चोंगछिंग (लेखनभेद: चोंग्छिंग ; चिनी: 重庆 ; फीनयीन: Chongqing) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे.

चोंगछिंग
重庆
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

वरपासून खालपर्यंत घड्याळाच्या दिशेनुसार जात : च्येफांगपै सीबीडी भागातील आकाशरेखा, पायदीचंग मंदिर, यांगत्से नदीवरील छाओ-थ्यॅनान्मन पूल, छूथांग घळ, जनतेचे महान सभागृह
चोंगछिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 29°33′00″N 106°30′25″E / 29.55000°N 106.50694°E / 29.55000; 106.50694

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३१६
क्षेत्रफळ ८२,३०० चौ. किमी (३१,८०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,१४,४२,३००
  - घनता ३८२ /चौ. किमी (९९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.cq.gov.cn/

उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे.

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)