागू केला.
- १८८५ - माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगाधोपा सुरू केला.
विसावे शतक
संपादन- १९०६ - चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले.
- १९१९ - नेदरलँड्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- १९२२ - हंगेरीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
- १९३४ - सोवियेत संघाला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - पोलंडचे सरकार पळून रोमेनियाला गेले.
- १९४३ - ज्यूंचे शिरकाण - सोबिबोरची कत्तल.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - ब्रिटिश पाणबुडी एच.एम.एस. ट्रेडविंडने जपानच्या जुन्यो मारु हे जहाज बुडवले. ५,६०० मृत्युमुखी.
- १९४८ - मार्गारेट चेझ स्मिथ अमेरिकेची पहिली स्त्री सेनेटर झाली.
- १९६१ - संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस दाग हॅमरशील्डचा विमान अपघातात मृत्यू.
- १९६२ - र्वांडा, बुरुंडी आणि जमैकाला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७३ - पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७४ - हरिकेन फिफि होन्डुरासच्या किनाऱ्यावर आले. ५,००० ठार.
- १९८१ - फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.
- १९९० - लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९९७ - टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.
- १९९८ - आयकानची स्थापना.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
- २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.
जन्म
संपादन- ५३ - ट्राजान, रोमन सम्राट.
- १७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
- १७६५ - पोप ग्रेगरी सोळावा.
- १८७६ - जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
- १८९२ - सॅम स्टेपल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
- १९३७ - आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - ऍन, रोमेनियाची राणी.
- १९४० - ब्रेस मरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू
संपादन- ९६ - डॉमिशियन, रोमन सम्राट.
- ११८० - लुई सातवा, फ्रांसचा राजा.
- १७८३ - लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.
- १८७० - चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.
- १९७० - जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
- १९९३ - असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक.
- १९९४ - व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९९५ - काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी.
- १९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक.
- २००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
- २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- वरिष्ठ नागरिक आदर दिन - जपान.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर महिना