शांघाय
षांघाय, रूढ लेखन शांघाय, (अन्य लेखनभेद: षांगहाय, शांगहाय, शंघाई, शांघाई ; सोपी चिनी लिपी: 上海; पिनयिन: Shànghǎi; उच्चार: शांग-हाऽ-इ; (अर्थ: समुद्रकिनाऱ्यावरचे); वू: Zånhae; आयपीए: [zɑ̃'he]), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे[१]. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत्रांपैकी एक असलेल्या शांघाय महानगराची लोकसंख्या इ.स. २०१० सालच्या जनगणनेनुसार २ कोटी ३० लाख एवढी आहे. हे जगातले एक प्रमुख वित्तीय केंद्र असून मालाच्या आवकजावकीनुसार जगातील सर्वाधिक वाहतुकीचे बंदर[२] आहे.
शांघाय 上海市 |
|
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर) | |
वरपासून घड्याळाच्या काट्यांनुसार जात : पूतोंगाची आकाशरेखा (शांघाय टॉवरसह), यू बाग, इ.स. २०१० एस्क्पोचे चीन पॅव्हिलियन, निऑन दिव्यांनी झगमगणारा नांजिंग रस्ता, शांघाय बांध |
|
देश | चीन |
राज्य | - |
स्थापना वर्ष | ५ - ७ शतक |
महापौर | हान चंग |
क्षेत्रफळ | ७,०३७ चौ. किमी (२,७१७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १३ फूट (४.० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,८८,८४,६०० |
- घनता | २,६८३.६ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.shanghai.gov.cn/ |
चिनाच्या पूर्व किनारपट्टीवरचे शांघाय यांगत्से नदीच्या मुखापाशी वसले आहे. शांघाय महानगर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा च्यांग्सू आणि च-च्यांग या प्रांतांना भिडल्या असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "सिटीज: लार्जेस्ट (विदाउट सराउंडिंग सबर्बन एरियाज् (अर्थ: नगरे : भोवतालचा उपनगरी भाग वगळून सर्वांत मोठी नगरे)" (इंग्लिश भाषेत). २० एप्रिल, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "टॉप ५० वर्ल्ड कंटेनर पोर्ट्स (अर्थ : जगातली मालवाहतुकीची अव्वल ५० बंदरे)" (इंग्लिश भाषेत). 2012-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2008-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)