चीन

एशियाई महाद्वीप के पू‍र्व में स्थित एक देश
(चीनचे जनतेचे प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)

चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चॉंऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चॉंऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे. काही अहवालांनुसार, चीनमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% किंवा १२२ कोटी लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.[]

चीन
中华人民共和国
चीनचे जनतेचे प्रजासत्ताक
चीनचा ध्वज चीनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: 义勇军进行曲(अर्थ: स्वयंसेवकांची आगेकूच)
चीनचे स्थान
चीनचे स्थान
चीनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बीजिंग
सर्वात मोठे शहर शांघाय
अधिकृत भाषा चिनी भाषा
 - राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग
 - पंतप्रधान ली कियांग
महत्त्वपूर्ण घटना
 - प्रजासत्ताक दिन १ ऑक्टोबर १९४९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९६,४१,२६६ किमी (३वा क्रमांक)
 - पाणी (%) २.८
लोकसंख्या
 -एकूण १,४१,३२,६०,००० (२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १४०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८८५९ अब्ज अमेरिकन डॉलर (२वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७२०४ अमेरिकन डॉलर (८४वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रेन्मिन्बी (CNY)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+८
आय.एस.ओ. ३१६६-१ CN
आंतरजाल प्रत्यय .cn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +८६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९६ लाख चौरस किलोमीटर आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला तिसरा किंवा चौथा सर्वात मोठा देश आहे. चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. उत्तर आणि उत्तरपूर्वेला मंगोलिया आणि मध्य आशियानजिक गोबी आणि तकलामाकन वाळवंटे आहेत तर नैर्ऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत. चीनचा पश्चिमेकडील भूभाग हा खडबडीत आणि उंचावलेला आहे. हिमालय, काराकोरम, पामीर आणि थ्येन शान पर्वतरांगा याच भागात आहेत. तिबेटच्या पठारावरून निघणाऱ्या यांगत्से आणि पीत नदी या दोन पूर्ववाहिनी नद्या चीनमधील मोठ्या नद्या आहेत. चीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले होते सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये चीननांशुक असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुकाला पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने चालत असे, त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणले जात असे. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेल्या ठाण्यातील नालासोपारा हे होते. भारतात आलेले फायान आणि यंगसांग हे बौद्ध भिक्खू ही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्धभिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले, त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म म्यानमार, जपान, कोरिया, व्हिएतनाम,लाओस,कंबोडिया, या देशांमध्येही पोहोचला.

इतिहास

संपादन

भारताचे चीनशी प्राचीन संबंध असल्याचे पुरावे आहेत. बलबाहु (अर्निको) ने पेकिंग शहराच्या आखणीत बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले आहे. आजही बलबाहूचा पुतळा या शहरात आहे. बलबाहु अर्निको या नावाने चीन मध्ये प्रसिद्ध होता. लिहायला पाहिजे साइयां हा चिनी प्रवासी प्राचीन काळामध्ये दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतामध्ये आला होता आपल्या प्रवासवृत्तात त्याने गुप्तकाळातील समाजजीवनाचे वर्णन केले आहे. तो म्हणतो भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. अनेक धर्मीय संस्थाही भारतामध्ये आहेत शहरांमध्ये हॉस्पिटले आहेत तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. विहार व मंदिरे या ठिकाणी भव्य दिव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारतामध्ये आहे. कोठे जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. येथील लोक दारू पीत नाहीत, हिंसा करत नाहीत. गुप्त राजवटीतील प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. अशा प्रकारे त्याने भारताच्या संदर्भामध्ये आपल्या प्रवास वर्णनात वर्णन केले आहे. भारताबद्दल त्याने गौरवोद्गार काढले आहेत. एकूणच चीन आणि भारत संदर्भातील हा महत्त्वाचा पुरावा आहे.

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चीन प्रमुख आकार पहिला हिंदी भाषेतील चारच्या आकाराचा होता परंतु तिबेट नावाचा स्वतंत्र देश चीनचा एक प्रांत झाल्यामुळे चीनचा क्षेत्रफळ वाढले आहे.

चतुःसीमा

संपादन

चीन हा मोठ्या क्षेत्रफळाचा देश असल्यामुळे याच्या सीमा अनेक देशांशी संलग्न आहेत. चीनच्या उत्तरेला मंगोलिया व ईशान्येला रशिया आहे. पूर्वेला चिनी समुद्र आहे, व नैर्ऋत्येला भारत आहे.

राजकीय विभाग

संपादन

चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग खालीलप्रमाणे आहेत :

मोठी शहरे

संपादन
चीन मधील धर्म (२०१०)
धर्म प्रमाण
बौद्ध
  
91%
ख्रिश्चन
  
2.5%
इस्लाम
  
1.5%
इतर
  
5%

बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून तो सर्वात संघटीत धर्म आहे. प्राचीन चिनी धर्म व बौद्ध धर्माचे अनुयायी येथे मोठ्या प्रमाणात राहतात. चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे,[] चिनी बौद्धांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तसेच जगभरातील १०३ कोटी हिंदू धर्मीयांहून खूपच अधिक आहे. चीनमध्ये ताओवादी कन्फ्युशियसवादी हे सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करतात. चीनमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या ही २.५% (३.३ कोटी) आहे तर इस्लाम धर्माची लोकसंख्या ही अवघी १.५ % (२ कोटी) आहे. उरवर्तीत ५% लोकसंख्या ही अन्य धर्मिय व निधर्मींची आहे. चीन मध्ये बौद्ध मठ आणि विहार यांची संख्या जवळजवळ ३५,०००हून अधिक आहे आणि बौद्ध भिक्खूभिक्खूनींची संख्या अडीच लाखाहून अधिक आहे. जगातील सर्वात मोठे निवासी बौद्ध विद्यालय लारूंग गार बुद्धिस्ट अकॅडेमी येथे असून बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून लाखों विद्यार्थी येतात. १५४ मीटर उंच असलेला 'जगातील सर्वाधिक उंच पॅगोडा' (विहार) याच देशात आहे. स्प्रिंग टेंपल बुद्ध ही जगातील सर्वात उंच मुर्ती चीनमध्ये आहे आणि या मुर्तीची उंची एकूण उंची १५२ मीटर आहे. लेशान बुद्ध ही जगातील दगडाची सर्वात मोठी व उंच मुर्ती आहे याच देशात आहे. तसेच जगातील आकाराने सर्वात मोठी असलेली प्रचंड मोठी मुर्ती चीन मध्येच निर्मिली असून २ किलो मीटर डोंगर चिरून त्यात निद्रावस्थेतील भव्य बुद्ध मुर्ती साकारलेली आहे.

शिक्षण

संपादन

१९८६ साली चीनने सर्व मुलांसाठी नऊ वर्षीय शिक्षण सक्तीचे केले. २००७ साली चीनमध्ये ३,९६,५६७ प्राथमिक शाळा, ९४,११६ माध्यमिक शाळा, व २,२३६ उच्च विद्यालये होती. फेब्रुवारी २००६ मध्ये चीनी सरकारने सर्व विद्यार्थांचे शिक्षण संपूर्णपणे मोफत केले, विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत मिळू लागली.
२००७ साली चीनमधील १५ वर्षावरील ९३.३% जनता साक्षर होती. २००० साली १५ ते २४ या वयोगटातील ९८.९% जनता साक्षर होती.

संस्कृती

संपादन

चीनी संस्कृती सर्वात जूनी संस्कृती समजली जाते कारण त्याला ३००० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. बौद्ध धर्म हा चिनी संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग बनला आहे. ताओ, कन्फ्युझिशियस सारखे चिनी लोक धर्म सुद्धा चिनी संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत.

अर्थतंत्र

संपादन

लष्कर

संपादन

चीनचे लष्करी बळ मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सव्वा कोटी सैनिकांची फौज, सात हजार पाचशे तोफा आणि सहा हजार सातशे रणगाडे असे स्वरूप आहे.

अंतराळ युद्ध

संपादन
  • लष्करी प्रयोजनाच्या ‘टिअ‍ॅनलिअ‍ॅन’ उपग्रहाचा समावेश.
  • उपग्रहावर आधारित नौकानयनासाठी चीन स्वतंत्र व्यवस्था
  • नौकानयनासाठी अमेरिकेची जीपीएस, रशियाची ग्लोनास व स्वतची प्रादेशिक बिडोऊ - १ यंत्रणा

क्षेपणास्त्रे

संपादन
  • एक हजार पाचशे ते १३ हजार किलोमीटपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे.
  • जहाजविरोधी व जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे
  • डीएफ-३१, डी एफ-३१ ए या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे अमेरिकेतील प्रमुख शहरे टप्प्यात. ही क्षेपणास्त्रे डागणारी संपूर्ण फिरती यंत्रणा विकसित
  • क्रूझ क्षेपणास्त्रांचा हवेतून दिवसा व रात्रीही मारा करता यावा म्हणून अतिप्रगत लढाऊ विमानांचा ताफा तैनात.
  • पाणबुडय़ांवरून सात हजार २०० किलोमीटर अंतरावर अचूकपणे डागता येतील अशा ‘जेएन-२’ या क्षेपणास्त्रांचा विकास.

हवाई दल

संपादन
  • चीनच्या हवाई दल व नौदलाकडे २३०० विमानांचा ताफा आहे.
  • त्यामध्ये १६५५ लढाऊ, ६४५ बॉम्बफेकी तर ४५० लष्करी वाहतुकीच्या विमानांचा समावेश.
  • या शिवाय, १४५० जुन्या लढाऊ व बॉम्बफेकी विमानांचा ताफा.
  • हवाई दलाकडील १००हून अधिक विमाने टेहळणी व हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना या कार्यासाठी वापरली जातात.

आण्विक शक्तीवरील पाणबुडय़ा, विनाशिका, पाणसुरूंगांचा वेध घेणारी व ते पेरणारी जहाजे, अतिवेगवान लढाऊ जहाजे आणि अण्वस्त्रांसह इतरही क्षेपणास्त्रांनी सज्ज असणारा पेट्रोल क्राप्टचा ताफा चीन कडे आहे.

  • २७ विनाशिका
  • ४८ लढाऊ जहाजा
  • अण्वस्त्र व इतर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या ६० युद्धनौका
  • २७ मालवाहू व विमानवाहू जहाजे असा ताफा आहे.
  • दहा हजार टनाची हॉस्पिटल नौकेसह सागरी युद्धभूमीवर वैद्यकीय उपचारांची सुविधा आहेत

पायाभूत सुविधा

संपादन

दूरसंचार

संपादन

चीन ही जगातील सर्वात मोठी टेलिकॉम[] बाजारपेठ आहे आणि सध्या पर्यंत जगातील कोणत्याही देशातील सर्वात जास्त सक्रिय सेलफोन आहेत, ज्यामध्ये २०१८ पर्यंत १ अब्ज ग्राहक आहेत. २०१८ पर्यंत दशलक्षपेक्षा जास्त इंटरनेट [] वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठी इंटरनेट आणि ब्रॉडबॅंड[] वापरकर्त्यांची संख्या आहे - जे लोकसंख्येच्या सुमारे ४०% इतके आहे आणि जवळजवळ सर्वच मोबाइल देखील आहेत. २०१८ पर्यंत चीनच्या जवळपास संपूर्ण लोकसंख्येला ४G जी नेटवर्कमध्ये प्रवेश मिळाला होता. 2019च्या सुरुवातीस, चीनमध्ये मोबाइल कनेक्शनची सरासरी वेग 30 Mbit / s (प्रति सेकंद मेगाबाइट) होती, जी अमेरिकेपेक्षा 9% कमी आहे.

वाहतूक

संपादन

१९९० च्या उत्तरार्धात, राष्ट्रीय महामार्ग [] आणि द्रुतगती महामार्गाचे [] नेटवर्क तयार करून चीनच्या राष्ट्रीय रस्ता नेटवर्कचे लक्षणीय विस्तार करण्यात आले. २०१८ मध्ये, चीनच्या महामार्गांची[] एकूण लांबी १,४२,५०० किमी (८८,५००मैल) पर्यंत पोहोचली होती, जी जगातील सर्वात लांब महामार्ग प्रणाली[] बनली आहे आणि चीनच्या रेल्वेने २०१७ पर्यंत १,२७,००० किमी लांबी गाठली. २०१८ च्या अखेरीस, चीनच्या हाय-स्पीड रेल्वे [] नेटवर्कने जगातील एकूण ६०% पेक्षा अधिक प्रतिनिधित्व करणारे २९,००० किमी लांबी गाठली.१९९१ मध्ये, यांग्त्झी नदीच्या मुख्य भागावर फक्त सहा पूल होते, जे देशाला उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागांमध्ये विभाजित करतात. ऑक्टोबर २०१४ पर्यंत असे ८१ पूल व बोगदे होते. ऑटोमोबाईल्ससाठी चीन ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, चीनने विक्री व उत्पादन या दोन्ही बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे. २०१६ मध्ये प्रवासी कारची विक्री २४ दशलक्ष ओलांडली. चीनच्या रोड नेटवर्कच्या वेगाने होणा-या वाढीचा दुष्परिणाम वाहतुकीच्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाला आहे, शक्यतो कारण म्हणून उल्लेखित असुरक्षित रहदारी कायद्यांचा उल्लेख केला गेला.  केवळ २०११ मध्ये, जवळपास ६२,००० लोक रस्ते अपघातात मरण पावले.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts". 4 ऑक्टो, 2015. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "List of countries by number of mobile phones in use". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-30.
  3. ^ "List of countries by number of Internet users". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-21.
  4. ^ "List of countries by number of broadband Internet subscriptions". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-10-25.
  5. ^ "China National Highways". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-11.
  6. ^ a b "Expressways of China". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-11.
  7. ^ "List of countries by road network size". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-16.
  8. ^ "High-speed rail in China". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-20.