स्वागत | Priya v p, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Priya v p, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४७ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
'र्या' - 'र्या'
संपादनप्रिया,
चंगीझ खानावरील लेखात बयाच ठिकाणी 'र्या' ऐवजी 'र्या' असे चुकीचे लेखन झाल्याचे दिसले (उदा.: दुसर्या). तुम्ही 'बरहा डायरेक्ट' सॉफ्टवेअर वापरून लिहीत असाल तर 'r^yaa' असे लिहून बघा.. ते 'र्या' असे दिसेल.
धन्यवाद,
--संकल्प द्रविड 13:29, 26 सप्टेंबर 2006 (UTC)
संकल्प मी तुम्हाला निरोप कसा पाठवायचा? सांगता येईल का?
प्रिया.
Help
संपादनमला इतरांना निरोप कसे पाठवता येतील? किंवा चर्चा कशा करता येतील?
priyambhashini 14:21, 26 सप्टेंबर 2006 (UTC)priya_v_p
Re:Help
संपादननमस्कार,
- एखाद्या सदस्याला निरोप कसा पाठवावा -
- त्या सदस्याचे चर्चापान शोधावे. सहसा ते User Talk:सदस्याचे नाव येथे असते, जसे माझे आहे User Talk:अभय नातू.
- या पानाच्या वरच्या भागात संपादन असा मथळा असतो. त्याजवळ अधिक चिह्न (+) असते. त्यावर टिचकी द्यावी व नवीन संदेश लिहावा.
- दुसरा सदस्य जेव्हा विकिपीडियाला पुन्हा भेट देईल तेव्हा त्यास कळेल की कोणी तरी संदेश ठेवलेला आहे.
- चर्चा कशी करावी -
- जर सदस्याशी चर्चा करायची असेल तर वरीलप्रमाणे एकमेकांच्या चर्चापानावर संदेश ठेवून करावी.
- जर विकिपिडीयाच्या सगळ्या सदस्यांशी चर्चा करायची असेल तर चावडीवर संदेश ठेवावा. चावडी येथे आहे.
- जर एखाद्या लेखाबद्दल चर्चा करायची असेल तर त्या पानाच्या मथळ्याजवळील चर्चा वर टिचकी देउन संदेश ठेवावा.
प्रत्येक वेळी संदेशाच्या शेवटी ~~~~ असे लिहावे. याचे रूपांतर तुमच्या सदस्य-नाव व संदेश ठेवल्याच्या तारीख-वेळ नोंदीत होते.
अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण लागल्यास निःसंकोचपणे चावडीवर किंवा मला निरोप पाठवा.
क.लो.अ.
अभय नातू 15:30, 26 सप्टेंबर 2006 (UTC)
गौरव
संपादनPriya v p,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी इतिहास विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 03:37, 30 सप्टेंबर 2006 (UTC)
चंगीझ खान आणि इतर इतिहासविषयक लेखन
संपादनप्रिया, चंगीझ खानाबद्दलच्या लेखात तुम्ही टाकत असलेली भर प्रशंसनीय आहे! तरीही त्या लेखात चंगीझ खानाच्या आयुष्यातील विविध माणसांची नावे(आणि त्यांचे शक्य तितके अचूक उच्चारानुसारी लेखन), विविध घटनांबाबतचे सन, ठिकाणे या सर्वांबाबत दुवे देऊन हा लेख आणखीन चांगला होऊ शकेल. इंग्लिश विकीपीडियावरील लेखांच्या दर्जेदार सादरीकरण पद्धतींचा आपणही अवलंब करू शकतो. वानगीदाखल Genghis Khan हा लेख पाहा.
इतिहास आणि अन्य विषयांवर तुमच्याकडून मराठी विकिपीडियाकरता अशीच मोलाची भर पडत जाईल अशी अपेक्षा आहे. :-)
--संकल्प द्रविड 19:20, 6 ऑक्टोबर 2006 (UTC)
Wiki Commons
संपादनPl. find enclosed a search link at Wiki Commons
Mahitgar 00:23, 7 ऑक्टोबर 2006 (UTC)
poll vote
संपादनप्रिया, प्रबंधकासाठीच्या मतदानात तुमचे मत ग्राह्य धरले जाण्याकरता प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll या संदेशातच संपादन करून लिहा. आपले मत लिहिताना सुरुवातीला 'Support' किंवा 'Oppose' असे इंग्लिशमधून लिहा; कारण 'विकिमीडिया' फाउंडेशनच्या 'stewards' चे सदस्य - ज्यांना मराठी येत नसण्याची शक्यता आहे - या मतदानाची पाहणी करतात.
आणि सर्वात महत्त्वाचे - तुमच्या मतदानाच्या वाक्याखाली तुमची 'विकि'स्वाक्षरी (चार टिल्डे) द्यायला विसरू नका. :P
--संकल्प द्रविड 12:20, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
विकिसंज्ञा :Category
संपादन[[वर्ग:Category Name]]This way you can create categories.To reach pages you created and still not categoriesed use "Yoagadaan" find out pages which are still not categorised and categorise them.Top category in Marathi Wikipedia is mr:Category:मूळ
Mahitgar 06:50, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
'मंगोलियाचा इतिहास' आणि 'विकिकरण'
संपादनप्रिया, माहितगार यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहिलेल्या लेखाचे एखाद्या [[वर्ग:xyz]] मध्ये वर्गीकरण करायचे असल्यास त्या लेखाच्या शेवटी '[[वर्ग:xyz]]' असे हव्या असलेल्या कॅटेगरीच्या नावासह लिहावे; म्हणजे आपला लेख त्या वर्गात दिसू लागतो. 'मंगोलियाचा इतिहास' या विभागातल्या लेखांपैकी प्रत्येक लेखाच्या शेवटी [[वर्ग:मंगोलियाचा इतिहास]] असे लिहिलेले आढळेल.
तुम्ही मराठी विकिपीडियावर चांगली भर घालत आहात. परंतु लिहिताना लिखाणाचे 'विकिकरण' (wikification) देखील जाणीवपूर्वक केले पाहिजे. 'विकिकरण' करताना म्हणजे लिहिताना यासारख्या काही बाबींचा अवलंब करा:
- विकिपीडियावरील अन्य लेखांचा चालू लिखाणामध्ये जेव्हा पहिल्यांदा संदर्भ येईल तेव्हा दुवा(link) सांधणे: उदा. चंगीझ खानाशी संबंधित इतर व्यक्तींच्या लेखामध्ये चंगीझ खान हा शब्द जेव्हा पहिल्यांदा वापरला जाईल, तेव्हा 'चंगीझ खान' लेखाशी अशी लिंक देणे.
- इसवी सनांचे उल्लेख जिथे जिथे येतील तिथे त्या इसवी सनाच्या पानाशी दुवा सांधणे. उदा. इ.स. १९४७
- नवीन लेख लिहिताना वर उल्लेखिल्याप्रमाणे योग्य विभागात वर्गीकरण करणे.
- आपण लिहिलेले लिखाण save करण्यापूर्वी शुद्धलेखन तपासणे.
याबाबतीत विकिपीडिआ साहाय्य:संपादन हा लेख संदर्भ म्हणून उपयोगी पडू शकेल.
--संकल्प द्रविड 10:26, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
गौरव
संपादनमहाराष्ट्र एक्सप्रेस 14:51, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
विनंतीची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद
संपादनविनंतीची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद
-माहितगार
Requesting Support in Peer Review of history article
संपादनWith your knowledge of History subject you seem to be better placed to peer review महाराष्ट्राचा इतिहास, so this request to you.As part of peer review process either you can make new contribution/corrections or else suggest corrections on the articles talk page.
Regards Mahitgar 08:16, 3 डिसेंबर 2006 (UTC)
आपले मत नोंदवा
संपादन[१]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 19:05, 6 डिसेंबर 2006 (UTC)
कंबोडियाचा इतिहास
संपादनमला कंबोडियाचा इतिहास अशी इतिहासात एक कॅटेगरी हवी होती. मी प्रयत्न केला परंतु ती वेगळ्या ठिकाणी दाखवली जाते. कोणी मदत करू शकेल का?
Done.
अभय नातू 22:08, 11 डिसेंबर 2006 (UTC)
एंगकोर वटबद्दल...
संपादनआँग्कोर वाट असा उच्चार बरोबर वाटतो.
अभय नातू 17:53, 12 डिसेंबर 2006 (UTC)
(Non)encyclopedic content
संपादन- "प्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे."कंबोडियाचा इतिहास
- This Content one can include in three places,Talk page of the article/s your user page,any user talk pages,
Or else you may give a thought to start new project page for history and there your self,and any other users interested in contributing to history articles can share this content.
- Another way is to put tag 'comment' which one can select from edit(संपादन)menu
- For the main article this content is refered as non encyclopedic.
Regards Mahitgar 05:01, 13 डिसेंबर 2006 (UTC)
- Nothing to feel sorry about.Any way some one would have edited it over normal course.Just I wanted to keep you informed.Mahitgar 10:55, 13 डिसेंबर 2006 (UTC)
sentence redrafting
संपादन"उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने, या काळात कालवे काढून शेती केली जात होती असे दिसून येते."फुनानMay be you can give thought to redraft above sentence.
How about following change?
- या ऐतिहासिक काळात कालवे काढून शेती केली होती असे उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने स्पष्ट होते.
Mahitgar 06:17, 13 डिसेंबर 2006 (UTC)
quincunx
संपादन- By quincunx do you mean the following definition?
quincunx ( ) n. An arrangement of five objects with one at each corner of a rectangle or square and one at the center.
- And by 'फाशावरील पाचाचा आकडा' , word 'फाशा'is related to games like ludo,
- May we can provide some pictorial to help uderstand point to readers.
Mahitgar 07:10, 13 डिसेंबर 2006 (UTC)
- Already I have uploaded one image if you do not like it ,you can remove it ; For the word I tried to search marathi word in Paribhaashika Shabda kosh' .I could not get any ready made.Thanks and regards
Mahitgar 10:58, 13 डिसेंबर 2006 (UTC)
चंगीझ खान- मासिक सदर
संपादन- You can decide your priorites, as you please.If you write more on Mangolian history that would be welcome.I tried to test mangolian fonts on talk page of चंगीझ खान but I could not succeed- चंगीझ खान is que for also in मुखपृष्ठ मासिक सदर,
Thanks and regards Mahitgar 11:12, 13 डिसेंबर 2006 (UTC)
- Hi चंगीझ खान is selected as FA of Jan'07. [२] →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:51, 15 डिसेंबर 2006 (UTC)
- नमस्कार. काही चित्रे
(जी कदाचित Free नसतात?)ती मराठी विकित आपोआप share होत नाहीत असे दिसतेय. कृपया इंग्रजी विकिचे चित्र तुमच्या संगणकावर उतरवून घ्या आणि येथे upload करा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 11:58, 15 डिसेंबर 2006 (UTC) - या नवीन विकि मराठी कळफलकाशी मी अजून व्यवस्थित जूळलो नाही आहे,लिहीण्यात काही चूका राहील्यास क्षमस्व, महाराष्ट्र एक्सप्रेस यांचःया प्रतिसादात आडवी रेष ओढण्या बद्दल क्षमस्व,नवीन सद्स्यांचा गैरसमज टळावा म्हणून तसे केले आहे.
- विकिपीडिया कॉमन येथिल चित्र संचिका सर्व विकिपीडियात आपापसात जशीचःया तशी जतन (सेव्ह) करता येते.
- जर संचिका(फाइल) कॉपी होत नसेल तर ती फक्त संबधीत विकितछ अअहे असा अर्थ होतो.तेव्हा संगणकावर उतरवऊन पुन्हा मराठी विकित चढवावी .
- वरील दोन गोष्टी बरोबर असून नवीन संचिका दिसत नसेल् तर कंट्रोल् रिफ्रेश करून पहावे.
- एवढे करून जमले नाही तर अअपण मागीतली तशी मदत मागणे सयुक्तिक असते .
Mahitgar 12:26, 15 डिसेंबर 2006 (UTC)
बाह्यदुवे, संदर्भ
संपादनप्रिया, चंगीझ खान लेखाच्या 'बाह्यदुवे' मथळ्याखाली तुम्ही दिलेला 'इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा' दुवा द्यायची गरज नाही. कारण, त्या पानाच्या डाव्या समासात 'इतर भाषा' नामक स्तंभात 'चंगीझ खान' या विषयावरील इंग्लिश व अन्य भाषांतल्या लेखांचे दुवे दिले आहेत (विकिपीडियाच्या पारिभाषिक संज्ञेत यांना 'आंतरविकि दुवे/जोड'(interwiki links) म्हणतात.). त्या स्तंभातील दुव्यांवरून तुम्हाला हव्या त्या भाषेतल्या विकिपीडियावरील लेख पाहता येईल.
चंगीझ खान लेखाचा स्रोत पाहिलात तर हे आंतरविकि दुवे लेखाच्या सर्वात खाली 'Category' लिहिल्यानंतर [[en:article name on english wikipedia]]
अशा प्रकारे लिहिल्याचे आढळून येईल.
त्यामुळे तुम्ही बाह्यदुवे या मथळ्याखाली इतर भाषांतील विकिपीडीयांचे दुवे देऊ नका.. त्याऐवजी आंतरविकि दुवे द्या (जे डावीकडे समासात दिसतील.) इतर काही पुस्तकांचे संदर्भ दिले असतील तर 'संदर्भ' नावाचा मथळा तयार करून त्यात पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, आवृत्ती इत्यादी माहिती लिहा.
--संकल्प द्रविड 14:57, 15 डिसेंबर 2006 (UTC)
Re: Request about Genghis Khan
संपादनHi,
- I agree with your opinion.
- However when I saw an article Descent from Genghis Khan on English wikipedia, which lacks citations for lineage of Mughals from Genghis Khan, I thought Marathi Wikipedia's article on Genghis Khan might mention (or clarify) this lineage. The references/citations can be either in favour or against of the lineage.
- Regards,
05:34, 17 डिसेंबर 2006 (UTC)
- While it is not necessary to go by english wikipedia,at times it can give some good referances.Certainly you are well read in history subject and so better placed to write about history.
Because of curiosity I did little reading on google and en wiki ,so sharing following links. en:Babur,en:Gulbadan Begum,amitav Mahitgar 14:34, 17 डिसेंबर 2006 (UTC)
- प्रिया, तुम्हाला चंगीझ खान, पूर्व युरोपावरील स्वारी, मंगोल साम्राज्य येथे नोंदविलेल्या मुद्द्यांसंदर्भात काही करता येईल का? चंगीझ खान हा लेख मासिक सदर म्हणून टाकण्याआधी तो लेख शक्य तितका समावेशक, परिपूर्ण व्हावा असे वाटते.
- धन्यवाद!
- --संकल्प द्रविड 17:06, 17 डिसेंबर 2006 (UTC)
- धन्यवाद!
- हरकत नाही. तुम्हाला जितके जमेल तितके लिहा.
- तसेच, इथून पुढे राज्यपदारूढ राजे, राण्या, संस्थानिक वगैरे व्यक्तींच्या माहितीकरिता mr:Template:माहितीचौकट राज्याधिकारी या माहितीचौकट साच्याचा (infobox template चा) वापर करा. वानगीदाखल चंगीझ खान लेखातील या साच्याचा वापर पाहा.
- --संकल्प द्रविड 18:26, 17 डिसेंबर 2006 (UTC)
- हरकत नाही. तुम्हाला जितके जमेल तितके लिहा.
- Regarding Descent from Genghis Khan, I believe we can incorporate those details, with note 'citation needed'.
- We have cited English wikipedia article, so references are carried in continuation.
- Regards,
- Harshalhayat 14:24, 18 डिसेंबर 2006 (UTC)
Requesting your vote at Marathi Wictionary
संपादनविक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. विक्शनरी हा शब्दकोश प्रकल्प आहे.
विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll
संपादन
- Nomination Request by User:Mahitgar in Marathi Language.:-
विकिपिडीयन्स,
मी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.
मी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणार्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.
मी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)
Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.
आशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती.
- At wictionary one needs to have a separate account to log in,if you do not have one already please do create one at Create wictionary account
क.लो.अ.
माहीतगार Mahitgar
Kiev इ.
संपादन- Prince Mstislav - प्रिंस म्स्तिस्लाव्ह अथवा राजकुमार म्स्तिस्लाव्ह
- Kiev - कियेव
अभय नातू 03:05, 20 डिसेंबर 2006 (UTC)
इ.स. ई.स.
संपादनप्रिया,
येथे चर्चा केली असता सगळ्या विकिपिडीयन्सना ती दिसेल.
अभय नातू 23:23, 22 डिसेंबर 2006 (UTC)
- सहमत.
- प्रिया, ही चर्चा मी चावडी वर नेली आहे. मनोगत "वाचनमात्र" अवस्थेतून बाहेर पडल्यावर तिथे तुम्ही मांडाल का?
प्रिया, मराठीत "ईसा" चे "इसवी" असे विशेषण होईल असे वाटते. "ईसवी" हे माझ्या मराठी डोळ्यांना खटकते. अचूक नियम मला सध्या सांगता येणार नाही, पण चावडीवरही मी असेच काहीसे मत मांडले आहे.
– केदार {संवाद, योगदान} 07:44, 27 डिसेंबर 2006 (UTC)
- हो, अगदी तसेच. धन्यवाद! उदाहरणे मलाही माहिती आहेत पण नियम आठवत नाही. :-)
Typing pipe |
संपादनWell,Normally above 'Enter' key on one's key board ,one can locate a 'back space key'(this key has a sign of arrow showing to left direction)
The key one may need for while doing linking work is just immidiate left of the 'back space key' . or right side key of + sign.(I do not know name of the key |So for a while we will reffer it as pipe key) but the key comes with two vertical short lines one above other.Use this key together with 'shift' key to get desired '|' pipe key.
Sorry it has become bit long answer may be some one else can make it shorter.We need properly written marathi answer in our help page 'Wiki sandnya' too. Mahitgar 13:10, 28 डिसेंबर 2006 (UTC)
- Extremely sorry I forgot to write initialy I also faced this problem.This problem comes when you use this pipe sign from some of r Marathi Typing softwares like baraha or manogat(When you paste it from other softwares wikipedia basically reading as alphabate.What I do is I type both words in bracket and type | sign after I bring words to Wikipedia.Alternatively when I use baraha direct I press F11/F12 short cut key for english type | and again press F11/F12 to go back to Marathi.Mahitgar 13:29, 28 डिसेंबर 2006 (UTC)
- Where you have used pipe sign already from other software (at times I forget and type it in advance) just delet it and type it again if this does not work just go "Show Preview" before saving do delet and retype and then save.Mahitgar 13:33, 28 डिसेंबर 2006 (UTC)
- Sorry for long answers again.
- Welcome Mahitgar 14:00, 28 डिसेंबर 2006 (UTC)
- The confusion is between a unicode pipe and a non-unicode pipe character. Wiki software expects a non-unicode pipe character for link/description differentiation. When typing in unicode using a non-native interface, pipe may or may not be represented as a unicode character. I type using windows native interface on win2k and winXP and I face no problems. I do need to switch between indic and roman input modes on my keyboard (using left-ctrl-left-alt combination).
- If you're using any of the recent OS's (XP, win2k, 2k3, newer distributions of linux) I suggest using native interface. If you need help setting it up, let me know.
- अभय नातू 16:33, 28 डिसेंबर 2006 (UTC)
'राजा रविवर्मा'/ 'राजा रवि वर्मा'
संपादनप्रिया, 'रवी' असे लेखन या नावात कधी वाचल्याचे मलातरी आठवत नाही. त्यामुळे 'राजा रवीवर्मा' आणि 'राजा रवी वर्मा' असे लेखन असायची माझ्या स्मृतीप्रमाणे शक्यता वाटत नाही. 'राजा रविवर्मा' आणि 'राजा रवि वर्मा' यातले नक्की कुठले लेखन योग्य असेल हे तपासून बघावे लागेल.. कारण माझीही पक्की खात्री नाही. मराठी विश्वकोशात दिलेल्या नोंदीप्रमाणे केवळ 'रविवर्मा' असे शीर्षक त्यांनी वापरले आहे: [३] ('रविवर्मा' शीर्षक शोधा.). गूगलवर शोधघेतला असता "राजा रवि वर्मा" गूगल शोधपरिणाम हे "राजा रविवर्मा" गूगल शोधपरिणाम यांच्या तुलनेत जास्त दिसतात. अर्थात गूगल शोधपरिणामांपेक्षा जरा विश्वासार्ह स्रोत बघितले पाहिजेत; कारण जनतेच्या शुधाशुद्धलेखनाचे.. सर्व प्रकारच्या लेखनाचे - शोधप्रिणाम गूगलवरून मिळतात :P.
मी माझ्याकडच्या पुस्तकांत जरा शोधून बघतो आणि उद्या तुम्हाला कळवतो.
--संकल्प द्रविड 05:21, 29 डिसेंबर 2006 (UTC)
शौरसेनी
संपादनप्रिया,
जर प्राकृत या प्रकारात एकापेक्षा जास्त भाषा मोडत असतील (मला वाटते पाली, अर्धमागधी, इ. इतर उदाहरणे आहेत) तर शौरसेनीला प्राकृत भाषा म्हणून सुद्धा वर्गीकृत करण्यास हरकत नाही.
शौरसेनी ही भाषा आता बोलली जात नसल्याचे गृहीत धरुन मी हा लेख प्राचीन भाषा वर्गात घातला आहे.
- श्री. अभय नातूंनी विक्शनरीत मेळावा शब्दलेखात भर टाकताना,मला स्वतःलामेळावा शब्दा बद्दल गूगलवर मीळालेली माहिती उत्साह वर्धक वाटली, म्ह्णून तसाच शोध मेळा शब्दाचाही घेतला.मराठी साहित्यात शब्द प्रतिमा कशी वापरली आहे याचा गूगलशोध एकुण अनुभव रंजक आणि मस्त आहे.मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास कृ. योगदान /मदत करावी.
Mahitgar 07:19, 4 जानेवारी 2007 (UTC)
interwiki link from article 'kombadi'.
संपादनHello, By mistake you you seems to have removed interwiki link from article 'kombadi'.Interwikilinks are given at the end of the any article for corresponding article in another language wikipedia ,and link apears on left side column of respective article.Link is given [[en:Chicken]]in this way.But when one wants to use link within article paragraph it is given [[:en:Chicken]] this way.en is short form for english wikipedia link.same way mr is used as shortform of marathi to make interwiki links in other language wikipedias Thanks - Mahitgar 14:12, 11 जानेवारी 2007 (UTC)
- No problem ,I will take care of the rest.It is nice that you know about interwiki links.I my self came to know about interwiki links quite late :) .
Mahitgar 14:58, 11 जानेवारी 2007 (UTC)
- I dont know if you would have said sorry, after eating, if it would have been real chicken :).BTW,giving interwiki links in english wikipedia is sort of priority for Marathi wikipedia , to catch 'bhule bhaTake Marathi panChi' and atleast make them read Marathi !
Mahitgar 15:12, 11 जानेवारी 2007 (UTC)
कालगणना पाने
संपादन- Thanks for your compliment.BTW Wikipedia:दिनविशेष pages are imp. for 'Mukhpristha'. I request your help in looking at them once in while. Abhay Natu and Kolhapuri have worked considerably on it,still a lot needs to be done there. (Please ask questions as many as possible, cause structure seems bit complex and any question answers will benefit other wikipedians too.)
- विकिपीडिआ:निर्वाह#काळ आणि दिनमानाशी संबंधीत साचे
जानेवारी - फेब्रुवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर
Mahitgar 16:05, 11 जानेवारी 2007 (UTC)
यक्ष, हिंदू यक्ष, बौद्ध यक्ष, पौराणिक व्यक्ती वर्गवारी इत्यादि
संपादनप्रिया, यक्ष ही संकल्पना/व्यक्तीसमूह हिंदू पुराणांत आणि बौद्ध जातककथांमध्येही आढळतात. त्यामुळे 'यक्ष' हा वर्ग 'पौराणिक व्यक्ती' वर्गात असणे योग्य ठरेल. 'हिंदू पौराणिक व्यक्ती', 'ग्रीक पौराणिक व्यक्ती', 'जैन पौराणिक व्यक्ती', 'बौद्ध पौराणिक व्यक्ती' हे सर्व उपवर्ग, तसेच 'अप्सरा', 'यक्ष' अशा बर्याच संस्कृतींमध्ये आढळाणार्या व्यक्तीसमूहांची वर्गवारी 'पौराणिक व्यक्ती' या वर्गात असणे योग्य ठरेल.
--संकल्प द्रविड 19:59, 16 जानेवारी 2007 (UTC)
Requesting to apply Wikibooks प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination
संपादन- Requesting to apply प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination at मराठी भाषेतील 'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination
As you know Marathi Wikipedia is growing fast.To support source requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wikibooks also.
As you know nominations for adminships of mr.wikibooks.org/wiki/ are invited. We are looking for aleast two more admins/sysops to support wikibooks operations at this stage.
- 'विकिबुक्स' प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationयेथे चालू आहे.I wish you apply for this nomination.You can take my support in advance.
Regards, Mahitgar 09:11, 19 जानेवारी 2007 (UTC)
- Ok no problem, may be consider my request again some time in future. Wikibooks and Wiki quotes are smaller sister projects that need attention not necessarily much time.Me too, like writing more but at Marathi Wiktionary I had to take the responsiblity.
Thanks & rgds Mahitgar 13:44, 20 जानेवारी 2007 (UTC)
मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?
संपादननमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.
→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 07:44, 23 जानेवारी 2007 (UTC)
बीबी का मकबरा
संपादनजरूर. भारतातील ऐतिहासिक वास्तू या श्रेणीची वर्गवारी भारतीय इतिहास व देशानुसार ऐतिहासिक वास्तूमध्ये होइल.
अभय नातू 16:44, 25 जानेवारी 2007 (UTC)
District Gazeteers
संपादनFor Maharashtra related aspects including some amount of historical aspects are available online in various Maharashtra Govt Gazeteers. While being govt documents as a historical document validity gets diluted but the benefit is most of them are written by different different historians so cross verification becomes easy. I used them in writing hayderabad mukti sangram to some extent.Aurangabad Gazeteer
I did add some of those links gazette links at bottom off some of distrct or city articles in Marathi Wikipedia. I wanted to check about your satavahana related query, but some today their down load speed is very bad.
विजय १७:०९, २६ जानेवारी २००७ (UTC)
'मोसमी', 'मोसमी वारे'
संपादनप्रिया, मराठीत 'मोसमी' असा शब्द लिहिला जातो; 'मौसमी' असा हिंदीप्रमाणे नव्हे. 'मोसमी वारे', 'मोसमी पाऊस' असे शब्द मराठीत रुळले आहेत. मराठी भाषेतील भूगोलाच्या पुस्तकांत व मराठी वृत्तपत्रीय लिखाणात तुम्हाला याबाबतचे संदर्भ आढळतील. तसेच, नवीन लेख लिहितेवेळी त्याचे वर्गीकरण कसे करायचे हे निश्चित झाले नसेल/ सध्यापुरता त्या लेखास वर्ग नसेल तर तेथे {{वर्ग}} हा साचा टाकावा; जेणेकरून ते पान 'वर्ग:अवर्गीकृत' या वर्गात दाखल होईल.
--संकल्प द्रविड १८:०२, २६ जानेवारी २००७ (UTC)
- मॉन्सूनला मराठीत मोसमी म्हणत नाहीत....चु.भु.दे.घे...? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:०९, २६ जानेवारी २००७ (UTC)
- नमस्कार. exact word is गौतमीपुत्र शातकरणी. I have confirmed! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:२६, २६ जानेवारी २००७ (UTC)
- मी हे नाव भारताचा इतिहास (ले: श.गो.कोलारकर) यांच्या पुस्तकात पाहिले. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाने इतिहास या विषयासाठी नेमलेले पुस्तक आहे. वाचनालयात मात्र शालिवाहन सातकर्णी अशा नावाचे पुस्तक असल्याचे आठवते. तुम्हाला हवे असेल तर मी ते पुस्तक आणून निश्चित करु शकतो. आपण इतिहासात intrested आहात हे बघून आनंद झाला. आपल्या वेळ मिळेल तेव्हा महाराष्ट्राचा इतिहासावरचे लेख पूर्ण करुयात.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०४:०३, २७ जानेवारी २००७ (UTC)
- आपण परदेशी इतिहास/ऐतिहासिक व्यक्तींपेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासाला आधी प्राधान्य द्यावे ही सुचना! →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ११:५५, २७ जानेवारी २००७ (UTC)
- काही हरकत नाही! तुमचा कल जागतिक इतिहासाकडे आहे.आपण विकिपीडियावरील इतिहास-विषयक लेख वाढवत आहात हे चांगले आहे. मी लौकरच महाराष्ट्राच्या इतिहास विषयक लेखांत भर घालीन.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १२:०६, २७ जानेवारी २००७ (UTC)
पॅलेस्टाईन
संपादननमस्कार,
पॅलेस्टाईन/पॅलेस्टाइन हा लेख अजून लिहिला गेलेला नाही. पॅलेस्टाईन असेच लिहावे.
अभय नातू १८:२३, ८ फेब्रुवारी २००७ (UTC)
Thanks
संपादन- Thanks to you and Abhay for supporting me with valuable support in article Wikipedia:धूळपाटी/मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?.
विजय ०६:१०, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
Shuddhalekhan
संपादनPriyaa vp,
Tumachee raast soochana shirasavandya!--J १८:२९, १५ फेब्रुवारी २००७ (UTC)
अकेमेनिड, घुरिड, गझ्नविड इत्यादी
संपादनप्रिया, तुम्ही अकिमेनिड राज्यघराणे हा लेख लिहिल्याचे पाहिले. 'अकेमेनिड' हे नाव इंग्लिशमधील पद्धतीप्रमाणे मूळ पर्शियन/अरबी/तुर्की नावाला 'id' प्रत्यय लावून बनले आहे. याच पद्धतीची आणखीन उदाहरणे द्यायची झाळी तर 'घोरी', 'गझनवी' या नावांची इंग्लिश रूपे 'Ghurid', 'Ghaznavid' अशी होतात. परंतु यातल्या बर्याचशा नावांची मराठीतील रूपे 'id' प्रत्ययान्त असण्याऐवजी इकारान्त असतात.. उदा. घोरी राजघराणे, गझनवी राजघराणे/ साम्राज्य इत्यादी. 'अकिमेनिड' शब्दाचे मराठीत तसे काही रूप अगोदरपासून असल्यास त्या नावाचे शीर्षक लेखास द्यावे.
तसेच, सध्याच्या शीर्षकात 'राज्यघराणे' असा शब्द वापरला आहे.. तो 'राजघराणे' असा हवा.
--संकल्प द्रविड १२:५०, १८ एप्रिल २००७ (UTC)
इराणचा इतिहास
संपादनप्रिया,
इराणचा इतिहास हा वर्ग आता इतिहास या वर्गाचा उपवर्ग आहे.
अभय नातू १५:२२, १ मे २००७ (UTC)
नमस्कार मोठी विकिसुट्टी घेऊन आपण परत आला आहात,स्वागत ! कुठल्या लेखांवर काम करण्याचा विचार आहे?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १४:२५, २३ मे २००७ (UTC)
महाराष्ट्र-इतिहासावरील काही लेखांवर काम करावे असे सुचवावेसे वाटते. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १६:३६, २३ मे २००७ (UTC)
वर्ग प्राचीन ग्रीक लेखक
संपादनप्रिया,
प्राचीन ग्रीक लेखक, प्राचीन ग्रीक कवी व प्राचीन ग्रीक साहित्यिक हे तीन नवीन वर्ग तयार केले आहेत.
लेखक व कवी हे साहित्यिकचे उपवर्ग आहेत, तसेच तिन्ही प्राचीन वर्ग हे त्यांच्या वर्गातही आहेत (प्राचीन लेखक लेखक वर्गात, इ.)
अभय नातू ०१:२६, २८ मे २००७ (UTC)
भरत
संपादनऐतिहासिक/पौराणिक कालात भरत नावाचे अनेकजण आहेत. दुष्य़ंतपुत्र, दशरथपुत्र, ऋषभ राजाचा मुलगा महायोगी गुणवान राजर्षी भरत ऊर्फ जडभरत, नाट्यशास्त्र लिहिणारा भरत(मुनी), मगधराजा इद्रद्युम्नच्या दरबारातील एक ऋषी, काशीचा एक योगी(याने गीतेच्या चौथ्या अध्यायाचे पठण करून बोराची झाडे बनलेल्या दोन अप्सरांचे पुनरुत्थान केले होते), पद्मपुराणातील एक दुराचारी ब्राह्मण, भौत्यमनूचा पुत्र, करंधमपुत्र मरुत्त ऊर्फ भरत इत्यादी. याशिवाय अग्निवंशात चार-पाच भरत होऊन गेले. भरतवंश नावाचे एक पूरुवंश व कुरुवंशाच्या समकालीन घराणे होते; त्यात सुदास, दिवोदास, शतानीक इत्यादी राजे होऊन गेले. या वंशाला तृत्सू व त्यातील लोकांना भरतगण असेही म्हणत. या ऋषभपुत्र भरताच्या नावावरून भारतवर्ष हे नाव पडले, दुष्यंतपुत्राच्या नावावरून नाही. वर्ष म्हणजे वर्षाऋतून एकाच वेळी पावसाखाली असणारा प्रदेश.--J ०५:१८, २८ मे २००७ (UTC)
निःसंदिग्धीकरण आवश्यक
संपादन'जे' म्हणतात ते बरोबर आहे. 'भरत' हे नाव धारण केलेल्या बर्याच व्यक्तिरेखांचे संदर्भ पौराणिक साहित्यात येतात. त्यामुळे 'भरत' या नावाबद्दल निःसंदिग्धीकरण पान लिहिणे आवश्यक वाटते. माझ्या मते भरत हे पान निःसंदिग्धीकरणाचे पान म्हणून ठेवावे व त्यावर 'भरत' नावाशी संबंधित सर्व लेखांची यादी दुव्यांसहित द्यावी. विवक्षित लेखांची शीर्षके पैतृक/मातृक नावे जोडून किंवा कंसात संदर्भाचा शब्द लिहून बनवावीत; उदा.: भरत दाशरथि/ भरत (रामायण), भरत कौरव (= कुरुवंशीय भरत) वगैरे. उदाहरणादाखल धौम्य ऋषि हे निःसंदिग्धीकरण पान पाहा. 'धौम्य' नावाने ओळखल्या जाणार्या दोन ऋषींचे लेख तेथे दिले आहेत.
--संकल्प द्रविड ०७:४४, २८ मे २००७ (UTC)
कोणता भरत?
संपादनआपण विदित केलेला विष्णुपुराणातला श्लोक 'उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव...' वगैरे भारतवर्षाच्या फक्त चतुःसीमा सांगतो, भरत कोण हे सांगत नाही. तसे महाभारतात 'इदं तु भारतं वर्षम् ततौ हेमवतम् परम्' किंवा लिङ्गपुराणात 'हिमाद्रेर्दक्षिणम् वर्षम्' वगैरेसुद्धा भारतवर्ष हिमालयाच्या दक्षिणेला आहे असे सांगतात-कुठला भरत हे नाही. परंतु प्राचीन इतिहास सांगतो की, प्रियव्रताने सात पुत्रांस सात द्वीपे (नद्यांनी वेढलेले प्रदेश) दिली. त्यात आग्नीध्र याच्या वाट्याला जंबूद्वीप आले. त्याने आपल्या नाभी इत्यादी नऊ पुत्रांना नऊ वर्षे (एकाच वेळी पाऊस पडणारा भूमिप्रदेश) दिली. नाभीला मिळालेल्या प्रदेशाचे नाव अजनाभवर्ष. नाभीचा मुलगा ऋषभदेव (याला जैनांनी पुढे 'त्यांचा' केला-हिंदूंनी बुद्धाला अवतार केला तसा!). ऋषभाने अजनाभवर्षाचे नऊ खंड करून नऊ मुलांना दिले. खंडांची नावे- कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक्, विदर्भ आणि कीकट. या सर्वांवर, अर्थात अजनाभवर्षावर, अधिपत्य आपल्या भरतनामक पुत्रास दिले. पुढे त्याच्याच नावावरून देशाला भरतवर्ष नाव पडले.--भागवत, स्कंध ५, अध्याय २-२०, २-२१ व ५-४-९,१० व ५-७-१.--J--J ११:००, २८ मे २००७ (UTC)
इक्ष्वाकु
संपादन[[इतर सर्वत्र दुष्यंतपुत्र भरत हाच भारतवर्षाचा प्रणेता मानला का जातो? त्याबद्दल पुरावे मिळतात का? भागवत पुराणाची एखादी ऑनलाईन प्रत आपल्याला माहित आहे का? मलाही त्यातील काही संदर्भ हवे होते? नाभी आणि ऋषभ हे ईश्वाकु वंशातील राजे का? priyambhashini ११:४०, २८ मे २००७ (UTC)]]--------------------------------------------------------------------------------
केवळ गैरसमजाने भारतवर्ष हे नाव दुष्यंतपुत्र भरतावरून पडले असे मानले जाते. कारण तोच बालपणी सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजणारा आणि पुढे महान पराक्रम करून पृथ्वीवर एकछत्री साम्राज्य निर्माण करणारा म्हणून प्रसिद्ध. ऋषभपुत्र भरत आपण क्वचितच ऐकलेला. कुणी शाकुंतलासारखे दिव्य काव्य करून त्यात त्याचा उल्लेखपण केलेला नाही.
पंडित महादेवशास्त्री जोशी लिहितात:-"या देशाला भारत बनवणारा दुष्यंतपुत्र भरत खास नव्हे. तो आहे, ऋषभदेवाच्या शंभर पुत्रातला सर्वात मोठा पुत्र भरत. त्याने अनेक अश्वमेध केले आणि आसमुद्र पृथ्वी पादांक्रांत करून तिच्यावर आपली नाममुद्रा उठवली."
भारतवर्ष नाव कसे पडले याचा एक तिसरा पर्याय प्रख्यात संशोधक श्री. वासुदेवशरण अग्रवाल यांनी मांडला आहे. मात्र तो इथे देणे अप्रस्तुत ठरेल.
भागवत पुराणाची ऑनलाइन प्रत मला तूर्त माहीत नाही, परंतु असल्यास शोधून सांगेन. आपण quote केलेल्या विष्णुपुराणातदेखील(२.१.३२) भारतवर्षाचा प्रणेता ऋषभपुत्र आहे असे लिहिले असल्याचे मी वाचले आहे.
इक्ष्वाकु वंशातले आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असलेले राजे:--इक्ष्वाकु, ककुस्थ(प्रभु रामाला बुधकौशिक ऋषींनी रामरक्षेत दोनतीनदा काकुस्थ म्हटले आहे), बृहदश्व, कुवलयाश्च, निकुंभ, मांधाता, हरिश्चंद्र, सगर, दिलीप, भगीरथ, रघु, अज, दशरथ, राम, कुशलव, निषध, नल, पुंडरीक वगैरे. शेवटचा इसवी सनाच्या दुसर्या शतकातला जैन वाङ्मयात आलेला खारवेल!. या यादीत नाभी, ऋषभ नाहीत. आपला ऋषभ स्वायंभुव मनूच्या वंशातला पाचवा वंशज. स्वायंभुव मनु-प्रियव्रत-आग्नीध्र-नाभी-ऋषभ-भरत. स्वायंभुव मनू इसवी सनपूर्व ३१०२ सालचा. --J--59.95.0.196 १८:४५, २८ मे २००७ (UTC)
- इंग्लिश विकिपीडियावरील भागवत पुराण या लेखातील बाह्य दुव्यांमध्ये पुराण आहे. इंग्लिश विकिपीडियावरील भागवत पुराण
- अभय नातू १९:००, २८ मे २००७ (UTC)
एक सूचना - हे पान चर्चाकोशात हालवावे
संपादनअभय नातूंच्या चर्चा पानावर जुन्या चर्चा जश्या Archive केल्या आहेत, तश्या आपल्या चर्चा Archive केल्यास या पानाच्या शेवटी जाण्यास लागणारा वेळ वाचेल व पान लवकर लोड होईल. --Shantanuo ०६:०७, २९ मे २००७ (UTC)
चौदा मनु
संपादनही चर्चा येथे न करता उपक्रमावर केली तरी चालेल.-P.v.p
उपक्रमावर म्हणजे कुठे?--J
चौदा मनु:-
- स्वायंभुव
- स्वारोचिष(किंवा स्वारोचिस् किंवा द्युतिमत्)
- उत्तम(औत्तम)
- तामस
- रैवत
- चाक्षुष
- वैवस्वत
- सावर्णी(अर्कसावर्णी)
- दक्षसावर्णी
- ब्रह्मसावर्णी
- धर्मसावर्णी
- रुद्रसावर्णी
- रौच्य
- भौत्य
पैकी सहा मनु झाले, सातवा चालू आहे. प्राचीन पौराणिक इतिहासाच्या कालनिर्णयासंबंधी विद्वानात मतभेद आहेत हे सर्वश्रुतच आहे. स्वायंभुव मनूचा काळ: इ.स.पू.३१०२(त्र्यं.गु.काळे);इ.स.पू. २६७०( डॉ.के.ल.दप्तरी).. वैवस्वत मनु: इ.स.पू. २५५०(काळे); २१५०(दप्तरी); ३१००(आधुनिक कालनिर्णय पद्धती). वैवस्वत मनूचा राज्यकाल भारतीय युद्धाच्या ९५ पिढ्या अगोदर. युद्धाचा काल इ.स.पू. १४००. यावरून वैवस्वत मनूचा काल इ.स.पू. ३११०. कलियुगाची सुरुवात इ.स.पू. ३१०२. हिब्रू आणि बाबिलॉन साहित्यात सांगितलेला मेसापोटेमियाच्या जलप्रलयाचा काल इ.स.पू. ३१००. हाच काल शतपथ ब्राह्मणातील जलप्रलयाचा येतो... शतपथ ब्राह्मणाचा काळ: इ.स.पू. ४०००-१०००(डॉ.पां.वा.काणे); ३१००(शं.बा.दीक्षित); २५००(रामायण समालोचना); १४२२(विविधज्ञानविस्तार).. शतपथ ब्राह्मण(उत्तरार्ध):काल इ.स.पू.११२२...--J--J १७:२४, २९ मे २००७ (UTC)
निःसंदिग्धीकरण पान तयार करण्याबद्दल
संपादनप्रिया, निःसंदिग्धीकरण पाने सर्वांना बनवता येतात. नेहमीच्या 'नवीन लेख' पानांसारखीच ही पाने बनविणे अपेक्षित आहे. फक्त या पानांचे वर्गीकरण [[वर्ग:निःसंदिग्धीकरण]] या वर्गात करावे. अशा पानांवर निःसंदिग्धीकरण करायच्या शब्दाशी संबंधित सर्व लेखांचे दुवे एकाखाली एक लिहावेत. आणि प्रत्येक दुव्यापुढे त्या लेखाचा संदर्भ कळेल इतपत माहिती थोडक्यात लिहावी.
तसेच, या यादीत लिहिलेल्या प्रत्येक संबंधित लेखात {{हा लेख|सद्य शीर्षकाबद्दल थोडक्यात माहिती|निःसंदिग्धीकरण पानाचे शीर्षक}} हा साचा वापरावा. उदाहरणादाखल धौम्य वैय्याघ्रपद्य आणि धौम्य आपोद हे लेख पाहा. तिथे या साच्यामुळे सर्वात वर निळ्या-तांबड्या निःसंदिग्धीकरण चिन्हाने सुरु झालेली एका ओळीची सूचना दिसेल. त्याचा सिंटॅक्स 'हा लेख' साच्याचा वापर कसा केला आहे हे पाहून कळेल.
बाकी, निःसंदिग्धीकरण पानांची शीर्षके तयार करताना शक्यतो सर्वात 'intuitive' वाततील अशी ठेवावीत. उदा. 'भरत' या विषयावर निःसंदिग्धीकरण पान तयार करताना त्याचे नाव 'भरत (निःसंदिग्धीकरण)' असे ठेवण्यापेक्षा 'भरत' असे सयुक्तिक ठरेल; कारण बहुसंख्य लोक भरताबद्दल माहिती शोधण्याकरता शोधपेटीत 'भरत' एवढाच शब्द लिहितील.
--संकल्प द्रविड ०६:५६, ३० मे २००७ (UTC)
कृष्णद्वैपायन व्यास
संपादनJ,
तुम्हाला या विषयांत बरीच माहिती आहे म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो की कृष्णद्वैपायन व्यास आणि वेदांचे वर्गीकरण करणारे वेद व्यास एकच का? तसेच, व्यास ही पदवी होती अशा नावाचे सुमारे २८ व्यास होते असे वाचनात आले किंवा कश्यप ऋषी हे पहिले व्यास होते असेही वाचले याला तथ्याधार आहे का?
तसेच अदिती मराठीत कसे लिहावे? अदिती की अदिति? मराठी विकिवर ति र्हस्व आहे म्हणून.कळावे, priyambhashini १५:४६, ४ जून २००७ (UTC)
विष्णुपुराणात(३.३.११-२०) अठ्ठावीस व्यासांची नावे दिली आहेत, त्यात कश्यप हे नाव नाही. व्यासांची नावे लिंगपुराण, स्कंदपुराण, देवी भागवत, शिवशतरुद्रसंहिता इत्यादी बर्याच ग्रंथात दिली आहे.
कश्यपाला तेरा बायका होत्या. अदिती, अरिष्ठा, इरा, कद्रू वगैरे. मराठीत नाईलाजाने अदितीतली 'ती' दीर्घ लिहावी लागते, संस्कृतमध्ये 'ति' र्हस्व आहे.
व्यास ही पदवी होती अशी थिअरी आहे. शक्य आहे, पण तसा निश्चित पुरावा नाही. व्यास हे अतिशय दीर्घायुषी होते त्यामुळे वेद व्यास आणि कृष्णद्वैपायन व्यास एकच समजले जातात. ते वेगळे असल्याचे अजून सिद्ध करता आलेले नाही अशी माझी माहिती आहे. अठ्ठावीस व्यासांच्या नावात शेवटचे नाव कृष्णद्वैपायन आहे. त्यांनी वेदविभाजन, पौराणिक साहित्य तसेच महाभारताच्या निर्मितीखेरीज व्यासस्मृती, गद्यव्यास, वृद्धव्यास, बृहद्व्यास, लघुव्यास, महाव्यास, दानव्यास इत्यादी स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. भविष्य पुराणाच्या पहिल्या(ब्राह्मपर्व) पर्वात पराशरपुत्र कृष्णद्वैपायन हे एकमेव व्यास असल्याचे सांगितले आहे.---J--J १९:०५, ४ जून २००७ (UTC)
पुरु निःसंदिग्धीकरण
संपादनप्रिया, 'पुरु' शब्दातील रुकार र्हस्व आहे की दीर्घ एकदा तपासाल का? माझ्या आठवणीप्रमाणे तो र्हस्व आहे. तसेच, पुरू लेखाचे निःसंदिग्धीकरण करताना वैयक्तिक लेखांची नावे त्या-त्या कुळाप्रमाणे लिहिली जातील असे माझे मत आहे. उदा. 'महाभारतातील पुरु राजा' असे लेखाचे नाव न ठेवता 'पुरु ---(उदा. कौरव/ यादव वगैरे कुलनाम)' किंवा 'पुरु ---(उदा. राघव वगैरे पैतृक/मातृक नाम)' असे ठेवावे. वानगीदाखल भरत किंवा धौम्य ऋषि हे लेख पाहा.
--संकल्प द्रविड १४:०१, १ ऑगस्ट २००७ (UTC)
- संस्कृतात उकारान्त पुल्लिंगी विशेषनामे बहुतकरून(का सगळीच?) र्हस्व उकारान्त आहेत. उदा.: रघु, कुरु, गुरु, यदु, आयु, उपमन्यु, अभिमन्यु, इक्ष्वाकु इत्यादी.
--संकल्प द्रविड १५:०३, १ ऑगस्ट २००७ (UTC)
अलेक्झांडर द ग्रेट
संपादन"अलेक्झांडर द ग्रेट' लेख छान होत आहे. चांगलं वाचनीय अशी माहिती तुमच्या लेखनातून मिळत असते. धन्यवाद. Mahitgar १४:४०, ४ ऑगस्ट २००७ (UTC)
गौरव
संपादनआपण मराठी विकिपिडीयावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
आपल्या विकिपिडीयावरील अथक परिश्रमाची नोंद म्हणून सर्व विकिपिडीयन्सतर्फे तुम्हाला हा एक-हजारी बार्नस्टार प्रदान करण्यात येत आहे. तुमचा हा गौरव आपल्या सदस्य पानावर आभिमानाने लावावा!
तुमच्याकडून अधिकाधिक योगदानाच्या आशा व अपेक्षेसह,
Mahitgar १६:१८, १२ ऑगस्ट २००७ (UTC)
लेखात लेखन योगदान हवे
संपादन- आपल्या सवडीने अभिव्यक्त होणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य#अधिकारप्राप्तीचा इतिहास या आणि संबधीत लेखात लेखन/संपादन/भाषांतर योगदान हवे आहे.
- आपण थोडे लक्ष घालू शकल्यास खूप छान होईल.धन्यवाद.
माहितगार ०६:०१, २६ मे २०१० (UTC)
खूप दिवसांनी?!
संपादननमस्कार,
खूप दिवसांनी तुम्हाला येथे पाहून आनंद वाटला. आपला मुक्काम बरेच दिवस असेल अशी आशा:-:
अभय नातू १७:५८, २७ डिसेंबर २०११ (UTC)
- सुस्वागतम्! :) तुम्हांला पुनश्च येथे लिहिते झाल्याचे पाहून आनंद वाटला. जरूर येत राहा... अजूनही तुम्ही लिहिलेल्या व मुखपृष्ठ सदर म्हणून निवडल्या गेलेल्या चंगीझ खान आणि महान अलेक्झांडर या लेखांची विकिभेटींच्या वेळी आठवण निघते.
- बाकी, येत्या जानेवारी/फेब्रुवारीत मराठी विकिपीडियावर मराठी भाषा दिवस व अन्य निमित्तांनी काही उपक्रम/कार्यक्रम (गेल्या २७ फेब्रुवारीप्रमाणे संपादनेथॉन वगैरे) केले जातील; तेव्हा आपला सहभाग असेल अशी आशा आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५२, २८ डिसेंबर २०११ (UTC)
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी
संपादननमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१५, १ जानेवारी २०१२ (UTC)
चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल
संपादननमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा
Please
संपादनHi, I'm from Myanmar(Burma). Can you write http://en.wikipedia.org/wiki/Bagan article in your wiki language for me. I can also translate the article you want to write in Burmese. Thanks...
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Priya v p,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.