आंह्वी (देवनागरी लेखनभेद: आंहुई, आंह्-वी; सोपी चिनी लिपी: 安徽; फीन्यिन: Ānhuī ) हा चीन देशातला पूर्वेकडील प्रांत आहे. यांगत्सेह्वायहे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या आंह्वीच्या सीमा पूर्वेस ज्यांग्सू, आग्नेयेस च-च्यांग, दक्षिणेस च्यांग्शी, नैऋत्येस हूपै, वायव्येस हनान व उत्तरेस शांतोंग या प्रांतांना लागून आहेत. हफै ही आंह्वीची राजधानी आहे.

आंह्वी
安徽省
चीनचा प्रांत

आंह्वीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
आंह्वीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी हफै
क्षेत्रफळ १,३९,४०० चौ. किमी (५३,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ६,१३,५०,०००
घनता ४४० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-AH
संकेतस्थळ http://www.ah.gov.cn/

भूगोलसंपादन करा

आंह्वी प्रांताच्या उत्तरेकडचा भूप्रदेश सखल असून तो उत्तर चिनी मैदानाचा भाग म्हणून गणला जातो. प्रांताच्या मध्यभागातून ह्वायहे नदी वाहते. आंह्वीच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात व मध्य आंह्वीतल्या ह्वायहे नदीच्या खोऱ्यात दाट वस्ती आहे. प्रांताच्या दक्षिणेकडील भाग डोंगराळ असून त्यातून यांगत्से नदी वाहते. आंह्वीच्या नैऋत्येकडील भूप्रदेशात ताब्ये पर्वतरांग पसरली असून तिच्यापासून फुटणाऱ्या डोगरांच्या व लहानलहान टेकड्यांच्या माळा आंह्वीच्या आग्नेय भागापर्यंत पसरल्या आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत



कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.