शांघाय टॉवर (चिनी: 上海中心大厦) ही चीनच्या शांघाय शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या पुडोंग परिसरात असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल ६३२-मीटर (२,०७३ फूट) इतकी असून ती (दुबईच्या बुर्ज खलिफा खालोखाल), २०१८मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत होती. शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच ह्या इमारतीमधील सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या लिफ्ट या जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये ते पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची सर्वसाधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.

शांघाय टॉवर
上海中心大厦
सर्वसाधारण माहिती
प्रकार मिश्र
ठिकाण पुडोंग, शांघाय
31°14′7.8″N 121°30′3.6″E / 31.235500°N 121.501000°E / 31.235500; 121.501000
बांधकाम सुरुवात २९ नोव्हेंबर २००८
पूर्ण ६ सप्टेंबर २०१४
ऊंची
वास्तुशास्त्रीय ६३२ मी (२,०७३.५ फूट)
छत ६३२ मी (२,०७३.५ फूट)
वरचा मजला ५८७.४ मी (१,९२७.२ फूट)
एकूण मजले १२८ (+५ तळमजले)
क्षेत्रफळ ३८०,००० चौ.मीटर
बांधकाम
वास्तुविशारद जून झिया

चित्र दालन

संपादन

बाह्य दुवे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन