च्यांग्सू

(ज्यांग्सू या पानावरून पुनर्निर्देशित)

च्यांग्सू (देवनागरी लेखनभेद : ज्यांग्सू; सोपी चिनी लिपी: 江苏 ; पारंपरिक चिनी लिपी: 江蘇 ; फीनयीन: Jiāngsū ; ) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेला षांतोंग, पश्चिमेला आंह्वी, दक्षिणेस च-च्यांगषांघाय या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस पिवळा समुद्र पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून यांगत्झे नदी वाहते. षांघाय, पैचिंग, थ्यांचिन या प्रांततुल्य महानगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. नानचिंग येथे च्यांग्सूची राजधानी असून सूचौ हे येथील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. शुचौ, वुशी ही देखील ह्या प्रांतामधील प्रमुख शहरे आहेत.

च्यांग्सू
江苏省
चीनचा प्रांत

च्यांग्सूचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
च्यांग्सूचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी नानचिंग
क्षेत्रफळ १,०२,६०० चौ. किमी (३९,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ७,७२,४५,०००
घनता ७३६ /चौ. किमी (१,९१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-JS
संकेतस्थळ http://www.jiangsu.gov.cn/

राजकीय विभाग

संपादन

च्यांग्सू प्रांत १३ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

च्यांग्सूचे राजकीय विभाग

बाह्य दुवे

संपादन